फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< इंग्लंडच्या रुनी आणि जेरार्डकडूनही अश्याच अनुभवी खेळाची अपेक्षा होती पण दोघेही फिके पडले.>> खरं तर कालची इंग्लंडची मॅच नाही पाहिली. पण हे दोनही खेळाडू गेले कांहीं हंगाम अचानक व अकाली फॉर्म हरवून बसल्यासारखेच कां वाटत होते ? वास्तविक रोनाल्डो एमयूमधून गेल्यावर रुनी बहरून येईल अशी अपेक्षा होती.

अर्जेंटिनाने बोस्निया-हर्झगोविनाला २-१ ने हरवले खरे पण थोडासा घाम गाळावा लागला. पहिला तासभर फारस काही करू न शकलेल्या मेस्सीने गोल मात्र अप्रतिम केला. चार चार खेळाडूंना चकवत मस्त ड्रिबलिंग केले. २००६ च्या स्पर्धेनंतर विश्वचषकात हा मेस्सीचा पहिलाच गोल. रोनाल्दोबरोबर सध्या जगात सगळ्यात चांगला खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेस्सीच्या नावावर तीन विश्वचषक खेळूनही आता फक्त दोन गोल जमा आहेत. तीच गत रोनाल्दोची. तोही तीन स्पर्धांत खेळलाय पण गोल अजून दोनच.
या स्पर्धेत दोघे या अपयशाची भरपाई करतील तर स्पर्धा तूफान होईल.

स्वित्झर्लंडने इक्वेडोरला २-१ हरवताना जिगरबाज खेळ केला. मध्यंतरापर्यंत इक्वेडोर पुढे होते.

आयव्हरी कोस्टने जपानला २-१ ने हरवले. त्यांचा आयकॉनिक प्लेअर द्रोग्बा बदली खेळाडू म्हणून उतरल्यावर आयव्हरी कोस्टचा खेळ बहरला. पिछाडी भरून काढत सामना जिंकला.

रिबेरीविना खेळणार्‍या फ्रान्सने होंडुरासला ३-० हरवले याचे त्यांनाही विशेष वाटले असणार. रिअल माद्रिदसाठी खेळणार्‍या बेन्झेमाने चांगला खेळ करून दोन गोल मारले.

आत्तापर्यंत एकही मॅच ड्रॉ झालेली नाही, गोल्सही भरपूर. मजा येतेय. सामन्यातील पहिला गोल करणे काही संघांना जिंक्स ठरले. क्रोएशिया, स्पेन, जपान आणि इक्वेडोर आघाडी घेऊनही हरले.

आज रात्री जर्मनी - पोर्तुगाल बघायला विसरू नका.

<< त्यांचा आयकॉनिक प्लेअर द्रोग्बा बदली खेळाडू म्हणून उतरल्यावर आयव्हरी कोस्टचा खेळ बहरला. >> ड्रोग्बा ! वयाच्या १८व्या वर्षीं व्यावसायिक खेळाडू होवून, सर्व किताब मिळवून , आज ३६व्या वर्षींही त्याचा ३रा फुटबॉलचा विश्वचषक खेळतोय व तेंही दरारा निर्माण करत !! जपानविरुद्ध त्याला सुरवातीलाच उतरवलं नाही म्हणून नाराजीही व्यक्त केलीय त्याने !!! ग्रेट !!!

जर्मनी ४ पोर्तुगाल -० !!!
जर्मनीपुढे रोनाल्डो व पोर्तुगाल अगदींच निष्प्रभ !!

