निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी अगरबत्तीमधे अगदी मोजके सुगंध असायचे.. नंतर सोनचाफा, रजनीगंधा असे छान छान सुगंध बाजारात आले ( अश्विनीमामी जास्त सविस्तर सांगू शकेल. ) रजनीगंधा हा शब्दच मुळी अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाच्या चित्रपटानंतर मराठीत आला. पुर्वी निशिगंध किंवा गुलछडी हे शब्दच प्रचलित होते.
कुणाच्या मनात काय संगती असेल सांगता येत नाही... काही काही गंध आणि जागा यांची मनात सांगड असते. गुलछडी आणि झेंडू यांचा एकत्र गंध आणि दादरचा फुलबाजार, टिपीकल केमिकल सुगंध आणि कुर्ला स्टेशनजवळची एक फॅक्टरी असे काहीसे माझ्या डोक्यात आहे.

माझी मावस काकी जे जे मधे शिकत होती. त्यावेळी ती हार्बर लाइनने प्रवास करत असे. ती म्हणायची हार्बर लाईनने प्रवास करताना डोळे उघडून स्टेशन कुठले आले बघायची गरजच नसते.. वासावरून कळते.
हिंगाचा वास.. मसजिद, ताजे मासे - डॉकयार्ड रोड, शेंगदाणे - रे रोड, सुके मासे - शिवडी, डिझेल - वडाळा, सिंधी खाद्यपदार्थ - जीटीबी नगर,
हातभट्टी - चुनाभट्टी, केमिकल्स - कुर्ला, नासलेले दूध - टिळक नगर..... आता ती काकी नाही आणि काहि गंधही इतिहासजमा झाले.

टाटा ऑईलच्या आवारातच इंडस्ट्रीयल पर्फ्यूमस लिमिटेड अशी त्यांचीच उपकंपनी होती. साबणासाठी नवीननवीन गंध तिथे शोधले जात.
एखादा गंध बाजारात आणण्यापुर्वी कृत्रिम रित्या तो कसा तयार करता येईल याची चाचपणी तिथे होत असे. त्यासाठी काही खास क्षमता असलेले लोक तिथे होते. एखाद्या गंधात बुडवलेली कागदाची पट्टी नाकाशी घेऊन ते चिंतन करत आणि मग त्या गंधाचे रासायनिक सूत्र
शोधण्याचा प्रयत्न करत. मला त्यांचा फार हेवा वाटे. काही मोजक्या रसायनांच्या संकरातून ते असे गंध निर्माण करत असत.

रेणुका भोसेकर - सुस्वागतम् ..... Happy

http://www.khapre.org/portal/url/pages/z140401060850/view - या लिंकवर श्री समर्थांना माहित असलेल्या वनस्पतींची यादी आहे (श्री समर्थांच्याच शब्दात असलेली ) .... जरुर वाचणे ...

समर्थांचेबाग प्रकरण! मस्तच.
मी पुण्यात आघारकर संस्थेचा 'परिसर वनस्पती परिचय अभ्यासक्रम' केला होता. त्याच्या प्रकल्पासाठी मी हे 'बाग प्रकरण' घेतले होते. त्यातल्या २७७ वनस्पतींची परिचित नावे, वनस्पतीशास्त्रीय नावे, त्यांची प्रकाशचित्रे, माहिती असे संकलन केले होते. कोणाला इंटरेस्ट असेल, तर या 'बाग प्रकरणावर मी लिहिलेला (पूर्वप्रकाशित) लेख इथे आहे:
http://www.jainvicharitranfula.blogspot.in/
-अश्विनी
--------------
जाताजाता:
मायबोलीकरांचा हा निसर्गाच्या गप्पांचा धागा मला खूप आवडतो. दिवसातून एकदा तरी मी इथे येते. मस्त वाटतं.
इथले बहुतेकजण एकमेकांना प्रत्यक्षातही ओळखतात, पण माझ्यासारख्या आगंतुकांनाही इथे सहज सामावून घेतले जाते, हे खूप छ्हान आहे Happy

इथले बहुतेकजण एकमेकांना प्रत्यक्षातही ओळखतात, पण माझ्यासारख्या आगंतुकांनाही इथे सहज सामावून घेतले जाते, हे खूप छ्हान आहे >>>>>>>>

nisarg gatag hi hot rahataat. yaayache tyaalaa mhanje agantuk raahanar naahi Happy

रेणुका तुमचे स्वागत आहे नि.ग. च्या धाग्यावर.

