निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पुतण्याला मागच्या महिन्यात असाच एक पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यानेही ५-६ जणांवर हल्ला केला होता. त्याला सरळ सरकारी दवाखान्यात नेले. कारण सरकारी दवाखान्यात अशी इन्जेक्शनची सोय तातडीने असते म्हणून. ४-५ इंजेक्शन्स घेतले त्याने. बरा झाला तो. >>>>>> येस्स जागू अगदी योग्य ट्रीटमेंट दिली गेलीये तुझ्या पुतण्याला. पण अशा वेळेस रेबीज अँटीसिरम किंवा इम्युनोग्लोब्युलिन देणेही अतिशय गरजेचे आहे.

सर्प दंश व श्वान दंश याबाबत आपल्याकडे लोक आता खूप सजग होत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे.

ओह मी इथे आलेच नाही खुप वेळ. धन्स सगळ्यांना.
ईंजेक्शन लगेच दिड - दोन तासात सुरु झाले. टीटी चे व रेबीज चे ईंजेक्शन दिलेय. रत्नागिरीच्या सिव्हील ला नेलेले. प्रायवेट मधे जखम पाहुन्च केस घेतली नाही. लगेच सिव्हीलला पाठवले.
काल दुसरा डोस झाला. अश्विनी उथळसर ला दिला कालचा डोस.
त्याच्या पेडीने पण चेक केले व लवकर जखमा हिल होण्यासाठी अँटीबायोटीक्स व आय्ब्युजेसिक दिलेय.
रतागिरीच्या डोक ने अँटीबायोटीक्स, पॅरसिटामॉल व रॅन्टॅक दिलेले.
शशांक आपले बोलणे झाले ते डीटेल मिळालेत मी पाठवते. एकदा चेक करा.
धन्स सर्वांना परत. शशांकशी बोलल्यावर थोडे रिलॅक्स वाटले. ऑथेन्टीक माहिती उपयोगी पडते. प्रचंड टेन्स आहे मी या प्रकारामुळे.

जेव्हा रेबीजची लस(व्हॅक्सीन) तयार केली जाते तेव्हा एक ठराविक टेस्ट असते जी प्रत्येक बॅचवर केली जातेच जाते. यात डायलुटेड रेबीज व्हॅक्सीन प्रयोगशाळेतील उंदरांना टोचून ते उंदीर इम्युनाईज केले जातात. मग या इम्युनाईज्ड उंदरांना डायरेक्ट त्यांच्या मेंदूत रेबीजचे जिवंत विषाणू टोचले जातात. पण हे उंदीर इम्युनाईज्ड असल्याने व्यवस्थित रहातात (त्यांना रेबीज होत नाही). अशा प्रकारे आजकाल जी रेबीजची लस तयार केली जाते ती अतिशय गुणकारी (इफेक्टिव्ह, इफिशिअंट ) असते. या उत्कृष्ट लसीमुळे आता रेबीजच्या विषाणूंचा पूर्णपणे अटकाव केला जातो. (मात्र हे लसीकरण ताबडतोब होणे आवश्यक - जसे मोनालिपच्या मुलाबाबत केले गेले आहे)

शशांक, म्हणजेच तो व्हायरस अटेन्युएट केला जातो का? >>>> अ‍ॅटेन्युएट नाही, तो व्हायरस पूर्णपणे न्युट्रलाइज केला जातो किंवा निष्फळ केला जातो (मारला जातो) Happy

न्युट्रलाईझ केल्यावरही तो अँटीजेन देऊ शकतो का?

निष्फळ केलेल्या विषाणूंचं डायल्युटेड इनॉक्युलेशन होतं की डायरेक्ट अँटीजेनचा डायल्युटेड डोस दिला जातो?

न्युट्रलाईझ केल्यावरही तो अँटीजेन देऊ शकतो का? >>>> तो व्हायरस शरीरात शिरतो तेव्हाच त्याच्याकडे अँटीजेन (फॉरिन बॉडी) म्हणून आपली इम्यून सिस्टिम पहाते. जेव्हा व्हॅक्सीन किंवा अँटीसिरम किंवा इम्युनोग्लोब्युलिन दिले जाते तेव्हा तो व्हायरस पूर्णपणे निष्प्रभ केला जातो - तो पुढे शरीरात वाढू शकत नाही. त्या व्हायरसला पूर्णपणे निकामी करुन शरीरातून बाहेर फेकले जाते.