जर्मनीने छान सांघिक खेळ केला...पण मॅच बघताना असे वाटत होते की दोन्ही संघ पूर्ण क्षमतेने खेळत नव्हते...जर्मनीने तर पोडलस्की, क्लोस आणि श्वाईनस्टीगर यांना विश्रांतीच दिली होती. पण बहुदा हेच दोन्ही संघ पुढच्या फेरीत जाणार असे वाटल्याने खेळ सावधच होता.
पेपे ने बळचं करून रेड कार्ड ओढवून घेतले. थॉमस म्युलरचा खेळ मस्त...त्याचा रुपाने जर्मनीला क्लोसचा वारसदार मिळाला आहे आणि न्युअर हा ऑलीव्हर कान्हचा...
सध्याचा जर्मनीचा संघ चांगलाच तुल्यबळ आहे आणि संभाव्य विजेते म्हणून त्यांच्याकडे बघण्यास नक्कीच हरकत नाहीये...

<< पण मॅच बघताना असे वाटत होते की दोन्ही संघ पूर्ण क्षमतेने खेळत नव्हते...>> अगदीं ! पोर्तुगाल पिछाडीवर असूनही त्यांच्या खेळात त्याचा खास दबाव किंवा 'अर्जन्सी' जाणवत नव्हती. त्यांतच, काल दुखापतींचंही पेंव फुटलं होतं. रोनाल्डोही जरा हातचं राखूनच खेळत होता, असंही वाटलं.
[ जर्मनीचा संघ, फुटबॉल असो किंवा हॉकी व इतर खेळ, त्यांत 'म्यूलर' नांव दिसलं कीं अस्सल जर्मन व भारदस्त वाटतोच ! Wink ]

बाकी, ४-० हा स्कोअर अर्जेंटिना-बोस्निया मॅचला अधिक शोभून दिसला असता. तिथे बोस्नियाने चांगली फाईट दिलेली दिसतेय.

आज शेवटच्या ग्रुपच्या पहिल्या मॅचेस आणि ग्रुप अ मधल्या टीमची दुसरी मॅच - मेक्सिको वि. ब्राझील... ही मॅच ब्राझीलला नक्कीच अवघड जाणार आहे..

आज अमेरिकेने घानाला हरवले आणि पुढच्या फेरीत जाण्याची तयारी केलेली आहे.. क्लिन्समन फारच खुश होता विजयामुळे..

<< मेक्सिको वि. ब्राझील... ही मॅच ब्राझीलला नक्कीच अवघड जाणार आहे.. >> खरंय. मेक्सिकोने कॅमेरूनविरुद्ध चांगला खेळ करून पहिली मॅच जिंकली असल्याने व त्यांची ग्रूपची शेवटची मॅच क्रोएशियाविरुद्ध असल्याने त्यांच्यावरचा दबाव बराच कमी असेल व ते ब्राझिलशीं नेटाने लढतील असं वाटतंय.

<< नाही नाही ब्राझिल ३-१ ने विजयी होईल >> उदयनजी, ब्राझिल हरेल असं नाही म्हणत; मॅच अटीतटीची होईल असं वाटतं, इतकंच.

<< ब्राझिल एका रोनाल्डो वर विसंबून नसते 11 रोनाल्डो मेस्सी आहेत >> अरेच्चा, मग स्टेडियम बांधण्यावर एवढा अवाढव्य खर्च करून एक महिना आम्हाला जागरण करायला कां लावताहेत ? सरळ देवूनच टाकायचा ना 'विश्वचषक २०१४' ब्राझिलला !! Wink [ माझ्या अवांतर फालतूपणाबद्दल क्षमस्व ]

परत एकदा पहिला गोल पेनल्टीवर.. पंधरामधल्या ६ मॅचेस मध्ये पहिला गोल पेनल्टीवर झालाय.. आणि आत्ता पर्यंत फक्त एकच मॅच ड्रॉ झालीये..

