निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद जागु, शशांकजी... माझ्या भावना तुमच्या पर्यंत पोचल्यात..:)

सरिवा केवडा पहिल्यांदाच बघते आहे... मस्तच ग!
लाल कण्हेर छानच..

धन्यवाद हेमा ताई...:)

सायली अभिनंदन. मी समजू शकते तुझा आनंद. आमच्याही दारात एक चाफा आहे. जवळ जवळ दहा वर्ष वाट पहायला लावली मला त्याने. प्रत्येक वेळेला मला वाटायच आली कळी पण ती पालवीच असायची. पण शेवटी एकदा एका पानाच्या खाली काहीतरी थोडसं टप्पोर दिसलं आणि हळुहळु ती कळी आहे असं जाणवायला लागल. प्रथम अगदी छोटी मग थोडी थोडी टप्पोरी होत होत सोनपिवळी झाली आणि एक दिवस ते पहिल फुल पूर्ण उमलल. मला ही तुला झालाय तसाच आनंद झाला होता त्या दिवशी. तु काढलेला फोटो छानच आलाय.

जागू, लाल कण्हेरी ही मस्त.

खर सोनचाफा ही चीजच स्वर्गीय आहे..आमच्या इथे एक सोनचाफ्याचे कायम फुलानी भरलेले झाड होते.. पण फुल नेहमी झाडाच्या टोकावर..कधी एक सुद्धा मिळायचे नाही. एकदा अशीच प्रचंड पावसातुन येत अस्ताना एक फुल खाली पडलेले दिसलेले.. मी पुढे गेलेले मागे गाडी वळवुन भर पावसात कार मधुन उतरुन ते घेतले.. अहाहा काय सुंदर वाटले ते हातात आल्यावर..आता गुलबकावलीचे फुल मिळाले तरी इतका आनंद नाही होणार...री:-)

सायली लक्की आहेस..!!

मृनिश, जागु दोघांचेही अनुभव खुप सुखद आहेत...
बोगनवेल खरच सुरेख... यातला तो फिकट केशरी रंग कीती मोहक असतो ना!

मला माहीत नव्ह्ते सोनचाफाचे दोन रंग असतात. नि. ग. मु़ळे खुप छान आणि महत्वाची माहीती मिळते.
आमच्याही कुंपणाजवळ खुप उंच सोनचाफाचे झाड होते फुले येत नव्ह्ते म्हणुन तोडले तर वर १० ते १२ कळ्या आल्या होत्या हळहळ वाटली होती. शेजारच्याना घर वाढवायचे होते ते सारखे मागे लागत फुले येत
तर झाड तोडुन टाका. तेव्हा मी लहान होते नाहीतर तोडुच दीले नसते.

सोनचाफ्यात तीन रंग असतात. पांढरा, पिवळा आणि पिवळसर केशरी... बिट्टीच्या फुलातही या तीन छटा असतात. सोनचाफ्याच्यातिन्हींच्या पानात किंचीत फरक असतो पण सुगंध, फळे आणि बिया सारख्याच असतात.

एक छान बातमी !

http://www.loksatta.com/pune-news/plantation-growth-holkarwadi-project-6...

