तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय चाल्लय काय? चिमा डोक्यावर पडलाय पटकथा लिहीताना. चक्क आईला गच्चीतुन ढकलुनदिले??:अओ: मन्जिरीबाई मध्येच अन्गात आल्यागत सासुशी ताज्या दमाने तावातावाने भान्डत असतात.

त्या दादाला पण काय उद्योग नाय. सत्या जिवन्त हाय ह्ये आधी प्रियाला कळवले म्हणे. ती मन्जिरीच्या आधी सत्याकडे पोचली, तिला तित बघुन मन्जिरीचा पारा सातव्या आकाशात गेला. मग ती सासुला बोल बोल बोलली. काय हा लेट करन्टपणा! बिचारी मधुरा आधी घसा खरवडुन सान्गत होती तेव्हा विश्वास ठेवला नाही, कुणाला विश्वासात घेतले नाही, मग आता काय अवसान चढलय?

काही वेळेस ती बोलत असते तेव्हा मला तिचे डोळे नागपूर-कोल्हापूर वाटतात.:अओ: म्हणजे दामुअण्णा मालवणकर टाईप.:फिदी: हाईट म्हणजे केस खान्द्यापर्यन्त कापलेत आणी फुगान्च्या बाह्याचे ब्लाऊज घालते. काय फॅशन आहे रे देवा! जरा प्रियाकडे बघ म्हणाव.:खोखो:

रश्मी....;)
लमाणी बायकांसारखी असतात मंजिरीची पोलकी....मागून पाठ अर्ध्याहून जास्त उघडी....आव मात्र सोज्वळ सीतेचा..

फॅशनवरून आठवलं....थोडं विषयांतर होतय पण बरेच दिवस मनात होतं.... पुण्यात शेजारी एक मारवाडी कुटुंबाचा मोठ्ठा बंगला आहे. हिंदी सीरियलीसारखाच....जोडीला आजी आजोबा, ४ सुना, त्यांचे नवरे आणि १० नातवंड वगैरे. घरात पारंपारिक वातावरण, मग सुनांकडून सदैव डोक्यावर पदर अपेक्षित. त्या कधी बाहेर निघाल्या की त्यांची गंमत वाटते. पूर्ण झिरझिरीत, 'पारदर्शक' म्हंजे लईच सी थ्रू साडी, लेटेष्ट फ्याशनचं (हेच लमाणी टाईप/ बाह्यांच्याएइवजी नुसतेच बंद/तूतिमी तल्या प्रियाच्या स्टाईलचं,ई) आपला 'आँ' करवणारं पोलकं, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, डोक्यावर पदर.
आता कपडे काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर ही टीका वगैरे नाही. फक्त एक ऑब्झर्वेशन. अर्थातच इथल्या चर्चाविषयापासून भरकटलेलंही आहे.

सत्याने एकदम बरोबर निर्णय घेतलाय....प्रेक्षकांनी तरी किती सोसायचं! घ्या एकदाचा काडीमोड अन करा मोकळं!

काल सत्या त्या वकिल बाइ कडे ज्या आश्चर्या ने बघत होता ते बघुन मला वटल.।
'त्याचा डोक्यत खड्कन ट्युब पेटलि अणि आठवल,अरे मझ तर् हिचा सोबत हि लफ़ड होतं!!!!!मग ति वकिलिन बाइ म्हणेल,ति मि नव्हे मझि जुळि बहिण होति अणी आता मझा नंबर

आला आला आला एकदाचा तो सुदिन. आज सत्यासमोर प्रियाबेबचे भान्डे खळळ खट्याक करुन फुटणार. विहन्ग, सत्या आणी नेत्राचा हा प्लॅन आहे. काल इवलुशी झलक दिसली. प्रिया बेबचा चेहेरा नन्तर खूपच बोलका वाटला. सिरीयल कुठे घरन्गळत चाललीय सत्या जाणे.

त्याची कितीही लफडे झाली तरी तो फक्त मंजीवरच खर्र्र्र्र्र्र प्रेम करतो...>>> Lol

कालच्या भागात पाहिल की सत्याची आई हास्पीटलातुन परत येतेय.... मनात विचार आला "कसली टणक आहे राव"

रश्मी, फक्त प्रोमो पाहून खूष होऊ नकोस. प्रत्यक्ष एपिसोड मधे त्या सीन नंतर प्रियाची नौटंकी असू शकते की विहंगने मला जबरदस्तीने हे बोलायला लावलं वगैरे. Wink

रमड....करेक्ट....किंवा विहंग/ डुचकीबाईचे दिवास्वप्न....ही सीरियल 'गॉन केस' असल्यामुळे काहीही शक्य आहे....

नाही नाही. हे स्वप्न नव्हत.:फिदी: काल चक्क विहन्गसमोर प्रियाबाई खरे काय ते बरळल्या. सत्या आणी नेत्राने ते आतल्या खोलीतुन ऐकले. ते बाहेर आल्यावर तिचा चेहेरा पहाण्यालायक होता. सत्याने तिचा गळा दाबला आणी बरेच सुनवले.

