निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१] वर्षुदी -
<<<< थायलँड मधे मुलीला शेजारच्या कुत्र्याची नखं लागली होती.. तेंव्हा तिला फक्त एकच इंजेक्शन देण्यात आले होते. पण दोन तीन दिवसातच तिचे वजन झपाट्याने खाली जाऊ लागले ..गाल अगदी आत गेले..
तेंव्हा परत डॉक कडे धाव घेतली तर त्याने सांगितले कि या इंजेक्शन मुळे शरिरातील प्रोटीन चा मोठ्या प्रमाणात र्‍हास होतो.. >>>>> हा काय प्रकार आहे मलाही माहित नाही, असे कशामुळे होत असेल हे मलाही शोधावे लागेल ...

२] प्रज्ञा कुलकर्णी -
लहान पणापासून असं ऐकण्यात आलंय की कुत्रा चावल्यावर ज्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत तर असा पेशंट पाण्याला घाबरतो , वगैरे वगैरे....
हे खरं आहे का?>>>>>

रेबीजचे विषाणू हे कुठल्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याकडून माणसात संक्रमित होऊ शकतात (म्हणजे फक्त कुत्राच नाही तर मांजर, घोडा, गाय, म्हैस, उंदीर वगैरे तसेच सर्व हिंस्त्र जंगली प्राणी -वाघ, सिंह, अस्वल, इ.) अर्थातच या प्राण्याच्या शरीरात रेबीजचे विषाणू असतील तरच ते संक्रमित होतील.
या विषाणूंचा आपल्या शरीरात जाण्याचा मार्ग - १] रेबीज बाधित प्राण्याची लाळ तो प्राणी आपल्याल चावल्यावर आपल्या रक्तात गेली तर,
२] रेबीज बाधित प्राण्याचे नख आपल्याला लागून जखम झाली तर - कारण हे सर्व प्राणी स्वतःला सतत चाटत असल्याने या लाळेतले विषाणू नखातही असतात.
३] रेबीज बाधित प्राण्याचे दूध जर पाश्चराईज न करता (निरसे वा धारोष्ण) आपल्या पोटात गेले तर

समजा आपल्याला यापैकी काहीही झाले तर त्वरित अ‍ॅलोपॅथिक डॉ. कडेच जाणे व रेबीज व्हॅक्सीनेशन व रेबीज अँटीसिरमची ट्रीटमेंट सुरु करणे. (आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वा तंत्र-मंत्र याने रेबीज कधीही बरा होऊ शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवावे - सर्प दंशाबाबतही अँटीस्नेक व्हेनमनेच ती व्यक्ति वाचू शकेल)

समजा हा प्राणी रेबीजने बाधीत आहे का नाही हे नेमके माहित नसेल तरीही ही ट्रीटमेंट सुरु करणे. कारण रेबीजचे विषाणू हे एकदा का आपल्या मेंदूत पोहोचले की त्यावर जगभरात काहीही उपाय नाही - ती व्यक्ति मृत्यूमुखी पडणार हे अटळ असते. एकदा का ते मेंदूत पोहोचले की जसजसा मेंदू निकामी होईल तसतसे इतर अवयव पॅरेलाइज्ड होऊन निकामी होत जातात.
मात्र वर नमूद केलेली ट्रीटमेंट लगेच सुरु केल्यास काहीही धोका नसतो ( रेबीजचे विषाणू शरीरात गेले असले तरीही) मात्र जसजसा या ट्रीटमेंटला उशीर होईल तसतसे त्या पेशंटचा जीव वाचण्याची शक्यता कमी कमी होत जाते.

पाण्याला घाबरणे - हायड्रोफोबिया - हे रेबीज इन्फेक्शन झाल्याचे एक प्रमुख लक्षण आहे. रेबीज बाधित प्राणी (माणूस) नंतच्या काळात त्याची लाळ्/थुंकीही गिळू शकत नाही - कारण त्याचे ते स्नायू निकामी झालेले असतात - त्यामुळे त्याच्या घशाला प्रचंड कोरड पडलेली असते - पाणी पाहिले की केव्हा एकदा ते पिईन असे वाटते पण घशाखाली एक थेंब देखील उतरत नसल्याने ते लक्षण पाण्याला घाबरणे - हायड्रोफोबिया असे समोरच्या व्यक्तिच्या लक्षात येते.

शशांक, जसा पोलिओ, स्मॉलपॉक्स इरॅडिकेट केला गेला सततचं व्हॅक्सिनेशन करुन तसं ह्या जीवघेण्या रेबीज बद्दल का केलं जात नाहिये?

