निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, रिया धन्यवाद... अरे व्वा, बरेच पुणेकर आहेत....

गावातले लोक जायला घाबरतात तिथे.++++ का ग? सापा मुळे, की अजुन काही बाधा वगैरे असा समज?

दिनेश दा कीत्ती माहिती आहे तुम्हाला... सगळे संदर्भ, वाक्य, ओळी सगळच कस आठवत हो तुम्हाला....

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला......


(गेल्यावर्षीच्या वारीचा फोटो)

देहूहुन तुकोबा आणि आळंदीहुन माऊली पंढरीच्या विठोबाला भेटण्यासाठी आज निघाले. Happy

पुण्यात "श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नानापेठ" आणि "पालखी विठोबा मंदिर, भवानीपेठ" नक्की कुठे आहे. तुकोबांची पालखी आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम अनुक्रमे येथे आहे (रविवारी २२ जून रोजी).

गेल्यावर्षी मायबोलीकर रंगासेठ आणि कोकण्या यांच्यामुळे वारी अनुभवता आली होती. यावर्षीही येण्याचा प्लान होता पण फिसकटला. Sad सोबत कुणीही नाही.) Sad

शनिवारी मल्हारगड, कानिफनाथ करून वाकडला मित्राकडे राहणार होतो आणि तेथुन वारीचे दर्शन घेऊन मुंबईला परतणार होतो. (किंवा सोमवारी दांडी मारून हडपसर पर्यंत जाण्याचा विचार होता). पण प्लान रद्द झाला. Sad

रच्याकने, वारीचे फोटो पाहताना किंवा इथे मायबोलीवर अपलोड करताना का कुणास ठावूक डोळे भरून येतात. Sad

गावातले लोक जायला घाबरतात तिथे >> साधनाताई का का का ?

जिप्स्या मस्त आहे प्रचि आजुन प्रचि पहायला आवडतील, जमव काहीतरी. Happy

दा - ती गुलाबी करवंदाची झाड वसईत आहेत अजुन. रात्री पाहीली तर झाड टपोर्‍या कळ्यांनी भरुन गेल्या सारखी वाटतात सफेद गुलाबी रंगा मुळे. तशी वसई गावात विविध प्रकारांची झाड शिल्लक आहेत अजुन.

ते भांषांतरीत पुस्तक होते, मी लिहिले होते सविस्तर यावर..

आपल्याकडे जशी वारी असते तशीच इथिओपिया मधेही असते आणि स्पेनमधेही.. या दोन्हीचे चित्रण जर्नीज टु द एण्ड्स ऑफ वर्ल्ड या माहीतीपटात आणि द वे या चित्रपटात ( अनुक्रमे ) आहेत. मक्केचीही यात्राच म्हणावी लागेल.. मला त्या साध्यापेक्षा साधनेत म्हणजे प्रत्यक्ष प्रवासात जास्त रस आहे.

"द वे" या चित्रपटात, यात्रेच्या शेवटी "मी" पण कसे गळून जाते त्याचे अत्यंत हृद्य चित्रण आहे. तो चित्रपटही
मला खुप आवडतो. इथे माहिती वाचा.

http://en.wikipedia.org/wiki/The_Way_(film)

बघायला मिळाला तर सोडू नका !

नितीन, माझी आत्या वसईला रहात असे. त्यावेळी वसई स्टेशनच्या आजूबाजूला वस्तीच नव्हती. (म्हणून स्टेशनचे नाव वसई रोड !)
आम्ही चिंचा, ही करवंदे, तोरणं भरपूर खायचो. किल्ल्याकडचा भाग तर पावसात मस्तच होतो. भरपूर रानफुले असतात आणि फुलपाखरेही ! तिथल्या झाडांवर "वाघरी" नावाची ऑर्किड्स भरपूर फुलतात.

Nitin, Dineshda, mazya Vasai cha kautuk vachin masta vatala Happy
maza janma Vasaicha ani lagna paryanta tithech lahanachi mothi zale tyamule Vasai phar phar jivhalyachachi..

रच्याकने, वारीचे फोटो पाहताना किंवा इथे मायबोलीवर अपलोड करताना का कुणास ठावूक डोळे भरून येतात. >>>> या सगळ्या संतांनी आपल्या मनात, ह्रदयात जो भक्तिभाव पेरला आहे तो असा हळूच डोळ्यातून अंकुरतो, रोमारोमातून थरारतो ....

गेले आकाश भरुनी
दिंड्या पताका लेवूनी
भक्तिभाव ओसंडतो
सामावेना त्रिभुवनी

घोष बरवा नामाचा
थोर संत-महात्म्यांचा
उरी हुंदका दाटतो
एक विठुच्या प्रेमाचा

सात्विकाच्या बहु लाटा
उचंबळतो सागर
मनी दाटते अनाम
विठुप्रेम अनावर

साप असतील तिथे म्हणुन घाबरतात... >> ओह ! बरोबर ते हिची चाल तुरुतुरु आठवल केवड्याच्या बनात नागीन वैगरे - पण खरोखरच साप केवड्यात असतात का ?
स्निग्धा Happy
दा - एक गटग वसई किल्ल्यावर

जिप्सि, शशांकजी माउली __/\__ Happy

स्निग्धा, पुर्वी मुंबईत रेशनवरच तांदूळ मिळत असे. त्यावेळी आई वसईहून तांदूळ पण आणत असे. इतकेच कशाला आम्ही झाडांसाठी मातीपण तिथून आणत होतो. त्यावेळी विरार लोकल, बोरीवली नंतर खुपशी रिकामीच असायची.
वसईचे रहाट अजूनही स्मरणात आहेत. तिकडच्या अनेक इस्ट इंडियन बायका आत्याच्या ओळखीच्या होत्या. त्यांची ती खास भाषा ( कवर्‍याला घेतली गं केरी तू ? ) त्यांचे लाल नेसू, कानातले... आठवताहेत.

