निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी काही काश्मिरची फुलं
ह्याचं नाव माहित नाही
१.
IMG_4449.JPG

२.
IMG_4455.JPG
३.ट्युलीप- सिझन संपलाय - कुठे कुठे तुरळक दिसली
IMG_4445.JPG
४.शिकारा भरुन फुलं
IMG_4464.JPG
५.पोपी
IMG_4603.JPG
६.ह्याचं नाव माहित नाही
IMG_4562.JPG
७.ह्याचंही नाव माहित नाही
IMG_4575.JPG
८.??????
IMG_4502.JPG

सुप्रभात!!!!

भक्तिच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास

चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास

काय पळतोय धागा.
तीन -चार दिवस आल नाही तर कित्ती पान वाचावी लागतात.
मस्त वाटत वाचून सगळी माहिती.
सगळ्यांचे फोटो मस्त.

मी कुंडित लावलेला मोगरा फुलतच नाहीये
नुसताच वाढ्तोय
फूल काहीच येत नाही

उन पाणी वगैरे सर्व नीट आहे
बाकीची झाडे व्यवस्थित आहेत

काय झाल असाव
कोणी मार्गदर्शन करेल का

जिप्सी,कसले सुरेख फोटो...
दिनेशदा,त्या फोटोंमध्ये जे काटेरो होते ति फुल होति का सुरवंट???

अंजली, फोटो'स एकदम झकास.आणि मला आता अस विचारयच होत कि चिनार म्हणजेच मॅपल का?? कारण पान तरि सारखिच वाटतात(अंजलीच्या फोटोत पाहिलेल)....

सुप्रभात!!!

फुलल्या मनाच्या मुक्या पाकळ्या
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला तिच्या पाऊली...

सुप्रभात!!!!!!!!!

ishu 091.jpg

जिप्सि, निशीगंध अहाहा................सूवास इथपर्यंत दरवळला.
मला निशीगंधाचे कंद हवे आहेत, नर्सरी गाठावी लागेल पावसाळ्याच्या आधी.
बेलफळाची चव आणि त्याचा तो एक वेगळाच दर्प समहाऊ मला आवडत नाही.

मोगर्‍याबरोबर जिप्सी च्या कवि हृदयाला ही बहार आलेलाय सध्या.. ,' आप तो ऐसे न थे' Wink

अन्जू, मोठे फोटो टाक ना.. कसली सुर्रेख फुलं आहेत..

काश्मिर ला ट्यूलिप्स पाहायचे असल्यास कोणत्या महिना / सीझन मधे जावे????

अंजली चितळे - कोरांटी, दशमुळी, अबोली ही सगळी फुले या कुळात येतात - Acanthaceae (Barleria family) . या नावाने गुगलून पाहिल्यास लक्षात येईल की या कुळांतर्गत इतरही अनेक प्रकारची फुले येतात. स्थानिक भाषेत फुले, झाडे यांना वेगवेगळी नावे असतात. ही सर्व नावे गुगलवर मिळतीलच असे नाही, त्यामुळे बोटॅनिकल नावे लक्षात ठेवणे जास्त सोयीचे ठरते.
तरीही http://www.flowersofindia.net/ या साईटवर तुम्हाला बर्‍यापैकी फुले, झाडे यांची योग्य नावे व स्थानिक भाषेतील नावेही मिळू शकतील.

नुसत्या फुलांचे जे फोटो (विशेषतः काश्मिरमधील फुलांचे) आहेत त्यावरुन मला तरी नावे ओळखता येत नाहीत. कारण फुल, पाने, एकंदरीत झाड असे वेगवेगळ्या भागाचे फोटो असतील तरच ते झाड नेमके ओळखता येते - तसे दिनेशदा, साधना, मेधा, जागू, इ. अनेकजण नुसत्या फुलांवरुनही वा फळावरुनही झाडे ओळखतातच ... Happy

मोगर्‍याला फुले येणे - चांगले खत घालणे, एकदिवसा आड पाणी घालणे (फार पाणी घातल्यास फुले येत नाहीत) व योग्य वेळेस छाटणी या सगळ्या गोष्टी करुन पहाणे. छाटणी हिवाळ्यातच करतात. शेणखत वा इतर सेंद्रिय खते वापरणे. जवळपास एखादी नर्सरी असेल तर तिथे चौकशी करणे. अजून जास्तीत जास्त महिनाभरच ही फुले येतील, एकदा का उन्हाचा तडाखा कमी झाला की याचा हंगाम संपलाच .... Happy

मोगर्‍याबरोबर जिप्सी च्या कवि हृदयाला ही बहार आलेलाय सध्या.. ,' आप तो ऐसे न थे' >>>> काये हे वर्षुदी ?? जिप्सी आधीपासून रसिक आहेच की - फरक एवढाच की पूर्वी सह्याद्रीचे, गड-किल्ल्यांचे फोटो काढायचा पण आता "घरात हसरे तारे असता... मी पाहू कशाला नभाकडे ..." अशी अवस्था आहे त्याची त्यामुळे घरातील फुलांचे फोटो काढतोय सध्या ...... Happy Happy

वर्षूदी, शशांक Proud

छाटणी हिवाळ्यातच करतात. शेणखत वा इतर सेंद्रिय खते वापरणे.>>>>शशांक, मी छाटणी फुले येऊन गेल्यावरही करतो. Happy मी झाडाचीचे सुकी पाने कुंडीत पसरून टाकतो,वेगळं अस खत अजुन एकदाही टाकलं नाही. Happy

