मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती,
कोण-कोणते शहारे आलेत नक्की?
अहो शिमग्याचे कवित्व दिवाळीपर्यंत चालवायचे आहे का?
वर दिलेली बातमी वाचून काय रोमांच उभे राहिलेत का?

हेच १६ मे च्या आधी झालं असतं तर इथल्या जिभा कश्या वळवळल्या अस्त्या त्याचा विचार करून अंगावर शहारे नाहीत, काटे येतात.

बोगस!

Mumbai riots: Rs 2-crore bill to be slapped on Raza Academy

Apart from this, the BMC has also sent a bill of Rs. 3 lakh to the Mumbai police commissioner pertaining to the damage of the Amar Jawan memorial, which will also be recovered from Raza Academy. The BMC has also expressed its willingness to register a separate FIR for the damages to the memorial, but cops are yet to take a decision on this matter.

मी या देशाचा नागरीक म्हणून रस्त्यावर चालतो तेव्हा अश्या गोष्टी होवू नयेत, ही 'सरकार'ची जबाबदारी असते.

ही जबाबदारी सर्वांसाठी पाळणे यालाच 'राजधर्म' म्हणतात. लांगूलचालन नव्हे.

मी अमुक धर्माचा, अमुक रंगाचा, तमुक लिंगाचा, म्हणून मला कुणी त्रास दिला तर माझ्या वतीने जाब विचारणे यासाठी सरकार असते.

काही गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.

There was no one left to speak, when they came for me.. असे होऊ नये, असे झालेले माझ्या लाईफटाईममधे पहावे लागू नये, ही मनापासून इच्छा आहे.

ठाकरे उर्फ जोशी, तिथे २ पोलिस होते,
अन आम्ही दोघेच आहोत, काही करू शकत नाही असे बोलत होते. अन निघून गेले.

जय मोदी सरकार!

किती फाटे फोडाल?
किती डू आय पोस्टी टाकून हे पान गायब करायचा प्रयत्न करतील?
कितीक दिवस चालेल?
एल ओ एल.

आवडली बातमी लै भारी !!

तुमची मानसीकता ! अरेरे !! कोणाचा खुन झाला तरीही चांगली बातमी ?

Good ! Keep it up Doctor !!

एक्झॅक्टली जोशी/ठाकरे!

कुणी मेला, ही बातमी चांगली नव्हे, पोलीसांनी काम केले ही चांगली बातमी. इतकी समज तुम्हाला आहेच, पण ट्विस्ट करणे ही गोबेल्सनीती तुम्हाला येते.

प्रीप्लाण्ड मर्डरमधे पोलिसांनी अधिक कुमक ठेवायला हवी होती, हे कोण सांगेल? तुम्ही अन तुमचे विखार तुम्हाला लखलाभ असोत. पब्लिक पहाते आहे काय सुरू आहे ते.

तुम्ही तुमचा प्रचार सुरू ठेवा.

अन हो,
महाराष्ट्र पोलिस अजूनही, काँग्रेसच्या सरकारचे ऐकतात बरं का
Wink कुमक ठेवू की नको या द्विधेत सापडले असतील बिच्चारे! नाईलाज असेल त्यांचाही..

तिथे २ पोलिस होते,
अन आम्ही दोघेच आहोत, काही करू शकत नाही असे बोलत होते. अन निघून गेले.>>>

महाराष्ट्र पोलिस अजूनही, काँग्रेसच्या सरकारचे ऐकतात बरं का>>>>>

ही वाक्ये दोन वेगवेगळ्या घटनांबद्द्ल आहेत का?

ब्रम्ह देशात मुसलमानांवर झालेल्या अत्याचाराचा वचपा काढण्यासाठी हुतात्मा चौकात दंगे केले होते ते विसरले काय ?

त्या दंगलीत दोन निष्पाप जीवांचा बळी गेलदंगलीत, १४ लोक जखमी झाले होते आणि महिला पोलिसांचा
विनयभंग झाला होता तेंव्हा तुमचा काय स्टँड होता ?

>>प्रीप्लाण्ड मर्डरमधे पोलिसांनी अधिक कुमक ठेवायला हवी होती, हे कोण सांगेल? <<
पोलिसांनी दाभोळ्कर सारख्या माणसाच्या जीवाला धोका असुनहि सुरक्षा दिली नाहि मग त्या घटनेचा ठपका तुम्ही आधिच्या सरकारवर का नाहि टाकला? पोलीस तेच, राज्य सरकार हि तेच; फक्त केंद्रात सत्ता बदलली...

