येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
मोदी - ओबामा भेट
मोदी - ओबामा भेट सप्टेंबरमध्ये.... महाराष्ट्र टाईम्स.
भेट होण्याची शक्यता आहे...
भेट होण्याची शक्यता आहे... जॉन केरी यान्ना सुषमा स्वराज यान्च्याशी फोनवर सम्भाषण साधण्यासाठी बराच वेळ ताटकळत रहावे लागले होते... परराष्ट्र व्यावहार मन्त्री स्वराज ह्या कामात व्यस्त होत्या असे कारण पुढे आले.
पन्तप्रधान मोदी अमेरिकेला सुरवातीपासुन कमी महत्व देत आहे, मनात २००५ मधे विसा नाकारल्याचे शल्य अजुनही मनात आहे.
विसा नाकारल्याचे शल्य -
विसा नाकारल्याचे शल्य - त्याही पेक्षा खोब्रागडे प्रकरणात आणि एकूणच भारताला देण्यात येणारी दुय्यम वागणूक जास्त सलत आहे.
जशास तसे? मला इंदिरागांधी
जशास तसे? मला इंदिरागांधी आठवल्या. अंदाजे १९८० चा काळ असेल.
पन्तप्रधान मोदी अमेरिकेला
पन्तप्रधान मोदी अमेरिकेला सुरवातीपासुन कमी महत्व देत आहे, मनात २००५ मधे विसा नाकारल्याचे शल्य अजुनही मनात आहे.<< शक्य आहे, मोदींच्या जवळपासचे लोक सांगतात की मोदी अपमान कधीच विसरत नाही, पण त्याबद्दल बोलूनही दाखवत नाही. बरोब्बर वेळ आल्यावर मात्र अचूक डाव साधून घेतला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फार आवश्यक असलेला गुण आहे!!
पीएमओच्या ऑफिसकडून येणारे रोजचे अपडेट्स मात्र भारी असतात आमच्या मुख्यमंत्रीअम्मांनी मोदींची भेट घेतली तो फोटो फारच प्रसन्न वगैरे हसतानाचा होता. अम्मा एन डी ए मधेय तीन मंत्रीपद दिल्यास येणार आहेत असे वाचले. म्हणजे मोदी लोकसभेतील बहुमतासोबतच राज्यसभेतील बहुमताचाही विचार करत आहेत असे दिसते.
जयलितांनी राज्यसभेत issue
जयलितांनी राज्यसभेत issue based पाठींबा देण्याबाबतही चर्चा केली असे वृत्त आहे. त्यावर कदाचित अशी चर्चा झाली असावी.
कदाचित जुलै मधे मोदींचा होऊ
कदाचित जुलै मधे मोदींचा होऊ शकेल जपान दौरा !
आज एक कलिग म्हणत होता असे. बाकी या बातमीला अजुन तरी कसलाच आधार नाही.
पंप्र झाल्यानंतरचा पहिलाच परदेश दौरा जपानचा असु शकेल.
Amitabh Kant, DIPP secretary
Amitabh Kant, DIPP secretary tweeted: “First time in my career - free, frank and fearless interaction with the prime minister of the country. Highly motivating! Great flow of ideas!” This meeting gives an idea on how the Modi government is going to function over the next 5 years and the kind of ideas that he has. With his mandate of less government and more governance, it is hence extremely important to have all secretaries on the same page. Many secretaries feel Modi’s speech was a morale booster and it was great to hear the prime minister talk about his ideas on governance. Over the next week, secretaries may be individually called in to give 10 minute presentations on their respective departments.
इथे रोज च्या रोज अपडेट असतात.
http://www.moneycontrol.com/election-2014/nda-100days.html
सुमित्रा महजन यांना लोकसभेचं
सुमित्रा महजन यांना लोकसभेचं अध्यक्षपद निश्चित झालंय.
मुरली मनोहर जोशी यांचि महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नेमणूक होउ शकते..
गापै, तुमच्या प्रतिसादातील
गापै,
तुमच्या प्रतिसादातील "त्याचं काय आहे की महाराष्ट्रातले मुस्लिम न्यूनगंडाने पछाडलेले आहेत." हे खूप खटकले, विशेषतः त्या संदर्भात.
एकतर कोणत्याही समाजाबद्दल किंवा जातीबद्दल असले घाऊक उल्लेख करणे चुकीचे आहे व धोकादायक आहे. त्यात तेथे एका दुर्दैवी घटनेच्या संदर्भात हे आले आहे त्यामुळे एकदम इनसेन्सिटिव्ह आहे.
राहुल गांधींवरच्या संस्कारांबद्दलही तुम्ही येथे की दुसर्या बाफवर लिहीले आहे ते ही आवडले नाही.
मोठेपणा एका दिवसात तयार करता
मोठेपणा एका दिवसात तयार करता येत नाही, मोठेपणा दीर्घकाळ जोपासलेल्या चारीत्रातूनच निर्माण होतो. असे म्हणतात कि तुमच्या चारित्र्याची ओळख हि ज्यांच्यापासून तुम्हाला काही फायदा नाही त्यांना कसे वागवता यावरून ठरते. पक्षानिभिविनेश बाजूला ठेवून हा लेख वाचण्यासारखा आहे कारण त्यातील अनुभव हा कोणा राजकीय विश्लेषकाचा नाही तर तुमच्या आमच्या सारख्या सामन्याचा आहे .