अजून जास्तीत जास्त महिनाभरच ही फुले येतील, एकदा का उन्हाचा तडाखा कमी झाला की याचा हंगाम संपलाच>>>>>अगदी अगदी. माझ्याकडच्या मोगर्‍याला वर्षातून दोनदा बहर येतो. Happy

वर्षूताई, काश्मिरला ह्यावर्षी ओळखीतल्या ८-१० फॅमिलीज तरी गेलेल्या ऐकल्या एप्रिल-मे मध्ये. ट्युलिप्स आताच असतात. एक मित्र युरोप आणि काश्मिर असं दोन्हीकडे १५ दिवसांच्या अंतराने जाऊन आला. त्याच्या दोन्हीकडल्या फोटोंमध्ये ट्युलिप्स आहेतच.

ट्युलिप्सच्या बागा म्हटल्या की 'सिलसिला' मधलं "ये कहाँ आ गये हम" आठवतं.

८-१० फॅमिलीज तरी गेलेल्या ऐकल्या एप्रिल-मे मध्ये. ट्युलिप्स आताच असतात>>>>अके, वर्षूदी कश्मिरात ट्युलिपचा सीझन एप्रिल एंडपर्यंतच. मे महिन्यात फारच कमी ट्युलिप्स दिसतात. मे महिन्यात ट्युलिप गार्डन बंद असतं. एप्रिल महिना बेस्ट आहे. Happy

हो का? आजच एक मैत्रिणी ऑफिसच्या बसमध्ये १५ दिवसांच्या सुट्टीवरुन आलेली भेटली. ती पण काश्मिरलाच गेली होती. मग तिला मिळालंच नसेल ट्युलिप गार्डन.

सुप्रभात....
एक आठवडया नंतर बुलबुल बा़ळांची प्रगती.....
bulbul1.jpgbulbul2.jpgbulbul 3_0.jpg

आता पिल्लांची भुक पुर्वी पेक्षा जास्त वाढल्यामुळे, आई, बाबांना जास्त खेपा कराव्या लागतायत....bulbul 4.jpgbulbul5.jpgbulbul6.jpg

माझ्याकडच्या मोगर्‍याला वर्षातून दोनदा बहर येतो. >>>>> जिप्सी, दुसरा बहर केव्हा येतो - ऑक्टोबर का ?

एप्रिल महीन्यात काय!! .... ओक्के जिप्स्या थांकु..नेक्स्ट ईअर..

अरे वा सयाली कडची पिल्लं मोठी होत आहेत पटापटा.. Happy

गोपिका, खरं आहे. चिनार म्हण्जेच मॅपलचं झाड. नोव्हेंबरमधे ह्याच्या पानांचा रंग पिवळा/ लाल होतो. आणि त्या सीझनमधे काश्मिर आण्खिनच देखणं असतं.
मराठीतलं गाणं- हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरि,
दिससी तू नवतरूणी काश्मिरी

ह्या हवेत चिनार बहुधा होत नाहित(प्रयोग केला पाहिजे) त्यामुळे चिंचेच्या झाडावर समाधान मानावं लागतं?????;) Wink Wink
वर्षू नील, मोट्या आकारातले फोटो लोड होत नाहिएत. काय मॅक्स/मिन् साइझ ठेवला म्हण्जे ते साधता येइल? मला जरा मार्गदर्शन करा न कुणीतरी.

येस जिप्सी, ट्युलिप चा सीझन मार्च आणि एप्रिल.
सायली, बुलबुलचे फोटो छान.आपल्याकडे लालबुड्या (red vented) बुलबुल दिसतात. काश्मिरमधे मला पिवळ्याबुड्या (yellow vented) बुलबुल दिसले.
तसं जाई म्हण्ते त्याप्रमाणे माझाही कुंडीतला मोगरा फुलत नाही. आता हा उपाय करुन पाहिन.

धन्यवाद वर्षु निल, अंजली...

जिप्सी, चाफा , निशीगंध सुरेखच + त्याला साजेशा आ़़ळी नेहमी प्रमाणेच....

अंजली सगळीच फुलं गोड आहेत.. पण ते बटरकप्स आणि पोपी(नावे इथेच कळलीत) खुपच मस्त आहेत..
तसेच येलो वेन्टेड बुलबुल कीती गोड दिसत असेल ना!

अरे बापरे बरेच फोटो, जिप्सीच्या सुंदर कविता. उशिरा आले त्यामुळे वरचे सर्व फोटो, कविता अप्रतिम.(एका वाक्यात वर्णन).

काल आपल्या नि.ग. च्या सत्यसाईबाबांचे प्रत्यक्ष दर्शन मिळाले, धन्य झाले. हातातून काही काढून मात्र दाखवले नाही त्यामुळे चमत्कार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.

हो ना आर्या पण हातातून एखाद्या वृक्षाची बी किंवा फुलपण नाही काढले. तेवढेच मी प्रसाद म्हणून माझ्या पर्समध्ये जपून ठेवले असते.

Lol अंजु!! आम्ही नंतर दक्षीच्या बागेवर डल्ला मारला होता. खरं तर खास तिची बाग बघायलाच गेलो होतो तिच्या घरी.

Pages