रेबीजची जेव्हा लस दिली जाते तेव्हा तो इनॅक्टिव्हेटेड रेबीज व्हायरस (रेबीजचा लाईव्ह व्हायरस हा महाभयंकर असल्याने कधीही संपूर्णतः इनॅक्टिव्हेटेड स्वरुपातच टोचला जातो) आपल्या शरीरात टोचला जातो - हाच अँटीजेन. शरीर याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करुन त्या व्हायरसला न्यूट्रलाईज्ड करते (निष्प्रभ करते). मात्र या अँटीबॉडीज तयार करायला शरीराला काही काळ लागतो. या काळात तो व्हायरस जर आपल्या मेंदूत शिरला तर सगळे संपलेच म्हणायचे.... म्हणून अँटीसिरम किंवा इम्युनोग्लोब्युलिन दिले जाते - यात रेडीमेड अँटीबॉडीज असतात ज्या त्या रेबीज व्हायरसला तत्काळ रोखतात व पुढे पूर्णपणे निकामी करुन शरीरातून बाहेर फेकून देतात.

आम्ही जेव्हा रेबीजचा लाईव्ह व्हायरस हाताळतो तेव्हाही आम्हा सगळ्यांना खूपच खबरदारी घ्यावी लागते. प्रॉडक्शन लॅबपासून ते अ‍ॅनिमल हाऊस मधले माईस (उंदीर) हाताळण्यापर्यंत .... कोणाही तिर्‍हाईत माणसाला (नॉनव्हॅक्सीनेटेड व्यक्तिला) तिथे प्रवेशही नसतो ...

अश्विनी तुझ्या प्रश्नांमुळे अजून माहिती मिळाली. शशांकजी ग्रेट. (कुठल्या विषयांची माहिती नाही तुमच्याकडे हे शोधायला लागेल.)

मोनालीप, काळजी करू नको . मुलाला लवकर बरं वाटेल. फ़क्त काळजी घे. जागू म्हणते तसं डॉक्टरांनी नाही सांगितली तरी पथ्य पाळच.

सर्व साधारणतः आपले शरीर (म्हणजे आपली संरक्षण यंत्रणा - इम्यून सिस्टिम ) कुठल्याही घातक जंतू, विषाणूंपासून आपले संरक्षण करायला पूर्णपणे समर्थ असते. म्हणजेच समजा आपल्याला छोटीशी जखम झाली वा इन्फेक्शन झाले तर आपण कुठलेही औषध न घेताही व्यवस्थित बरे होतो (पूर्वी येणारे साथीचे रोग आठवा - देवी, कॉलरा, पोलिओ अथवा विषमज्वर वा अगदी कावीळही ... या सर्व प्रकारात काही मंडळी काहीही उपचारांशिवाय बरी झालेली असणारच - याला कारण आपली सक्षम संरक्षण यंत्रणा) - याला कारण आपली संरक्षण यंत्रणा.

पण जेव्हा रेबीजचे विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा मात्र ते या संरक्षण यंत्रणेला फसवून मेंदूत शिरतात - व एकदा का त्यांनी मेंदूचा ताबा घेतला की ती व्यक्ति संपलीच - तो आघात प्राणघातकच असतो (रेबीज इज हंड्रेड पर्सेंट फेटल) - त्यामुळे रेबीजचे विषाणू रोखण्यासाठी तत्काळ रेबीज व्हॅक्सीन व जोडीला अँटीसिरम देणे हाच रेबीजवर एकमेव उपाय आहे.

अक्के तुझे प्रश्ण व शशांक तुमची उत्तरे यातुन बरिच माहिती कळतेय. धन्स.

तुम्हच्या म्हणण्याप्रमाणे हे उपचार माझ्या लेकाला मिळालेत तर आता सर्व मस्त होईलच. काळजि घेत आहेच. तो लवकर बरा होऊदे बास आणि काही नकोय.

