तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता खरच मला हि त्या प्रिया ह्य कॅरॅक्टर चा राग येतो....
तो सुहास तर नेहमि 'घश्या ला इन्फेकक्शन' झाल्य सारखा बोलतो...घसा खरवडुन....खुप चीड येते....

सध्या तर चिमालाही सर्दी झाली आहे बहुधा.

अरे तो अमोल कोल्हे बराय की. मंजिरीने सत्याला गेट लॉस्ट म्हणून खरंच लग्न करावं त्या अमोलशी. आणि प्रियाने सत्यजितकडे परतावं आणि म्हणावं 'तू तिथे मी'. म्हणजे पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरे सुफळ संपूर्ण होईल Proud

सुहास तर नेहमि 'घश्या ला इन्फेकक्शन' झाल्य सारखा बोलतो.>>>> हो काय विचित्र आवाज झालाय त्याचा.

सध्या सगळ्या सिरीअलमधे कोणाला ना कोणाला सर्दी आहे. एलतिगो मधे उका पण सर्दीच्या आवाजात बोलत होता Happy

त्या कफ सिरप वरुन आठवल झी हिंदीवर कुठलिशी सिरेल सुरु होतेय त्यात पण प्रोमोजमधे एक ताई एका दादांना लाडिक धमकावर असतात, आपने आईसक्रीम खिलाई है तो कफ सिरप भी आपही पिलाएंगे. आणि बॅकग्राऊंडला एक सुंदर गाणे ' खामोशिया गुनगुनाने लगी, तनहाईया मुस्कुराने लगी, सरगोषी करे हवा, छुपके से मुझे कहा, दिल का हाल बता दिलबरसे ना छुपा'

मुग्धा, मी नै घेत............ कफसिरप Happy

शुभे नाक जाम होउन पण जी सर्दी असते ना ती जाम सर्दी Happy

मी घरी पोहचेपर्यंत ही सिरीयल संपलेली असते बर्‍याचदा किंवा संपायला आलेली असते. Happy माझ्या सा.बा. अगदी भक्तीभावाने झी मराठी बघतात. अगदी होम मिनिस्टर पासुन सुरुवात ते एलतिगो पर्यंत. तर त्या दिवशी तुतिमी मधे सत्या त्या अनुनासिका अनघाला म्हणत होता की तुझ्या हातची कॉफी कैतरी वेगळीच असते. म्हणजे असते साधीच कॉफी पण तु बनवल्याने चव काय्तरी खासच असते. काय करतेस तु??? वै वै. भारीच.

<<बाकी काही बदल नाही, तोच गोंधळलेला चेहरा, मुधोळ्करांकडे जाव की नाही या विचारात इकडुन तिकडे फिरणे >> अगदी अगदी .बाकी ती अनघा आणि अनघाचा नवरा अगदी बोअर करताहेत. दादा होळकर चा विनोदी व्हिलन मस्त आहे. अमोल कोल्हे किती तो मोठा दिसतो. दोन पोरांचा बाप्या दिसतो. चिमाला पण अभिनयाच्या बाबतीत काहीच म्हणजे काहीच वेगळ करायचच नसत. एकच एक लांब चेहरा करून वावरायचं असत. अख्या मालिकेत. तुसड्या माणसाचा अभिनय म्हणजे आणखीन काय करू शकणार म्हणा तो Happy

सस्मित होना ग. मंजिरी रडू बाई आणि याचा सतत " काय कटकट आहे ? " असा चेहरा . अख्या जगाचा त्रास होतोय त्याला. कधी कधी म्हणून चेहऱ्यावर हसू नाही Happy

एयं, कोण त्या सत्या, मंजी आणी प्रियाला सारखे सारखे नावे ठेवतयं?आँ! माझी गुणाची बाळं ती. कित्ती कित्ती जिवंत अभिनय करतात नाटकीपणाचा, जणू सगळे काही खरेच घडतेय.:डोमा:

तो अनघा राजेचा नवरा धूमकेतू सारखा कधी पण उगवतो आणी मावळतो. दादाला काय जास्ती काम दिसत नाहीये. तरी त्याची भूमिका तो दादाच वाटावा इतकी चोख करतो. हा चिमा कधी सुधरायचा देव जाणे.:अओ:

अनघा राजे उर्फ अनुराधा खोपकर बहुतेक फिल्टर कॉफीच करत असावी असा मला दाट संशय आहे, कारण त्यात मालमसाला घालता येतो, म्हणजे जायफळ, वेलदोडे वगैरे वगैरे. नेसकॅफेत कसे टाकणार्?:फिदी:

आणी प्रियाचे लग्न सत्याशी अज्ज्याब्बात नक्को, त्या अमोल कोल्हेशीच लावा. सुहासचे काय करायचे? नकली हासुन ( सारखे स्मित करुन )बहुतेक त्याचे तोंड दुखायला लागले असेल्.:खोखो:

<<आणी प्रियाचे लग्न सत्याशी अज्ज्याब्बात नक्को, त्या अमोल कोल्हेशीच लावा.>> भारी आयडियाची कल्पना आहे Lol

प्रियाचे लग्न अमोल कोल्हेशी, सत्याचे अनघा शी , मंजिरी चे सुहासशी, होळकर च्या बायकोचे मंजिरीच्या जिजुशी असा नुसता राडा करून टाका म्हणाव. सगळी गुंतागुंत करून टाकली पाहिजे . धमाल येईल. मालिका वाढवायला फुल स्कोप Lol

मंजिरी चे सुहासशी>>> सुजा ते शक्य नाही.... तो तिचा भाउ आहे. त्यापेक्षा मंजिरीच तिच्या जिजुशी आणि मिसेस होळकरांच सुहासशी लग्न लावा म्हणजे आधी हे दोघे वाकड तोंड करुन शिरेल सोडुन जातील

काल दादा होळकर प्रियाला भेटायला तिच्या घरी येतो, हे घडवून आणण्यासाठीच सुहासला दिल्लीला जाण्याच्या नावाखाली कटवले असेल.

मुग्धा, त्यापेक्षा मंजिरीचं लग्न होळकरशी लावलं तर तिला रडायला व बावळटपणे रहायला खूपच स्कोप मिळेल, ज्यात ती एक्सपर्टहि आहे.

मुग्धा, त्यापेक्षा मंजिरीचं लग्न होळकरशी लावलं तर तिला रडायला व बावळटपणे रहायला खूपच स्कोप मिळेल, ज्यात ती एक्सपर्टहि आहे.>>>>> आई आई ग..... काहीही काय? मी इथे मालिकेतली पात्र कमी करते आहे आणि तु अजुन पाणी घालायला काय स्कोप देते?

ए काय चाल्लयं तुमचे?:फिदी: जर दादाचे लग्न मंजिरीबरोबर लावले ना तर तो जास्त वेडा होऊन तांबडे बाबांवर नवीन भजनं रचेल. मंजिरीला पण ग्यानबा तुकाराम करावे लागेल. मग मंजिरी अहो पण अहो पण करत नाचेल्.:खोखो:

सत्याचे लग्न प्रियाशी लागले तर ती लांब हाताचे चांगले चुंगले ब्लाऊज घालेल, जरीच्या साड्या नेसेल आणी सप्लीमेंट लाऊन वेणीचा शेपटा सोडुन त्यावर गजरा लावेल.

सुहासचे काय? मंजुषा वैनींचे विहंग भावोजींबरोबर जमलेच आहे, मग बार उडवुन द्या.:डोमा:

नवीन अपडेट
भाग अ भाग ब
१)आत्या - प्रिया
२)आजि - शालिनि
३)सत्यजीत - विहंग
४)मंजिरि - पूर्णा माउशि
५)मंजिरि चे बाबा - स्वप्निल

वरच्या प्रमाणे 'जोड्या जुळवा' हा खेळ चालु आहे....बघाव तेव्हा वरील जोड्या एकमेकांशि 'च' बोलत असतात फक्त
अणि हो 'सुहास' हा लिम्बु - टिंबु.म्हणजे परिक्षार्थि चा थोडा गोन्धळ व्हावा म्हणुन हे नाव 'भाग अ' मध्ये एक्स्ट्रा ठेवले आहे....म्हणजे 'आत्या - प्रिया' कि 'सुहास - प्रिया'.पण उत्तर मला माहित आहे' 'गप्पा' असा शब्द असल्या मुळे 'आत्या' हे उत्तर बरोबर आहे..... Proud

आणि हो....

१.आपल मत माण्डण्या साठि 'म्हण' किव्वा 'उपमा' ह्यान्चा वापर
२.भावना व्यक्त करण्यासाठि हिन्दि गाणि...त्यामुळे चिमा च बरच काम वाचत असणार आहे अणि त्या हि पेक्शा पलिकडे म्हण्जे - तेच ते डायलॉग्स असल्यामुले,टीम ला हि काहि गरज नसणार आहे विशेष प्रॅक्टिस चि...

Pages