देन व्हाय धिस कोलावरी, कोलावरी, कोलावरी दि... नाउ?

आता नीट बातम्या वाचा अन नाचा.
ट्विस्ट देणे ही तुम्हा लोकांची खासियत आहेच.

अन नंदिनी,
पूर्वीच्या काळच्या कुण्या धाग्यांवरची तुमची मते आठवताहेत मला Wink अ‍ॅडमिन कृपेने अस्तंगत झालेल्यांपैकी आहे तो एक..

पूर्वीच्या काळच्या कुण्या धाग्यांवरची तुमची मते आठवताहेत मला डोळा मारा अ‍ॅडमिन कृपेने अस्तंगत झालेल्यांपैकी आहे तो एक..<<< बरं मग????

इब्लिसः

--अत्यंत निषेधार्ह घटना. आरोपीना योग्य शिक्षा व्हायलाच हवी.

२ <५ वर्षं महाराष्ट्रात मिळाल्यावर लावलेले दिवे आठवून अजूनही शहारे येतात अंगावर. It is better to learn from experience.>
नक्की कोणते शहारे येत्तात तेही सांगा. ज्ञानात भर पडेल.
त्या सरकार नंतर तब्बल १५ वर्ष तुमच सरकार होतं. १५ वर्ष..नक्की काय दिवे लावलेत तुमच्या सरकार ने ते ही कळू द्या. सेनेने एन्रोन बंद पाडले ना? १५ वर्षात एक नाही १० एन्रोन सुरु करता आले असते की..
एन्रोन चं तुणतुणं वाजवणं बण्द करा..
३. हेच १६ मे च्या आधी झालं असतं तर इथल्या जिभा कश्या वळवळल्या अस्त्या त्याचा विचार करून अंगावर शहारे नाहीत, काटे येतात.
बोगस!
-- कॉग्रेस ला विरोध करणारे म्हणजे सगळे दंगेखोर्, मुसल्मान विरोधि?? तुमची अत्यंत घाणेरडी मनोव्रुत्ती आहे ही..

अहो, माझ्या धाग्यावर मोदी सरकारच्या धोरणा-निर्णयांची चर्चा करायचीय.

मला सुद्धा विसरायला होईल.
Wink

सध्या तरी अतिरीक्त कारभार नितीन गडकरींकडे सोपवण्यात आलेला आहे. लवस्करच याबद्दल निर्णय जाहीर असं बातमीत म्हटलंय.

मोदी सरकारचे नोकरशहांना आवाहनः कामे करताना भीती बाळगू नका.

NEW DELHI: PM Narendra Modi on Wednesday assured the bureaucracy of protection against malicious prosecution for bona fide decisions, saying secretaries to the government can approach him or mail him directly with inputs and ideas on any issue for deciding matters quickly.

http://www.hindustantimes.com/india-news/pune-techie-killed-sms-boasts-o... जय मोदी सरकार!! गुजरात पॅटर्न तो हाच का रे भौ?

अच्छे दिन आने वाले है, कारण काही वाईट झालेले लोकांपर्यंत पोहोचणारच नाही!>> अगदी अगदी!

दाभोळकरांना पोलिस संरक्षण का दिले नाही??? http://www.thehindu.com/news/national/other-states/rationalist-dabholkar...

>>> His family said he received threats often but refused to ask for police protection. “He thought this was a struggle to end ignorance, and he did not need weapons to fight it,” said his son. >>

सडेतोड,

१.
>> जय मोदी सरकार!!

कायदा आणि सुव्यवस्था ही राज्य सरकारची जबाबदारी असते. महाराष्ट्रात मोदींचं सरकार नाही.

२.
>> गुजरात पॅटर्न तो हाच का रे भौ?

त्याचं काय आहे की महाराष्ट्रातले मुस्लिम न्यूनगंडाने पछाडलेले आहेत. त्यांना शिवाजीमहाराज, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी इत्यादिंची बदनामी केली की मोठ्ठं पुण्यकृत्य केल्यासारखं वाटतं. हिंदूंना शिव्या देण्यापेक्षा मुस्लिमांचा हा न्यूनगंड कमी करायच्या कामी तुम्ही लागा आता.

हिंदूंनी वैध मार्गाने निदर्शने केली तर पोलीस उलटे हिंदूंनाच पकडतात. मग कायदा आणि सुव्यवस्था राखायची कोणी?

आ.न.,
-गा.पै.

Pages