शशांक इतकी डीटेल मधे माहिती सांगितलीस. खूपच उपयोगी आहे.
थायलँड मधे मुलीला शेजारच्या कुत्र्याची नखं लागली होती.. तेंव्हा तिला फक्त एकच इंजेक्शन देण्यात आले होते. पण दोन तीन दिवसातच तिचे वजन झपाट्याने खाली जाऊ लागले ..गाल अगदी आत गेले..
तेंव्हा परत डॉक कडे धाव घेतली तर त्याने सांगितले कि या इंजेक्शन मुळे शरिरातील प्रोटीन चा मोठ्या प्रमाणात र्‍हास होतो..
हे च त्याने आधीच बजावले असते तर?? Uhoh
अजून ही या प्रकाराबद्दल शंका च आहेत.. सांगशील का एक्जॅक्टली काय दिले होते इंजेक्शन मधून??

मोनालीप, वाचून काळ्जी वाट्ली. पण उपचारही वेळेत झालेत त्यामुळे निभ्रांत अस. शशांकच्या संपर्कात असल्याने नक्कीच रिलीफ वाटला असेल.
तूझ्या मुलाला लवकर बरं वाटो ह्या शुभेच्छा...

शशांक त्यानिमित्ताने तुझाही नं. लिस्ट मधे आला. तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायचा योग केव्हा येतो ते पाहू. पुढ्च्या गटग बद्द्ल च्या बातमी च्या प्रतिक्षेत.

मोनाली, तुझा लेक लवकर बरा होवो ही सदिच्छा !

कमला नेहरू पार्क मधे हे झाड पहायला मिळाले. तिथेच एका काकांना नाव विचारले तर कळाले की ह्याला कैलाशपती म्हणतात. असेच एक झाड नेहरू सायन्स सेंटरच्या आवारात पण आहे.

kailashpati.jpg

फूल
kailashpatiPhul.jpg

फळ
kailashpatiPhal.jpg

नले, सध्या मुंबईत खुप आहे ही झाडे. कैलाशपतीच नाव आहे. फुलेही सुगंधी असतात पण फळे मात्र खुप दुर्गंधीयुक्त असतात ( फिटीडा कूळ ) या फळांची विल्हेवाट कशी लावावी हाच प्रश्न असतो.

मोनाली, ऐकून कससच झाल. काय उच्छाद मांडलाय ह्या रस्त्यावरच्या कुत्र्यांनी. दहशत आहे नुसती.
पण आता इंजक्शन दिलय म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. काळजी नको करु वाटेल बरं लवक्कर त्याला.
शशांकजी , तुम्ही दिलेली माहीती उत्तम.

शशांकजी खूप छान माहिती दिलीत.
वरचि माहिती वाचून मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. लहान पणापासून असं ऐकण्यात आलंय की कुत्रा चावल्यावर ज्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत तर असा पेशंट पाण्याला घाबरतो , वगैरे वगैरे....
हे खरं आहे का?

मोनालिचा लेक खुपच अ‍ॅक्टीव्ह आहे. मी भेटलोय ना त्याला. एका जागी एक मिनिट बसत नाही... मला खात्री आहे की तो खुप शूर पण आहे.
तो आता भूभूला अजिबात घाबरणार नाही आणि रडणारही नाही !

हा धागा पळतोय खुप, आजच १२-१५ पाने वाचून काढली. जागु तुम्ही काही काश्मीर मधील झाडे ओळखायला सांगितली जागु ( पान १९) जागू | 22 May, 2014 - 03:33 -

हे छोटे झुडूप Oriental Arborvitae किंवा Platycladus orientalis. मी Seattle ला राहते आणि येथे माझ्या अंगणात आहे हे. छोट्या झुडुपाला star आकाराची फळे लागतात.

कित्ती छान आणि विविधांगी चर्चा सुरू असते इथे नेहमी..मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी इथली चर्चा वाचत असते. प्रत्येकच पोस्ट छान असते की बरेचदा काय आणि किती लिहावं हे न कळल्याने लिहिलं जात नाही!

कैलासपते झाड राणीच बागे त आहे. त्याला मोठी मोथी फळे लागतत.

सायन सर्कलला सिनेम्याक्स की काहेतरी मुल्टे स्क्रीन आहे

त्याच्या आवारातही अहे

Pages