कित्येक काळानंतर आदरणीय म्हणता येईल असे नेतृत्व लाभले आहे तर खुल्या दिलाने एक संधी देण्यास काय हरकत आहे.
http://www.thehindu.com/opinion/open-page/a-train-journey-and-two-names-...
नितिन गडकरिंनी जाहिर केलि
नितिन गडकरिंनी जाहिर केलि पोलिसि.
लायसनच कायदा बदलनार.
३ वेला चुकल्यास लाय्सन केन्सल. परत गादि चालवु देनार नाहि.
मानसावर विशवास नाहि. केमेर्यातुन नजर थेवनार. फुल्ल ओटोमेतिक सिस्तिम. घरि पावति.
माननीय कानतोडे भाऊ, बराहा
माननीय कानतोडे भाऊ,
बराहा वापरूनही इतकं बेक्कार लिहिता येऊ शकतं यावर विश्वास बसत नाही.
तेव्हा आमच्या उभ्या असलेल्या विश्वासाची काळजी करून, जरा नीट लिहायला शिका प्लीज.
धन्यवाद.
पंतप्रधान मोदी यांचा पहिला
पंतप्रधान मोदी यांचा पहिला विदेश दौरा 'भूतान' ला.
पहिला मान - भूतान
गॅसच्या किंमतीत वाढ होणार. रिलायंसने गॅस पुरवठाच्या दरात वाढ करुन $८ प्रति युनिटने भाव देण्याची विनंती केलीय. गॅसच्या किंमतीत वाढ
ही भाववाढ एप्रिलमध्येच होणार होती पण निवडणुका असल्याने ती पुढे ढकलली, आणि आत्ता १ जुलैला निर्णय होईल.
उत्तरपूर्व भारतातील
उत्तरपूर्व भारतातील राज्यांसाठी जनरल व्ही के सिंग ह्यांना मंत्री बनवले. ह्या विभागासाठी विशेष मंत्रीपद हा प्रकार प्रथमच झाला. परिणामतः चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्यावर येणार! नरेंद्रभाई मोदींनी सत्तेवर येताच स्वतःच्या देशाच्या राजकीय व भौगोलीक मर्यादांबाबत आपण किती रोखठोक, कणखर आणि गंभीर आहोत हे दाखवून दिले.
<ह्या विभागासाठी विशेष
<ह्या विभागासाठी विशेष मंत्रीपद हा प्रकार प्रथमच झाला> हा विभाग आधीपासूनच होता. मंत्रीही होते.
आधीचे दोन्ही मंत्री पूर्वोत्तर राज्यांतून निवडून आलेले खासदार होते.
चीनचे सध्याचे प्रमुख li keqiang यांनी त्यांच्या पहिल्या विदेश दौर्यासाठी भारताची निवड केली होती.(मे २०१३)
अरे वा गॅस ची किंमत वाढली ??
अरे वा गॅस ची किंमत वाढली ?? अंबानीला पहिला हफ्ता गेला म्हणायचा
भरतजी .... मोदीस्तुती मोड मधे आहे बेफी
सगळ कणखर रोखठोक दिसत आहे त्यांना आता .. 
बहुतेक भारतातल्या
बहुतेक भारतातल्या उत्तरपूर्वेकडच्या राज्यांबद्दलही आत्ताच कळले असेल.व्ही के सिंग यांचा महिमा.
गा पै, जय मोदी सरकार ही राजु
गा पै, जय मोदी सरकार ही राजु ठाकरेनी दिलेली घोषणा आहे. आणि मुस्लिमांचा न्यूनगंड कमी करण्यासाठीच १९९२ सालची घटना "घडवली" गेली का?
नवाज शरीफना अगत्याने आमंत्रण का गेले, भूतानच दौरा का.... अदानी समुहाच्या विस्तारयोजनांचा मागोवा घेतल्यास उत्तरे मिळु शकतील.
याचाच अर्थ = आत्तापर्यंत हे
याचाच अर्थ = आत्तापर्यंत हे खातं होतं हे अनेक लोकांना ठाउकही नसण्याइतपत अकार्यक्षम होतं
अनेक लोकांना ठाउकही
अनेक लोकांना ठाउकही नसण्याइतपत अकार्यक्षम होतं >. जोक
फुकाची जाहिरात बाजी करण्याची सवय नव्हती हो आधीच्या सरकार ला
म्हणुन तुमच्यासारख्यांना माहीत नव्हते ...
कालच एकाची कमेंट फेसबुक वर वाचली ..." १६ तारखे नंतर सकाळी बराच आराम मिळायला लागला ... मोदीच्या कृपेने
" 
प्रत्येक गोष्ट जर मोदीला जोडु लागलेत तर १६ नंतर जे काही आपत्ती झाली त्याला सुध्दा मोदीला जोडाच
विचारवंत +१. सडेतोड -
विचारवंत +१.
