मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदय अ‍ॅडमिनना खूप कामे असतात याच्याशी सहमत.
पण सहसा कुणा धागाकर्त्याने निरर्थक प्रतिसाद उडवायची विनवणी त्यांच्या विपूत केली की ते काही वेळा कारवाई करतात.
इथे अजून केलेली नाही एवढेच म्हणायचे आहे.

निरर्थक प्रतिसाद उडवायची विनवणी<<<

प्रतिसाद निरर्थक नसतात साती, विसंगत असू शकतात.

आणि खरे तर असे रंजक प्रतिसाद आले नाहीत तर धाग्यात मजा काय? Happy

समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आपण घेतलेले घर हे फक्त आपले नसते तर किडे, मुंग्या, पक्षी, ह्या सर्वांचे असते.

तसेच आपण काढलेला धागा हा आपला, धागा आवडलेल्यांचा, धागा न आवडलेल्यांचा, ड्यु आय डीं चा, हिणकस आय डीं चा, असा सगळ्यांचा असतो. तो अ‍ॅडमीनने 'फक्त आपला व धागा आवडलेल्यांचा' करावा हे वाटणे पारमार्थिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. Happy

(अवांतराबद्दल क्षमस्व)

मग कुढत कशाला होतात? <<<

आपण व्यवसायाने डॉक्टर असल्याने आपल्याला पेशंटने मनातल्या मनात खदखदून हासत प्रत्यक्षात विषण्ण वर्तन करणे हे कुढण्यासारखे वाटत असावे. Happy

साती, तसे असल्यास क्षमस्व!

जी गोष्ट पाच वर्षे करावी लागणार आहे त्यावर मी सुसंगत प्रतिसाद देऊ नाही शकत Happy

तुम्हाला माहीतच आहे, पाच तासांनंतरचे मला सांगता येणार नाही.

बरं , Wink

फारएण्ड,

आपला इथला संदेश वाचला. दोन मुद्दे दिसले. एकेक चर्चेस घेऊया.

१.
>> राहुल गांधींवरच्या संस्कारांबद्दलही तुम्ही येथे की दुसर्‍या बाफवर लिहीले आहे ते ही आवडले नाही

संदर्भाकरिता माझा मजकूर देतोय : http://www.maayboli.com/node/49107?page=7#comment-3138551

त्या संदेशात शिवाजीमहाराज व शंभूराजे यांच्याही संस्कारांचा उल्लेख आहे. राहुल गांधींची उणीदुणी काढायची नसून भिन्न संस्कारांमुळे माणसे कसकशी वेगळी घडतात ते दाखवून द्यायचा हेतू आहे. Happy

२.
>> तुमच्या प्रतिसादातील "त्याचं काय आहे की महाराष्ट्रातले मुस्लिम न्यूनगंडाने पछाडलेले आहेत." हे खूप खटकले

राष्ट्रपुरुषांची विटंबना करणारे अत्यल्प आहेत. मग मुस्लिम विचारवंतांतून या गोष्टीचा निषेध का होता नाही? हे दोन वर्ग सोडल्यास उर्वरित मुस्लिमांची दखल घ्यायची आवश्यकता नाही. कारण की ते सारे या दोघांच्या मागोमाग जाणारे आहेत.

कोकणात इस्लाम कसा वाढला ते इथे पहायला मिळेल (इंग्रजी दुवा) :
http://www.ikokani.com/index.php?option=com_content&view=article&id=57&I...

इथे Early Muslim Settlements विभागात स्पष्टपणे लिहिलंय की इ.स. सातव्या शतकापासून कोकणपट्टीत मुस्लिमांची तुरळक वस्त्या होत्या. इ.स. ६९९ मध्ये बसरामध्ये होणाऱ्या छळाला कंटाळून तिथले काही अरबी मुस्लिम कोकणात आले. ज्याप्रमाणे इ.स.पू. १ ल्या शतकापूर्वी बेणे इस्रायली आले, १५ व्या शतकात पारशी आले तस्सेच ७ व्या शतकात मुस्लिम आले. कोकणात इस्लामचा विस्तार तलवारीने झालेला नाही. घाटावर वेगळी गोष्ट असू शकते (निजामी राज्यामुळे). तर मग कोणी बेणे इस्रायली वा पारशी माणूस हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना दिसतो का?

