निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा भारंगीची भाजी लहानपणी खाल्ली आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला येते ती. पावसाळ्यात होणारे पोटाचे आजार ही भाजी खाल्ली की होत नहीत अशी आईची समजूत होती. त्यामुळे ती कंपल्सरी खावी लागे. आमच्याकडे ती आख्खे वाल घालुन करत असत.

शशांकजी नखे मारल्यावरही इंजेक्शन घ्यायची गरज असते का? म्हणजे ह्यापुढे काळजी घ्यायला.>>> शशांक ह्यांनी वरती उत्तर दिलेच आहे. मला एक प्रश्न आहे की घरातल्या सगळ्यांनी (ज्यांच्य घरी पाळीव कुत्रा) व्हॅक्सीन घेण्यापेक्शा कुत्र्यालाच दरवर्षी व्हॅक्सीन दिले तर. आणी त्याचे नख लागल्यास व्हॅक्सीनची गरज आहे का? >>>>>

कुत्र्याला दरवर्षी व्हॅक्सीन देणे अत्यंत गरजेचे आहे - पण समजा तुम्ही रात्री कुत्र्याला मोकळे सोडत असाल आणि तो इतर भटक्या कुत्र्यांमधे मिसळत असेल तर काय ?? ही जर खात्री नसेल तर व्हॅक्सीनेटेड कुत्र्याचे नख लागले तरी आपण व्हॅक्सीन घेणे गरजेचे आहे. मात्र कुत्रा इतर कुठल्याही भटक्या कुत्र्यांमधे मिसळत नसेल तरच त्याचे नख लागले तरी आपण व्हॅक्सीन घ्यायची गरज नाही.

इथे सर्वांनी एक लक्षात घ्यावे (सर्वच प्राणी पाळणार्‍यांनी तर विशेषच) - मी सर्व प्रॉबेबिलिटिज (शक्याशक्यता) सांगत आहे - याचे कारण रेबीज हा अतिशय विचित्र प्रकार आहे. तो विषाणू आपल्या शरीरात काही (१०-१२ वर्षेही) वर्षेही काहीही न करता (डॉर्मंट अवस्थेत) राहू शकतो आणि अचानक उसळी मारुन आपले अस्त्वित्व दाखवतो - हे अस्तित्व म्हणजे साक्षात मृत्यूराजच ..... त्याला मग काहीही औषध नाही, इलाजही नाही...
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण व्हॅक्सीन घेतले (कारण नसताना Happy ) तर जास्तीत जास्त काय होईल - आपले पैसे वाया जातील - पण "अनमोल" असा जीव वाचेल ना ???

रेबीज मधे हेळसांड, हलगर्जी, कुछ नही होता है - अशांना काहीही दया-माया नाही -सर्व उपचार वेळेतच करणे गरजेचे -आणि अ‍ॅलोपॅथिक डॉ. म्हणतील तेच उपचार - आपल्या मनाने, इंटरनेटवरुन कोणी काहीही करु नये, ठरवू नये व एकमेकांना सल्लेही देऊ नयेत ..... Happy
इति || (आता बहुतेकांच्या याबाबतच्या शंका संपल्या असाव्यात असे मी समजतो... Happy Wink )

हो मनीमोहोर....

बीबीसी ची आफ्रिका सिरीज आपल्याकडे दाखवली का ? अर्थातच सर अटेंबरो आहेतच. ते म्हणतात तसे आफ्रिकेच्या पोटात आजही अनेक गूढरम्य गोष्टी आहेत.. त्यातल्या काहींचे चित्रीकरण यात आहे.

उदा.

कलाहारी सारख्या रुक्ष वाळवंटात एक गुहेत गोड्या पाण्याचा साठा आहे. १०० मीटर्स खोल जाऊनही त्याचा तळ
लागलेला नाही. जगात कुठेही न सापडणारे केशरी कॅटफिश तिथे आहेत.

