फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक गोल करून रुनीचं घोडं एकदाचं गंगेत न्हायलं म्हणायचं ...२०१८ मधे तो असण्याची शक्यता कमीच!

ग्रीस-जपान मॅचमधे ग्रीसनं किती ती यलो कार्डस घेतली Uhoh

तुम्ही इंग्लंडचे फॅन आहात का? >> आता नाहीये...! काल किती वाईर्‍ट्ट हारले. युरुग्वे चा दुसरा गोल इंग्लंडच्या खेळाबद्दल सर्वकही सांगून जातो.

जेरार्ड अगदीच सुमार होता काल. रूनी चांगला खेळला. काल तो इंग्लंडचा सर्वोत्तम खेळाडू होता. इंग्लंडचा बचाव खराब आहे ते माहित होते, पण इतका...?

आता इंग्लंड क्वालिफाय होण्यासाठी इटली ने उरलेले दोनही सामने जिंकायला हवेत.

आता इंग्लंड क्वालिफाय होण्यासाठी इटली ने उरलेले दोनही सामने जिंकायला हवेत - आणि इंग्लंडने कोस्टारिकाला मोठ्या गोल फरकाने हरवायला हवे आहे..

ज्या पद्धतीत कोस्टारिकाने उरुग्वेला हावरले ते बघता ही शक्यताच रहाणार..

<< आता इंग्लंड क्वालिफाय होण्यासाठी इटली ने उरलेले दोनही सामने जिंकायला हवेत >> एखाद्या चांगल्या संघाला 'क्वालीफाय' होण्यासाठीं इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणं, हें जरा लाजिरवाणंच ! पण बर्‍याचदां विविध खेळांच्या मोठ्या स्पर्धांमधे अशा तर्‍हेने 'क्वालीफाय' झालेले संघही नंतर खेळ उंचावून विजेते पण होतात, असाही अनुभव आहेच [ उदा. पाकिस्तानने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक, आत्तांच आयपीएलमधे सुरवातीला निराशाजनक खेळ करून केकेआरने शेवटीं मारलेली मुसंडी इ.इ.] त्यामुळें, सध्यां कोणत्याही संघावर काट न मारणं हेंच उत्तम !

ओ भाउ................... केकेआर ने सलग ९ सामने जिंकुन चषक जिंकलेला आहे.... राजस्थान स्वतःच्या कर्माने बाहेर पडली होती Biggrin

<< केकेआर ने सलग ९ सामने जिंकुन चषक जिंकलेला आहे.... >> मुद्दा तर तोच आहे; सुरवातीचे सलग पांच सामने हरून, गुण-तक्त्यात तळाला असूनही केकेआरला नंतर लय मिळूं शकली !!!

थोडं सविस्तरपणें मला असं कां वाटतं तें - १] नविन हवामान व वातावरणाशी जुळवून घेताना कांहीं संघांची लय सुरवातीला कांहींशी बिघडण्याची शक्यता असते. [ 'अ‍ॅक्लेमटायझेशन'चं महत्व पूर्वींच्या विश्वचषकांच्या तयारीत प्रत्येक देशात लक्षात घेतलं जायचंच]. ब्राझीलचा अपवाद वगळतां बहुतेक द. अमेरिकेतील संघ सुरवातीपासूनच अपेक्षेपेक्षां चांगला खेळ करताहेत, हेंही याबाबतींत लक्षांत घ्यायला हवं; २] बर्‍याच देशांच्या संघांतील खेळाडू वेगवेगळ्या क्लबमधून विखुरलेले असल्याने संघ म्हणून एकत्र सामने खेळण्याचा सराव त्याना कमीच असतो. जस जसे सामने होत जातील तस तशी त्याना एकत्र खेळण्याची लय सांपडून संघाचा खेळ उंचावूं शकतो. [ कदाचित हें खूपच 'थिऑरेटिकल' वाटेल पण मला ही शक्यता जाणवते, हें खरं ]

<< इंग्लैंडा बोंबल रे आता >> आत्तां मध्यंतर तर झालंय ! Wink
कोस्टारिकाचा गोल मात्र अप्रतिम सेंटर व हेडर होता !!

अंतिम स्कोअर - कोस्टारिका -१ , इटली -० !!
इटलीने शर्थीचे प्रयत्न केले पण कोस्टारिकाचं 'मिडफिल्ड मार्कींग' जबरदस्त होतं. इटलीच्या बहुतेक चाली त्यानी परतवल्या. 'ऑफ-साईड ट्रॅप'चाही योग्य उपयोग केला व मुख्य म्हणजे आघाडी मिळाल्यावरही बचावावर न थांबतां आक्रमण चालूच ठेवलं. निकाल न्याय्यच !

लय भारी खेळले कोस्टारिका.. इटलीला फार कमी चान्सेस दिले गोल मारण्याचे.. पझेशन जरी इटलीचे जास्त दिसत असले तरी चान्स कमी मिळाले त्यांना...

फ्रान्सनी पार धुव्वा उडवला स्विसचा.. ५-२..

इटली अत्यंत मुर्खासारखे खेळले काल...... दोन वेळा चांस मिळुन सुध्दा तुम्ही अतिशय घाईत असल्यासारखे बॉल ला जाळ्यात ढकलण्याचा प्रयत्न करणार तर होईल का गोल ? जरा आजुबाजुला देखील बघा... कोणीच नव्हते...आरामात गोल होणार होता तरी करता आला नाही......

