फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, पण अर्जेन्टिनाच्या डिफेन्समधे खिंडारं आहेत त्याचं काय? बाद फेर्‍यांमधे महागात जाईल असाच डिफेन्स ठेवला तर..

मेस्सी मस्तच!

आणि ही चावाचावी कुठून आली सॉकरमधे? तो सुअरेझ म्हणे बरेचदा चावतो

>>> आपल्याकडे रस्त्यातल्या टांगावाल्यांच्या घोड्यांची तोंड बंद करतात ते कोणाला चुकुनही चावू नये म्हणुन तशी ह्या प्लेयर्सची तोंड पण बंद करायला हवीत. Proud

अर्जेंटिना - स्वित्झर्लंड इंटरेस्टींग मॅच होईल. अर्जेंटिनाचा बचाव फारसा भक्कम नाही आणि कधीच नव्हता. आक्रमण आणि मध्यफळी हेच त्यांचे स्ट्राँग पॉईंट्स. स्विस आक्रमणही चांगले आहे.

ब्राझील - चिली , मेक्सिको - नेदर्लँड, फ्रान्स - नायजेरिया, कोलंबिया - उरुग्वे, ग्रीस - कोस्टारिका

कोस्टारिकाला सुवर्णसंधी आहे. ग्रीसला हरवून उपान्त्यपूर्व फेरीत जाण्याची. ग्रीस कसलाही चमकदार खेळ न करता केवळ नशिबाने पुढे गेलेत. आयव्हरी कोस्ट असायला हवे होते त्यांच्या जागी. बाद फेरीत गेलेली सर्वात अनाकर्षक टीम आहे ग्रीस.

ग्रूप जी आणि एच मधील संघ आज ठरतील. मेस्सीने आन्तर्राष्ट्रीय सामन्यात त्यातूनही वर्ल्ड कपमध्ये अपयशी हा डाग चार गोल करून धुवून काढलाय. अर्थात अजून लांबची मजल बाकी आहे म्हणा.
रोनाल्डोही या स्पर्धेत चमकण्यासाठी आतुर असेल. फिटनेस कसा आहे त्यावर.

पोर्तुगाल - घाना ट्रिकी मॅच आहे.
जर्मनी - यू एस ए सुद्धा रंगतदार आहे. जर्मनीचा पूर्वीचा स्टार खेळाडू क्लिन्स्मन कोच असल्याने अमेरिकेची जर्मनीविरोधी थिअरी परफेक्ट असणार पण प्रत्यक्षात किती अप्लाय करतात ते पाहू.

आजच्या ग्रूप जी मधल्या मॅचेस मस्त होणार... जर्मनी अमेरिका ड्रॉ व्हायला पाहिजे.. म्हणजे दोन्ही टीम्स पुढे जातील. जर्मनी पहिल्या नंबरनी आणि अमेरिका दोन नंबरनी.. तसे झाले तर दुसर्‍या मॅचच्या रिझल्टचा काहीही परिणाम होणार नाही.

<< जर्मनी अमेरिका ड्रॉ व्हायला पाहिजे.. >> मध्यंतरापर्यंत ०-० व आतां जर्मनी -१, यूएसए -० !
<< बा द वे, प्लेञर्स्ची ढकलाढकली बघुन शाळेतली पोरं आठवतात. >> आत्ताच्या सामन्यात तर रेफरीनेच एका युएसएच्या प्लेयरला ढकलून आडवा केला , अर्थात चुकून ! हा खेळच इतका वेगवान व आडदांड आहे, काय करणार !!!! Wink

घानाने मॅचच्या आधी त्यांचे दोन महत्वाचे खेळाडू मुंटारी आणि बोटँग यांना शिस्तभंगाच्या कारणावरून हाकलून दिले....
त्या दोघांनी म्हणे एका स्टाफरशी धक्काबुक्की केली आणि नंतर कोच ला शिव्या दिल्या...

चला आता उद्या पासून बाद फेरीतील सामन्यांची मेजवानी...

आशियातील एकही टीम बाद फेरीत नाही.. रादर.. कोणालाही विजय देखील मिळवता आला नाही...

कोस्टारिका, अमेरिका, ग्रीस आणि अल्जेरिया ह्या चार अनपेक्षित टीम्स बाद फेरीत पोहोचल्या आहेत.

स्पेन, पोर्तुगाल, इटली, इंग्लंड, आयव्हरी कोस्ट, रशिया.. ह्यांना बाद फेरीत जाण्याच्या संधी होत्या पण त्यांचा फायदा न घेतल्याने ते बाहेर गेले आहेत..