दोन जिराफ आपल्या मानेने आणि शिंगाने एकमेकांना जखमा होईपर्यंत मारामारी करतात. एकशिंगी गेंड्यांचे
चांदण्या रात्री स्नेहसंमेलन भरते ( खास कॅमेराने हे चित्रीत केलेय ) काँगोतला एक मासा फुलपाखरासारखा उडतो.. हत्तीनी स्वत:च एक मोठे क्रिडांगण बनवले आहे. काही प्राणी मोकळी हवा खाण्यासाठी समुद्रावर फिरायला जातात आणि चक्क तिथे समुद्रात डुबकी मारतात...... अफलातून चित्रण आहे हे.

वाळवंटात पाण्याअभावी हत्तीचे एक पिल्लू प्राण सोडते त्यानंतर त्याच्या आईने केलेला विलाप. हा खुप करुण प्रसंग आहे. त्याबद्दल बोलताना कॅमेरामनचाही आवाज कातर झालाय.

मनीमोहोर मी दर पावसाळ्यात भारींग्याची भाजी आणून करते. आता रानभाज्यांना सुरुवात होईल. पहीलाच शेवळे हजेरी लावतील.
माझ्या लेखनात रानभाज्यांमध्ये बघ आहे भारंगीची भाजी.

काल आमच्याइथे चिकूच्या झाडावरून आंब्याच्या झाडावर धामण उड्या मारत होती. आज सकाळी जोडीने दोघे कंपाउंडच्या बाहेर दिसले जाऊबाईंना. आज संध्याकाळी मला कॅमेरा घेऊन बसावे लागेल. Lol

जागुले.. मी तुझ्याकडे येण्यापूर्वी सांगीन मग तू हे तुझ्या प्रेमाचे जीवजंतू बांधून, लपवून दू>>>र ठेव बर्का.. Wink

जागू एकदा त्यांना आपली ओळख करून देते, ते त्यांच्या पद्धतीने हॅलो करतात, मग ते आपल्याला काही करत नाहीत !

पिवळा वेली गुलाब भारीय हं!
अख्रोटचा बहर अप्रतिम....
शशांकजी खुप उपयोगी माहिती...
दिनेश दा लिंक द्या ना...
जागु धामण विषारी असते का?

आज पहिल्यांदाच असे झाले की नि ग चक्क शोधावे लागले !!!

इतकी वर्दळ आहे ना आज पहिल्या काही पानांवर की बस्स ......

आता अगदी सात / आठ दिवसावर आला ना मुंबईचा पावसाळा.... कुठे कुठे काळे ढग दिसायलाही लागले असतील.>>>> सध्या बर्‍याच ठिकाणी वळवाचा पाऊस पडतोय - पण सॅटेलाईट पिक्चरमधे ढग कुठे दिसतच नाहीयेत !!! Sad Sad Sad

मोनाली, अग ओफिसला तर जावेच लागते... पंखे/कुलर/एसी काहीच काम करत नाहीये... दिवसातुन दोन वेळा
माठ भरावा लागतोय... रात्री नऊ वाजता सुद्धा नळातुन कडत्त पाणी येतय..

हो दिनेशदा खुप उष्णता वाढलेय आणि काळे ढगही दिसतात.

