निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

जिप्सयाला रात्रि फोन
जिप्सयाला रात्रि फोन करता????? आणि त्याने रिटर्न कॉल करावा ही अपेक्षाही ठेवता?? काय माणसे आहात राव...
इतक्या जणांनी फांदी मागितल्यावर त्याचा मोगरा आता काहि टिकत नाही. तुम्हा सगळ्यअंना दिल्यावर तोच जोगवा मागेल, मला आता एक फांदी द्या म्हणुन.
बाकी फांदीमध्ये काही नसते, प्रेमाने लावणा-याच्या हातात सगळे असते.
वर्षू, पोपट मस्त. दुसरा फोटो लैच झकास. पोपट उडताहेत असे वाटते. काश या रंगाचे पोपट मला पाहायला मिळते.
शोभा, त्या कॅसेट
शोभा, त्या कॅसेट रद्दीवाल्याला देऊन टाकल्या. >>>>>>>>>भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य
तू पाठवणार होता ना मला?

साधना अग गटग ठरत होत्या त्या
साधना अग गटग ठरत होत्या त्या दिवशी तुम्ही मला फोन करुन थकलेलात तेंव्हा वर्षूताईचा मला कॉल आलेला जिप्स्याला फोन करायला. तेंव्हाचा कॉल. नाहीतर मी तर त्याला आता दुपारी पण कॉल करणार नाही.
नाहीतर मी तर त्याला आता
नाहीतर मी तर त्याला आता दुपारी पण कॉल करणार नाही. >>>>>>>>>अग, फक्त सुट्टीच्या दिवशी, दुपारी पण करू नको.
दिनेशदा.. विपु बघा..
दिनेशदा..
विपु बघा..
जिप्सी अप्रतिम फोटोस... हिरवे
जिप्सी अप्रतिम फोटोस... हिरवे कंच झाड आणि पांढर्या शुभ्र कळ्या आहाहा!व्वा क्या नजाकत है!
तुमच्या सारखीच आमची अवस्था आहे... घरी कोणाला बागकामाची आवड नाही....
एक दिवस वैतागुन नवर्याला बोलले काय रे मी रोज इतक्या आनंदाने सांगते, आज १०फुलं आलीत, आज
१२ आलीत... तु कधी तरी जाउन बघतोस का बालकनीत... तर माहाराज पेपर वाचता वाचता तडक उठले,
बालकनीत गेले आणि काय म्हणाले असतील... खरच आपला पांढरा झेंडु केवढा बहरलाय!.... अरे झेंडु पांढरा असतो का कधी? शेवंती आहे ती... हो तेच ते... त्यचीच बहिण आसते ती... कप्पाळा वर हात मारुन बसले...
बर ते तर जाउ दया, देव पुजेची खुप आवड आहे त्याला... पण कोणत्या देवाला कोणते फुल आवडते ते
माहिती नाही... आपण जर म्हणटल..की इतकी लालं फुलं असताना पांढर जास्वंदाच फुल का वाहिलस गणपतीला,
तर उत्तर मिळतं तुझ्या कानात सांगीतले वाटत गणपतीनी... कोणते फुलं आवडतात ते....
जागू, वर्षुताई, जिप्सी ...
जागू, वर्षुताई, जिप्सी ... मस्त फोटो.
जिप्सीकडे इतकी वर्षं कधी मोगरा असल्याचं ऐकलं नाही. यंदा भारीच बहरतोय हां.
मामी
मामी
आज ऑफीस मधे एकाने सगळ्यांना
आज ऑफीस मधे एकाने सगळ्यांना बेल फळेच वाटली... ह्याचा मुरब्बा कसा करायचा? सरबतही होते म्हणे...
सांगाले का कुणी...
मामी
मामी

मामी एकदम सही. सायली मस्त
मामी एकदम सही.
सायली मस्त आहेत बेलफळे. बंगालमध्ये सकाळच्या नाश्त्याला नुसती बेलफळे खातात, लोकसत्तामध्ये मागे अविनाश बिनीवाले ह्यांनी लेख लिहिला होता.
सायली पिकून गुळमट वास यायला
सायली पिकून गुळमट वास यायला लागला कि फोडायची. गर पाण्यात घालून कुस्करायचा. त्यात चवीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा. झाले सरबत.
काश्मिरमधे ठीकठीकाणी दिसणारी
काश्मिरमधे ठीकठीकाणी दिसणारी हि






