येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
Isn't RBI an autonomous
Isn't RBI an autonomous organisation? What do monetory measures have to do with Governemnt/ MoF ?
I believe RBI doesn't take instructions from MoF. I remember the previous Guv Dr. Subbarao being praised in many editorials for supposedly defying the Fun Min and asking the Fin Min to take fiscal measures to control inflation and promote growth.
Mayber (even) the RBI has lost its autonomy under the new Sarkar. Don't know.
(No subject)
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी >>> हे अद्याप आलेले नाहीये . डीपार्टमेन्ट (DIPP) ने ड्राफ्ट बनवला आहे, त्यावर मंत्री आणि इतर संबंधितांचे कमेन्ट्स मागवले आहेत. त्यानंतर एफ डी आयब्द्दल निर्णय घेण्यात येईल आणी १०० टक्के एफ डी आय नाही.ट१०० टक्के पर्यंत एफ डी आय. (डीफेन्समध्ये असलं तरी मुख्यत्वे करून मॅन्युफॅक्चरिंग संदर्भामध्ये आणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरबाबत आहे) चु भु दे घे.
Isn't RBI an autonomous organisation? What do monetory measures have to do with Governemnt/ MoF ?>>>> आं???????????????????????????
मी अर्थतज्ज्ञ(!) नसलो तरी
मी अर्थतज्ज्ञ(!) नसलो तरी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे.
आँ काय? वाचा.
I decide monetary policy, govt free to fire me: RBI's Rajan
सध्यातरी आरबीआय आणि सरकार
सध्यातरी आरबीआय आणि सरकार यांच्यात सामंजस्य दिसतय, जे पुर्वी नव्हतं.
भरत, मला अर्थ क्षेत्रातलं फारसं कळत नाही, पण सामंजस्याने काम करण्याला स्वातंत्र्य हिरावले म्हणणेही योग्य वाटत नाही. यापुर्वीही (बहुदा) कधीही रिजर्व बँकेने सरकारचे ऐकले नसावे असे वाटते. (अगदी डॉ. मनमोहनसिंग गव्हर्नर असतानाही). चुभुद्याघ्या.
"सध्यातरी आरबीआय आणि सरकार
"सध्यातरी आरबीआय आणि सरकार यांच्यात सामंजस्य दिसतय, जे पुर्वी नव्हतं."
मलाही वरच्यासारखा स्मायली टाकता आला असता. पण मी टाकणार नाही
रघुराम राजन गव्हर्नरपदी आल्यावर (मागच्या सरकारच्या काळातच) अचानक सामंजस्य निर्माण झाले.
रघुराम राजन यांना पदावर कायम ठेवा असा अनाहूत सल्ला अनेक अर्थतज्ज्ञ नव्या सरकारला देत होते/आहेत.
सुब्बाराव ऐकण्यातले नव्हते म्हणून त्यांना मुदतवाढही दिली नाही. (इति लोकसत्ताचे अर्थतज्ज्ञ संपादक)
वरच्या माझ्या तिन्ही
वरच्या माझ्या तिन्ही वाक्यांपुढे डोळा मारल्याचा स्मायली हवाय.
मयेकर काय झालंय तुम्हाला?
मयेकर काय झालंय तुम्हाला? ayber (even) the RBI has lost its autonomy under the new Sarkar. Don't know >> तुमच्या ह्या वाक्यावर मी हसलो आहे. मनापासून.
माणूस द्वेषात आंधळा होतो म्हणतात !
RBI ने मागच्या सरकारवर ओढलेले ताशेरे मी त्या लेखात दिले आहेतच की? ती स्वायत्त नाही असा अर्थ होतो का त्यातून?
मी फक्त अर्थ पॉलिसी बदलत आहेत एवढे लिहिले आहे. मोदींनीचे बदलायला भाग पाडले असे मी लिहितोय, असे तुम्ही समजून चालत आहात की काय?
बाकी तेच म्हणायचे असले तर मग - मोदींची गर्व्हनरशी भेट आणि त्यानंतर लगेच बदल हा योगायोग आहे की काय?
पावलं उचलली त्याबद्दल अभिनंदन !