फ्रांन्स ने चांगली सुरुवात केली....... स्विस वाले उशिरा जागे झाले ......

१७ व्या मिनिटाला एक गोल झाला आहे तर किमान तत्पर राहायचे की नाही.... ढिसाळापना नडला डिफेंस वाले देखील गोल करण्याच्या इर्षेने पुढे आले आणि गोलकीला एकट्याला टाकले...... तेच ५ व्या गोल ला झाले.. खर तर कॉर्नर स्विस ला मिळालेला पण पठ्ठ्याने असा काही बॉल मारला की फ्रान्स वाल्याने लगेच घेउन स्विस वाल्यांच्या गोल कडे पाठवुन दिला........सोप्पा पास होता....... तेव्हा देखील डिफेस्वाले बोंबलत दुसरी कडे होते..

सहावा गोल देखील झालेला परंतु जेव्हा किक मारली गेली तेव्हाच शिट्टी मारली असल्याने तो गोल वैध धरला नाही

साला काल जागरण झाले त्याच्या नादात Happy

<< साला काल जागरण झाले त्याच्या नादात >> भारतातल्या अनेक घरात सकाळीं ही कुरकूर फिफा फायनल होईपर्यंत ऐकायला मिळणार, हें नक्की ! Wink

जर्मनीला घानाने २-२ वर रोखले ....... अजुन एक अनपेक्षित निकाल...... ०-० वर रोखने वेगळे आणि २-२ वर रोखने वेगळे ... जर्मनीचा बचाव घानाने बर्याच वेळॅला भेदलेला.. सुरुवातीचे ३० मिनिट तरी घानानेच जर्मनीवर आक्रमन केलेले.

वाॅट ए गेम! हातातुन मॅच निसटली पण पैसे वसुल!! ९४ व्या मिनीटाला गोल? धिस इज इनक्रेडिबल,,,

पुढच्या फेरीतल्या प्रवेशासाठी ग्रूप 'ए'मधला ब्राझील, मेक्सिको व क्रोएशिया यांच्यातला तिढा आज रात्री सुटणार !
मॅराडोना 'येने केन प्रकारेण.. ' यानुसार प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी भडक विधानं करून स्वतःचं हंसं करून घेतोय ! [ आणि मीं येडपटासारखं अर्जेंटीनाच्या प्रशिक्षणात तो सहभागी आहे असं इथं म्हणून बसलों !].

काल दोन्ही मॅचेस मस्त झाल्यात... त्यातल्या त्यात... नेदरलंड आणि चिलीची मॅच म्हणजे कोण चुका जास्त करतो याची स्पर्धाच लागली होती... रॉबिन एकटा खेळुन बॉल गोलपोस्ट जवळ आणत होता आणि जेव्हा तो पास देत होता तेव्हा त्या ठिकाणी खेळाडुच नसायचा.. एकतर फार लांब असायचा या फार आधीच पुढे गेला असायचा.. एक जण तर इतका मुर्ख होता की दोन खेळाडु गोलपोस्ट वर आहे आनि हा तिसरा बागेत फिरल्यासारखा फिरत होता.. जणु तुम्ही खेळतात मला देतच नाही ...जरा तरी अ‍ॅक्टिवपणा दाखवला नाही अन्यथा पहिल्या हाफ मधेच हॉलंड चा गोल झाला असता...

ब्राझील ची मॅच ही पर्वणीच होती जागरणाची.. १७ व्या मिनिटाला नेयमार चा गोल आणि त्या पाठोपाठ कॅमेरुन चा गोल २७ व्या मिनिटाला.. पण नंतर नेयमार ने परत गोल करुन केमरुन चा चांस घालवला.... ब्राझील चा ३ रा जो गोल होता तो आक्रमक कशाला म्हणतात याचे नुमना होता .. किमान ५-६ वेळा गोलपोस्ट वर बॉल मारलेला आणि परत आल्यावर त्यावर ताबा मिळावुन परत जाळ्यात मारण्याचा प्रयत्न होत होता....एकाची किक चुकली तर दुसरा बॉल वर नियंत्रण मिळवुन परत किक मारायचा.. अश्या ६-७ वेळा झाल्यावर हेडर वर गोल झाला..

अमेरिका चांगली सरळ जिंकत होती तर शेवटच्या एक दोन मिनिटात घोटाळा झाला. टाय! वाईट वाटले. पोर्तुगालचा रोनॉल्डो फारसा चमकला नाही. त्याचा पाय अजून दुखत असावा.

आणि ही चावाचावी कुठून आली सॉकरमधे? तो सुअरेझ म्हणे बरेचदा चावतो, पूर्वीसुद्धा तीनदा पकडला गेला होता. अजूनहि त्याला फिफा मधून हाकलले कसे नाही?

काय अप्रतिम सामना झाला : अर्जेंटीना ३ - नायजेरिया -२ !
अत्यंत वेगवान व शैलीदार हल्ले व प्रतिहल्ले ! मेस्सीच्या 'लेफ्ट फूट'ची कमाल [ गोलकडे ४ शॉटस , २ गोल !] !! पुढच्या फेरीत काय मेजवानी वाढून ठेवलीय त्याची एक झलकच पहायला मिळली आज !

Pages