येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
अगदी मुंबईतही मुस्लिम
अगदी मुंबईतही मुस्लिम कुटुंबाला जागा भाड्याने मिळताना अडचणी येतात.
केदारभौ, आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद पण मी येणार नाही. मला दाडी मिशा चिकटवून माझा एनकाउंटर करतील आणी मोदी, तोगडिया आणी मुतालिक याना मारायला आलेला पाकि अतिरेकी विकूउल्लाखान ठार झाला असे जाहीर करतील
जोक्स अपार्ट , मोदींचे गेल्या काही दिवसातले काम पाहून ते किती हँड्स ऑन आहेत आणी प्रशासनावर त्यांची किती घट्ट पकड असते हे दिसून येते. गुजरात मध्ये झालेल्या अनेक एनकाउंटर्स् ची त्यांना कल्पना नसेल असे वाटत नाही. त्यातल्या त्यात आशेची बाब म्हणजे आता ते पम्प्र झाले आहेत त्यामुळे त्यांची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा बनवण्यासाठी अशा एनकाउंटर गिमिक्स जी जरूरी नाही. अगदी निवडणूक तोंडावर आलेली होती तेव्हाही त्यांना मारायला आलेले चार अतिरेकी पकडले अशी बातमी होती. निवडणूक आयोगालाच आता बास म्हणायची वेळ आली. मीडियाही अशा घटनांकडे फारशा स्केप्टिसिझम ने बघत नाही. आत तर रिलायन्स ने टी व्ही १८ खरेदीच केला आहे. नोम चॉम्स्की ने लिहिलेले 'मॅन्युफॅक्चरिंग कंसेंट' पुस्तक आठवले.
@ghetto इथ आमच्यासारखे
@ghetto
इथ आमच्यासारखे अशिक्शित लोक पन येतात याचि जानिव ठेवा राव. एकतर तुमचे पुन्याचे भताललेलि मराठि समजुन घेतानाच लै फेस येतो तोन्डाला. आमच्या मायबोलित यातल ८० टक्के नाहि. त्यातुन ते घट्ट आयझेडएशन सारक काहि वापरल तर कापर भरत अन्गाला. आता अस्ला शब्द दिला तर नाय आठवला मराथितला शब्द तरि अर्थ तरै दिला असता का नाहि ? इब्लिस भाउ न नोर्मल राहुन सान्गितलं म्हनुन कळलं.
उद्याला electrophotomicrographically, floccinaucinihilipilification, Antidisestablishmentarianism नायतर Pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis अस्ल कायतरि लिव्हल तर आंम्हि कुनाच्या तोन्डाकड बगायचं ?
गा पै, ही देखिल दोन
गा पै, ही देखिल दोन वर्षांपूर्वीचीच बातमी http://twocircles.net/2012dec21/did_gujarati_muslims_vote_bjp.html#.U4tH...
Pneumonoultramicroscopicsilic
Pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis
या प्रकारचे जोडशब्द समजत नसतील, तर आरसा बघावा.
आता तुमचा शब्द बघा:
Pneumono = हवेच्या पिशव्या उर्फ फुफ्फुसांशी संबंधीत.
ultra-microscopic = मायक्रोस्कोप वापरून दिसण्याच्या आकारापेक्षा छोटे (कण)
silico-volcanoconiosis = सिलिका / वाळूचे, जे बहुदा व्हल्कॅनो उर्फ ज्वालामुखीच्या उद्रेकाने हवेत पसरलेल्या राखेत असतात, अशा कणांच्या फुफ्फुसप्रवेशाने उद्भवलेल्या आजारासंबंधी आहे, असा अर्थबोध होतो.
म्हणजे हा भयंकर मोठा 'दिस्णारा' शब्द अॅक्चुअली छोटे शब्द जोडून बनवलेला आहे. तेव्हा जास्त भीती न बाळगता बिन्धास्त अर्थ समजवून घेण्याचा प्र्यएत्न करावा.
अन हे सगळे कठीण जात असेल, तर शब्दावर राईट क्लिक करून गूगल करावे, आयते ज्ञान पदरी पडते.
बेफ़िकीर | 1 June, 2014 -
बेफ़िकीर | 1 June, 2014 - 12:34
इब्लिस.
Ghettoization म्हणजे काय ते माहीत आहे का तुम्हाला? माहीत असले तर मला सांगाल का?
<<
प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यानंतर ते वाचूनही साधं धन्यवाद न म्हणण्याच्या वृत्तीला काय म्हणावे?
vijaykulkarni , >> त्यांची
vijaykulkarni ,
>> त्यांची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा बनवण्यासाठी अशा एनकाउंटर गिमिक्स जी जरूरी नाही.
तत्त्वत: सहमत. गिमिक्सची गरज नाही. मोदींच्या जिवास खरोखर धोका असेल तर खुशाल अतिरेक्यांना चकमकीत उडवावे. पाटणा सभेत स्फोट झाले होते यावरून मोदी अतिरेक्यांच्या हत्यासूचीत आहेतच. पंतप्रधान झाल्याने धोका अधिकच वाढला आहे.