सध्याचा हंगाम वृक्षारोपणांच्या कार्यक्रमांचा आहे. अनेक संस्था आणि महापालिका देखील शहराभोवतीच्या टेकडय़ांवर वृक्षारोपणाचे कितीतरी कार्यक्रम घेतात. लावलेल्या या झाडांच्या संगोपनाची मात्र काहीच व्यवस्था नसते. दोन वर्षांपूर्वी कात्रज पासून वीस किलोमीटरवर असलेल्या होळकरवाडी गावातील टेकडय़ांवरही असेच वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, त्या वृक्षारोपणाचे वेगळेपण हे की या टेकडीवर आता तब्बल तेरा हजार झाडे जगवण्यात आली आहेत आणि त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपनही केले जात आहे.
होळकरवाडीच्या चहूबाजूंनी साडेसहाशे एकर गायरान जमीन आहे आणि तीन मोठय़ा डोंगराच्या कुशीत हे गाव वसले आहे. या उघडय़ा बोडक्या डोंगरांवर आणि खडकाळ अशा ३२ एकर क्षेत्रावर वृक्षारोपणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथे पहिला वृक्षारोपणाचा कार्यक्रम ८ जुलै २०१२ रोजी झाला. त्या वर्षी सात हजार झाडे लावण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ८ जुलै रोजी आणखी साडेसहा हजार झाडे लावण्यात आली. या मुरमाड डोंगरावर आता पिंपळ, आवळा, कडुलिंब, वड, चिंच, कवठ, सीताफळ, आंबा ही आणि अशी विविध प्रकारची तेरा हजार झाडे छान जगली आहेत आणि ती वाढतही आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चालवल्या जात असलेल्या या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे संस्थेचे पाचशे सदस्य या झाडांची जोपासना करतात. त्यासाठी गुरुवार आणि रविवार हे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. गावाचे सरपंच रवींद्र झांबरे यांचीही या उपक्रमाला सुरुवातीपासून सर्व ती मदत झाली आहे.
या कामाला सुरुवात झाली तेव्हा पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्या वेळी टँकर आणून डोंगरांवर रांगा करून ते पाणी वाहून नेले जात असे आणि नंतर ते झाडांना दिले जात असे. त्यासाठी सदस्य टँकर पासून साखळी करून पाणी वाहून नेत. त्यानंतर आता श्रमदान करून डोंगरांवर छोटी तळी करण्यात आली आहेत. त्यात टँकरचे पाणी टाकले जाते आणि ते पाणी सदस्य कॅनमधून एकेका झाडाला देतात. याशिवाय आठवडाभर ओल टिकून राहावी म्हणून सलाइनच्या बाटल्यांचा वापर करून त्याद्वारेही पाणी देण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. प्रत्येक रोपापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी सदस्य अतिशय परिश्रम घेतात आणि सर्व काम स्वेच्छेने करतात. त्यामुळेच गावाच्या बाजूचे बोडके डोंगर आता हिरवे होऊ लागले आहेत.
वृक्षसंगोपनाचा हा उपक्रम यशस्वी झाला आहेच, शिवाय आता महापालिकेच्या साहाय्यातून तळजाई डोंगरावरही प्रतिष्ठानतर्फे दहा हजार झाडांच्या संगोपनाचा उपक्रम ८ जुलै रोजी सुरू केला जाणार आहे.
योगेश फडतरे, प्रमुख वृक्षारोपण, संगोपन मोहीम

अरे वा दिनेशदा खरच खुप चांगली बातमी आहे. मी म्हणते प्रत्येक शहरातील रस्त्याच्या कडेलाही अशी झाडे लावण्याचे कार्यक्रम राबविले पाहिजेत.

सुरुची, खुप मोठे झाड असते ते. त्यामूळे आधी जरी कुंडीत लावला तरी नंतर बाहेर लावावाच लागेल. मोठ्या बिल्डींगच्या आवारात लावला तर सर्व घरात छान सुगंध येतो.

जागू.... आता ही जाणीव लहान मूलांनाच करुन द्यावी लागेल. आपल्या पिढीने त्यांचे भरपूर नुकसान करुन ठेवलेले आहे.

ऋषीपंचमीला ज्या (हाताच्या) भाज्या मिळतात त्या नंतर कधी बाजारात दिसत नाहीत.
काय नावं आहेत त्या भाज्यांची? कुणी सांगु शकेल काय???

पायनु भाजी म्हणतेस का ?
२१ प्रकारच्या भाज्या आमच्याइथे टाकतात पायनु भाजीत असे म्हणतात.
मी पाककृती पण टाकली आहे बघ त्याची माझ्या लेखनात. उद्या आठवतील तेवढ्या भाज्यांची नावे देते.

बाप्रे,.. २१ प्रकारच्या अस्तात का?
आमच्याकडे ४-५ भाज्य अस्तात मिक्स! एक भेंडीसारखी असते, एकीला तुरे असतात्...आणि बाजरीच्या दाण्यासारख्या बिया असतात त्यांना आणि एक दोडक्यासारखी.. अजुन काही काळपट तुरीसारखे दाणे असतात्..पण ते कडवट लागतात.
ही मिक्स भाजी मला भयंकर आवडते. आई करते ना उपास. आम्ही अग्दी टप्पुन बसलेलो असतो या भाजीसाठी. Happy

दोन दिवसांनी नीट वाचले, सर्व फोटो आणि माहिती सुरेख. पांढरा सोनचाफा पहिल्यांदा पाहिला. गावाला पिवळसरच आहे.

