फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पेनबद्दल भलती अँटि इनकंबंसी दिसतेय. चांगली टीम होती. सलग दोन युरो आणि वर्ल्ड कप जिंकणे सोपे नाही. पण आता टीमचा चेहेरा बदलावा लागेल. टोरेस, कोस्टा अजिबात प्रभाव टाकू शकत नाहीत. मध्य आणि बचावातले अनेक खेळाडू काहीसे थकलेत. ही टीम पाच सहा वर्षे खेळतेय. या लेवलला फिटनेस टिकवता येत नाहीये.

स्पेनच्या गोलार्धाच्या सुरवातीपासून उजव्या बगलेवरून सुरेख चाल रचून चिलीने पहिल्या १५-२० मिनीटांत केलेला कालचा पहिला गोल प्रेक्षणीय तर होताच पण स्पेनला हादरवून टाकणारा ठरला. स्पेनच्या गोलकीपरने परतवलेल्या हल्ल्यातला बॉल हेरून त्याच क्षणीं तो गोलमधे भिरकावून चिलीने केलेल्या दुसर्‍या 'संधीसाधू' गोलने तर स्पेनचं अवसानच गळून पडलं.
ब्राझील वि. मेक्सिको या सामन्यापेक्षां कालचा स्पेन वि. चिली सामना खूपच जोषपूर्ण व विश्वचषकाच्या दर्जाला शोभेसा वाटला. निदान मला तरी.
<< ... मला पॉल म्हणा >> तुमच्या ब्राझील वि. मेक्सिको मॅचच्या भविष्यवाणीचं काय ? Wink

येस भाऊ, जोश आणि क्वालिटी पहायची तर ऑस्ट्रेलिया नेदरलँडही उत्कृष्ट सामना झाला. ऑस्ट्रेलियाने शेवटपर्यंत झुंज दिली. ब्राझिलपेक्षा नेदरलँड फार ऑर्गनाईझ्ड वाटतायत.

<< ही टीम पाच सहा वर्षे खेळतेय. या लेवलला फिटनेस टिकवता येत नाहीये.>> अमेयजी, अगदीं खरंय.शिवाय, जिंकण्याच्या ईर्षेलाही नकळत उतरती कळा लागत असावी. चिली 'फिटनेस', 'ऑर्गनाईज्ड' व ' मोटीव्हेशन' या तिन्ही बाबतींत स्पेनपेक्षां खूपच सरस वाटली, निदान काल तरी. अर्थात, कांहीं संघ स्पर्धेच्या उत्तरार्धात लय सांपडून बहरात येतात, हाही अनुभव आहेच . पण त्याकरताही त्यानी उत्तरार्धात प्रवेश करण्याइतपत तरी प्राथमिक फेरीत चांगला खेळ करणं याला पर्यायच नाहीं. स्पेनला हा धडा मिळालाय व काल क्रोएशियाने कॅमरूनला ४-० हरवून ग्रूप 'ए'मधे ब्राझील व मेक्सिकोसाठीं अशी अनिश्चितता निर्माण केलीच आहे !

ग्रूप अ मध्ये ब्राझिल - कॅमेरुन आणि मेक्सिको - क्रोएशिया अश्या मॅचेस बाकी आहेत. पहिल्या मॅच मधून ब्राझिल हारले तरच बाहेर जातील.. नाहीतर ते पुढच्या फेरीत नक्की.. एकच शक्यता आहे.. ब्राझिलला एकही गोल करता आला नाही आणि मॅच ड्रॉ झाली.. आणि क्रोएशिया आणि मेक्सिकोची मॅच एक एक किंवा दोन -दोन गोल नी ड्रॉ झाली तर गोल डिफरन्स सेम राहिल पण गोल्स फॉर क्रोएशियाचे जास्त होतील.. त्यामुळे ते पुढे जाऊ शकतात.

एकच बघितले नाहीये अजुन.. गुण बरोबर झाले तर त्या दोन टीम्स मधली विजेती टीम पुढे जाईल की गोल डिफरन्स वर निर्ण्य होईल..

<< गुण बरोबर झाले तर त्या दोन टीम्स मधली विजेती टीम पुढे जाईल की गोल डिफरन्स वर निर्ण्य होईल.. >> प्रथम गोल डिफरन्स व तो सारखाच असेल तर त्या दोन संघातला विजेता संघ. तेंही निर्णायक होत नसेल तर चिठ्या टाकून .
[According to FIFA's official rules, tiebreaking procedures are in place if need be. In the event that two teams are tied, a distinction will be made based on goal differential followed by total goals.

