तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का ग पियु? अग हे केलान, दिलान, घेत्लान वगैरे चिपळुणातच जास्त बोलल जात म्हणुन विचारल मी.....

>> अगं हो माहितीये.. मला पण कोणी केलंन, दिलंन म्हटलं कि गंमत वाटते.. तशी तुलापण वाटली आणि म्हणुन हसले.. Happy

मला होळकर किंवा मंजुषा वहिनी तांबडे बाबांच्या भजनावर नाचताना पाहायचे आहे.
प्लीज कोणी (दोघांच्याही) लिंक देईल का?

तुम्ही चिपळुणच्या का हो????>>>नाही मुग्धा, मी पुण्याची आहे...पण माझी मैत्रिण चिपळूणची होती.

रमा. तुला असे वाटते आहे का कि इथे भजन गायल्याने मला अचानक होळकर किंवा मंजुषा वहिनी इथे दिसु लागतील?

मला व्हिडिओची लींक हवीये.

सुखाचे क्शण - ही बाब एका बाप लेकिने खुल्लं खुल्ला चर्चा करत बसावि अशि नहिये. काय निर्लज्ज डायलॉग्झ दिले आहेत आणि ति मंजिरि निर्लज्ज पणे त्या आठवणि जवळ जवळ सगळ्यां समोर उगाळुन झालं आहे.

हो मी पण आज सकाळी जाहिरातीत पाहिल. पण शो नाही बघता येणार Sad
इथे लिंक टाका हां नंतर कोणीतरी प्लीईईईईईज किंवा मला हा सोहळा नंतर कुठे बघता येईल ते पण सांगा.

गोपिका....अनुमोदन.. यडपटचंद्रिका मंजिरीचा तो सुखाचे क्षण वाला डायलॉग डोक्यातच गेला. एका जुन्या एपिसोडमध्ये पाहिल्याचं आठवतंय, सत्याने घराबाहेर काढल्यावर ही बया दिवसभर तुळशीवृंदावनापाशी उभी होती.
असो.साक्षात सीतामाईनंही ह्या मंजिरीला मूर्ख आहेस म्हणून फैलावर घेतलं असतं की बये, माझ्या नवर्यानं माझ्यावर अन्याय केला पण तो त्याचा स्वतःचा स्वभाव एवढा संशयी आणि दुराग्रही होता म्हणून नव्हे तर राज्यकर्त्याचे (त्याच्या दृष्टीने असलेले) कर्तव्य म्हणून. सोड त्याला.

अबोली Lol
इथे राजकारणी आणि आम जनता स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती, महिला सक्षमीकरणाच्या नावाने गळे काढतेय आणि ही धन्य बाई ४ सुखाच्या क्षणांचे राग आळवत बसलीय...... काही स्वाभिमान, आत्मसन्मान वगैरे शब्द माहित आहेत की नाहीत??? Angry

>> यडपटचंद्रिका मंजिरीचा तो सुखाचे क्षण वाला डायलॉग डोक्यातच गेला>> तिचे बहुतेक डायलॉग रडके आणि डोक्यात जाणारे असतात.
मंजिरी मोड ऑन--"कसं ए ना, अबोली, मालिका कितीही बकवास असली तरी पोटधरून हसण्याचे क्षण ह्याच मालिकेच्या ह्या धग्यामुळे मिळाले आहेत हे नाही विसरू शकत मी!" मंजिरी मोड ऑफ

काल तो सत्याचा मित्र होळकरच्या बायकोला म्हणत होता 'कसं आहे ना....' Angry ह्या रोगावरची लस शोधून चिमांला टोचली पाहिजे.

आता तर मला वाटत काही दिवसांनी तुतिमी मध्ये डायलॉग्जच्या जागी फक्त कस आहे ना इतकच ऐकायला येईल.. कारण तसही कुठल्याही मालिकेत कुणालाही पूर्ण आणि स्पष्ट बोलायची/ऐकायची अ‍ॅलर्जीच आहे, त्यामुळे नुसत कस आहे ना म्हटल की काम झाल..(प्रेक्षक आहेतच आपली डोकी खाजवायला तयार) डायलॉग लिहीणार्‍याला पण जास्त कष्ट नकोत(तसेही कुठे घेतो तो कष्ट?)

