येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
साबरमती बद्दल पुर्ण अनुमोदन.
साबरमती बद्दल पुर्ण अनुमोदन. नदी , काठ, पाणी, पूल ... सार्व विलोभनीय आहे.
(अ) गृहपाठ करा... अभ्यास करत
(अ) गृहपाठ करा... अभ्यास करत जा.
(ब) सन्सदेत आचरण चान्गले ठेवा.
(क) (माझ्या...) पाया पडु नका.... खुशामत, हाजी हाजी करु नका.
(ड) प्रसारमाध्यमान्शी बोलताना प्रवक्ते पद स्वत:कडे आहे अशा थाटात बोलणे टाळा..
........... ..........हे पन सान्गाव लागन्याचि पाळि का येते ? निवडनुकिला उभे होते म्हनजे २१ पुर्न असेल कि.
(No subject)
आता आपण विरोधी पक्षात नसून
आता आपण विरोधी पक्षात नसून सत्ताधारी पक्षात आहोत हे अनेक खासदारांच्या, काही मंत्र्यांच्याही लक्षात राहायचे नाही त्यासाठी हे सांगावे लागते
फारएण्ड, >> मुस्लिम
फारएण्ड,
>> मुस्लिम विचारवंतांनी त्या समाजाला योग्य दिशा दिली नाही असे म्हणणे वेगळे (त्याच्याशी मी सहमत आहे)
>> आणि "महाराष्ट्रातील मुस्लिम न्यूनगंडाने पछाडलेले आहेत" म्हणणे वेगळे.
या दोन विधानांपैकी एक कारण आहे, तर दुसरा परिणाम. अर्थात, हे झालं माझं आकलन. तुम्हाला पटायला पाहिजे अशी सक्ती नाही.
जर ते न्यूनगंडाने पछाडलेले नाहीत तर त्यापैकी कोणी समंजस भूमिका घेतांना का आढळत नाहीत? घेतली तरी समंजस मुस्लिमांचा आवाज इतका क्षीण का?
तसेच, तुम्ही ज्याला घाऊक आरोप म्हणता आहात त्याविषयी थोडं स्पष्टीकरण देतो. बहुसंख्य मुस्लिम जरी आपण बरे की आपले काम बरे या भूमिकेत असतात हे मान्य करतो. मात्र जर हिंदू गाफील राहिले, तर ही भूमिका क्षणार्धात बदलू शकते. पाकिस्तान अशाच ढिसाळपणातून उत्पन्न झाला आहे. पाकिस्तानातील मुस्लिमांनी वेगळं राष्ट्र कधीच मागितलं नव्हतं. मी जरी घाऊक आरोप केल्यासारखं दिसत असलं, तरी वस्तुत: तो हिंदूंकडे केलेला एक अंगुलीनिर्देश आहे.
आज भारतीय मुस्लिमांत समंजस नेतृत्व उभारणं हे हिंदूंचं काम आहे. अन्यथा अशा विटंबना सतत होत राहणार. मोदी शासनाकडून ही वैचारिक अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मात्र हे कार्य प्रामुख्याने दोन्ही समाजातील विचारवंतांचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
गापै, तुमचे विचार वाचून
गापै,
तुमचे विचार वाचून आश्चर्य नाही पण खेद जरूर वाटला. इंटरनेट वर फिरणारी ती चित्रे मी पाहिली आहेत. हास्यास्पद आहेत ती. हाताशी एखादा तास असलेला आठ दहा वर्षाचा मुलगा सहज करू शकेल ते. मुळात ती चित्रे मुस्लिमांनीच बनविली असे छातीठोकपणे कसे सांगता येइल? मागे कर्नाटकात हिंदु सेनेने सरकारी कार्यालयावर रात्री पाकिस्तानी झेंडा लावला होता. ते निमित्त करून सकाळी दंगा करायचा हेतु होता त्यांचा. तसलाच हा प्रकार नसेल कशावरून? ज्या वेगाने ही बतमी गावागावात पोचली.. आणी एखाद्या मुस्लिमाने ते केले असले तरीही ते जाळपोळ करायच्या लायकीचे आहे? ज्या तरुणाला हकनाक जीव गमवावा लागला त्याचा इथे संबंधही नव्हता. एखाद्या निनावी चित्रापेक्षा शिवजयंतीला/गणेशोत्सवात डॉल्बी लावून आयटम गीतावर नाचणे जास्त विटंबना आहे. कुठे आहेत ते हिंदु विचारवंत? भारताचे नुकसान करायला पाकिस्तानला फार खर्च नाही. अधून मधून अशी चित्रे फे बु वर फिरविली की काम फत्ते.