कोकणी मुस्लिम हा भारताला उर्वरित इस्लामशी जोडणारा दुवा का होत नाही? भारत अध्यात्मिक केंद्र असतांना भारतीय इस्लाम का जन्म घेत नाही? वहाब्यांना इतका मान का मिळतो? अरबी किंवा फारसी असेल तेच सरस अशी समजूत आहे म्हणूनच ना?

कुठे गेले मुस्लिम विचारवंत? ते ठामपणे भारतीय परंपरेच्या मागे आपलं वजन का टाकत नाहीत? विशेषत: पाकिस्तानची जी हालत झालीये त्या पार्श्वभूमीवर भारतीय मुस्लिम विचारवंतांनी मुस्लिमांस धोक्याचा इशारा द्यायला हवा होता. तसा काही दिसतो का? मलातरी ही न्यूनगंडाची लक्षणं वाटतात.

आ.न.,
-गा.पै.

केंद्रीय सचिवांसोबतच्या बैठकीत मोदींनी सुचवलेल्या सुधारणांपैकी :
शासकीय खात्यांत द्याव्या लागणार्‍या कागदपत्रांच्या प्रती राजपत्रित अधिकार्‍यांकडून किंवा दंडाधिकार्‍यांकडून सत्यापित करून घ्यायची गरज नाही. स्वसत्यापन पुरेसे ठरावे.

कालबाह्य झालेले, बदलांची गरज असलेले असे दहा नियम शोधून त्यांचे पुनरावलोकन करणे.

दंडाधिकारी म्हणून नियुक्ती मिळविलेल्या असंख्य 'कार्यकर्त्यांची' कमाई बंद पडेल.
५-१० रुपये घेऊन शिक्के मारणारी असंख्य मंडळी या महिन्यातच शाळा/कॉलेज प्रवेशानिमित्ताने कमाई करीत असतात..

मयेकर शासकीय खात्यात म्हणतायत. 'असंख्य कार्यकर्त्यांच्या' 'कमाई' बंद पडण्याची चिंता तूर्तास नको.

अनेक ठिकाणी प्रवेशासाठी, स्पर्धा परीक्षांचे, नोक अर्ज भरताना, इ. वि.का.दं.नी केलेले सत्यापन आजकाल चालत नाही. राजपत्रित अधिकार्‍यांनी केलेले सत्यापनच लागते.

पैलवान,

राश्ट्रपुरुशान्च्या विटम्बनेचा निशेध केला नाही केवळ इतक्या गोश्टीवरुन कुणी अपराधी ठरत नाही.

तुमच्या द्रुश्टीने एखादा मनुश्य राश्त्रपुरुश असेल पण इतरान्च्या द्रुश्टीने तो प्रान्तपुरुश असु शकेल. इतिहस पूर्‍नपनॅ ना तूम्हाळा माहेत ना त्याना माहीत असतओ.

शीवाय हिन्दुस्तान देश इतिहास म्यानेज करण्यात आणि मोदी सरकाआर् बातम्या म्यानेज करण्यात पटाइत आहेत.

सर्वात महत्वाची गोश्ट.... मूस्लिम धर्म बळजबरीने इतरान्च्या गळ्यात घातला, ही बोम्बच हास्यास्पद आहे. जगातल्या प्रत्येक मनुश्यावर जो जन्मजात धर्म लादलेला असतो, तोही बळजबरीनेच लादलेला असतो. Happy माझ्यावर जन्मजात धर्म मला न विचारता लादला काय किंवा औरन्गजेबाने बळजबरीने नन्तर मुसलमान धर्म लादला असता काय... दोन्ही ठिकाणी माझ्या चॉइसची किम्मत शुन्यच असते.

<राष्ट्रपुरुषांची विटंबना करणारे अत्यल्प आहेत>

कोणत्य राष्ट्रपुरुषाची विटंबना करायची, कशी करायची याचा प्रत्येकाचा चॉइस वेगवेगळा असतो, इतकेच.

इथे Early Muslim Settlements विभागात स्पष्टपणे लिहिलंय की इ.स. सातव्या शतकापासून कोकणपट्टीत मुस्लिमांची तुरळक वस्त्या होत्या. इ.स. ६९९ मध्ये बसरामध्ये होणाऱ्या छळाला कंटाळून तिथले काही अरबी मुस्लिम कोकणात आले. ज्याप्रमाणे इ.स.पू. १ ल्या शतकापूर्वी बेणे इस्रायली आले, १५ व्या शतकात पारशी आले तस्सेच ७ व्या शतकात मुस्लिम आले. कोकणात इस्लामचा विस्तार तलवारीने झालेला नाही. >>> यावर भली मोठी पोस्ट लिहायचा विचार आहे, पण... तो धाग्याचा विषय नाही.