कालच म्हटले होते की आमच्याइथे साप दिसला आणि संध्याकाळी घरी गेल्यावर कॅमेरा घेउन शोधेन त्याला म्हणून. काल घरी गेले आणि मुलिंना पारावर खेळवत मी, मिस्टर आणि दिर असे बसलो होतो. तोच मला पलिकडच्या शेतात करंजाच्या झाडाच्या टोकावर हालचाल दिसली. हालचाल पक्षाची नाही वेगळीच आहे हे लक्षात येताच मी सगळ्यांना दाखवल. सापच होता तो. पुढे येऊ लागला तसा दिसू लागला. आमच्या कंपाउंडच्या आत म्हणजे पाराच्या आंब्याला ती करंजाची फांदी चिकटलेली होती. आमच्या आंब्यावर बर्‍याच ढोली आहेत व त्यात साळूंख्या राहून अंडी घालतात. त्या ढोली हे त्याचे लक्ष होते. आम्ही लांब जाऊन सगळे पाहत होतो. जवळ जवळ ३ तास आम्ही घरातले सारे खिळून होतो तिथेच. अंधार पडला होता, रात्र झाली होती तरी टॉर्च मारून तो कधी जातोय हे पाहत होतो. साळुंख्या, कावळे त्याला टोचत होते. शेपटी ला खुप टोचले. पण तो काही पळत नव्हता. शेवटी त्याने एक साळूंखी पकडली आणी खुप भयानक वाटले. बिचार्‍या साळुंखिचे खुप वाईट वाटले सगळ्यांनाच. हकलवून पण तो जात नव्हता. जमीनीवर असता तर काहीतरी करता आले असते. मी फोटो काढ्ण्याचा प्रयत्न करत होते पण अंधार असल्याने निट जमत नव्हते. शेवटी त्याने ती साळूंखी गिळंकृत केली. आधी ढोलीत डोक खुपसुन बसलाही होता. तेंव्हा कदाचीत ढोळीतील अंडी फस्त केली असतील. ८-८.३० नंतर आम्ही कंटाळून जेवण वगैरे करण्याच्या तयारीला लागलो कंटाळून. पुरुष वर्ग त्याच्यावर लक्ष ठेउन होता. आधी मिस्टरांनी सर्प मित्राला फोन केला होता पण तो बिझी होता शिवाय रात्री झाडावरून पकडणे अशक्य होते त्यामुळे तो काही आला नाही. पोटपुजा करुन तो इतका सुस्तावला होता कि नशा चढलेली त्याला खाली उतरायचा मार्गच सापडत नव्हता. सकाळी ७ वाजे पर्यंत तो झाडावरच होता. नंतर निघून गेला. मी ऑफिसला जायच्या गडबडीत असल्याने सकाळी फोटो घ्यायच्या भानगडीत पडले नाही इच्छा असुनही. आम्ही सगळेच डिस्टर्ब झालो होतो काल. सगळ्या दार खिडक्या बंद करुन बसलो होतो रात्रभर इतक्या गर्मि मध्ये पण. फोटो देतेय पण क्लियर नाहीत. कोणाला क्लियर करता येत असतील तर नक्की करुन टाका. जिप्स्या तुला जमेल बहुतेक.

ढोलीत डोके घातलेले.

साळुंखी तोंडात पकडलेली.

हे फोटो लाईट केले तर दिसेल.

जाण्याचा रस्ता शोधातोय.

धामण होती. तशी ही विषारी नसते.

अगदी थरारक अनुभव जागू.
पण त्यांचे कायदे वेगळे असतात. निसर्गाला जशी सांळुकी हवी तशी धामणच हवी. आपण त्यांच्या आयूष्यात ढवळाढवळ करायची नसते.

मला लुंआडाला विमानाने येताना ( जर अदीस किंवा नैरोबी हून आलो तर ) काँगोचे घनदाट जंगल पार करावे लागते. तिथे भरपूर पाऊस पडतो. पण त्यातला ९५ % पाऊस हा त्या जंगलानेच हवेत सोडलेल्या बाष्पामूळे पडतो... जर भारतातही अशी घनदाट जंगले राखली असती तर ...

जागु काय थ्रिलिंग आहे ग सगळं! बिचारी साळुंकी....>>>>>>>>>>>>.+ १ Sad
म्हणूनच मी अ‍ॅनिमल प्लेनेट पहात नाही कधी.