कैलासपतीची फळे तोफ गोळ्यांसारखी असतात म्हणुन त्याला कॅनन बॉल ट्री असं ही म्हणतात.

शशांक, जसा पोलिओ, स्मॉलपॉक्स इरॅडिकेट केला गेला सततचं व्हॅक्सिनेशन करुन तसं ह्या जीवघेण्या रेबीज बद्दल का केलं जात नाहिये? >>>>> रेबीज हा विषाणूच विचित्र आहे. जंगली प्राणी हे रेबीजचे नॅचरल रिझरवॉयर्स आहेत. बर्‍याच प्रगत देशांमधे या जंगली प्राण्यांचे व्यवस्थित इम्युनायझेशन करुन ते देश "रेबीज मुक्त" झाले आहेत. पण संपूर्ण जग रेबीज मुक्त करणे सध्यातरी शक्य नाही. रेबीजमधे एक लक्षात ठेवले पाहिजे की रेबीज इम्युनायझेशन हे एक वर्षाकरताच असते. समजा या मे २०१४ मधे मला कुत्रा चावला आणि मी व्यवस्थित रेबीज इम्युनायझेशन शेड्युल पार पाडले - पण २०१५ जुलै - ऑगस्टमधे मला परत कुत्रा चावला तर परत नव्याने रेबीज इम्युनायझेशन घ्यावे लागते.
इथे भारतात साध्या कुपोषणाने किती बालमृत्यू घडताहेत - त्याकडे बघणार का या जंगली प्राण्यांचे इम्युनायझेशन करणार - देशागणिक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यादृष्टीने आरोग्यतज्ज्ञानां त्याकडे पहावे लागते. - रेबीज व्यतिरिक्त इतर अनेक रोग (इन्फेक्शन्स- लहान मुलांचे डायरिया, श्वसनाचे आजार) आहेत किंवा मधुमेह वगैरेंसारखे आजार आहेत ज्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते.

रेबीज बाधित प्राण्याचे दूध जर पाश्चराईज न करता (निरसे वा धारोष्ण) आपल्या पोटात गेले तर

समजा आपल्याला यापैकी काहीही झाले तर त्वरित अ‍ॅलोपॅथिक डॉ. कडेच जाणे व रेबीज व्हॅक्सीनेशन व रेबीज अँटीसिरमची ट्रीटमेंट सुरु करणे. >> शशांक दुधातुन हे होऊ शकते हे जर खरेय तर ते कळणार कसे??? लहान मुलांना तर नको असले तरी आपण जबरदस्ती दुध देतच असतो.
रेबीज ची लक्षणे काय? प्रायमरी स्टेजला हे इन्फेक्शन कसे कळेल?
आणि असे असते तर इतर वॅक्सीनेशन सारखे हे पण आपण का देत नाही सर्रास? समजा दिलेच तर त्याचा इफेक्ट किती दिवस रहातो?
जसे माझे उदाहरण - घरात एक वर्षाचे बाळ आहे. तर त्याला हे वॅक्सीन सेफर साईड द्यावे का? एकाकडुन दुसर्‍याला इन्फेक्शन होऊ शकते का? कसे?

वरील सर्वांना धन्स. माझ्यामुळे तुम्हीही काळजीत आहात, इतकी जीव लावणारी माणसे आजुबाजुला आहेत हे वाचुन पण बरे वाटते. Happy

आता तो बराच बरा आहे, जखमा झपाट्याने सावळताहेत. पोटातुन औषध चालु आहेतच. शुक्रवारी तिसरा डोस आहे ईंजेक्शनचा. एवढे असुन जीवाला स्वस्थता आज्ज्ज्जीबात नाही. दिवसभर घरभर फिरत असतो, झोप ती कशी नाहीच. Sad

वर्षूदी तु म्हणतेस तेवढा वजनात फरक अजुन तरी दिसत नाहीए. बहुदा तिकडे खुपच स्ट्राँग डोस असेल तो. तरी शनीवारी त्याच्या पेडोशी बोलेनच. शशांक तुम्हीपण सांगा हे प्रोटीन चे रिलेशन काय आहे ते. मीपण शोधते नेटवर.

पण २०१५ जुलै - ऑगस्टमधे मला परत कुत्रा चावला तर परत नव्याने रेबीज इम्युनायझेशन घ्यावे लागते.>> समजा नाही चावला तरी उगाचच डोस रिपीट करावा का? तसे असेल तर एकच ईंजेक्शन पुरते का? की ३ किंवा ५ चा कोर्स करुन घ्यावा?

