Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या आजिबाइंना इंग्रजि येत
त्या आजिबाइंना इंग्रजि येत ह्याचि प्रचिती करुन देण्याचि हुक्कि अधुन मधुन चिमा ला येते....माग हि त्या एकदा इंग्रजि बोलल्या होत्या....बाकि काम चां गल असत त्या आजिंच
क्षिति जोग (अॅड. किरण) हिचि एंट्रि सुद्धा खुप टिपिकल होति.
बाकि दादा होळकर आपल काम मस्त बजावतो....
दादा - फळ जास्त पिकल तरि ते नासत.मोतिवाल्या बाइंच हि तसच झाल आहे
संखे - मग हाकलुन लाऊ क त्याना....
दादा - नाहि नाहि संखे, आपण तरि हि त्यांचा उपयोग करुन घेऊ...'टाकाऊ तून टिकाउ'
हे ऐकुन मि खुप खुप हसले होते.....
अणि आता भरिला म्हणुन विहंग आत्ता त्या अनघा वर जीव ओवाळत सुटला आहे अस दिसत....
मंजिरि आपलि,नेहमिच...
१.बाबा प्लीझ
२.सत्यजीत प्लीझ
३.नेत्रा प्लीझ
४. उरले सुरले सगळे.... प्लीझ्झ्झ्झ्झ्झ्झ....
५.थोड्या दिवसानि....शुभ्रा प्लीझ....
५.थोड्या दिवसानि....शुभ्रा
५.थोड्या दिवसानि....शुभ्रा प्लीझ....>>>>> धिस इज हाईट
दादा - नाहि नाहि संखे, आपण
दादा - नाहि नाहि संखे, आपण तरि हि त्यांचा उपयोग करुन घेऊ...'टाकाऊ तून टिकाउ'>>>
मंजिरि आपलि,नेहमिच... १.बाबा
मंजिरि आपलि,नेहमिच...
१.बाबा प्लीझ
२.सत्यजीत प्लीझ
३.नेत्रा प्लीझ
४. उरले सुरले सगळे....
प्लीझ्झ्झ्झ्झ्झ्झ....
५.थोड्या दिवसानि....शुभ्रा प्लीझ
भारीच
शुभ्रा प्लीझ... मी तिथे
शुभ्रा प्लीझ...

मी तिथे तुम्ही का?...
मुळात कस्टडीबद्दल केस
मुळात कस्टडीबद्दल केस होण्यासाठी शुभ्रा अतिशय लहान नाहीयेका?
मला वाटलं सदोदित ' गोपियोंमें किशन कन्हैय्या' असणार्या सत्यजिताला मंजिरी सोडून गेल्यावर सबस्टिट्युट म्हणून वकिलीण बाई आणल्या की काय....
मुधोळकराचं कॅरॅक्टर अतिशय गमतीदार रचलंय.... हा बायकोवर वाटेलतसा संशय घेणार....संशय आला तर वाट्टेलतशी टोकाची भूमिका घेणार....बायकोचा इतका मानसिक छळ करणार की तिने भीतीने चळचळ कापावं.... प्रसंगी शारिरीक छळही करायला कमी करणार नाही ( मुलीच्या जन्माआधी फरफटत नेणे)....मुलगी जन्मल्यावर तर कहरच केला होता, बाळ हिसकावून घेऊन घराबाहेर हाकलून देणे, नंतर बाळाला पळवून आणणे, इ. मग ह्याच्यात आणि त्या अनघा राजेच्या नवर्यात फरक काय राहिला? ती अनघा बया याची 'मैत्रिण' म्हणे....मंजिरीच काय ह्याच्या आईनंही संशय घेतला की ह्याच्यावर....पण नाही हा मात्र तोंड वर करून प्रिया, अनघा गोप्यांबरोबर रासक्रीडा करतच होता....त्यात भर त्या वकिलीण बाईंची...
