निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोपिका, कवी लोकांना कायच्याकायच आणि काहीहि वाट्तं न् दिसतं.
जे न देखे रवी, ते देखे कवी म्हण्तात ते उगीच नाही Lol

मेपलचे झाड खरे तर छान प्लानिंग करते. एवीतेवी हिवाळ्यात पाने झडणारच असतात ( सूर्यप्रकाश नसल्याने त्यांना कामही नसते ) म्हणून ते झाडातील साखर परत खोडात घेते. खोडांना भोक पाडून हा सिरप गोळा केला जातो. हिरवा , पोपटी, पिवळा, लाल , सोनेरी अशा क्रमाने ही पाने रंग बदलतात.

सुप्रभात!!!!

पूरबी सूर्य उदेला जी
उडती पंछी आकाशी, घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवरी वेणु रुणझुण घुंगरमाळा जी
प्राणांतून प्रार्थना कपाळी कुमकुम लावून जी
जात्यावर घरघर देवालय मृदुंग झाला जी
(कवी: ना. धों. महानोर)

सुप्रभात!!!!

सगळीकडे कावळ्यांची घरटी बांधलेली आहेत. काही ठिकाणी बाळंतपणे सुद्धा झाली आहेत. पिले थोडी मोठी झाली आहेत. पण काही कारणाने एखादे पिलू खाली पडते. मग बाकीचे मोठे कावळे काव काव करून उच्छाद आणतात. अशा पिलाला पुन्हा त्यांच्यात स्थान नसते.

१६ मे च्या संध्याकाळी असेच एक पिलू गटाराजवळ पडलेले होते. सोसायटीतले सगळे बाळ-गोपाळ "कोकिळेचे पिलू" म्हणत कल्ला करत होते. झाडावर मोठे कावळे काव काव करत होते. ते पिलू घाबरले, सरकत सरकत गटाराच्या फटीत गेले. माझा नवरा तेथेच होता. घरी फोन करून मल्हारला विचारले "कोकिळेचे पिलू आहे. rescue साठी आणू का?" मग ते पिलू घरी आणले.

घरी पक्षांचा पिंजरा आणलेला आहे. त्यात हे कावळ्याचेच पिलू ठेवले. त्याला थोडे उडता येत होते. ओरडता येत होते. त्याला मध-पाणी पाजले. पाजताना हातात धरले तर पिलाला ग्रिप फार छान होती. (हे सगळे मल्हारने केले). ईतर कावळे / कबूतरे खिडकीत येऊन ओरडत असायचे. कदाचित त्यांना कळत होते की एक पिलू या घरात आहे. आजीचा रोष पत्करून दोन दिवस देखभाल केली. ( कावळा घरात ? एकदम अशुभ!!) मग त्याला संध्याकाळी थोडा अंधार झाल्यावर आवारातील एका झाडावर सोडून दिले. पुढे त्याचे काय झाले कळायला मार्ग नाही.

नमस्कार निगकर्स. एक आठवडा कोकणात जाउन आले. भरलय कोकण मेवा नी आंब्यांनी. फोटो काढायला आजीबात जमले नाही. फेबु वर गणपती पुळेचे आहेत जरा तेवढेच.

हुश्श इथलेही वाचुन झाले सर्व. Happy

बर मला एक सांगा, मोठ्या लेकाला कुत्रा चावलाय तिकडेच. इंजेक्शन सुरु आहेत. अजुन काही काळजी घ्यावी लागते का? काय?

कुत्रा रस्त्यावरचा होता व त्या दिवशी टोटल ७ मुलांवर हल्ला केला त्याने. मुलाला बर्‍याच डीप जखमा झाल्यात, डॉककडे पण नेलेय, त्यांनी स्ट्राँग अ‍ॅन्टीबायोटीक्स दिलेत. आता जखमा सावळल्या आहेत बर्‍याचशा. पण अजुन काय काळजी घ्यावी लागते? व किती दिवस?

जिप्सी, फोटोबरोबर एक सुंदर कविता पेश करता क्या बात है.

जाई, जाई मस्त.

मधु एकदम टचिंग.

आईग मोनालीप, वाईट वाटलं ग. काळजी घे. होईल लवकर बरा तुझा मुलगा. पण त्या कुत्र्याने एवढा उच्छाद मांडला, इतक्या जणांवर हल्ला केला, बापरे.