मोनाली - मी निरसे / धारोष्ण दूधाबद्दल म्हटलंय - पाश्चराईज्ड किंवा उकळलेल्या दूधाबद्दल म्हटलेले नाही. पाश्चराईज्ड किंवा उकळलेल्या दूधात रेबीजचे विषाणू नसणारच कारण दूध जेव्हा ठराविक तापमानाला नेतात (६२ का ६३डि. से. ) किंवा उकळतात तेव्हा रेबीजचे विषाणू समजा त्या दुधात असले तरी ते नष्ट होतातच.

जेव्हा एखादी गाय्/म्हैस/ बकरी/शेळी वगैरे रेबीजने बाधित होते तेव्हा त्या जनावराला व्हेटकडे नेण्याआधी तर त्या मालकाला कळत नाही की हे जनावर रेबीजने बाधित आहे ते - आणि अशा दुभत्या जनावराच्या दुधातून (पुन्हा नीट लक्षत ठेव - निरशा किंवा धारोष्णच ) आपल्याला रेबीजचे विषाणू मिळतात.

ओके. Happy

बाकी लहान मुलासाठी काही स्पेशल केअर घेऊ का? तसेही त्याला मोठ्यापासुन सद्ध्या लांब ठेवत आहोत कारण जखमा अजुन जरा ओल्या आहेत. तरी अजुन काही काळजी घ्यावी का?

वर्षूदी ने म्हटलेय त्यासाठी व असे पण पौष्टीक म्हणुन त्याला अंडे दिले तर चालेल का? (उकडून / ऑम्लेट / बुर्जी कसे द्यावे?)

रेबीज ची लक्षणे काय? प्रायमरी स्टेजला हे इन्फेक्शन कसे कळेल?>>>> मोनाली तू गैरसमज करुन घेउ नको, पण हे समजून घेण्याची तुला बिलकुल गरज नाहीये. डॉ. देखील नुसते तपासून हे सांगू शकत नाहीत. ठराविक टेस्ट्स केल्यावरच रेबीजचे निदान केले जाते - नुसत्या लक्षणांवरुन कधीही नाही.

जसे माझे उदाहरण - घरात एक वर्षाचे बाळ आहे. तर त्याला हे वॅक्सीन सेफर साईड द्यावे का? एकाकडुन दुसर्‍याला इन्फेक्शन होऊ शकते का? कसे? >>>> एक म्हणजे तुझ्या मुलाच्या (ज्याला कुत्रा चावला आहे त्याला ) शरीरात रेबीजचा एकही विषाणू नाहीये - त्यामुळे तो ते दुसर्‍याला कसा देऊ शकेल ? रेबीज हा काही सर्दीसारखा नाहीये की एकाला झाला की त्याच्या संसर्गाने दुसर्‍याला झाला.
त्यामुळे तुझ्या एक वर्षाच्या बाळाला रेबीज व्हॅक्सेनेशनची अजिबात गरज नाहीये (अर्थातच तुम्हाला कोणालाही त्या व्हॅक्सेनेशनची गरज नाहीये)
डोन्ट बी पॅनिक - तसे काही असते तर डॉ. नी तुला सांगितले असतेच ना ??
राहता राहिला तुझा मोठा मुलगा - ज्याला कुत्रा चावलाय - तो शांत बसू दे नाहीतर दिवसभर घरभर फिरू दे - तो पूर्ण निरोगी आहे - त्याला काहीही झालेलं नाहीये - त्याला त्याच्या मनाप्रमाणे करु दे - खेळला तरी चालेल - झोपून राहिला तरी चालेल - तू सगळ्यात पहिले म्हणजे काळजी करणे पूर्णपणे सोड .... Happy

तू सगळ्यात पहिले म्हणजे काळजी करणे पूर्णपणे सोड>>> कमी केलेय पण सुटत नाहीये. Sad
एक वर्षाच्या बाळाला रेबीज व्हॅक्सेनेशनची अजिबात गरज नाहीये>> ओके. हीपण काळजी मिटली. Happy
खेळला तरी चालेल >>> ते तो करतोच आहे. पण सगळे बैठे खेळ. मी त्याला सद्ध्या खाली पाठवत नाहीये, खाली गेला की प्रचंड धावाधाव असते जी आत्ता त्याला चालणार नाही. पेडोने पण त्याला बजावले आहे जखमा पाहुन की खाली जाउ नकोस. तीचा प्रयत्न आहे की जखमेत पस होऊ नये व त्या लवकर बर्‍या व्हाव्या.

नलिनी वेलकम.
ही फुले शंकरालाही वाहतात. हरीहरेश्वरला देवळाच्या बाहेर जी पुजेची ताटे मिळतात त्यात असतात ही फुले. आमच्या उरणमध्येही एका गार्डनमध्ये झाड आहे.