बेल्जियमची निराशाजनक सुरुवात. टीमबद्दल खूप ऐकलं होतं पण पहिल्या हाफमध्येतरी अल्जिरियन बचाव भेदू शकलेले नाहीत. अल्जिरियाचा गोल हा त्यांनी विश्वचषकात २८ वर्षांनी अणि जवळजवळ ५०० मिनिटे खेळल्यावर केलेला पहिला गोल होता. दुसर्‍या हाफमध्ये बचाव शाबूत राखला तर आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद होईल.
ब्राझील मेक्सिकोची मेन डिश खाण्याआधीचे हे स्टार्टरही मजेदार वाटतंय Happy

<< ब्राझील मेक्सिकोची मेन डिश खाण्याआधीचे हे स्टार्टरही मजेदार वाटतंय >> उदयनजी कितीही म्हणत असले कीं ब्राझिलसाठी मेक्सिको ही मेन डीश म्हणजे ' बोनलेस चिकन' आहे तरीही आपण ती सर्व्ह होईपर्यंत आज जागणार ,हें नक्की !

ब्राझील -०, मेक्सिको -० !!!
मेक्सिकोच्या गोलीने ब्राझीलला रोखलं म्हणायला हवं; दोन अप्रतिम 'सेव्हज' !
तरी पण चषक जिंकण्यासाठीं ब्राझीलला खेळ खूपच उंचवावा लागणार हें निश्चित [ अर्थात, कालच्या निकालामुळे त्याना आधीं स्पर्धेचा पुढचा टप्पा गांठण्यावरच लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे]. काल प्रशिक्षक स्कोलेरोलाही हें नक्कीच जाणवलं असावं असं त्याच्या हावभावांवरून वाटलं. ' मिडफिल्ड'मधे चेंडूचा ताबा दोन्ही संघ स्वतःकडे राखूं शकत नव्हते व त्यामुळे फारशा चांगल्या रचलेल्या चाली पहायल्या नाही मिळाल्या असं आपलं मला वाटलं. शक्यता अशीही आहे कीं या दोन्ही संघाना एकमेकांचा खेळ चांगला परिचयाचा असल्याने दोघानाही जिंकणं कठीणच झालं असावं.
काल दोनच ' पिवळीं कार्ड' दाखवलीं गेलीं असली तरी तीं अधिक दाखवणं सहज शक्य होतं !

ब्राझिलकडून काका यावर्षी खेळत नाही.....

मुलगा : काका मिस यु!!!

मुलगी : कुठे गेलेत काका? काकु पण गेल्यात का सोबत?

मुलगा : ...........Blocked.......

<< मुलगा : ...........Blocked.......>>
मुलगी : इट इज ऑल रिअली मेसी ! Wink

ब्राझिल-मेक्सिको अगदीच अपेक्षित बरोबरीचा निकाल. पण गोल होऊन बरोबरी व्हायला पाहिजे होती.. निदान गोल फॉर आणि अगेन्स्ट तरी वाढले असते..

लैच निराशा झाली जागरण सोसून काल. गोलीचे सेव्ह तेवढे भारी.

आज ऑस्ट्रेलिया - हॉलंड कोण कोण बघणार? हॉलंडला एक मॅच बाकी असतानाच टेंशन फ्री होण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया जरा कमजोरच आहे. या स्पर्धेतील सर्वात खाली जागतिक क्रमवारी असणारी टीम ( ६२ व्या नंबरची).

स्पेन चिली पण रंगतदार होईल. बरोबरी किंवा विजय चिलीसाठी फार उपयोगी ठरेल आणि स्पेनसाठी बाय बाय. हॉलंडकडून मार खाल्लेल्या टीमचे धैर्य कोचने मधल्या दिवसात किती उंचावले असेल ते पाहू.

हॉलंड - ऑस्ट्रेलिया १-१,
२३ मिनिटे झालीत.
रॉबेनने एकहाती केलेल्या गोलचे सेलेब्रेशन संपतेय न संपतेय तोच काहिलची बरोबरी. लाँग पासवर जबरदस्त गोल.

उदयन, खरंच की!!! ०-२! टॉरेस आता आलाय, कदाचित तो एखादा गोल करेल, पण २ गोलची पिछाडी भरून काढणे अवघड वाटते.

Pages