>>अन्यथा अशा विटंबना सतत होत राहणार. मोदी शासनाकडून ही वैचारिक अपेक्षा बाळगायला हरकत नाही
मोदी सरकारने फेसबूक वर बंदी आणावी काय? मुळात हि विटंबना आहे असे मानणारे लोकच न्यूनगंडाने पछाडलेले असतात.
गेले काही दिवस धडाधड निर्णय घेऊन सरकार बदलले आहे हा संकेत लोकात आणी नोकरशाहीत पोचवल्याबद्दल अभिनंदन. आपले मुख्यमंत्री दोन नवे राज्यमंत्री तीन महिन्यासठी नेमण्यासाठी चार दिवस दिल्लीत गयावया करत होते त्या पार्श्वभूमीवर हे उठून दिसते. इतके सव्यापसव्य करून त्या मंत्र्यांना खातेवाटप नाहीच. बसा दालनात माशा मारत. ( आता माझ्यावर निलंबनाची कारवाई होणार
)
आता आपण विरोधी पक्षात नसून
आता आपण विरोधी पक्षात नसून सत्ताधारी पक्षात आहोत हे अनेक खासदारांच्या, काही मंत्र्यांच्याही लक्षात राहायचे नाही त्यासाठी हे सांगावे लागते डोळा मारा
----- सरकार भाजपा आघाडीचे आहे आणि नेतृत्व मोदी महाशय करत आहेत. पन्तप्रधान मोदी ह्यान्नी खासदाराना केलेले आवाहन अत्यन्त स्तुत्य आहे. पन्तप्रधान असणार्या व्यक्तीची पक्षावर, सन्सदेवर पकड आहे असे दुर्मिळ झालेले चित्र यातुन दिसते. (पन्तप्रधान पदी असणार्या मनमोहन सिन्ग यान्नी दोन हात जोडुन केलेल्या नमस्काराकडे सोनिया गान्धी लक्षही देत नव्हत्या. नमस्कार स्विकारणे दुर पण प्रतिसादासाठी थाम्बलेल्या प्रधानमन्त्रान्ना टाळणे काही पटले नाही - एक वेळा दुर्लक्ष होणे समजू शकतो. फेसबुक वर जेव्हा असे चित्र दिसले तेव्हा प्रथम वाटले होते कुणीतरी खोडसाळपणे असे चित्र तयार केले असावे पण TOI का अजुन कुणा वृत्तपत्रानेही अशी फोटो प्रदर्शित केली आहेत तसेच यु ट्युब वर क्लिपा मिळतील).
या सरकारात आणि कॉग्रेसच्या पाठिम्ब्याने दिल्लीत स्थापन झालेल्या आआपा चे सरकार या जमिन अस्मानाचा फरक आहे. जानेवारीमधे दिल्लीचे तत्कालीन मुख्यमन्त्री केजरीवाल ह्यान्नी (स्वत: मुख्यमन्त्री असतानाही) रेलभवनाजवळ धरणे आन्दोलन केले होते.
कर्नाटकात हिंदु सेनेने सरकारी
कर्नाटकात हिंदु सेनेने सरकारी कार्यालयावर रात्री पाकिस्तानी झेंडा लावला होता.
---- माझा हैद्राबादी मित्र सान्गतो गैरसमज पसरवणे सोपे आहे... एक ___ मेलेला प्राणी ____ प्रार्थना स्थळाजवळ टाका. प्राणि आणि प्रार्थना स्थळ काय असावे हा तुमचा पर्याय. बहुतेक प्रसन्गात असे कृत्य करणारे स्वतःच्या धार्मिक स्थळानाच लक्ष करतात. निमीत्त मिळाल्यावर काही तासात दोन समाजात जुम्पते...
