मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदय आणि उदयन ह्यात गोंधळ झाल्यामुळे क्षणभर मला वाटले की उदयन वळले की काय भाजपकडे!

शशी थरूर वळतात तिथे माबोकरांचे काय म्हणा!

Light 1

बेफी चांगल्या निर्णयाला / गोष्टीला मी चांगलेच म्हणतो.. Wink

शशी थरुर चे वक्तव्य योग्यच होते ..त्यात काय नवल ? आता काँग्रेस भाजपासारखी तर नाही आहे जी १० वर्षे विरोधी बाकावर बसुन सरकारच्या प्रत्येक धोरणाला विरोध टिंगल टवाळी , अप्रचार करने सारखे प्रकार करायला Biggrin

जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे ... जे १० वर्षात घडले नाही.. ( आता इथले ओरडत येतील ..१० वर्षात काहीच चांगले घडले नाही तर कसे म्हणनार बोलत Wink )

शशी थरुर चे वक्तव्य योग्यच होते ..त्यात काय नवल ? आता काँग्रेस भाजपासारखी तर नाही आहे जी १० वर्षे विरोधी बाकावर बसुन सरकारच्या प्रत्येक धोरणाला विरोध टिंगल टवाळी , अप्रचार करने सारखे प्रकार करायला खो खो
----- शशी थरुरान्चे स्वत:चे वैयक्तिक मत आहे, काँग्रेस चे मत नाही. काँग्रेस या वक्तव्यापासुन दुर रहाण्याचा प्रयत्नात आहे, अपेक्षेप्रमाणे मणि शन्कर अय्यारान्नी थरुरान्वर कडवट टिका केली आहे...

त्या मणिशंकर अय्यरला अजुन येते काय? स्वतःच डिपॉझिट वाचवु शकला नाही आणि आता टिवटिव करत बसलाय एक नंबरचा लाळपुश्या माणुस आहे.

मुंडे गेल्यावर त्यांचे पद त्यांची मुलगी 'पंकजा मुंडे' हिला देण्यात यावे अशी विनंती काल 'पंकजा मुंडे' यांचे मामा टिव्हीवर करतांना दिसले.

सगळ्या पोस्टस नाही वाचत बसत आता. अर्थशास्त्रावरच्या पोस्टस चांगल्या आहेत पण माझ्या आकलनापलिकडच्या आहेत. सहा दिवसांच्या आठवड्याचे सूतोवाच केले आहे अशी ऐकीव बातमी आहे. कुणाकडे काही बातमी ?

बाकी, ईव्हीएम मशीन्स या वेळी व्यवस्थित चालली ना ?

<<<सहा दिवसांच्या आठवड्याचे सूतोवाच केले आहे अशी ऐकीव बातमी आहे. कुणाकडे काही बातमी ?>>>

सरकारी खात्यांना तसे अंतर्गत आदेश देण्यात आले आहेत अशी खात्रीलायक बातमी आहे.

This report in the Business Standard quotes Minister of State for Home Affairs, Kiren Rijiju, as saying that the main problem faced by Modi's staff is that the man himself is up and running at 5.30 am even after working till well after 1 am.

Food Processing Minister Harsimrat Kaur Badal is also quoted as saying she got a call from Modi at 9 in the morning asking her to meet him in 10 minutes. "I left whatever I was doing and simply rushed because I know the PM doesn't like latecomers," she has been quoted as saying

"He found one of the offices filled with smoke and politely told the officers that there is a 'no smoking' board outside. In another room he found several dirty tea cups littering the desks. He just mentioned them and walked out but that was enough for us to get the message," a bureaucrat said.

सहा दिवसांच्या आठवड्याचे सूतोवाच केले आहे अशी ऐकीव बातमी आहे. कुणाकडे काही बातमी ?>>>
बातमी अशी आहे की मंत्र्यानी व नोकरशहानी शनिवारीही काम करावे म्हणजे सुटी राहील पण मंत्री आणि ऑफिसर्स यानी ऑफिसम्ध्ये काम करावे. असा उपदेशात्मक आदेश आहलोक्पब्लिकसाठी ऑफिसे बन्द राहतील . आता मंत्री आणि सायेब आला की खालच्या स्टाफला झकत यावेच लागणार Happy

सनी लिओनला भीती वाटली असेल . भाजपाचे लोक सस्न्सदेतच आपली ब्ल्यु फिल्म बघतील म्हणुन. त्यामुळे तिने नग्नचित्र सन्यास घेतला.