मोदींनी "पाया पडू नका" असे खासदारांना सांगितले

बाकी, खासदारांना होमवर्क वगैरे पण करायला सांगितलाय. हे बेष्ट आहे. Happy

ह्या बीबी वर सुद्धा काहीजण (अर्थात नेहमीचेच तेच ते) आपापले खांब पकडून बसलेत.
साती ह्यांनी काय उद्देशाने बीबी काढलाय ते बाजुलाच.

हे भगवान

मोदी सरकार : जागता पहारा आता राष्ट्रपुरुषांची बदनामी व मुस्लिमांची राष्ट्रनिष्ठा व्हाया भारतात मुस्लीम कुठून आले, आर्य कुठून आले यामार्गे मंदीर वही बनायेंगे, अयोध्या तो झांकी है, कांशी मथुरा बाकि है मुक्कामी पोहोचण्याची चिन्हे दिसताहेत. त्यात जर आपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं इव्हीएम मशीन्सच्या हॅकिंगप्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा फेसबुकवर व्हायरल झालेला व्हिडीओ आदी मसल्याची भर पडली तर मग पेड टीव्ही चॅनेल्स वगैर स्टेशन्स लागून वैश्विक आणि सर्वकालीक सफर घडण्याची शक्यता आणि क्षमता इथे दिसून येते आहे.

आपले ज्ञान मांडा. विषयाशी संबंधित असो नसो. पर्वा करू नका. एक खड्ड्यात पडला की मागच्याने पण उडी घ्यावी. जाग नको पण खाजगी ज्ञानपाल्हाळ आवरा असं म्हणण्याचा मोह आवरून हे दोन खाजगी शब्द संपवतो. लगे रहो मेंबर्स, सर्वांना मनापासून हार्दीक शुभेच्छा !

त्या संदेशात शिवाजीमहाराज व शंभूराजे यांच्याही संस्कारांचा उल्लेख आहे. राहुल गांधींची उणीदुणी काढायची नसून भिन्न संस्कारांमुळे माणसे कसकशी वेगळी घडतात ते दाखवून द्यायचा हेतू आहे. स्मित
>>

उत्तम, संस्काराच्या पार्श्भूमीवर एकदा राहुल गांधी आणि राहुल महाजन यांचीही तुलना होउन जावी द्यावी असे माझे मत्त हाये !

कोण राहुल महाजन ? अहो ते कै. प्रमोद महाजन यांचे पुत्र आणि खा. पूनमताई महाजन यांचे बंधू . टीव्ही वर ते नंतर गेले.

ठीक आहे. राहुल महाजनला पंतप्रधान पदासाठी उभे करा, मग आम्ही त्याचीपण पिसं काढतो. Happy

रॉबीनहूड, तुम्ही मत व्यक्त केलंत ते योग्य आहे. पण तिथेच थांबू नका. प्रत्यक्ष तुलना कराच. कळूदे लोकांना कोण कसं आहे ते. Happy
आ.न.,
-गा.पै.

गापै,

पहिल्या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण कळाले. रागांवर काही चांगले संस्कार झालेले नसतील असे म्हणायचा तुमचा हेतू नव्हता असे दिसते. ओके.

दुसरा मुद्दा अजूनही पटला नाही. मुस्लिम विचारवंतांनी त्या समाजाला योग्य दिशा दिली नाही असे म्हणणे वेगळे (त्याच्याशी मी सहमत आहे) आणि "महाराष्ट्रातील मुस्लिम न्यूनगंडाने पछाडलेले आहेत" म्हणणे वेगळे. दुसर्‍या वाक्यात घाऊक आरोप आहे. तो चुकीचा आहे.

हे दोन वर्ग सोडल्यास उर्वरित मुस्लिमांची दखल घ्यायची आवश्यकता नाही. कारण की ते सारे या दोघांच्या मागोमाग जाणारे आहेत. >>> हे ही चुकीचे गृहीतक आहे. बराचसा वर्ग हा इतर सामान्य (हिंदू) लोकांप्रमाणे आपले काम बरे वाला असतो. तो यातील कोणाच्याच मागे जात नाही. त्यातील अनेकांना आपली जात, आपला धर्म काहीतरी इतरांपेक्षा भारी आहे असे वाटत असते, पण त्यातून देशविघातक काही करणारे ते नसतात.