IRIS ची फुलं
बोगन्वेलीचं टेक्ष्चर असलेली ही सुरेख फुलं
अगदी नखाएवढी रानफुलं - दल झील के किनारे
आणि हे butterfly bush (buddlejas)
अंजली मस्त आहेत फुलं.. खूऊऊप
अंजली मस्त आहेत फुलं..
खूऊऊप वर्षांपूर्वी बेलफळाचं सरबत प्यायलं होतं.. बरं होतं चवीला...
गर मात्र आवडला होता.. पिठूळ , गोड..
मामे...

जिप्स्या..काय रे.. निगकर्स पिच्छाच सोडत न्हाई रे तुझा...
नेक्स्ट बकरा मिलनेतक तूईच!!!
बेलफळ नुसतंच बियांसकट खायला
बेलफळ नुसतंच बियांसकट खायला मस्त लागतं... बियांलगत मध पण असतो. आता ८-१० वर्षे झाली बेलफळ खाऊन...
अंजली फुलांचे फोटो सुंदर
अंजली फुलांचे फोटो सुंदर आहेत.
जिप्सी , मोगरा सुंदरच! तो डबल
जिप्सी ,
मोगरा सुंदरच! तो डबल मोगरा आहे ना! माझ्याकडे तसाच मोगरा आहे पण कुंडीत आहे. गजर्यातला मोगरा परत वेगळा दिसतो.
अंजली चितळे,
फोटो मस्त!
सुप्रभात!!! भग्न शिवालय परिसर
सुप्रभात!!!
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करितील गर्द झुला
भेटेल तिथे गं, सजण मला
क्या बात है जिप्सी... खुप
क्या बात है जिप्सी... खुप सुंदर ओळी... आणि अबोली तर व्वा.... मस्त आलाय फोटो....
धन्यवाद दिनेश दा... नक्की करीन सरबत...
अन्जु नविनच कळले तुझ्याकडुन ... बेलफळाचा नाष्ता...
अंजली मस्त फुलं.....
जिप्सी.. फोटो छानच.. तूला
जिप्सी.. फोटो छानच.. तूला केनयाच्या जंगलात पाठवायला हवे तिथे खरेच रानअबोली आहे. अगदी बोटभर उंचीचे झाड असते. फुले अशीच पण रंगाने जास्त गडद.
अंजली, बिनीवाल्यांची "न्याहारी" अशी मस्त मालिका होती. पुस्तक आले असणार त्याचे बहुतेक.
आजचा एक छान लेख :-
आजचा एक छान लेख :- http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-usage-of-dna-550049/
डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.
प्रत्येक सजीव पेशी एखाद्या रसायनाच्या कारखान्याप्रमाणे काम करत असते. पेशीच्या जीवनकालात प्रथिने, विकरे, हार्मोन्स अशा अनेक जैविक रसायनांची निर्मिती होत असते. आपल्या शरीरातील अन्नाचे चयापचन, प्राणवायूपासून ऊर्जानिर्मिती इ. अनेक जैवरसायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या विकरांच्या निर्मितीला डीएनएच जबाबदार असतो. डीएनएच्या या कार्याचा उपयोग करून कृषितंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आहे.
गाजर, पपईसारख्या रंगीत फळात बीटा कॅरोटीन नावाचे रसायन असते, ज्यापासून आपल्याला 'ए' जीवनसत्त्व मिळते. कृषिवैज्ञानिकांनी बीटा कॅरोटीनच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचे तांदळात संकर करून पिवळ्या रंगाचा 'गोल्डन राईस' बनविला आहे. ज्यामुळे आपल्याला त्या तांदळातून 'ए' जीवनसत्त्व मिळते.
वर्तमानपत्रात बी. टी. कापूस व बी. टी. वांग्यावर झालेला ऊहापोह आठवत असेल. बॅसिलस जातीचा एक सूक्ष्म जीव असे एक रसायन बनवतो की ज्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून होऊ शकतो. बॅसिलसमधील या रसायनाच्या जडणघडणीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचा संकर कापूस अथवा वांग्याच्या जनुकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कापसाची बोंडे अथवा वांगी किडीच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित असतात. असेच तंत्रज्ञान वापरून अधिक प्रथिने असणारी किंवा अधिक उपज देणारी तसेच अधिक स्निग्धांश असलेल्या तेलबियांची संकरित वाणे तयार करता येतात.
असेच तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात पण वापरले जाते. मधुमेहावर वापरात असणारे इन्सुलिन डुकरापासून मिळविले जाते. पण आता मानवात इन्सुलिन बनविणारे जनुक ई. कोलाय या सूक्ष्मजीवात संकरित करून त्यापासून इन्सुलिनची निर्मिती करता येते. हे इन्सुलिन अधिक प्रमाणात मिळविणे शक्य असल्यामुळे ते कमी दरात उपलब्ध होऊ शकेल.
डॉ. मृणाल पेडणेकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जिप्स्या, या पानावरचा चौथा
जिप्स्या, या पानावरचा चौथा फोटो बघ. ( केनयातली रान अबोली ) प्रखर उन्हात काढल्याने रंग वेगळा दिसतोय.
http://www.maayboli.com/node/31485
दिनेश दा रान अबोली छान आहे
दिनेश दा रान अबोली छान आहे हो... कीती छोटेसे झाड आहे पण फुलं लागलीत... नवल वाटले...
वर्षू,दिनेश्,अंजू, देवकी
वर्षू,दिनेश्,अंजू, देवकी धन्यवाद.
जिप्सी, फोटो छान. पण आप्ल्याकडे कोकणपट्टीत दशमूळी जे जे फूल/झाड आहे ते ह्या अबोलीकुळातलं आहे असं मला वाट्तं. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. मी तर कीत्येक दिवस तीला निळी अबोली म्हणायचे. तसं जर असेल तर ख-या अर्थाने ते रानफूल म्हणता येइल. ब-याच दिवसांनी किशोरी आमोणकरांच्या गाण्याची आठवण करुन दिलीस. धन्स. मी हे गाणं पूर्वी म्हणायची.
काश्मिरमधे बहावा टाईप ही फुलं
काश्मिरमधे बहावा टाईप ही फुलं दिसली. ह्यांचं नाव काय? पांढरी, गुलाबी, पिवळी अशा रंगात भरभरुन फुलली होती


