तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते शम्मीचे गाणे का, बगावतमधले? मेरे मेहेबुब तुझे सलाम, सलाम , सलाम, सलाम.:फिदी:

बाई प्रेग्नंट आहेत ना>>>>>खरच की काय अंजली??? हे कधी समजल? मी एकदा बघितल तेव्हा चक्कर आल्यावर मॅडम विचार करत होत्या की मला काही आजार वगैरे तर नाही ना... मी केलेल्या पापांची शिक्षा म्हणुन... तेव्हा वाटल की नक्कीच हिला ब्रेन ट्युमर वगैरे डिटेक्ट होणार.

kal satyacha apghat jhala manjiri punha satya kade janar ata. gharat solid rada rad chalu aahe.

gharat solid rada rad chalu aahe.>>> कुणाच्या पलक? मुधोळकरांच्या, सरनाईकांच्या की तुमच्या?

कालचा भाग कोणी पाहिला की नाही? काल चक्कचक्क मंजिरीने प्रियाला सुनावले/ खडसावले आणि घराबाहेर हाकलले. त्या सत्यशिलाबाईंच्या (सत्याची आज्जी) मनाला गुदगुल्या झालेल्या/ होतांना स्पष्ट दिसल्या. सत्याची आई शालिनीबाई मंजिरीच्या बाजुने उभी राहिली आणि सत्याची आत्या शुन्यात. आज पुढील भागात मध्ये कोणीतरी (बहुतेक पोलिस किंवा डॉक्टर) म्हणाले कि सत्यजीत जिवंत आहे.

त्याआधी भावनेच्या/रागाच्या भरात प्रियाने त्या घरातुन (सत्यजीतच्या) त्या माकडाला (तिच्या नवर्‍याला) हाकलले होते. त्यामुळे आता ती कुठे जाणार काय माहित. आजचा भाग नीट पाहिला नाही त्यामुळे प्रिया परत त्या माकडाकडे गेली असल्यास माहित नाही.

मी मी पाह्यला ना.:फिदी: जाम मज्जा आली. प्रियाबायच्या अ‍ॅक्टिन्गला दाद द्यावी लागेल. अस्सल!

ह आता प्रियाने कुठल्या भरवशावर नवर्‍याचा अपमान करुन हाकलले प्रिया जाणे. आता कुठल्या तोन्डाने त्याच्याकडे जाणार? घरकी न घाटकी!

जाई, अबोली त्याने तो डाव खेळला आहे मंजिरीच्या जवळ जाण्यासाठी, म्हणजे आता यांच्या संसाराची नवी सुरुवात खोटेपणाच्याच पायावर..... विशेष म्हणजे सत्याच्या आईला पण हे माहित आहे...... आता आपल्याला मिळवण्यासाठी सत्याने केलेला खोटेपणा जेव्हा मंजिरीला कळेल तेव्हा काय होईल? का परत तिच्या माहेरी जाण्याच आणि परत येण्याच दळण दळणार? त्यात शिवाजी महाराज (अमोल कोल्हे) आलेच आहेत मधे. बास करा यार काय त्याच त्याच चुका, तिच तिच स्पष्टीकरण Angry

कल्याणमस्तु....जाऊदेहो..मनावर नका घेऊ....सरतेशेवटी मंजिरी मूर्खशिरोमणी असल्याने ती स्वतःच्या हिटलर नवर्याकडे परत जाईल. तेही बरंच आहे म्हणा, अमोल कोल्हेंचं सुदैव म्हणायचं....ह्या असल्या पात्रापेक्षा ती मंजुषासुद्धा बरी हो....पण मंजुषा एवढी बावळट नाही, त्यामुळे तिने आधीच सूत जुळवून ठेवले आहे....

aaj kalel manjirila satya jivant aahe te. mag Ramesh Bhatkar punha TANDAV karel

आता पुढे काय? राग>>>> पुढे काय, आल मंजिरीच गाठोड परत माहेरी... पुढील भागात (आजच्या भागात) दाखवल आहे की मंजिरी शालिनीला(स्वतःच्या सासुला) झालेल्या त्रासाबद्दल सत्यजितला क्षमा करणार नसल्याच सांगते तेव्हा शालिनीबाई आपण या सर्व कटात सामिल असल्याची कबुली देणार आहेत... आता तर काय होईल काहीच सांगता येत नाही पांचट झालीय आता मालिका.

का? का? का? पाणचट नाही म्हणायची काही. उलट म्हणायचे की मालीका रन्गत चाल्लीय. मग आपण सगळे मिळुन सत्या आणी मन्जिरीला आदर्श नायक नायिका ( झी अ‍ॅवॉर्डस२०१३ व २०१४ साठी) म्हणून निवडु.:फिदी:

मग चिमा नवीन शिरीयल बनवेल, पर्यायः- तुम्ही तिथेच मी/ तुमच्या पाठीशी मी/ तुमच्या साठीच मी/ तुमच्या साठी कायपण करणार मी.:खोखो:

Pages