आ.न.,
-गा.पै.
इब्लिसबाउ - मले त तुमि
इब्लिसबाउ - मले त तुमि सुपरमेनच वाटुन रायले ना बे. तुमच्यसाथि येवडसं असल पन आमच्यसाथि ते डोन्गर वाटत ना.
तुमचा आताच पर्तिसाद अंकल स्क्रुच च कार्टुन असतं की नै, त्याने हागेमारुसारखं तोन्ड वेडंवाकडं करुन डोलान्ड डक चे आवाजात म्हटल्यासारखा ऐकु आला भाउ.
गूजरातात दारुबन्दी नाही.
गूजरातात दारुबन्दी नाही. आम्ही पन्धरा दिवस अहमदाबादेत काढले आहेत. तिथे आमच्या मित्राना हवे ते ब्र. मिळत होते.गुजरातेतल्या मायबोलिकरान्नी प्रामानिकपने सान्गावे.>>>>>>>
पुण्यात चौका चौकात लोक वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. लहान मुले (१६ वर्षा खालील) गल्लोगल्ली गाड्या चालविताना दिसतात म्हणजे काय पुण्यात आर.टि.ओ. वाहतुकिचे नियम, वाहतुक पोलिस नाहीत असा होतो का ?
प्रतिसादविचारवंत | 1 June,
प्रतिसादविचारवंत | 1 June, 2014 - 03:26
आता मराठीही समजेनासे झाले आहे याला....अरेरे
सो लोक्स, यापुढे इग्नोर मारत चला.
प्रतिसादविचारवंत | 1 June, 2014 - 03:41
प्रतिसादविचारवंत | 1 June, 2014 - 03:44
हहगलो
प्रतिसादविचारवंत | 1 June, 2014 - 05:24
मराठी वाचता येत असल्यास वरील लिंकवर क्लिक करावे. यापुढे इयत्ता तिसरी ड सारख्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. कृपया. धन्यवाद.
प्रतिसादविजय आंग्रे | 1 June, 2014 - 05:51
हहगलो फिदी फिदी हहगलो
प्रतिसादराजु ठाकरे | 1 June, 2014 - 08:50
३ री ड
हहगलो फिदी
प्रतिसादराजु ठाकरे | 1 June, 2014 - 08:55
हहगलो
बंदूक हातात घेऊन मतदानाच्या दिवशी गावच्या गाव 'बसवणे' ही कन्सेप्ट ठाऊक आहे का तुम्हाला?
ही तर तिच कन्सेप्ट ज्या मुळे आता पर्यंत काँग्रेस विजयी होत होती ??
आता ते दिवस गेले, विसरा आता !!
हहगलो फिदी हहगलो फिदी
स्वतःच्याच प्रतिसादाला
स्वतःच्याच प्रतिसादाला वेगवेगळ्या नावांनी हसून हसून गडाबडा लोळण्याची दाद देणे हे नेमकं कशाचं लक्षण आहे ?
मालक या नावाने मायबोलीवर कुप्रसिद्ध असलेल्या या आयडीचे पण काही पाठीराखे आहेत कि काय मायबोलीवर ?
बिन (माना)पानाचे मालक पानाची
बिन (माना)पानाचे मालक
पानाची गादी गेल्यापासून चायवाला, इडलीवाला, विचारवंत, राजु ठाकरे, विजय आंग्रे असं बहुरुपी बनून चौकाचौकात सिग्नलला खेळ करत असतात. सुट्टे पैसे टाकले कि मग ख्शूह असतात मालक.
साहेबराव, एका तासाच्या
साहेबराव,
एका तासाच्या पेक्षा लहान रे तुझी आईडी !!
आणि दुसर्या आयड्यां बद्दल सांगतो तत्वज्ञान
एका तासाच्या पेक्षा लहान रे
एका तासाच्या पेक्षा लहान रे तुझी आईडी !! >>>>>
एका तासाच्या पेक्षा लहान रे तुझी ड्यू आईडी !! >>>>>
असे नको का?
शरद, १००००००००००००००००००%
शरद,
१००००००००००००००००००% अनुमोदन !!
एका तासाच्या पेक्षा लहान रे
एका तासाच्या पेक्षा लहान रे तुझी आईडी !!

आणि दुसर्या आयड्यां बद्दल सांगतो तत्वज्ञान
राजु ठाकरे उर्फ मालक उर्फ मंदार जोशी उर्फ बहिर्जी
पाच मिनिटं पुरली.
जेव्हढा जास्त वेळ होईल तेव्ह्ढा तुझ्या दीर्घ करीयरमधल्या कृष्णकृत्यांचा (आणि ड्युआयडींचा) भांडाफोड होत राहील.
:खोखो::फिदी::हाहा::खोखो:
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/3/guestbook?page=1
नारबा या आयडीने एका सदस्याला धमकीचा मेल पाठवल्याची तक्रार इथं सापडली. मेल नारबाने पाठवलीय. सही अजय सावरकर उर्फ असा उर्फ मंदार जोशी यांची आहे.