त्यांची ती खास भाषा ( कवर्‍याला घेतली गं केरी तू ? ) त्यांचे लाल नेसू, कानातले... आठवताहेत. >> yes, Dineshda, aata tya lal nesu valya khup kami distat, pan ti khas bhasha ajunhi aikayla milate.
maazya lahan panchya athavanit Vasai Road station pasun Manikpur nakya paryant phakta 1 Road ani donhi bajula khadich pani, madhe ek te Parvati thearter ani tyachya javal Roadchya bajucha to katta aahe, jithe amache aai-baba amhala doghina saykal var basvun firayla net asat.

mazi shala Vasai gavatli New English School, Vasai madhali ek changali navajleli shala, tyamule ST ne jav lagaych, tyavelecha to paus, Auto pan phar kami hotya, tyamule bas jar madhe banda padali tar daptar sambhalat pavsachya panyatun vat kadhat sagala mulancha group chalat shalep jaycho. khup khup majja yaychi.... Happy

aso post khup lambatey.....

स्निग्धा आणि पापडीचा बाजार ! आत्या तामतलावला होती. तो तलावही आता खुप खराब झालाय.
तिथून मूळगावला चालत जावे लागायचे.
०००००००००००
मोनालिने फेसबूक वर गणपतिपूळ्याचा फोटो टाकलाय. समुद्राचे पाणी थेट देवळापर्यंत आलेले दिसतेय.
माझ्या आठवणीत तसे नव्हते. मी अगदी गणेशचतुर्थीला तिथे होतो, पण समुद्र थोडा लांब असायचा.
का आधीपासूनच तसे होते ?

गणेशचतुर्थीला तिथल्या मूर्तीला हात लावता येतो ! ( एरवी नाही )

मोनालिने फेसबूक वर गणपतिपूळ्याचा फोटो टाकलाय. समुद्राचे पाणी थेट देवळापर्यंत आलेले दिसतेय.
माझ्या आठवणीत तसे नव्हते. >>> तसे नाहीच्चे. मी मागच्या महिन्यात तर होते तेथे. त्या रेतीत बसुन बर्फाचा गोळा, भेळ खाल्लीये. त्यावरच उंटाची सवारीपण केली लेकाने.

तो फोटो मागच्या आठवड्यातला आहे जेव्हा सगळीकडे प्रचंड लाटा आलेल्या.

आमच्या समुद्रकिनारी भरपूर केवड्याची झाडे आहेत. पण मला अजून तिथे केवड्याचे फुल किंवा फळ दिसले नाही. झाले की लगेच लोक काढत असणार. बाजारात विकायला येणारी फुलेच मी पाहीलीत.

गणपतीत तर एक एक पात विकतात.

सुप्रभात...... मी आज जाम खुष आहे.:)

खुप दिवसांच्या प्रति़क्षे नंतर आज सोनचाफ्याला पहिलं फुल आलय.... एवलस कुंडीतलं झाड ते, मोजुन ७ , ८ पानं त्याला इतकं गोंडस फुल आणि ३ कळ्या कुशीत घेऊन आलय..... कुठे ठेवु आणि कोणा कोणाल
दाखवु अस झालय:) .... सकाळी, आमच्या फ्लोअर च्या सगळ्या माझ्या मैत्रिणी याला भेट देऊन गेल्या..
खुप मज्जा आली.... मला इतका आंनद होतोय तो शव्दात मावायचा नाही.......:)

Photo-0340.jpg

खुप मज्जा आली.... मला इतका आंनद होतोय तो शव्दात मावायचा नाही... >>>> वा, सायली - मस्त फुल आहे - तुझा आनंद तुझ्या पोस्टमधून अग्दी ओसंडून वाहताना जाणवतोय .... Happy

फक्त एक विचारावेसे वाटते, मी गेल्या वर्षी साधारण ऑगस्ट च्या सुमारास सोनचाफ्याची २ झाडे
आणली होती... एक मोठ होत साधारण ४ फुट आणि ते मोठ्या कुंडीत पण लावले.. लाहान रांझणच म्हणा न...
ते वाढुन आता सहा फुट झाले आहे.... जेव्हा ते घरी आणले तेव्हा त्याला एक फुल पण होते... त्याला आजुन एकही फुल आले नाही. आणि त्या नंतर १५/ २० दिवसानी हे दुसरे रोप आणले त्याला मात्र फुलं आलय.. दोन्ही फुलात खुप फरक आहे, म्हणजे रंग, आकार, स्वरुप.... सगळ चे निराळे आणि अदभुत आहे...

असो, पण मी जाम खुष आहे... माझ्या साठी एक गणपती आहे तर दुसरा कार्तिक आहे Happy
हा पहिल्या झाडाचा फोटो, (गेल्या वर्षीचा). एक दिवस असा जात नाही की हा फोटो मी बघीतला नाही...
Photo2444.jpg

कामिनी पांढरा सोनचाफा पण असतो.
माझ्या एका मैत्रीणीच्या घरी मी एकदा संध्याकाळी गेले होते. तिच्या घरून निघताना तिने आम्हाला तिच्या गार्डनमध्ये नेले. तिच्या कडील पांढरा सोनचाफा पूर्ण अर्धवट उमललेल्या चाफ्याने भरला होता. त्याचा सुगंधही परीसरात दरवळत होता. तिने मला ओंजळभर फुले काढून दिली त्या झाडावरून. माझ्यासाठी अगदी सुगंधीत भेट होती ती.

Pages