निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांची फुले छानच.
ती जांभळी ऑर्किड्स अगदी गेल्या १५/२० वर्षातच मुंबईत दिसायला लागली. सर्वच ऑर्किड्स प्रमाणे ती नाजूक दिसत असली तरी बरीच टिकतात.

गोपिका ते सुरवंटच होते.

शोभाला चिडवू नका, माझी आज्जी आहे ती. ( मारेल मला ! )

हे स्थलांतरीत पक्षी पिल्लांना मोठे करण्यासाठी आटापिटा करतात. आपल्या देशात परत जाताना त्यांना पिल्लांना घेऊन जायचे असते. तेवढ्या काळात त्यांना तेवढे सक्षम करायचे असते.

जिप्सी, दुसरा बहर केव्हा येतो - ऑक्टोबर का ?>>>>हो शशांक, साधारण दिवाळीच्या आसपासच दुसरा बहर येतो. Happy

निगचे सत्यसाईबाबा Proud

शोभाला चिडवू नका>>>>>दिनेशदा, सुरूवात तुम्हीच केली आहे बर्का. Happy (नारायण नारायण Wink Happy )

सुदुपार!!!

३-४ दिवसांनी आले तर कमीतकमी ३-४ पाने वाचावी लागतात.
सगळ्यांचे फोटो आणि माहीती छान...

हे स्थलांतरीत पक्षी पिल्लांना मोठे करण्यासाठी आटापिटा करतात. आपल्या देशात परत जाताना त्यांना पिल्लांना घेऊन जायचे असते. तेवढ्या काळात त्यांना तेवढे सक्षम करायचे असते. >>>>>>>>>>>>>>> दा, तुम्ही हे बुलबुल बद्दल म्हणत आहात का? पण तसे बुलबुल बारमाही दिसतात.
माझ्या लहानपणी मुंबईत ईतके पक्षी दिसत नव्हते (ओळखता येत नव्हते / जाणिवच नव्हती). पण आता बुलबुल, साळुंकी, पोपट, सुर्यपक्षी, शिंपी, दयाळ सर्रास दिसतात. कदाचित या पक्षांनी माणसांच्या परिसराला आपलेसे केले असेल.

मधू, अगदी हेच.. खुप नवीन पक्षी दिसायला लागले आहेत आता. बुलबुलपण पुर्वी क्वचितच दिसायचा.
वांद्राच्या ड्राईव्ह ईन थिएटरच्या समोर जे तिवरांचे रान होते त्यालाही सलीम अलिंच्या सल्याने पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला होता. पण आता तिथे एवढी गजबज असते कि पक्षी तिथे फिरकत नसावेत.

जिप्स्या... अशी काडी लावलीस तर मी आणि शोभा मिळून तूला मारू !

जिप्स्या... अशी काडी लावलीस तर मी आणि शोभा मिळून तूला मारू !>>>>>>>>..दिनेशदा, याच इकडे लवकर. Happy
दिनेशदा, अशोक मामा तुम्ही आल्यावर गटग करायच म्हणत होते.कधी येताय? Happy

दिनेशदा, याच इकडे लवकर. >>>>हायला, हे बरं आहे. सुरूवात दिनेशदांनी करायची आणि मार जिप्स्याने खायचा? (नारायण नारायण :फिदी:)

(नारायण नारायण फिदीफिदी)>>>>>>>>>>नारायणाचा नारद कधी झाला? Proud

शोभे, तेथे सत्यसाईबाबांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेस का? तरच येईन म्हणतोय आणि तेही नेहमीच्याच वेषात Wink

ऐ पुण्याला कधीये गटग???????? >>>>> ते आता "सत्यसाईबाबा" आणि "नारद"च ठरविणार आहेत गं .......
आपल्या कोणाच्याही "हातात" नाहीये ते .... Happy Wink

ऐ पुण्याला कधीये गटग????????>>>>>>>>.अय्या! तूला माहित नाही.जिप्स्याने सांगितल नाही तुला? जिप्स्या असं करणं शोभत होय रे तुला? Proud

आज .' नारदा' रोल बदललाय वाट्टं!!!!!! >>>> येस्स, हातात वीणेऐवजी "कॅमेरा" ..... (कॅमेरा मात्र विदाऊट "रोल" .... ) Happy Wink

वर्षू...
तूला फणसाचे लोणचे, भाजी ( ही ३/४ प्रकारे करतात ), कच्च्या गर्‍याची भाजी, तळल्या फणसाची भाजी, नुसते गरे, सांदण, फणसपोळी, फणसाचा मुरांबा, चिप्स, आठळ्यांची भाजी, फणसाच्या पानाच्या द्रोणातल्या इडल्या, त्याच्या पानावर केलेल्या सालपापड्या, कोक्यांची बिहारी कोशिंबीर.... हे सगळे खाऊ घालावेसे वाटतेय Happy

जुलै मधे जिप्स्या आणि साधना पण नाही ना ? असो, मी आपला पुण्याला धावती भेट नक्कीच देऊन जाईन. ( त्याचवेळी या जिप्स्याचे काय करायचे त्यावर पण चर्चा करूच. )

<<< तूला फणसाचे लोणचे, भाजी ( ही ३/४ प्रकारे करतात ), कच्च्या गर्‍याची भाजी, तळल्या फणसाची भाजी, नुसते गरे, सांदण, फणसपोळी, फणसाचा मुरांबा, चिप्स, आठळ्यांची भाजी, फणसाच्या पानाच्या द्रोणातल्या इडल्या, त्याच्या पानावर केलेल्या सालपापड्या, कोक्यांची बिहारी कोशिंबीर.... हे सगळे खाऊ घालावेसे वाटतेय >>>>> सगळेच तोंपासू ...... कधी येताय आणि कधी करताय हे सगळे असं झालंय ??? Happy

<<तूला फणसाचे लोणचे, भाजी ( ही ३/४ प्रकारे करतात ), कच्च्या गर्‍याची भाजी, तळल्या फणसाची भाजी, नुसते गरे, सांदण, फणसपोळी, फणसाचा मुरांबा, चिप्स, आठळ्यांची भाजी, फणसाच्या पानाच्या द्रोणातल्या इडल्या, त्याच्या पानावर केलेल्या सालपापड्या, कोक्यांची बिहारी कोशिंबीर.... हे सगळे खाऊ घालावेसे वाटतेय<<बाप्रे बाप्रे... इतके प्रकार असतात?? Uhoh
शोभी... नुस्ती नावाचीच कोकणी. कधी असले प्रकार कोकणातुन आणत नाय!! Sad

आर्या होना, काल मला वाटले, शोभा एखादा तरी कोकणी पदार्थ चमत्काराने हातातून काढेल, आपल्यासाठी. अधून मधून माझे लक्ष तिच्या हाताकडे होते.

शोभी... नुस्ती नावाचीच कोकणी. कधी असले प्रकार कोकणातुन आणत नाय!! >>>>>>>>>>>एकतर मी कोकणात विशेष जात नाही. आणि गेले तरी मलाच काही मिळत नाही. Sad

Pages