मोनालिप.. खूप वाईट वाटलं.. त्या इंजेक्शन्स चा इफेक्ट विचारून घे डॉक ला.. काही इंजेक्शनांमुळे शरिरातील प्रोटीन झपाट्याने कमी होतं ( थायलँड मधे असताना मुलीला पण इंजेक्शन्स घ्यावी लागली होती.. तेंव्हा डॉक ने बजावल्यामुले हे लक्षात आलं होतं )

बी एम सी, पोलिस इथे कंप्लेंट करून काही होईल का???

अग हे सर्व रत्नागिरीला झाले. मी आता आलेय ठाण्याला. तेथे फोन करुन थोडया सुचना देत आहे दिल्यात पण इथुन जास्त काय सांगत राहु?

वर्षू धन्स. विचारते ग. इथेही शशांकशी बोलायचा प्रयत्न करतेय. त्याच्या जॉबचा संबंध रेबीजसाठीच्या लसी बनवण्याशी आहे असे इथेच एका नीगच्या धाग्यात वाचले.

<<<< बर मला एक सांगा, मोठ्या लेकाला कुत्रा चावलाय तिकडेच. इंजेक्शन सुरु आहेत. अजुन काही काळजी घ्यावी लागते का? काय?

कुत्रा रस्त्यावरचा होता व त्या दिवशी टोटल ७ मुलांवर हल्ला केला त्याने. मुलाला बर्‍याच डीप जखमा झाल्यात, डॉककडे पण नेलेय, त्यांनी स्ट्राँग अ‍ॅन्टीबायोटीक्स दिलेत. आता जखमा सावळल्या आहेत बर्‍याचशा. पण अजुन काय काळजी घ्यावी लागते? व किती दिवस? >>>>>
अशा वेळेला रेबीज व्हॅक्सीनेशन जरुरी आहे आणि डॉ. ठरवतील तसे रेबीज अँटीसिरम किंवा इम्युनोग्लोब्युलिन देणे गरजेचे आहे.
समजा रेबीज व्हायरस (टच वूड - इथे तो नसावा) असेल तर स्ट्राँग अ‍ॅन्टीबायोटीक्स ते कसे काय रोखू शकेल - याठिकाणी फक्त रेबीज व्हॅक्सीनेशनच उपयोगी ठरेल.

मोनालि, ठाण्याच्या डॉक्टरला परत एकदा दाखवायला पाहिजे. सहसा इंजेक्शन्स घेतल्यानंतर घाबरायचे कारण नसते. त्याच्या मनातही उगाच भिती रहायला नको. स्वतःहून आता जाणार नाही कुत्र्याजवळ, पण तरी जपायला सांगायलाच पाहिजे. ( मला चावला होता लहानपणी. नंतर काही त्रास झाला नाही. )

समजा रेबीज व्हायरस (टच वूड - इथे तो नसावा) असेल तर स्ट्राँग अ‍ॅन्टीबायोटीक्स ते कसे काय रोखू शकेल - याठिकाणी फक्त रेबीज व्हॅक्सीनेशनच उपयोगी ठरेल.>>>> बापरे! मोनाली, तू ठाण्यातल्या डॉक्टरना गाठ पहिलं. इतर डॉक्टरांकडे नसेल तर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला ये. तिथे आहेत ही इंजक्शन्स. मी शनिवारी तिथे ओपीडीसाठी हेल्पडेस्कला बसते तेव्हा कुत्रा चावलेले पेशंट्स आले होते १-२ वेळा. (मी ठाणे सिव्हिलला नोकरी करत नाही).

कोणाकडे मोनालिपचा फोन नं असेल तर मला द्या प्लीज - मी बोलतो तिच्याशी ....... इट्स अर्जंट ...

माझा सेल - ९४२०१७७३५९

मोनाली घाबरू नको. सगळ ठिक होईल.

माझ्या पुतण्याला मागच्या महिन्यात असाच एक पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यानेही ५-६ जणांवर हल्ला केला होता. त्याला सरळ सरकारी दवाखान्यात नेले. कारण सरकारी दवाखान्यात अशी इन्जेक्शनची सोय तातडीने असते म्हणून. ४-५ इंजेक्शन्स घेतले त्याने. बरा झाला तो. डॉ. पथ्य सांगत नाहीत पण जुने लोक सांगतात व तसे आम्हीही थोडे पथ्य करायला लावले त्याला. जास्त तेलकट न खाणे, बटाटा न खाणे.

Pages