पर्याय :-गाय ,मशिद,डुक्कर,
पर्याय :-गाय ,मशिद,डुक्कर, मंदीर,
नेहमी प्रमाणेच धागा
नेहमी प्रमाणेच धागा विषयापासुन भरकटतोय.
मुंबईतील मेट्रो सेवेच्या
मुंबईतील मेट्रो सेवेच्या उद्घाटनास विलंब झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे घाटकोपर मेट्रो स्टेशनजवळच्या रस्त्यावर रास्तारोको आंदोलन
घाटकोपर मेट्रो स्टेशनजवळच्या रस्त्यावर भाजपचे रास्तारोको आंदोलन, खा. किरीट सोमय्या आणि खा. गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू
--------------------------------
पनवती भाजपा चे नाटक सुरु ..... गुजरात मधे १५ वर्षापासुन साधा मेट्रोचा प्लान पास करता आला नाही आणि इथे मुंबई मधे फुकटचे नाटके चालु केली.......असली विकृत आणि फुकाची विरोधी मनोवृत्ती असल्यानेच देशाला पाहिजे तेवढी प्रगती करता आली नाही...
मोनोरेल आनि मेट्रो बघुन भाजप्यांच्या पोटात दुखायला लागले
चांगल्या कामाला नाट कसा लावायचा हे भाजपा कडुन शिकावे ..
vijaykulkarni, आपला इथला
vijaykulkarni,
आपला इथला संदेश वाचला. एखाद्या भारतीय मुस्लिमाचा संशय येऊ नये एव्हढा ठाम विश्वास निर्माण झालेला बघायला आवडेल.
जाळपोळ समर्थनीय निश्चितच नाही. वादग्रस्त पान २८ मे रोजी खुलं झालं. मग १ जूनपर्यंत सरकार काय करत होतं? ते पान १५ मिनिटांत बंद करता येतं. ते जर होणार नसेल तर गृहखातं काय कामाचं? जाळपोळ होऊ नये म्हणून सत्वर पावलं पोलिसांनी उचलायला हवीत. कुणालातरी खूष करायला पोलीस ती जबाबदारी टाळताहेत, असा निष्कर्ष निघतो.
आता तुमची विधाने पाहूया.
१.
>> मोदी सरकारने फेसबूक वर बंदी आणावी काय? मुळात हि विटंबना आहे असे मानणारे लोकच न्यूनगंडाने
>> पछाडलेले असतात.
आख्ख्या फेसबुकवर बंदी नाही तर त्या विशिष्ट पानावर बंदी म्हणतोय मी. जशी हिंदू जनजागृती समितीच्या पानावर घातली तशीच.
२.
>> एखाद्या निनावी चित्रापेक्षा शिवजयंतीला/गणेशोत्सवात डॉल्बी लावून आयटम गीतावर नाचणे जास्त विटंबना
>> आहे.
म्हणूनच सर्वांनी उत्सव शास्त्राप्रमाणे गांभीर्याने साजरे करावेत असं माझं मत आहे.
३.
>> तसलाच हा प्रकार नसेल कशावरून?
म्हणूनच पोलिसांची निष्क्रियता संशयास्पद आणि भयसूचक आहे. पोलीस सत्य का सांगत नाहीत? पोलीस कारवाई का करत नाहीत?
आ.न.,
-गा.पै.
हा धागा किती वर्शे चालणार? १०
हा धागा किती वर्शे चालणार? १० दिवसात ६०० प्रतिसाद. ५ वर्शात काय हालत होइल.
उदयन.., >> गुजरात मधे १५
उदयन..,
>> गुजरात मधे १५ वर्षापासुन साधा मेट्रोचा प्लान पास करता आला नाही
तुमच्या माहितीसाठी सात पानी पीडीएफ (इंग्रजी दुवा) :
http://www.gujaratmetrorail.com/news/Answers%20of%20Frequently%20Asked%2...
आ.न.,
-गा.पै.