जिप्सी अभंग आणि वारीचा फोटो मस्त.

शशांकजी सुरेख अभंग.

आर्या आमच्याकडे त्यात अळू, हिरवा माठ, मूळा, दोडका, अरवी, लाल भोपळा, भेंडी, मक्याचे कणीस, ओले भुईमूगाचे दाणे, श्रावण घेवड्याचे दाणे, डांब, पांढरे रताळे, आंबाडे ( फळे ), कोवळे शहाळे, चाकवत, आंबट चुका, कोहळा... अशा साधारण सोळा भाज्या घालतात. शिवाय चिंच आणि मिरची. फोडणी नाही, पण वरून साजूक तूप किंवा दही घालतात. सोबत वर्‍याचा भात किंवा दशमी असते.

थोडा उशीर झालाय पण तरीही दाखवल्याशिवाय रहावत नाहीये. हा माझ्या दारातला सोनचाफा. आमच्या मजल्यापर्यंत उंच झालाय आता. त्याला न्याहाळणे गॅलरीत बसून हे माझ्या आनंदाचे निधान आहे. गावाहून छोटसं रोप आणलं होत, आता चांगलच वाढलय. चैत्रात जुनी पान गळून मस्त नवी पोपटी रंगाची पालवी येते आणि श्रावण महिन्यात ही अशी सोनपिवळी फुले.

From mayboli

एकदा मी सोनचाफा चे अत्तर विकत घेत होते. त्याचा रंग पिवळसर नव्ह्ता म्हणुन मी घेतले नाही .
पांढरा सोनचाफा असेल कदाचीत.

सोनचाफा, कन्हेर, केवडा, बोगनवेल भारीच अगदी.
मी पुर्वी एकदा बोगनवेलाच्या झाडाचा रोममधे काढलेला फोटो टाकला होता. इथे परत एकदा देतेय.

हल्ली आमच्या कडे सर्वत्र विविध रंगांची फुललेली फुलं पहायला जाम मजा येतेय. बहरलेल्या गुलाबांपासून जाताना तर काय सुगंधी वातावरण असते.
आज आमच्याकडे मिडसमर डे साजरा झाला. अतिशय उत्साहाने तालात नाचणारी वृद्ध जोडपी, पानाफुलांचे मुकूट घातलेली उत्साही जनता पहायला खूप मजा आली.

bogan.jpg

ओक्के जागु, दिनेशदा...पण या सगळ्या ओळखीच्या भाज्या आहेत. आमच्या इथे ३-४ अनोळखी भाज्या अस्तात. मी टाकेन फोटो ऋषीपंचमीला!

नंदिनी...बोगनवेलीचं झाडं सुंदरच दिसतय!! प्रयत्न करायला पाहिजे असा बोगनवेलीला झाड बनवायचा. की त्याची वेगळीच 'जात' असते????

आर्या, ते पांढरे दाणे मी ठाण्याला बघितले होते.. पण मुंबईत दिसत नाहीत ते. गोव्याला यात कुर्डू वगैरे भाज्या पण वापरतात. तिथे अशी मिश्र पालेभाजीचीच जूडी मिळायची.

**************

काल मी नॅशनल जिओग्राफीची एक फिल्म बघत होतो. त्यात अमेरिकेतील डेथ व्हॅली दाखवली होती. ते रुक्ष वाळवंट आहे पण त्याखाली एका गुहेत खुप मोठा पाण्याचा साठा आहे. आणि जगात केवळ तिथेच आढळणारी एक सुंदर निळ्या माश्याची प्रजाती आहे. Pupfish असे त्याचे नाव. इथे फोटो बघता येईल त्याचा. ( या नावाने गूगलही करता येईल ) त्या माहितीपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी केवळ १०० मासे शिल्लक होते.

http://www.google.com/imgres?imgurl=http://www.fws.gov/nevada/protected_...

नलिनी बोगनवेल मस्तच. आणि ममो............सोनचाफा ही सुंदरच. सांगलीला झाड होतं. टोपलीभर फुलं निघायची. बाईंना (शाळेत) द्यायची असायची काही. आणि उरलेल्यावर मैत्रिणींचा डोळा असायचा.

Pages