Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली, नारळ घालणार असालच.
अंजली, नारळ घालणार असालच. साध्या दुधाची पण छान लागते खीर. आमच्या घरी भारतात साधं दूध घालूनच करतात.
बरिटो एंचिलाडा, फा हिताज,
बरिटो एंचिलाडा, फा हिताज, केसाडिया हे सर्व कसे करतात. मेक्सिकन स्वयंपाकाबद्दल माहिती साठी एक धागा
काढावा का? गूगल करून माहिती नक्की मिळेल पण जर घरी करतच असाल तर ते सोपे पडेल. बेसिक मसाले का य आणायचे? चिली मध्ये राजमा बीन्स वापरायच्या का तोत्तिया म्हणजे पोळीच का पातळ लाटलेली असे फार बेसिक प्रश्न आहेत. इथे फाहिताज बरोबर एक राइस मिळ तो तो फार मस्त लागतो त्याची नक्की काये रेशिपी?
इटालिअन आता डन टु डेथ झाले आहे. फार कुकरी प्रॉग्राम बघून बोअर झाले आहे. आणी सर्वत्र मिळते. इव्हन गुज्जु हाउस वाइफ्ज दुकानात वो पास्ता का मसाला देदो असे विचारत अस्तात. नो हार्म पण एखाद्या रेसीपेचे तरला दलालीकरण झालेली ती ओरिजिनल राहात नाही असे वाटते.
मी आजच शेफ सिनेमा पाहून
मी आजच शेफ सिनेमा पाहून आल्याने फारच मोटिवेटेड आहे. उद्याच शेफस नाइफ घेउन येणार. क्युबन सँ डविच चिकन घालून करता येइल का? साधारण मुंबईत ग्रिल्ड सॅ. मिळते तसेच वाटले.
अमा, जीर्याची पावडर, सुक्या
अमा,
जीर्याची पावडर, सुक्या अन्चो पेपर्स, हलापिनो पेपर्स, लसूण, टोमॅटो, जीरे, मिरे, कोथिंबीर, लिबं इतपत बेसिक मसाले पुरेसे आहेत. मिळाल्यास चिपोटले एन अदोबो चा कॅन आणि मेक्सिकन ओरगॅनो.
तॉर्तिया मक्याच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या करतात. पातळ लाटायच्या आणि दोन्ही बाजूनी शेकायच्या.
पिंटो आणि ब्लॅक बिन्स.
कांदे, ढब्बू मिरच्या.
चीझ
मेक्सिकन राईस काल झाला आमच्याकडे. लेकाच्या बरीटोत चिकन आणि राईस घातलं.
बाकी मग चॉकलेट, दालचिनीवेगवेग, कंडेन्स मिल्क वगैरे जसे रेसिपीसाठी लागेल तसे.
क्युबन सॅडविच म्हणजे पोर्क आणि हॅम हवे.
.http://www.rickbayless.com/r
.http://www.rickbayless.com/recipes-from-chef-rick-bayless/
इथे ना एक पूर्ण किट मिळते.
इथे ना एक पूर्ण किट मिळते. त्यात ८ फाहिता. होतात. पन ते इंपोर्ट केलेले असते व एक्स्पायर झालेले ही असू शकते. म्हण जे पैसे वाया. एकदा तोर्तिया पाकीट आणले ते दोन दिवसात ख राब झाले ३०० रु पाण्यात. मेक्सिकन राइस ची रेस्पी लिहाल का? पायोनिएअर वुम न साइट वर केसाडिया वगैरे आहे. पण मायबोली असताना तिचे का वाचून करायचे?
अमा तुमच्या विपूत देते.
अमा तुमच्या विपूत देते.
धन्स द वादम. आजचे स्वप्न फूड
धन्स द वादम. आजचे स्वप्न फूड ट्रकचे आहे.
पण माझा ट्रक फक्त पुणे मुंबईच फिरेल.
मेक्सिकन स्वयंपाकाबद्दल
मेक्सिकन स्वयंपाकाबद्दल माहिती साठी एक धागा काढावा का? ़<< Ama, navaa dhaga kadhanar ka please?
दुधाची पण चांगली लागते
दुधाची पण चांगली लागते खीर>>
ओक्के नंदिनी आणि तृप्ती! थँक्स!
मी खुप वेळा अंडा करी केलीये
मी खुप वेळा अंडा करी केलीये पण एकदा पण छान झाली नाहि ़ कोणी मला परफेक्ट रेसिपी देईल का प्लिज ? किंवा टिप्स तरी
मी मेक्सिकन बर्याचदा घरी
मी मेक्सिकन बर्याचदा घरी करते. बहुतेक वेळा चिकन टॅकोज किंवा बरीटो आणि बरोबर ग्वाकामोले + चिप्स असा मेनु असतो. पुढच्या वेळी करेन तेव्हा फोटो काढेन. पण माझे थोडे इंडियन फ्युजन असते रेस्पीत.