चालु झाली का ???? ते सांगा
चालु झाली का ???? ते सांगा ...... फुकटचे इकडचे तिकडे सांगत बसु नका
लगो, हा धागा पाच वर्षे किंवा
लगो, हा धागा पाच वर्षे किंवा मोदी पंप्र आहेत तो काळ यांपैकी जो काळ कमी असेल तोपर्यंत चालवायचा विचार आहे.
आपला इथला संदेश
आपला इथला संदेश वाचला
>>
पैलवान तुमचा ' तिथला' संदेश काही उघडत नाही.किम्बहुब्ना तिथे काही तुम्ही लिंकच केलेले नसावे. खरे तर तुम्हाला ते दाखवायचेच नव्हते. नुसत्या फेक लिंका देत आहात असे मला संशय आहे. (संशय घेण्याचा मक्ता काही तुम्हीच घेतलेला नाही)
केंद्रात आणि राज्यात सत्ता
केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना ठरल्याप्रमाणे वेळेत मेट्रो सेवा सुरू करणे दोन्ही काँग्रेसना जमले नाही. केंद्रात एनडीएची सत्ता आल्यानंतर भाजपने मेट्रो लवकर सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले, असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. .............
आयत्या बिळावर नागोबा भाजपाचे नेते......लाज कशी वाटत नाही ?????
निर्जज्जम सदा भाजपम् ..!!
काम केले तर श्रेय का
काम केले तर श्रेय का घ्यायला नको. फायली वर सही करणे ते पण एक काम असते ते मागच्या सरकारला जमले नाही.
कोग्रेस् ला ३ महिने आदी मेट्रो चालु करुन श्रेय घेता आले असते. पण पर्यावरण मंत्री , रेल्वे मंत्री आणि राज्य सरकार ह्याचात फायली अडकुन राहिल्या.
तसे मुम्बई पुणे दुत्रगती ला आपल्या नेत्याचे नाव देउन कोन्ग्रेस्स ने काय केले? त्यात तर काहीच काम केले न्हवते.
<<<हा धागा पाच वर्षे किंवा
<<<हा धागा पाच वर्षे किंवा मोदी पंप्र आहेत तो काळ यांपैकी जो काळ कमी असेल तोपर्यंत चालवायचा विचार आहे.>>>
म्हणजे कमीत कमी पाच वर्षे धागा चालणार तर! कारण इन्शाअल्ला; नमो आता १०-१५ वर्षे तरी पंप्र राहणारच!
३ महिने आदी मेट्रो चालु करुन
३ महिने आदी मेट्रो चालु करुन श्रेय घेता आले असते. >>>>..
मेट्रोची फायनल ट्राय आणि नंतर मिळणारे सर्टिफिकेट्स कधी मिळाले ते बघा.....त्याच्या आधी चालु करायची असते का ?
गुजरात मधे तेवढे देखील झाले नाही....तिथे कुठे फायली अडकुन राहिल्या ...... २००९ पासुन अजुन चालुच आहे फायली फिरणे .......ते बघा आधी...... दुसर्यांचे बघायचे वाकुन स्वतःचे ठेवायचे झाकुन ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध दर्शवला म्हणून प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांना अमेरिका दौऱ्यात एका एनआरआय व्यक्तीने धमकावल्याची घटना घडली आहे. कॅलिफोर्निया प्रांतात सनवेली या शहरात एका कार्यक्रमासाठी शुभा मुद्गल गेल्या असताना हा प्रसंग घडला. ही व्यक्ती शुभा मुद्गल यांना धमकावत असताना आयोजकांपैकी कुणीही मध्यस्थी करून त्याला रोखले नाही, असं वृत्त 'मिड-डे'ने प्रकाशित केले आहे. >>>>
--------------------
चला "माज" सुरु झाला म्हणायचे ... अशी "पैलवानगिरी" करणारे माथेफिरुच
सरकारी कार्यालयांच्या
सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी ११ कलमी कार्यक्रम. हा कार्यक्रम खरच जर अमलात आला तर कीती बरं होइल.?