डरने के दिन आ गये.

बीपी के दिन आ गये

Proud

सनी लिओनला भीती वाटली असेल . भाजपाचे लोक सस्न्सदेतच आपली ब्ल्यु फिल्म बघतील म्हणुन. त्यामुळे तिने नग्नचित्र सन्यास घेतला.

डरने के दिन आ गये.

बीपी के दिन आ गये<<<

लगो, एखादा पूर्वग्रहरहित विनोद करून बघत जा अधूनमधून!

Biggrin

लोकहो,

सनी लियोनला बरोब्बर संदेश मिळाला. वेळच्यावेळी चाळे आवर! नाहीतर...!!

आ.न.,
-गा.पै.

वेळच्या वेळी चाळे आवर नाहीतर आमचे खासदार सन्सदेअतच तुझा षिनेमा लावतील

Sad

निळी भावली लावायची म्हणुन ही स्मायली वापर्ली

डरने के दिन आ गये.
------ बरोबर... मोदी यान्च्या कणखर नेतृत्वामुळे भ्रष्टाचार, पिढीजात चोर लोकान्चे डरने के दिन आ गये है. Happy

मोदीन्कडुन देशाच्या खुप अपेक्षा आहेत, किमान सहा महिने काम करु द्यायला हवे.... तोपर्यन्त दररोज मोदी यान्ची हसतमुख छबी सर्व चॅनेल्स्वर, वर्तमान पत्रात बघायची सवय करुन घेतलेली बरी.

बरेच दिवसांनी एक असा धागा निघाला आहे ज्यावर कोणीही मनमोकळेपणाने जे मनात आले ते लिहू शकतो, ते मूळ विषयाशी सुसंगत आहे की विसंगत हे पाहण्याची प्रतिसाददात्याला आवश्यकता भासत नाही व ती अटही नसते.

बेफ़िकीर | 6 June, 2014 - 20:18 नवीन
बरेच दिवसांनी एक असा धागा निघाला आहे ज्यावर कोणीही मनमोकळेपणाने जे मनात आले ते लिहू शकतो, ते मूळ विषयाशी सुसंगत आहे की विसंगत हे पाहण्याची प्रतिसाददात्याला आवश्यकता भासत नाही व ती अटही नसते.

मला वाटतं या वाक्यातला बरेच दिवसांनी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे.
माबोवरचे सगळे धागे ऑलमोस्ट असेच असतात. Wink
वरती हेडरमध्ये असे करू नका असे लिहूनही लोक तसेच वागत असतील आणि अ‍ॅडमिनला निरर्थक प्रतिसाद उडवा असे सांगूनही ते उडवत नसतील तर धागाकर्तीचा नाविलाज आहे.

मोदींचे विदेश दौरे:
भुटान
जपान : जूलै
ब्राझिल: ब्रिक्स परीषद जूलै
अमेरीका: सप्टेंबर

माबोवरचे सगळे धागे ऑलमोस्ट असेच असतात. डोळा मारा
---- सहमत... आणि याला आपण सर्वच कुठेतरी नकळत का असेना हातभार लावत असतो.

वरती हेडरमध्ये असे करू नका असे लिहूनही लोक तसेच वागत असतील आणि अ‍ॅडमिनला निरर्थक प्रतिसाद उडवा असे सांगूनही ते उडवत नसतील तर धागाकर्तीचा नाविलाज आहे
----- अ‍ॅडमिन यान्ना अनेक कामे आहेत... आणि ते जर निरर्थक प्रतिसाद उडवण्याचे काम करत बसले तर दर दहा आय डी साठी एक अ‍ॅडमिन लागेल. Happy थोडक्यात कामाचा व्याप प्रचण्ड वाढेल...

प्रतिसाद धाग्याशी सम्बधित नसल्यास किव्वा निरर्थक असल्यास क्षमस्व.

Pages