लाईव्ह अपडेट्सः- प्रियाबाय आणी सुहासचे जोरदार भान्डण झाले. प्रिया सुहासला दळभद्री वगैरे म्हणाली. आजपासुन कोर्ट सीन सुरु.

पण काय उपयोग? वर तो मुधोळकर म्हणतो की माझ्या आईला मंजिरीने असं वागवलं त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार....चोराच्या उलट्या बोंबा.... मंजिरीच्या आईने ह्या सत्यानेच दिलेल्या धक्क्यामुळे ईहलोकीची यात्रा संपविली होती ना? तरी पण मुधोळकराचं आपलं गिरा तो भी टांग उप्पर.... भुक्कड कुठला.... ती मेंगळट मंजिरी पुन्हा विरघळताना दिसतेय....
विहंग आणि नेत्रा बालवाडीतले बाल डिटेक्टिव्ह आहेत बहुतेक ( एनिड ब्लिटनचे 'Five Find Outers And The Dog' सुद्धा जास्त चाणाक्ष म्हणायचे यांच्यापेक्षा) प्रियाबाईच्या कन्फेशनची सीडी करून तिच्या कॉपीज मुधोळकरांकडे, मंजिरी व तिच्या वडिलांकडे, सुहासकडे वगैरे पाठवायच्या ते दिले सोडून....आता विहंग नेत्रापैकी एक कुणीतरी लवकरच 'हे राम' म्हणणार, प्रिया, होळकर आणि मंडळींच्या कृपेने..:(

काल येकदाचा कोर्ट सीन झाला. जोग बाई ( महाबळ वकिल पिता पुत्री) नी बापसे बेटी सवाई म्हणत सरनाईकाना पार आडवे केले. मला कोर्ट सीन आवडतात. कालचा भाग रन्गला होता ( सिरीयल डफ्फर असली तरी ).

आता शुक्कीरवारी सरनाईकसाहेब दादाकडे जाणार आहेत म्हणे त्याची मदत मागायला. तिथ त्याना प्रियाबेब भेटेल, ती म्हणे सत्यजीतच्या विरुद्ध साक्ष देणार आहे.

मंजिरी इतकी मुर्ख बाई मी कुठेच बघितली नै... जिथे खरंच बोलायला हवं होतं तेव्हा मुग गिळून बसत होती.. अन वडलांसमोर जीभ फूट्भर लांब होते तिची...जेव्हा सत्यजित तिचे हालहाल करत होता तेव्हा तिच्या तोंडातुन एक शब्द निघत नव्हता.. अन इथे बाबांना झापत बसते सारखी...

शालिनी ला मंजिरी उलट सुलट बोलली तर सत्याने एक क्षण लावला नाही तिला आयुष्यातुन दुर करायचा निर्णय घ्यायला, मंजिरिबै च्या आई ने या सत्या च्या फटकळपणा मुळे इहलोकीची यात्रा संपवली तरी ही त्याच्याच मागे गोंडा घोळत...
इतक्या अन्याय सहन कशासाठी करायचा.. डोक्यात जातं सगळं!, Angry Angry

सफरचंदा.....१००१ मोदक....सत्यजिताला चाबकाने फोडला पाहिजे मंजिरीने....

.सत्यजिताला चाबकाने फोडला पाहिजे मंजिरीने....>>> याच्यावरुन आठवल, तो चिमाने स्वतःला चाबकाने फोडण्याचा सीन झालाच नाही, आम्ही इथे कित्ती आणि काय काय विचार करुन ठेवला होता, मंजिरीच्या प्रतिक्रीयेचा Wink

नको नको नको. काय फरक पडणार आहे त्याने? ती तुम्हा सगळ्याना चान्गली रागवेल. सत्याखातर ते ही सहन करेल. मग सत्या तुम्हा सर्वान्च्या मागे लागेल.:फिदी:

त्या पेक्षा सत्या उर्फ चिमाला मेल करुन ही लिन्क पाठवा. वाचुन त्याला फेफर येईल. मग तो मालीका पूर्ण उलटी फिरवेल, परत पहिल्यापासुन. फक्त नाव बदलेल, मी तिथे तुम्ही का?Biggrin

जोग बाई चान्गले काम करतात. पण त्या शुभ्राला सा,न्भाळणार्‍या बाई कोर्टात फाड फाड कोकाटे विन्ग्लिश बोलल्या ते कसे याचा थान्ग मला लागला नाही, तुम्हाला कोणाला कळ्ळे का?:अओ:

आता प्रिया बेब काय दिवे उजळवते देव जाणे. बहुतेक कोर्टात येऊन, सत्या माझ्या होणार्‍या बाळाचा बाप आहे असे शिक्रेट सान्गणार असेल.

त्या पेक्षा सत्या उर्फ चिमाला मेल करुन ही लिन्क पाठवा. वाचुन त्याला फेफर येईल. मग तो मालीका पूर्ण उलटी फिरवेल, परत पहिल्यापासुन. फक्त नाव बदलेल, मी तिथे तुम्ही का?खो खो >>>> Proud

Pages