साक्षात सीतामाईनंही ह्या मंजिरीला मूर्ख आहेस म्हणून फैलावर घेतलं असतं की बये, माझ्या नवर्यानं माझ्यावर अन्याय केला पण तो त्याचा स्वतःचा स्वभाव एवढा संशयी आणि दुराग्रही होता म्हणून नव्हे तर राज्यकर्त्याचे (त्याच्या दृष्टीने असलेले) कर्तव्य म्हणून. सोड त्याला. >> अबोलि आगदि खरं

एखादि अडाणि बाइ सुद्धा कधिचि नवर्‍याचा कानाखलि आवाज काढुन झालं असत....
आणि ह्या मडम तर पुण्यातल्या,शिकल्या सवरलेल्या.....वास्तवात्,एवढा अन्याय कुणि हि सहन नाहि करत

सत्यजीत ला न जमणारी गावरान मराठि भाषा जो तो त्याचा आजि शि बोलतो...बाप रे अस वाटत काहि आहे का??

खुप वाइट अणि चुकिचा संदेश ह्या मलिकेने दिला आहे....

अरे पब्लीक, यात अजून एक अशीच फ्रेज आहे. ती ऐकलीत का? आणि असंही... ही ती फ्रेज >>> हो, हो! अगदी! हे बहुतेक कसं ए नाच धाकटं भावडं.

आजच्या एपिसोड मध्ये आत्या दोनदा म्हणाली नेत्राला "कसंय ना डुचके"...

अरे त्या चिमाला लिंक पाठवा ह्याची. कसं आहे ना की आपल्या कॉमेंट्स वाचुन तो आयुष्यात असली आयटेम सिरीयल पुन्हा कधी बनवणार नाही.:फिदी:

काल मंजिरीबाईनी ड्वायलॉग मारला की वठलेल्या झाडाला पालवी फुटायला पण वर्ष जावं लागतं पण ज्या झाडावर वीज पडते त्यावर कधीच पालवी येत नाही. म्हटलं बाई ग तुझ्या डोक्यावर पडायच्या आधी वीज पण दहा वेळा विचार करेल की इतक्या रिकाम्या डब्यावर पडून काही उपयोग आहे का....

काल मंजिरीबाईनी ड्वायलॉग मारला की वठलेल्या झाडाला पालवी फुटायला पण वर्ष जावं लागतं पण ज्या झाडावर वीज पडते त्यावर कधीच पालवी येत नाही. म्हटलं बाई ग तुझ्या डोक्यावर पडायच्या आधी वीज पण दहा वेळा विचार करेल की इतक्या रिकाम्या डब्यावर पडून काही उपयोग आहे का.... Lol Biggrin

"दादा होळकरचे सर्व खलनायिकांना प्रत्युत्तर" अशी काहीतरी पाटी वाचली आज..आणि तो दादा नाचताना दिसला प्रिया अँड कंपूबरोबर....ईईईईईईईई.... दादा होळकराचे खलनायकत्व साजरे करणार का आता? ज्याप्रकारे त्यानं बायकांना ' ट्रीट' केलं आहे आतापर्यंत ते त्याचे वर्तन सेलेब्रेट केल्यासारखे नाही का होत? एवढं खालच्या स्तरावरचं मनोरंजन म्हणून कसं सहन केलं जाऊ शकतं? मीडियापैकी कुणाला खटकत नाही का हे? कुणीच कसा आक्षेप घेत नाही यावर....कठीण आहे....:(

अबोली, मीडीयाला ही मालिकाच खटकायला हवी होती मुळात. स्त्रीचं जे रूप यात दाखवलं आहे तेच असह्य आणि अशक्य आहे. सत्यजितने बायकोला जसं वागवलं आहे ते दाखवून नक्की काय संदेश देत आहे ही मालिका?

Pages