उल्हास भिडे, प्रमोद देव आणि
उल्हास भिडे, प्रमोद देव आणि मंदार जोशीच्या हितचिंतकांना प्रश्न आहे. या मेलमधली भाषा वाचल्यावर तुमची सहानुभूती त्याला असेल का ? या आयडीला इतकी सुट का देण्यात येते. याच्यामुळं अनेक चांगले लोक मायबोलीवरून गेलेले आहेत. याचे कारनामे दिसत नाहीत का ? स्वत: अॅडमीनला याच्या खोट्यानाट्या तक्रारींनी भरून गेलेली त्यांची विपू साफ करता करता नाकी नऊ येत असतील. मग याला आणि याच्या नव्या नव्या हजारो ड्युआयडिंना मुक्त परवानगी देण्याचं कारण काय ? याचे कारवाई होऊन ब्लॉक झालेले जुने आयडी पुन्हा कसे काय अॅक्टीव्ह होतात ?
साती
माफ करा
नवीन धागा काढत असाल तर तिकडे या पोस्टस कॉपी करतो.
दिनेशदा अश्याच ड्यु
दिनेशदा अश्याच ड्यु आयड्यांबद्दल बोलत होते, बरेच झोंबलेले दिसतेय !!
तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करुं !!
अॅडमिन धावा.
अॅडमिन धावा.
http://www.bloombergview.com/
http://www.bloombergview.com/articles/2014-06-01/india-s-newest-media-ba...
छान धागा. शीर्षक आवडले ह्या
छान धागा. शीर्षक आवडले ह्या सरकारवर जागता पहारा ठेवण्याची कल्पना आवडली नि त्याची गरजही आहे
स्वागत पगारे. पराभवाच्या
स्वागत पगारे.
पराभवाच्या धक्क्यातुन सावरलेले दिसताय, बर्याच दिवसांनी मायबोलीवर.:स्मित:
>>छान धागा. शीर्षक आवडले ह्या
>>छान धागा. शीर्षक आवडले ह्या सरकारवर जागता पहारा ठेवण्याची कल्पना आवडली नि त्याची गरजही आहे <<
पगारे साहेब, हे शिवधनुष्य उचलुन तुम्ही माबोकरांच नेत्रुत्व स्विकाराव हि कळकळीची विनंती...
पगारे साहेब, हे शिवधनुष्य
पगारे साहेब, हे शिवधनुष्य उचलुन तुम्ही माबोकरांच नेत्रुत्व स्विकाराव हि कळकळीची विनंती...
----- मायबोलीवर अनेक पात्र उमेदवार नेत्रुत्वासाठी तयार आहेत, खरी गरज आहे ते राष्ट्रिय पातळीवर भाजपाला रोखायची. राहुलजीनी लोकसभेत कॉन्ग्रेसच्या नेत्रुत्वासाठी नकार दिलेला आहे.
पगारे साहेब, हे शिवधनुष्य
पगारे साहेब, हे शिवधनुष्य उचलुन तुम्ही माबोकरांच नेत्रुत्व स्विकाराव हि कळकळीची विनंती...
----- मायबोलीवर अनेक पात्र उमेदवार नेत्रुत्वासाठी तयार आहेत, खरी गरज आहे ते राष्ट्रिय पातळीवर भाजपाला रोखायची. राहुलजीनी लोकसभेत कॉन्ग्रेसच्या नेत्रुत्वासाठी नकार दिलेला आहे.
भाजप खासदाराच्या घरात सेक्स
भाजप खासदाराच्या घरात सेक्स रॅकेट
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/sex-workers-re...
>>विचारांमधे मोठीच ताकद असते
>>विचारांमधे मोठीच ताकद असते व त्यायोगे समाज मनावर बराच परिणाम घडून येऊ शकतो).
सत्यवचन श्रीमान !
अहो पगारे, याचा मोदीसरकारच्या
अहो पगारे, याचा मोदीसरकारच्या धोरणांशी काही संबंध नाही.
त्यांचे असेच काहीतरी असबंध
त्यांचे असेच काहीतरी असबंध चाललेले असते.
अरेच्चा अर्थ पॉलिसी मध्ये
अरेच्चा अर्थ पॉलिसी मध्ये थोडे बदल झालेले जागता पहारावर नाहीत? कुठे गेले सर्व पहारेकरी?
(की काहीच बदल होणारच नाहीत हेच धरून बसला आहात?)
१. लिबरलाईज्ड रेमिटसं स्किम मध्ये आता नागरिकांची लिमिट $ ७५००० ऐवजी $१२५००० झाली आहे. RBI वरचे प्रेशर (डॉलर विकत घेण्याचे आणि बॅलन्स साधण्याचे) कमी होईल. आणि रू व्हर्सेस डॉलर बॅलंस साधन्यात मदत होईल. (नोटिफिकेशन - http://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=8918&Mode=0)
२. Statutory liquidity ratio (SLR) .५ % ने कमी केल्यामुळे बाजारात ३९००० करोड रू येतील.
कालच्या आणि आजच्या पेपर मध्ये प्रत्येक बँकेचे हेड काय म्हणतात हे वाचता येईल.
Pages