मेक्सिकन कलीगने दिलेली
मेक्सिकन कलीगने दिलेली रेसेपी:
तांदुळ १/२ १ तास भिजत घालुन, जिर्याची फोडणी करुन त्यात तांदुळ, थोडं मीरपुड टोमॅटोच्या प्युरीमधे शिजवायचे. हा बर्याचदा बरिटो वैगरे मधे देतात.
नुसता खायलाही छान लागतो. मी थोड्या रस्स्याच्या तिखट भाजीबरोबर बनवते.
अजू न बरीटो मंजे नक्की काय
अजू न बरीटो मंजे नक्की काय तेच माहीत नाहीये.
इनोची हे करून
इनोची हे करून बघ
http://deepascooking.blogspot.in/2012/05/egg-drop-curry.html
Here's most everything you
Here's most everything you need to know about burritos - http://en.m.wikipedia.org/wiki/Burrito
I would say it is Mexican cousin of our Frankie's
I think of burrito as a short
I think of burrito as a short tough guy in T shirt and shorts,
however will read through. The point of all this discussion is we are moving away from full thali meals to single dish plus salad/dessert type of eating habits. if it is roti sabzi no rice. if rice rajma no roti
Chipotle as a little girl with twin plaits and red ribbons
Kesadia as a fat Marwari trader selling oil in tins.
that kind of thing.
कॉस्टकोमधुन "कोकोनट पिठ"
कॉस्टकोमधुन "कोकोनट पिठ" आणले आहे. त्याचे काय काय करता येईल? याआधि कधि वापरले नाहि. कॉस्टकोचे नविन प्रॉडक्ट आहे.
कोकोनट पीठ जिथे ऑल पर्पज
कोकोनट पीठ जिथे ऑल पर्पज किंवा गव्हाच्या पीठाच्या ठिकाणी वापरता येते. ग्लुटेन फ्री रेसीपीज साठी हल्ली जबरी क्रेझ आहे त्याची. Paleo diet साठी वापरले जाते.
I think of burrito as a short
I think of burrito as a short tough guy in T shirt and shorts,
Chipotle as a little girl with twin plaits and red ribbons
Kesadia as a fat Marwari trader selling oil in tins. << हाहाहा आणि टाको - लहान खोड्कर मुलगा. फहीता - ओल्ड लेडी
Deepac तुम्हि दिलेल्या अंडा
Deepac तुम्हि दिलेल्या अंडा करीच्या रेसिपीत मसाला नाहिये मला स्पायसी हवी आहे
इनोची, http://onehotstove.blo
इनोची,
http://onehotstove.blogspot.com/2005/10/e-is-for-egg-rassa-and-eggplant-...
बोनलेस चिकनला फ्लॅट
बोनलेस चिकनला फ्लॅट ब्रेडमध्ये घालून खायचा रॅप करताना टेस्टी चिकन बनवायची काही हमखास पाकृ आहे का?
वेका, मी आलटून पालटून खालील
वेका, मी आलटून पालटून खालील पर्याय वापरते.
१. ड्राय रब आणि तेल/ असे आधी चोळून ठेवते आणि ग्रील करते किंवा परमेझान चीझ+ ब्रेड क्रम्ब्ज मधे घोळवून बेक करते.
२ मॅरीनेट करुन ग्रील करते किंवा स्टर फ्राय करते.
३. रोस्ट केलेली चिकनचे लेफ्टओवर
ड्राय रब/ मॅरीनेड ज्या प्रकारचे असेल त्याला योग्य असे बाकीचे घटक.
आभार्स स्वाती२. ग्रीडलवर
आभार्स स्वाती२.

ग्रीडलवर ग्रील करेन बहुतेक. रब शोधते आहे का..रब ने बना दी चिकन म्हणून सर्व्ह करावं
गव्हाच्या लाह्या कशा करतात??
गव्हाच्या लाह्या कशा करतात??
धन्यवाद सीमा,.उत्साहात घेतले
धन्यवाद सीमा,.उत्साहात घेतले ऑर्गानिक आहे म्हणुन. बघते वापरुन.
इनोची तुला अंडा करी विपु
इनोची तुला अंडा करी विपु केलीय
स्वारी बरंका ते दिसलंच नाही
स्वारी बरंका ते दिसलंच नाही अगदी!!! वीपु त देते!
अंडा करी ला नवीन धागा नको वाटतो!
अनिश्का. आणि धनुकली, तुम्ही
अनिश्का. आणि धनुकली, तुम्ही हेडरमधली पुढील सूचना वाचली असेलच.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
तेव्हा, या पानावर उजव्या बाजूला वरती 'नवीन लेखनाचा धागा' अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही इकडे लिहिलेली अंडा करी लिहा.
अगदी चार ओळींची पाककृती असली तरी नवीन लेखनात लिहिली तर बरं होईल. भविष्यात पुन्हा कधी ती पाककृती शोधायची झाल्यास इथली ३३ पानं उलटत बसायला नको, काय?
Pages