अदीजो खरच साधना म्हणतेय त्याप्रमाणे एखाद्या गटग ला या. आणि प्रत्यक्ष नाही भेटलो तरी मने मात्र जुळलेली असतात. मी या धाग्यावरील फक्त साधना, दिनेशदा, जिप्सी, मामी, अश्विनी के, मोनाली यांनाच प्रत्यक्ष भेटलेय पण इतर सगळेही मला अगदी जवळचे मित्र मैत्रीणी वाटतात कधी न पाहताही. Happy
त्या मैत्रीसाठी ही पांढरी कण्हेर. Happy

रेणुका, सुस्वागतम ! कालचीच अ‍ॅडमिशन दिसतेय ! Wink
वरील सर्व फोटो मस्त !
नलिनी, ते झाड कसलं सुरेख आहे ग ! सोनचाफा, पांढरी कण्हेर, वा वा वा !

बालगंधर्वला कट्टे बुक करून ठेवते. आणि हो बहुतेक आमच्याकडचा पाऊस पण तुमच्या येण्याकडेच डोळे लावून बसलाय (बहुतेक), म्हणून तो ईथे यायलाच विसरलाय. Happy

जागू , तुला अनुमोदन.
गुलाबी झाली, लाल झाली, आता पांढरी आणि ती ही मैत्रीसाठी !! हे खूप आवडलं
रेणुका, सुस्वागतम माबो आणि निग वर

मनीमोहोर Happy

प्रज्ञा तुमच्याकडे पाऊस आला की त्याला म्हणो उरणला पण सगळे वाट बघताहे लवकर जा. असह्य झालाय आता हा उन्हाळा. त्यातल्या त्यात वारा सुटतो म्हणून बरे आहे नाहीतर नकोसेच झाले असते.

काल समुद्रकिनारी गेले होते. समुद्र खवळलाय. पांढर्‍या फेसाळ लाटांऐवजी आता गढूळ लाटा येताहेत. वारा इतका होता की काही कावळ्यांना पुढे जाता येत नव्हते तर काही कावळे आपोआप वार्‍याच्या दिशेने उडले जात होते.

प्रज्ञा, मग कन्फर्म करतो.
सावलीच्या फोटोतली पाने चवळीच्या पानासारखी दिसताहेत पण चवळी नाही कारण त्याला तीन पाने असतात.

त्या मैत्रीसाठी ही पांढरी कण्हेर.

सो स्वीट ऑफ यु जागू. धन्यवाद.

जागू समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नकोस आता. इथेपण पाऊस नाहीच.

वाल आणि द्रोणही नाही.

हे पपईचे रोप आहे ( बहुधा Wink ). पपईच्या तीन बिया पेरल्या होत्या. त्यातुन अशी दोन रोपं आली. मला आधी वाटलं की पपईऐवजी मातीतलं दुसरंच काहीतरी उगवुन आलं आहे. अजुन थोडं वाढल्यावर बघु म्हणुन ठेवलं. नंतर काढुन टाकणार होते तेवढ्यात नवी पानं वेगळी आलेली दिसली. आता आता जरा अशी पानं यायला लागली आहेत.
हा अजुन एक फोटो टाकते.

IMG_7533_leaf2.jpg

आता अजुन वाढलं की फोटो देईन

खुप छान छान फुलांचे फोटो.:)

खरच कधी एकदा खुप खुप पाऊस पडेल असे झाले आहे....

दिनेश दा खुप दिवसात भेट झाली नाही. या वेळेस खुप वेळ काढुन नक्की या.

Pages