In the somewhat unlikely event that a tie still exists, it will then come down to the head-to-head result between those two teams. If they are still tied after that, then the FIFA Organizing Committee will hold a random draw to determine who advances.]

विशेषतः ह्या विश्वचषक स्पर्धेत या नियमाना कधी नव्हे इतकं महत्व येणारसं दिसतंय !!!

म्हणजे ब्राझिल हारले तरच बाहेर... कारण मेक्सिकोचा गोल डिफरन्स एक आहे आणि ब्राझिल आणि क्रोएशियाचा दोन आहे.

मेक्सिको - क्रोएशिया बरोबरी झाली तर मेक्सिको चे ५ गुण आणि ते पुढे जातील. क्रोएशिया चा पण गोल डिफरन्स तेव्हढाच राहिल.. पण ब्राझिल कडून हारल्यामुळे ते बाहेर जातील.

<<म्हणजे ब्राझिल हारले तरच बाहेर... >> 23 जूनला मेक्सिको वि. क्रोएशिया व ब्राझील वि. कॅमेरून हे दोन्ही सामने नेमके एकाच वेळीं खेळले जाणार आहेत ! ब्राझीलला घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याचा फायदा होण्याऐवजी त्याचा अवाजवी दबाव तर येत नाहीय ना त्यांच्यावर ! तसं असेल तर कॅमेरूनवर आतां कसलंच प्रेशर नसल्याने व ब्राझीलवर जिंकायचा अतिरिक्त दबाव असल्याने कांहीं अघटीत न घडो, इतकंच !

मला वाटतंय ब्राझील क्रोएशिया जातील पुढे. मेक्सिको चांगलीच आहे पण गोल करण्याची स्ट्रायकर पॉवर क्रोएशियाकडे जास्त आहे.

सर्वच दृष्टिनी पाहिलं तरी ब्राझील पुढे जावं असं तीव्रतेने वाटतंय, हें मात्र खरं; त्यांची अशी एक खेळाची शैली आहे व ती पहाताना तुमच्या अनेक जुन्या आठवणीना उजाळाही मिळतोच. शिवाय, यजमानाशिवाय या प्रचंड सोहळ्यातली गंमतच जाईल असंही वाटतं. असं वाटणं बरोबर कीं चूक, माहित नाहीं !!!

ह्म्म, स्पेन बाहेर गेल्यामुळे मी दु:खी मोडमधे.
अमेयच्या सगळ्या पोस्टसना +१.
आता अर्जेंटिना आणि जर्मनीला चिअर करणार. बघुयात.
ऑस्ट्रेलिया vs नेदरलँड्स - ट्रीट होती. खुप टफ दिल्यामुळे मजा आली.
पोर्तुगाल vs जर्मनी - जखमा/दुखापतींनी भरलेली मॅच होती. म्युलर भारीच. पेपे एकदम बॅड बॉय. नेहमीच सरकुपणा करतो.
उरुग्वे काय हरली यार? मला यावेळेस खुप धक्के बसताहेत त्यामुळे आजपासुन नो एक्सपेक्टेशन्स.
चिली - स्पेन - बंडु मॅच. Sad

यावेळेस गोल्डन बुटसाठी रॉबेन आणि म्युलर कंपिट करणार बहुतेक. दोघंही ३-३ आहेत. म्युलरला या आधीच्या वर्ल्ड कपला मिळाला होता, पण रॉबेनही खुप मस्त खेळतो आहे.

एकुणा

व्हॅन पर्सीपण आहे रेस मधे... पण पुढची मॅच तो बाहेर बसणार आहे दोन बॅक टू बॅक यलो कार्डस मिळातील त्याला..

पर्सीला मी त्याच्या एका हेडरसाठी स्पे अ‍ॅवॉर्ड देवुन टाकलं आहे. तो वॉस्सॅप मेसेज काय appropriate आहे.
it is a bird? is it a aeroplane ? No it is Van Persie ! काय पॉवरफुल एन अ‍ॅमेझिंग हेडर होता तो.

आज रात्री साडेबारा इंग्लंड - उरुग्वे ..... दोघांसाठी करो या मरो मामला. लुईज सुआरेज खेळतोय का? त्याचे फिट असणे मोठी डोकेदुखी ठरेल इंग्लंडसाठी.

त्याआधी साडेनऊची कोलंबिया - आयव्हरी कोस्टपण दोन वेगळ्या फुटबॉल शैलीसाठी बघाच.

स्पर्धा इज हॉटींग अप. मज्जाच मज्जा.