सुब्बाराव ऐकण्यातले नव्हते
सुब्बाराव ऐकण्यातले नव्हते म्हणून त्यांना मुदतवाढही दिली नाही. (इति लोकसत्ताचे अर्थतज्ज्ञ संपादक) >>>>>>>>>> मग रघुरामांनी तरी युपीए सरकारचं कुठं ऐकलं?
मग आरबीय मॉनेटरी पॉलिसीची
मग आरबीय मॉनेटरी पॉलिसीची बातमी मोदी सरकारच्या कामगिरीच्या धाग्यावर द्यायचे कारण काय ?
Wasn't this monetory policy due now? ती परिस्थितीनुरूप बदलणार नाही तर काय सरकारच्या धोरणानुसार बदलणार?
वर राजन यांचे वक्तव्य दिलेच आहे.
स्मायलीबाबत : तुमची आणि तुमच्यानंतरची कमेंट एकत्र वाचल्याने स्मायलीबद्दल माझा गैरसमज झाला. क्षमस्व.
<मी फक्त अर्थ पॉलिसी बदलत
<मी फक्त अर्थ पॉलिसी बदलत आहेत एवढे लिहिले आहे. मोदींनीचे बदलायला भाग पाडले असे मी लिहितोय, असे तुम्ही समजून चालत आहात की काय? अ ओ, आता काय करायचं
बाकी तेच म्हणायचे असले तर मग - मोदींची गर्व्हनरशी भेट आणि त्यानंतर लगेच बदल हा योगायोग आहे की काय? डोळा मारा >
अचानक काय झालं?
ऊशीरा वाचलेला/ लिहिलेला लेख
ऊशीरा वाचलेला/ लिहिलेला लेख शेअर करतोय. नविन तसं काहिच नाही, पण मोदी समर्थकांना आवडेल असा.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5425144276683656315&Se...
विजय देशमुख.. "सकाळ"च्या
विजय देशमुख..
"सकाळ"च्या कड्या (लिंका) देताना &SectionId इथपर्यंत दिल्या तरी चालतात, पुढचा फापट पसारा देण्याची गरज नाही.. उदा. वर दिलेली कडी,
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5425144276683656315
एव्हढीच दिली तरी ते पान उघडतं.
धन्यवाद अग्निपंख. ३-४ वेळा
धन्यवाद अग्निपंख. ३-४ वेळा करुन बघितलं तरी जमलं नव्हतं. आता लक्षात ठेवतो.
रीजर्व बँकेने रेमिटंस लिमीट
रीजर्व बँकेने रेमिटंस लिमीट ७५००० वरून १२५००० डॉलर केली हे मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत घेतलेला निर्णय नही. हे रीजर्व बँकेचे exchange rate management and Foreign Exchange Reserve Management मधे येते. यात मिनीस्ट्री ऑफ फायनान्स चा काही control नाही.
या पूर्वी ही लिमीट २००००० डॉलर होती ती आत्ता फ्क्त थोडी रीस्टोर केली आहे.
वित्त मंत्री जेटलीं च्या म्हणण्या प्रमाणे पुढील २ years करसवलत देता येणार नाही. वित्तीय तूट भरून काढण्यावर भर दिला जाईल. जे लोक नविन सरकार आल्यावर टॅक्स रेट लगेच कमी होतील या अपेक्षेत होते त्यांच भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. फार काय वित्तीय तूटी मुळे डीझेल किंमतीमधे दर महिना ५० पैसे वाढ होत राहील असे दिसते.
लगेच काय मिळते या पेक्षा धेय धोरणे काय असतील आणि ती कशी राबवली जातील याल जास्त महत्व आहे.
निवड्णुकांच्या वेळी एक बातमी होती, मोदीं पठोपाठ अमुल वाराणसीत.
त्यावेळी अमुलने दिलेली आकडेवारी मनोरंजक आहे. वारणसी आणि परीसरात होणारे दुध उत्पादन ५ लाख लीटर, त्या पैकी प्रक्रिया होते फक्त १ लख लीटर. म्हणजे ४ लाख लिटर दुध हे प्रक्रीये वीना वाया जाते किंवा ते देशभर वितरीत होउ शकत नाही. अमुल प्रकल्पा मुळे रोजगार निर्माण होतीलच पण उत्पादनाचे वितरण भारतभर वेगवेगळ्या उत्पदनांच्या स्वरूपात होईल.
