निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
नारऴ् नसावा. इतका सोप्पा
नारऴ् नसावा. इतका सोप्पा पेपर नसतो निगवर >>
सोलताना फुलासारखी झाली
ती सुपारी आहे
चल जिप्स्या पटापट प्रचि येऊदेत आम्हालाही माऊलीमय होऊदे
आमच्या रानवाटा गृपने केलेला
आमच्या रानवाटा गृपने केलेला हा २४ मिनिटांचा "आनंदवारी" लघुपट नक्कीच तुम्हालाही वारीचाच एक भाग असल्याचा आनंद देईल.
"आनंदवारी">>>> मस्त आहे. आजच पाहिला मी.
घरी जाऊन बघीन !
घरी जाऊन बघीन !
११ जूनला ताम्हिणी घाटात
११ जूनला ताम्हिणी घाटात जाण्याचा योग आला. तिथे करवंदाच्या जाळ्यांवर करवंद दिसत होती आणि तीच ताजी ताजी करवंद तोडून काही स्त्रिया रस्त्याच्या कडेला विकत होत्या. त्याचबरोबर अळूही होते. एकदम ताजी फळं खाऊन तृप्त झाले.
सगळ्या निगकरांच्या वतीनं मूठभर करवंदं आणि दोन अळू जास्त खाल्लेले आहेत त्यामुळे बोलायचं काम नाय!
सगळ्या निगकरांच्या वतीनं
सगळ्या निगकरांच्या वतीनं मूठभर करवंदं आणि दोन अळू जास्त खाल्लेले आहेत त्यामुळे बोलायचं काम नाय!
माझी करवंदं खाल्ली ती खाल्ली वर अळूही खाल्ले....... दोनातला एकतरी मला आणुन दाखवायचा होतास गं....
अरेच्चा! असं हाय व्हय? जा की
अरेच्चा! असं हाय व्हय? जा की या शनिवारी ताम्हिणी घाटात फिरायला.
त्यामुळे बोलायचं काम
त्यामुळे बोलायचं काम नाय!>>>>>>>>>>> मामे खूप करवंदं खाल्ली की चिकाने तोंड चिकट होतं, खालचा आणि वरचा ओठ एकमेकांना चिकटतात! आणि बोलताच येत नाही. इतकी कशाला ती खावीत करवंदं? आँ???

८ जुलैला भेटताय का सगळे? दिनेशच्या भारतभेटीत? कुठे? केव्हा?>>>>>>>>> अरे सांगा ना ...मला का इग्नोर मारताय?
शुभ संध्या!
शुभ संध्या!
वॉव! करेलेका फूल का सरिवा? की
वॉव! करेलेका फूल का सरिवा? की दोडका?
सरीवा, खूप सुंदर फोटो.
सरीवा, खूप सुंदर फोटो. मस्तच!!!
मानुषी,तांबडा भोपळा.
मानुषी,तांबडा भोपळा.
मानुषी... ८ तारखेला पुण्याला
मानुषी... ८ तारखेला पुण्याला यायला जमेल का ?
मामी, अळूचा फोटो हवा होता.
मामी, अळूचा फोटो हवा होता. इथे काही जणांना माहीत नाहीत ते.
खरं तर ती चवही सर्वाना आवडेल अशी नसतेच !
दिवसभरात मस्त माहिती. सरिवा,
दिवसभरात मस्त माहिती.
सरिवा, तांबड्या भोपळ्याचं फुल मस्त
खरं तर ती चवही सर्वाना आवडेल
खरं तर ती चवही सर्वाना आवडेल अशी नसतेच !>>>>हो मी, चव घेतलेली याची. २-३ आठवड्यांपूर्वी , पण बिलकुल नाही आवडलं.
जिप्सी फार छान लिहीता
जिप्सी फार छान लिहीता तुम्ही...
नितीन, सरिवा, जागु मस्त फोटो...
दिनेश गोड आठवणी आहेत रे
दिनेश गोड आठवणी आहेत रे तुझ्या बालपणाच्या..
इक था बचपन.. छोटासा नन्हासा बचपन च्या भरभरून आठवणी सामावल्यात नाही आपल्या सर्वांच्या मनात..!!
नि३ छानै फोटो..
साधने.. हरा सिग्नल.. आणी हरी सिंग
क्या कनेक्शन जोडा .. कै च्या कै हसले...
वॉव लाल भोपळ्याचं फूल किती
वॉव लाल भोपळ्याचं फूल किती ब्राईट दिस्तंय सरिवा..
मला लाल भोपळ्याची भाजी मात्र अजिब्बात आवडत नाही ,, सॉरी सरिवा.. एनीथिंग गोड नाही नो नो!!!
दिनेश ला माहितीये म्हणून मला त्याच्याकडून पेरी पेरी आणी आफ्रिकन पेप्पर च भेट म्हणून मिळतात.. म्हंजे मीच मागून घेते
ती करवंद पुर्वी केसात माळत.
ती करवंद पुर्वी केसात माळत. मस्त फोटोज.
आमच्याकडे सध्या लिली फुललीय :)
८ जुलाई............पहायला
८ जुलाई............पहायला लागेल. कारण युएस मधून आल्यापासून भटकन्तीच चालूए. लग्न, अॅनिव्हर्सरीज, गेट टुगेदर्स. पण जमवायला आवडेलच.
जिप्सि, आनंदवारी बघायलाच
जिप्सि, आनंदवारी बघायलाच हवा.



नितीन, ह्याला म्हणतात निसर्गप्रेम. नाव काढताच फोटू काढुन हजर.
सरिवा, मस्त आलाय फोटू.....
सगळ्यांचेच फोटो छान.
सुप्रभात!!!!!!
आज सकाळचे आकाश
८ जुलाई............पहायला
८ जुलाई............पहायला लागेल. पण जमवायला आवडेलच. >>>> मला ही आवडेल खरतरं पण मंगळवार आहे त्यामुळे सुट्टी नाही आहे
दिनेशदा, मुंबइत कधी
दिनेशदा, मुंबइत कधी आहात???
आणि मुंबइकरांना नाही का भेटणार?????
सुप्रभात!!! उजु, छान फोटो.
सुप्रभात!!!
उजु, छान फोटो.
हे फुल कशाचे आहे ते
हे फुल कशाचे आहे ते ओळखा.
शशांक आणि दिनेशदा यांना हे कोडं ओळखण्यास सक्त मनाई आहे. 
चिंच???
चिंच???
चिंच???>>>>बिंगो मृनिश, एकदम
चिंच???>>>>बिंगो मृनिश, एकदम बरोब्बर



पहिलंच उत्तर बरोबर
हे तुमचं बक्षीस
हे फुल कशाचे आहे ते ओळखा ते
हे फुल कशाचे आहे ते ओळखा
)
ते ओळखण जाऊदे रे पण प्रचि प्रचंड सुंदर आहे
वेगळा गुलमोहर आहे का किंवा ऑर्किड ( मी नक्कीच चुकणार
अरे वा चिंचेचे फुल सुंदर आहे
अरे वा चिंचेचे फुल सुंदर आहे
शप्पथ, कित्ती गोड दिसतय ते
शप्पथ, कित्ती गोड दिसतय ते फुल!
मी ही आधी गुलमोहरच समजले.
Pages