ग्रीस केवळ नशीबानेच बाद फेरीत आलेत. अत्यंत नीरस खेळ करण्यात ते पटाईत आहेत.. त्यांची पुढची मॅच कोस्टारिका विरुद्ध आहे.. जी त्यांना जड जाणार आहे.. आणि तेच बाहेर पडायची शक्यता जास्त आहे.

उपांत्य पूर्व फेरीतील संभाव्य लढती
ब्राझील - कोलंबिया, नेदरलंड - कोस्टारिका, फ्रान्स - जर्मनी, अजेंटीना - अमेरिका.

माझा अंदाज - उपांत्य पूर्व फेरीतील संभाव्य लढती
ब्राझिल - युरग्वा़य, मेक्सिको - कोस्टारिका, फ्रान्स - जर्मनी, अर्जेंटिना - अमेरिका.

मेस्सीने परवा तुफानी स्पीडने धावत जाउन मारलेला तो गोल (गोल्पोस्टला लागुन परत आलेला बॉल. प्रचन्ड लवकर जज करुन त्यावर तेवढीच क्ब्विक अ‍ॅक्शन) पाहिला असल्याने काल जर्मनीच्या मॅच च्या वेळी त्याची लैच आठवण आली.
क्रिकेट मधील उपमा (फारेन्डाची क्षमा मागुन Wink ) टुकुटुकु खेळत होते अस वाटलं.

प्राथमिक फेरीत 'यलो कार्ड', दुखापत इ. संभाळून महत्वाचे खेळाडू खेळत असल्याने कदाचित बाद फेरीत त्यांचा अधिकच चांगला खेळ पहायला मिळेल !

रोनाल्डो बिचारा........एकटा खेळुन खेळुन किती खेळणार पोर्तुगाल ला पहिल्याच फेरीत बाद व्हायला लागले...
रोनाल्डो फिल्ड वर बोल्ट च्या स्पीड बरोबरीने धावतो पण पासेस देणारेच जय हरी विठ्ठल असतील तर तो इतका वेगवान धावुन काय उपयोग...

आता मेस्सी , मिलर, नेयमार, यांच्यातच खरी लढत ....

आता समोर सचिन ब्रायन ख्रिस गेल डिव्हिलेअर्स असतील तर तुम्ही कोहली, रोहित, पोलार्ड यांच्यावर लक्ष ठेवणार नाही ना Happy

रॉबेन >>>> हॉलंड चा खेळाडु .. मागच्याच सामन्यात बघितले कि त्याला इतरांची योग्य साथ मिळत नाही.. जीव तोडुन तो बॉल गोलपोस्ट जवळ आणतो आनि तेव्हा पास घ्यायला खेळाडुच नसतात .. हे मागच्या मॅच मधे एकदा नाही दोनदा नाही तर किमान ७-९ वेळा झालेले आहे.. अश्या वेळॅला तो रोनाल्डो च्या कॅटेगरीत येतो ..

ते व्हॅन पर्सी नव्ह्ता म्हणून झाले गेल्या सामन्यात.. पुढच्या मॅचला दोघेही असतील तेव्हा बघा... स्पेन विरुद्धची मॅच बघितली नाहीत का तुम्ही...

संभाव्य आठ संघांत अनपेक्षितपणे नायजेरिया घुसण्याची एक शक्यता वाटते; आक्रमण व बचाव दोन्ही सरस वाटले या संघाचे . फ्रान्स विरुद्धचा त्यांचा सामना रंगणार असं वाटतंय .

लुई सुआरेझ चावरे यांचावरील बंदीमुळे उरुग्वे कमजोर होणार जराशी. खरेतर अधिक कडक कारवाईची अपेक्षा होती कारण त्याच्या कारकीर्दीतला हा तिसरा प्रसंग. कोलंबिया जास्त परिपूर्ण टीम वाटते.
चिलीचे दुर्दैव की ब्राझीलशी भिडले. पूर्ण स्टेडियम विरोधात घोषणा देत असताना बाद फेरीचा सामना खेळायचा म्हणजे अवघडच !

<< पूर्ण स्टेडियम विरोधात घोषणा देत असताना बाद फेरीचा सामना खेळायचा म्हणजे अवघडच ! >> कधीं कधीं याचा उलटा परिणामही होतो; यजमान संघ अवाजवी दबावाखाली येतो व बाहेरचा संघ अधिक चेंव येवून खेळतो !

ब्राझील - चिली जबरदस्त सुरू आहे. शेवटची दहा मिनिटे आणि अजूनही १-१. टेंपो वाढलाय. एक संधी आणि कोणीतरी हिरो ठरणार. मस्त उत्कंठावर्धक सामना. अतिरिक्त वेळ आणि पेनल्टीजचा ऑप्शन आहेच बरोबरी कायम राहिली तर. चिली गोलकीपर ग्रेट अजूनपर्यंत.

Pages