अमेय, तो खेळतोय बहुतेक तरी आज. स्टरीज आणी तो लिव्हरपूल चे दोन सर्वात यशस्वी गोलस्कोरर्स (या वर्षीचे) आजएकमेकांससमोर असणार आहेत. रूनीला सेंटर मिडफील्ड ला खेळवण्याची जोरदार शक्यता आहे, त्यामुळे त्याचा खेळ बहरेल असे वाटते. इंग्लंड चे आक्रमण खूप वर्षांनंतर धारदार वाटतेय. दोन्ही संघांसाठी बचाव ही मोठी डोकेदुखी आहे. इंग्लंड जिंकेल असं वाटतंय... ३-१

जेरार्डची साथ मिळायला हवी रुनी आणि स्टरीजला. स्टर्लिंग आणि जॉन्सन चांगले खेळले होते मागच्या सामन्यात. लँपार्डला सबस्टिट्यूट म्हणून उतरवून पाह्यला हरकत नाही. कमी काळ मैदानावर असेल तर फिटनेसचा प्रश्न न येता प्रभावी ठरू शकतो.
रूनीच्या नावावर वर्ल्ड कपचा एकही गोल नाहीये अजून. तो डाग धुवून निघायला हवाच असेल त्याला. जिंकायसाठी जी टीम जास्त डेस्परेट असेल तीच जिंकेल.

यंदा एक नवीन ट्रेंड बघायला मिळतो आहे.. बरेच प्लेअर्स दोन वेगळ्या रंगाचे बूट घालून खेळत आहेत. असेच प्रकार आता सगळ्या खेळात बघायला मिळणार बहुतेक.

उरुग्वे २ - इग्लंड १ . सुआरेज..... काय गोल केलेत पठ्ठ्याने. तो आल्यामुळे उरुग्वे वेगळीच टीम वाटत होती. रूनीने गोल केला पण इग्लंडची इर्षा थोडी कमी पडली.
इंग्लंडची आशा संपल्यातच जमा आहे. इटलीने पुढील दोन्ही मॅच जिंकल्या आणि इग्लंडने कोस्टारिकाला मोठ्या फरकाने हरवले तर काही चमत्कार होईल पण शक्यता फार कमी.
अन्यथा बाकी तीन संघात शेवटपर्यंत जबरदस्त चुरस असेल. कोणीतरी चांगले खेळूनही निराश होणार आहे या गटात.

कोलंबिया २ - आयव्हरी कोस्ट १
बर्‍याच काळानंतर वर्ल्ड कपमध्ये खेळणार्‍या फुटबॉलवेड्या कोलंबियात पार्टी चालू असणार दोन विजयांनंतर.

रुनीचा विश्वचषकातला पहिला गोल झाला यापलिकडे रुनीला, जेरार्डला व इंग्लंडला कालच्या सामन्यात कांहीं विशेष चमक दाखवतां आली नाही, हें इंग्लंडचे फॅनही मान्य करतील.

इंग्लंड घाण खेळले काल.. किती त्या पासिंगच्या चुका.. आणि आपले खेळाडू मध्यात नुसतेच माश्या मारत बसले आहेत ते ही दिसत नव्हते त्यांना.. स्पेसिफिकली लेफ्ट फ्लँकला बॉल गेल्यावर तर अगदीच स्वतः कडेच बॉल ठेवून काय मिळवत होते तर काहीच नाही.. दोन मॅच हारल्यावर इंग्लंड स्पर्धेतून बाहेर गेल्यातच जमा आहेत.. कितीही आदळआपट केली तरी ते बाहेर आहेत...

पोर्तुगालचा नंबर लागू शकतो.. तसेच कोस्टारिका कसे खेळतात त्यावर इटली किंवा उरुग्वे ह्यांचा ही नंबर लागू शकतो....

दोन विजय मिळाले की तुम्ही पुढच्या फेरीत नक्की जाताय..

ग्रूप क एकदमच इंटरेस्टींग झालाय कोलंबिया पुढे गेलेलेच आहेत पण उरलेल्या तिन्ही टीम्स (आयव्हरी कोस्ट, जपान आणि ग्रीस) ला चान्स आहे.

<< इंग्लंड घाण खेळले काल >> + << सुआरेज..... काय गोल केलेत पठ्ठ्याने. >> = कालची मॅच !!
कालच्या काँमेंट्रीमधलं सुआरेजबद्दलचं एक वाक्य - England would love to see the back of him !

सुआरेज, रुनी... नेमार, मेस्सी .. या सर्वांचं कौतुक असलं तरीही ह्या विश्वचषकातील निकाल खास एकच गोष्ट अधोरेखीत करताना दिसताहेत - फुटबॉल हा सांघिक खेळ आहे !

Pages