जसे "ब्राह्मणांनी..." पासून सुरू होणारी सगळीच्या सगळी वाक्ये - स्तुती वा निंदा करणारी- चुकीची असतात तसेच काहीसे.

बाकी, खासदारांना होमवर्क वगैरे पण करायला सांगितलाय. हे बेष्ट आहे. स्मित
----- पन्तप्रधान मोदी यान्नी नवनिर्वाचित खासदार मन्डळीस काही चान्गल्या गोष्टी सान्गितल्या
(अ) गृहपाठ करा... अभ्यास करत जा.
(ब) सन्सदेत आचरण चान्गले ठेवा.
(क) (माझ्या...) पाया पडु नका.... खुशामत, हाजी हाजी करु नका.
(ड) प्रसारमाध्यमान्शी बोलताना प्रवक्ते पद स्वत:कडे आहे अशा थाटात बोलणे टाळा...

मला चारही गोष्टी आवडल्या Happy मुख्य म्हणजे भ्रष्टाचार आणि काळा पैसा सम्बधात त्यानी याआधिच SIT स्थापन केली आहे. अर्थात हे सर्व वाचायला, एकायला चान्गले वाटते... आता अम्मल बघू.

पाया पडायला खरोखरच बंदी घालायला हवी. आणि ती टीव्हीतील कार्यक्रमांनाही लागू करायला हवी. एकदम भंपकपणा वाटतो बर्‍याचदा Happy

प्रसारमाध्यमान्शी बोलताना प्रवक्ते पद स्वत:कडे अशा थाटात बोलणे टाळा...<<< हे फार महत्त्वाचे आहे. हल्ली कित्येकदा कुठलाही नेता "आमचे म्हणणे असे...." म्हणत पक्षाचेच मत मांडल्यासार्ख बडबडतो आणी इतर पक्षश्रेष्ठींना त्याची घाण निस्तर्त बसावे लागते. मीडीयादेखील वैयक्तिक मत आणि पक्षाचे मत यामधेय फरक करू शकत नाही. (याबाबतील सगळेच पक्ष सरखे!)

मला आवडलेले तीन निर्णय.

१. कुठलीही फाईल चार लेयर्स पेक्षा जास्त मधून जाऊ नये.

२. ग्रीन क्लिअरन्स ऑनलाईन झाला. ६० दिवसात निर्णय. आणि १ जुलै पासून कागदी अर्ज बंद. तुमची फाईल कुठे आहे ते देखील कळणार.

३. गंगा टुरिझम प्लान तयार झाला आणि त्यावर टप्याटप्यात ६००० करोड रू खर्च होतील..
- मला वाटतं गंगा प्लान यशस्वी होईल. काही वर्षांपूर्वी अहमदाबाद मधील साबरमती नदी खूप घाण होती. गेले दोन आठवडे मी अहमदाबादला जाणे येणे करतोय. तिचे स्वरूप हडसन सारखे वाटतेय. (ह्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही !) हडसन सारख्याच थोड्या गढूळ रंगाचे पाणी, तितचीच स्वच्छता, तसेच पायी फिरायला योजलेले मार्ग. मी निदान ६ किमीच्या पट्टात पायी फिरलो नदी किनारी, नदीत कुठेही कचरा नव्हता! नदी दोन्ही बाजूने बांधली आहे आणि दोन्ही बाजूने पुण्यात जसे रस्ते आहेत तसेच पण तीन पदरी तयार करत आहेत. त्या कामाचा राडारोडा असूनही खुद्द नदी एकदम स्वच्छ आहे ! निर्माल्य देखील टाकलेले आढळले नाही. पुढच्या टप्प्यात तिथे बोट टुरिझम आणत आहेत, ते बांधणे चालू आहे. ह्या असलेल्या अनुभवामुळे गंगा प्लान यशस्वी होईल असा मला विश्वास आहे.

हा साबरमती व्हिडीओ मी प्रत्यक्ष भेट देऊन आलो आहे. आणि हे साबरमतीचे फोटो

बनारस ते कलकत्ता स्टेज वन आणि पुढच्या स्टेज मध्ये अलाहाबाद असा प्लान मोदी सरकारने काल आणला आहे.

Pages