सडेतोड - परराष्ट्र धोरण हे बहुतांशी व्यापार धोरण असावं. उगाच अमेरिका मोदींना बोलावण्यासाठी फडफड करतेय असं वाटलं का? का चहापानासाठी बोलावतील असं? स्वार्थाशिवाय कोणताही परदेशदौरा नसतो {वैयक्तीक नाही}. जशी इतर देशांनी भारतात गुंतवणुक करावी असं आपल्याला {सरकारला} वाटतं तसच इतर देशाचं आहे. त्याला हरकत कशाला? आणि संधीचा अदाणि फायदा घेत आहेत तर इतरांनाही ही संधी आहेच की.
अदानी समुहाच्या
अदानी समुहाच्या विस्तारयोजनांचा मागोवा घेतल्यास उत्तरे मिळु शकतील. >>.. अंबानीला १ हफ्ता दिला आहे गॅस वाढी ने आता अदानीचा नंबर आहे........
विशिष्टव्यापारी वर्गाचे धोरण बनवुन त्याची फुकाची जाहिरातबाजी चे लिप्स्टिक पावडर लावुन लोकांसमोर सादर करायचे .. आणि दाखवायचे डिप्लोमॅटिक धोरण "कणखर आणि रोखठोक" आहे
नवाज शरीफ यांना बोलवले ते केवळ अदानीला पाकिस्तान ला वीज विकायची आहे म्हणुन .. अश्या वेळेला निवडणुकिच्या प्रचारात दाखवलेला फुकटचा देशाभिमान वगैरे खड्ड्यात जातो..
गेली १० वर्ष पाकिस्तानी प्रधानमंत्र्याची भारतात पाउल टाकायची हिंमत नव्हती.... पण मोदी "कणखर आणि रोखठोक" असल्याने आल्याबरोबर त्यांना "रेड कारपेट" टाकुन बोलवले ..
इथे कमेंट टाकणे म्हणजे दंगली
इथे कमेंट टाकणे म्हणजे दंगली आणि कत्तली घडवून आणण्यासारखे आहे
फुकाची जाहिरात बाजी करण्याची
फुकाची जाहिरात बाजी करण्याची सवय नव्हती हो आधीच्या सरकार ला डोळा मारा म्हणुन तुमच्यासारख्यांना माहीत नव्हते ... >>>>>>> ओह, म्हणजे राहुलची प्रतिमा उजळण्यासाठी जे केले ते जाहिरातबाजी नव्हती ... चुकलंच माझं.
देशातील उद्योगाला चालना देणे हे चुकीचे आहे का?
४ $ वरुन ८$ केला हे उद्योगाला
४ $ वरुन ८$ केला हे उद्योगाला चालनाच दिले नाही का ?
अवघे ५० पैसे डिझेल काँग्रेस वाढवत होती तरी यांचा थयथयाट चालु होता इथे तर सरळ सरळ दुप्पटच केले की हो .. चालते वाटते आता हे
हे भाजपाने नव्हे तर
हे भाजपाने नव्हे तर काँग्रेसनेच वाढवुन दिले होते. त्याबद्दल आधी भाजपाने नव्हे तर आप ने थयथयाट केला होता. पण त्याचाही उपयोग झाला नाही.
काँग्रेसनेच वाढवुन दिले होते.
काँग्रेसनेच वाढवुन दिले होते. >>> चुक.... प्रस्ताव होता .. तो नव्या सरकार ला नाकारता देखील आला असता .. पण कसे नाकारणार
आप तर १ $ मधे द्या म्हणत होती.... तो येडेपणा आहे ते जाउ द्या ... गॅस दरवाढीला जो भाजपाने विरोध केलेला तो आता गायब झालेला आहे .. कारण सर्वाना माहीत आहे
गेली १० वर्ष पाकिस्तानी
गेली १० वर्ष पाकिस्तानी प्रधानमंत्र्याची भारतात पाउल टाकायची हिंमत नव्हती....
----- वरिल माहिती अपुरी आहे.
युसूफ रझा गिलानी ह्याना मोहालीचा भारत - पाक क्रिकेट सामना पहायला तत्कालीन पन्तप्रधान मनमोहन सिन्ग यान्नी बोलावले होते.
http://archive.indianexpress.com/news/i-am-here-to-promote-cricket-frien...
त्या सामन्या दरम्यान्चे पाकच्या कर्णधारने (भारतात असताना) व्यक्त केलेले मत आणि २४ तासानन्तर पाक मधे पाय ठेवता क्षणी त्याने जाहिर केलेले मत या दोन मधे जमिन-आस्मानाचा फरक आहे... यु ट्युब वर माहिती आहे.
युसूफ रझा गिलानी ह्याना
युसूफ रझा गिलानी ह्याना मोहालीचा भारत - पाक क्रिकेट सामना पहायला तत्कालीन पन्तप्रधान मनमोहन सिन्ग यान्नी बोलावले होते. >>> क्रिकेट मॅच बघायला ना... राजकिय दृष्ट्या या आर्थिक दृष्ट्या महत्वाचा होता का तो दौरा ?
मग अश्या दौर्याला काय किंमत ?
Pages