विवीध वस्तुंच्या वितरण व्यवस्थेतील constraints हे कीमती वाढण्या मागचे एक महत्वाचे कारण आहे आणि ते जर असे दूर करता आले तर नक्कीच फरक पडेल. त्या साठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधां निर्माण होणे हे एका दिवसातले काम नाही. लोकांच्या अपे़क्षा त्वरीत काही तरी मिळाले पाहीजे अशा असणे आणि सरकारने त्या योग्य वेळेत मिळणार आहेत असे लोकाना convince करणे हे बघणे interesting असेल.
सध्या पहारेकरी परत एकदा
सध्या पहारेकरी परत एकदा मुलाबाळांच्या शाळांच्या चक्रात अडकलेत.

त्यातही अर्थशास्त्रातलं काही कळत नाही.
<त्यातही अर्थशास्त्रातलं काही
<त्यातही अर्थशास्त्रातलं काही कळत नाही.>
अपप्रचाराला बळी पडलेली भोळीभाबडी जनता ती हीच, हीच बरं!
निवडणुका संपल्या, निकाल आले, मनासारखे नवे सरकार आले तरी अपप्रचार संपेना
मोदी सरकारला अधिकच सावधतेने
मोदी सरकारला अधिकच सावधतेने रहावे लागणार.
दोन दिवसातली दुसरी घटना: दिल्लीत सरसंघचालकांच्या गाडीला अपघात, सरसंघचालक बचावले.
इंग्रजी बातमीचा दुवा
मोदी सरकारला आता महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत अधिकच जागृत राहावे लागणार. अखंड सावधान असावे असे समर्थ रामदास स्वामी म्हणून गेलेच आहेत.
उत्तर प्रदेश बद्द्ल मोदी
उत्तर प्रदेश बद्द्ल मोदी सरकार ने काहीतरी करायला हवं, आजच्या वर्तमानपत्रात तिथल्या चार बलात्काराच्या बातम्या आहेत

अतिशय वाईट परिस्थीती. उ.प. मधले लोक लिंगपिसाट आहेत असं वाटतय.
अग्निपंख. आता तिथलं सरकार
अग्निपंख. आता तिथलं सरकार बरखास्त केलं तर लोक आवई उठवणार की बदल्याचे राजकारण करत आहेत.
नाही कारवाई केली तरी उलट्या बोंबा.
अप प्रचार संपेना !! पण
अप प्रचार संपेना !!
पण अप-प्रवृत्तीला कोण आळा घालणार !
अर्थकारण हत्ती खाली बसला तरी
हत्ती खाली बसला तरी गाढवापेक्षा उंची जास्त्च असते
व्वा त्यातच तुम्हाला आनंद !!
व्वा त्यातच तुम्हाला आनंद !!
ख्खीक !!
अच्चे दिन आ गये. अॅक्सिडेन्ट
अच्चे दिन आ गये.
अॅक्सिडेन्ट के दि आ गये
--
--
लक्ष्मी गोडबोले ती शोभा डे पण तुमचीच बहीण आहे वाटते, तिनेही काल असच बेअकली ट्विट केल होत.
सारे भारतीय भाउ बान्धव आहेत
सारे भारतीय भाउ बान्धव आहेत
भरत, शेवटी पर्याय कोणता?
भरत, शेवटी पर्याय कोणता? काहिच न करणार्या सरकारपेक्षा काहीतरी करणारे सरकार बरेच नाही का?
yala kay arth ahe ka
yala kay arth ahe ka lakshyaa......
<काहिच न करणार्या
<काहिच न करणार्या सरकारपेक्षा काहीतरी करणारे सरकार बरेच नाही का?>
अपप्रचाराला बळी पडलेली आणखी जनता.
काहिच न करणार्या सरकारपेक्षा
काहिच न करणार्या सरकारपेक्षा काहीतरी करणारे सरकार
<<
काहीच न करणारे सरकार !?
कसला जबरदस्त प्रोपोगण्डा केलाय!
असो.
५ वर्षं महाराष्ट्रात मिळाल्यावर लावलेले दिवे आठवून अजूनही शहारे येतात अंगावर. It is better to learn from experience.
हळू हळू समजेल. मग बघू गम्मत.
गेल्या १० वर्षात या सरकारने
गेल्या १० वर्षात या सरकारने अंगावर शहरे आणलेले नाहीत का?
Pages