सोनुली धन्यवाद झाडाचे नाव आवर्जून सांगितल्याबद्दल. Happy

वर्षूताई नखे लागल्याने मला वाटत नाही काही होत. माझ्या लहानपणी मारली होती नखे कुत्र्याने मी कोणतीच ट्रीटमेंट नव्हती घेतली. तसेच आमच्या घरातल्या डॅनीचीही नखे बर्‍याचदा पुतण्याला वगैरे लागतात पण रक्त आल तर घरातील औषध लावतो. बाकी इन्जेक्शन वगैरे नाही घेत. शशांकजी नखे मारल्यावरही इंजेक्शन घ्यायची गरज असते का? म्हणजे ह्यापुढे काळजी घ्यायला.

शशांकजी नखे मारल्यावरही इंजेक्शन घ्यायची गरज असते का? >>> हो, रेबीज व्हॅक्सीनेशनची गरज आहे.

ओके धन्स शशांकजी. ह्यापुढे कोणाला नखे लागल्यास इंजेक्शन घ्यायचा सल्ला देईन.

ओळखा काय आहे ते. सोप्प आहे एकदम.

जागू मस्त फोटो. अगं ते नाही का ते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स नाव येत नाहीये तोंडात.
कालपरवा तर पाहिले हे झाड. Sad काय झालय मेमरीला.

मोनालि, तो खेळतोय ना, मग अजिबात काळजी करू नकोस. शशांक, बर्‍याच नवीन गोष्टी कळल्या. रेबीज म्हणजे कुत्रा हेच समीकरण बनलेय. सरकारी माहितीपत्रकांवर इतर प्राण्यांचीही चित्रे असतात.

पुर्वी हे इंजेक्शन खुप दुखायचे. मला पहिल्या दिवशी दोन आणि नंतर रोज १ अशी सहा इंजेक्शन्स दिली होती.
आता देतात ते कमी दुखते का ?

ओळखा काय आहे ते. सोप्प आहे एकदम.>>>>अक्रोड (कि सफरचंद).

स्पॅथोडियाचा फोटो मस्तच Happy

शशांकजी नखे मारल्यावरही इंजेक्शन घ्यायची गरज असते का? >>> हो, रेबीज व्हॅक्सीनेशनची गरज आहे.>>>>>पूर्ण सहमत. मलाही कुत्राने नख मारल्यावर मी ही घेतलंय इंजेक्शन.

सरिवा क्लोजअप मस्तच.

मोनाली मेमरीला चालना दे ग.

वैशाली वांग नाही ते.

दिनेशदा उत्तर चुकले तुमचे.

कर्दळ का ग? चुकलेच असेल ना Wink पाने कर्दळीची नाही पण ती.

आता देतात ते कमी दुखते का ?>> असावे बहुदा. पण त्याला तसेही आवडते ईंजेक्शन घ्यायला पहिल्यापासुन. ते घेताना अगदी २ सेकंद सुखते पण नंतर भरपुर काळासाठी आपण आजारी पडत नाही हे त्याला सांगायचे मी. सो तो पण आनंदाने घ्यायचा.

आत्ताही जखमेत दिलेली ईंजेक्शन सोडली तर तो आजीबात रडला नाही. अगदी कुत्रा चावला तेव्हाही ओरडला नाही वर घरात सांगत आला स्वतः की कुत्रा चावलाय. अगदी कुत्र्याचा रंग इ. पण नीट सांगीतले.

डॉक सांगत होते बाहेर जाऊ देऊ नका, जखम उघडी ठेवा इ. तर तिकडेच बेडवर असुनही मला वर म्हणे गार्डन मधे पण जायचे नाहीये का ते विचार Uhoh

मोने लेक धिराचा आहे ग चांगला. गुड.

अक्रोड (कि सफरचंद).

जिप्स्या त्या सफरचंदाला कंसातून बाहेर काढ. नुकताच लागलेला सफरचंद आहे तो.

ही सफरचंदाची बाग.

कोवळ्या फळांनी लगडलेल्या फांद्या

ही सफरचंदाची नविन कलमे.

जागू, मी कुठे उत्तर दिलेय.. मला त्यावेळी फोटो दिसतच नव्हता. ( आणि उत्तर आलेही नसते. ) मी बघितलेली सफरचंदाची झाडे वेगळी होती. पानांचा रंग गडद होता आणि सफरचंद घोसांनी लागली होती. ( मी न्यू झीलंडलाच बघितली. )

मोनालि.. खरंच शूर आहे तो. त्याला गोष्टी वगैरे सांगून एका जागी बसवावे लागेल.

Pages