आपण त्यांच्या आयूष्यात ढवळाढवळ करायची नसते.>>>>>>...आमच्या स्वयंपाक खोली समोर उंबराच, तुतीच झाड आहे. बरेच पक्षी येतात. कधी कधी मांजर खाली दबा धरून बसलेले असते. मला दिसले की मी त्याला हाकलण्याचा प्रत्न करते. कधी जाते. कधी रहाते. त्यावेळी दिनेशदांचे हे शब्द आठवतात पण मन शांत बसू देत नाही. आणि असाही विचार येतो, त्याचं एक वेळच अन्न आपण काढून घेतलं. पण दुसरा विचार येतो, त्यापेक्षा कुणाचा तरी जीव वाचवणं जास्त महत्वाचं Uhoh

शोभा.. जीव कुणाचा ? ते त्यांचे नैसर्गिक अन्नच आहे ना ?
जंगलात चित्रीकरण करताना कॅमेरामन त्यांच्यासमोर जे घडतेय ते शांतपणे चित्रीत करतात. कितीही करुण प्रसंग असला तरी त्यात ते ढवळाढवळ करत नाहीत. निसर्ग अत्यंत क्रूर असतो. जीवनाचा लढा कुणाला चुकलाय ?
त्यात हरणार्‍याला क्षमा नाहीच.

जे भक्ष्य आहेत त्यांची संख्या नेहमीच जास्त असते. ( जंगालात हरणं अनेक असतात, वाघ मोजकेच असतात ) त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते... आणि आपल्या प्रियजनांच्या मृत्यूच्या स्मृती त्यांचा मनात फार काळ रहात नाहीत. अगदी त्यांच्या डोळ्यासमोर हे घडले तरी.

Sad
जीवनाचा लढा कुणाला चुकलाय ?>>>>>>>>>>>>.हे फ़क्त प्राण्यांनाच. मनुष्याच्या बाबतीत असे काही घडले तर आपण जातोच ना सोडवायला. Uhoh

आणि आपल्या प्रियजनांच्या मृत्यूच्या स्मृती त्यांचा मनात फार काळ रहात नाहीत.>>> अगदी !

गेल्या आठवड्यातच स्कायवॉकवर चालताना ठिकठिकाणी झाडांवर, मोठाल्या होर्डिंग्ज्सच्या सांगाड्यांवर कावळ्यांची अगणित घरटी दिसत होती. प्रत्येक घरट्यात १ किंवा २ कावळे दिसत होते. मी मैत्रिणीला म्हटलं की हे सगळे सारखेच दिसतात मग कसे ओळखतात आपल्या जोडीदाराला? कसं कळतं की कोणा दोघांनी नक्की आपल्याच अंड्यांसाठी घरटं बांधायचं? कसं कळतं की इतकी घरटी असताना नक्की कोणत्या दोघांनी कुठल्या घरट्याकडे परतायचं? मग पिल्लं आली की नक्की कुठल्या पिल्लांना कुठल्या दोघांनी चारा भरवायचा/उडायला शिकवायचं? ......एवढं सगळं झाल्यावर ती पिल्लं उडून गेली की हे दोघेही एकमेकांना विसरतात का? त्या पिल्लांची किंवा एकमेकांची आठवण त्यांना येते का? ती पिल्लं ह्या दोघांना शोधतात का? मिस करतात का? एक विण झाली की त्या कुटुंबातलं कुणीच कुणाचं उरत नाही का? ना जोडीदार, ना आईवडिल व पिल्लं, ना भावंड!!!!

ह्या सगळ्यांच्या ताटातुटीच्या कल्पनेने मलाच पोटात कालवाकालव झाली होती. पण हे असंच होत असतं.

एक विण झाली की त्या कुटुंबातलं कुणीच कुणाचं उरत नाही का? ना जोडीदार, ना आईवडिल व पिल्लं, ना भावंड!!!!>>>>>>>>.ह्यांनाच खरं संत म्हटलं पाहिजे. Happy

म्हणूनच पक्षी आपल्या पिल्लांना जन्मताच स्वावलंबनाचे धडे देतात. पिल्लू उडायला लागल की ते आपाअपल्या मार्गाने जातात.

Pages