या बरोबरच गोर गरीब,निरक्षर जनतेला कागद्पत्रांची योग्य ती माहीती देणं हे पण बंधनकारक असायला हवं.
लहान लहान कागद्पत्रांसाठी बिचारी नाडली जातात.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/union-secretaries-get-11-comman...
पुण्यातील मोहसीन हत्येच्या
पुण्यातील मोहसीन हत्येच्या निषेधात,दिल्लीतील महाराष्ट्रसदनावर मुस्लिमांचा मोर्चा!
मोहसीन हत्या निषेधार्ह आहेच.पण असा मोर्चा / निषेध इतरवेळी (उदा.आझाद मैदानावरील महिला पोलिसांची विटंबना इ.) का बरे होताना दिसत नाही?
रॉबिनहूड, >> पैलवान तुमचा '
रॉबिनहूड,
>> पैलवान तुमचा ' तिथला' संदेश काही उघडत नाही.किम्बहुब्ना तिथे काही तुम्ही लिंकच केलेले नसावे.
मी दर्शवू इच्छितो तो दुवा हा आहे : http://www.maayboli.com/node/49069?page=18#comment-3143588
माबोचे सर्व्हर स्क्रिप्टमध्ये काहीतरी गडबड आहे. त्या दुव्याचे रूपांतरण होते, जे चुकीचे आहे.
आ.न.,
-गा.पै.
मोदींचा भूतान दौरा हा तेथील
मोदींचा भूतान दौरा हा तेथील ३०००० MW hydropower potential tap करण्यासाठी आहे असे ऐकिवात आहे. कुणी ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकेल तर बरं होईल.
बाकी स्वच्छ आणि सुंदर साबरमतीसारख्या गोदावरी आणि कृष्णा कधी होतील माहित नाही.
आणि हो, मला येथे हे आवर्जून नमूद करावसं वाटतंय की मला काँग्रेस आणि भाजप ह्या वादात पडण्यात अजिबात रस नाही. सरकार कुणाचं ह्यापेक्षा ते काय काम करतं हे आपण इथे बोललो तर जास्त बरं होईल.
माबोचे सर्व्हर स्क्रिप्टमध्ये
माबोचे सर्व्हर स्क्रिप्टमध्ये काहीतरी गडबड आहे. त्या दुव्याचे रूपांतरण होते, जे चुकीचे आहे....
>>> आमचे नम्र पैलवान,
कॉन्ग्रेसवाल्यानी सर्वर स्क्रिप्ट मध्ये काहीतरी गडबड केलेली दिसते . साले मायबोली प्रशासनातही काँग्रेसवाले आहेत हे पाहून आश्चर्य वाटले. काँग्रेस निवडून आली की एव्ही एम मध्ये गडबड. आता मायबोलीत गडबड.
एक जनसंघीय घोषणा आठवली : हा विजय गाईचा नाही, बाईचा नाही , शाईचा आहे. सारेच काही बदललेले नाही म्हणायचे !
पैलवान तुमच्या गुडघ्यावर बर्फ ठेवा पाहू ! ::फिदी:
रच्याकने, हेच ते सुप्रसिद्ध
रच्याकने, हेच ते सुप्रसिद्ध गामा पैल्वान
उजव्या चित्रात त्यांचा हात कुठे आहे हे पहाणेही मनोरंजकच
(No subject)
एक जनसंघीय घोषणा आठवली : हा
एक जनसंघीय घोषणा आठवली : हा विजय गाईचा नाही, बाईचा नाही , शाईचा आहे.
----- त्यात काही चुकीचे होते असे वाटत नाही. मी परवाच येथे मायबोलीवर भाजपाचा (किव्वा मोदी यान्चा) जय अथवा काँग्रेसचा (राहुल गान्धी यान्चा) पराभव या पेक्षाही ५५ कोटी लोकानी मतदान करण्याचा हक्क बजावला आणि निर्णय घेतला हे जास्त महत्वाचे आहे.
सामान्य नागरिकाना सरकार कोण आहे यापेक्षाही ते आपल्यासाठी आणि पर्यायाने देशासाठी काय करते हे महत्वाचे आहे...
Pages