१.
२.
तसंच चिनारचे देरेदार वृक्ष
तसंच चिनारचे देरेदार वृक्ष भरगच्च हिरव्या सावलीचे जिथे तिथे आपले हिरवे हात पसरुन होते. त्यांना ही छोटी फुलं की फळं लागली होती. साधारण आपल्या कळम , कदंब वृक्षाला असतात तशी. तिथल्या एका नावाड्याला विचारलं तर म्हण्तो कसा - चिनार को थोडी न् फूल या फल लगते है?

पण आप्ल्याकडे कोकणपट्टीत
पण आप्ल्याकडे कोकणपट्टीत दशमूळी जे जे फूल/झाड आहे ते ह्या अबोलीकुळातलं आहे असं मला वाट्तं. >>>>हो अंजली, अगदी बरोबर. ती दशमूळीच.मीही आधी निळी अबोलीच समजायचो.

कश्मिरमधील फुले छानच.
हा दशमूळीचा फोटो
आणि हि पिवळी अबोली 

दिनेश, ती रानअबोली सुरेखच. पण
दिनेश, ती रानअबोली सुरेखच. पण त्याचा आकार मला भद्रक ह्या फुलासारखा वाट्तोय. हो ना? कदाचित माझा काहितरी गोंधळ उड्तोय.
जीप्सी, व्वा लगेच फोटो
जीप्सी, व्वा लगेच फोटो टाकलास. मी ही दशमूळी रानातून आणून कुंडीत लावली आहे आणि दरवर्षी जानेवारीत एक मस्त तुरा येतो.
हे मॅग्नोलियाचं झाड. इतका
हे मॅग्नोलियाचं झाड. इतका सुरेख सुगंध.... वाटतं कि झाडाखालीच बसून राहावं. तसं फार उंछी नाही जात हे झाड असं वाटतं

आणि हे झाड मला जेम ट्री सारखं भासलं- रत्नजडित- ह्याला ज्युडास म्हणतात
ह्याचा क्लोजअप- जरा जास्त एक्स्पोज झालाय
Pages