आता परत ती मूर्खशिरोमणी यडपटचंद्रिका मंजिरी पडतं घेताना दिसतेय मुधोळकरापुढे.... वडिलांनी खरंतर सण्णकन दोन ठेवून द्याव्या हिच्या कानाखाली मायबोलीकरांतर्फे....
आता परत ती मूर्खशिरोमणी
आता परत ती मूर्खशिरोमणी यडपटचंद्रिका मंजिरी पडतं घेताना दिसतेय मुधोळकरापुढे.... वडिलांनी खरंतर सण्णकन दोन ठेवून द्याव्या हिच्या कानाखाली मायबोलीकरांतर्फे....>>>> +++++१
रच्याकने....तूतिमीच्या
रच्याकने....तूतिमीच्या फेसबुकावरच्या प्रोफाइलला आम्ही ४-५ मैत्रिणी ह्या धाग्याची लिन्क मेसेज करत असतो मधून मधून....आता परत करायला हवं....
अणि आता भरिला म्हणुन विहंग
अणि आता भरिला म्हणुन विहंग आत्ता त्या अनघा वर जीव ओवाळत सुटला आहे अस दिसत....
>>>>>>> विहंग आणि मंजुषा ना?
विहंग पण अनघाच्या मागे?
बर का....काल मंजिरी ने एक
बर का....काल मंजिरी ने एक आगदि धमाकेबाज डायलॉग फेकला.....तेवढ एकच त्या येडपट मुखातुन येण राहिल होत...
झाल अस कि दादा चि साक्ष होति व अपेक्शे प्रमाणे मंजुशा अणि चिमा चे हि संबंध असल्याचे कोर्ट मध्ये सांगतो...
नंतर हि घटना मंजिरी आपल्या काका ला सांगताना म्हनते..
'इतर बायकांशि त्यान्चे कसे हि संबंध असले ना तरि मला माहिति आहे कि मंजुषा ताइना ते बहिण मानतात
(आगदि ते माझाशि कसे हि वागलेअसतिल मधले कसेहि बरका.....ही बाब महत्वाचि आहे)
रच्याकने....तूतिमीच्या
रच्याकने....तूतिमीच्या फेसबुकावरच्या प्रोफाइलला आम्ही ४-५ मैत्रिणी ह्या धाग्याची लिन्क मेसेज करत असतो मधून मधून....आता परत करायला हवं....>>>>>>>>>> बापरे.....अरे त्या चिमा ने हे सगळ वाचलं न, तर...!!!
लोक्स, जरा जपून ह...मंजिरीला आपल्या अंगावर सोडून-बिडून दिईल.....!
@मधुरा....अहो त्यानी
@मधुरा....अहो त्यानी वाचण्यासाठीच तर सारा घाट घातलेला....आणि त्या मेंगळट्ट बावळट्ट मंजिरीला शेंबडं पोरही घाबरणार नाही....तसंही मंजिरीचं काम करणार्या बाईंचा दोष नाही..दोष सर्वस्वी लेखक मंडळींचा आहे....हां, मंजिरीची देहबोली मात्र तिच्या पात्रातला सगळा मूर्खपणा आणि मट्ठपणा ठळकपणे दिसेल असा अधोरेखित करते.
रच्याकने चा काय अर्थ आहे.....
रच्याकने चा काय अर्थ आहे..... म्ह्णजे,तोपसु,थोपु,प्रचि वगरे कळले पण हे मला अजुन नाहि कळले
रच्याकने= रस्त्याच्या कडेने=
रच्याकने= रस्त्याच्या कडेने= बाय द वे
रच्याकने= रस्त्याच्या कडेने=
रच्याकने= रस्त्याच्या कडेने= बाय द वे >>>> अछा...आत्ता समजले हो...भारि आहे कि

विहंग आणि मंजुषा ना? विहंग पण
विहंग आणि मंजुषा ना?
विहंग पण अनघाच्या मागे? >>>>>ति मंजुषा विहंग चा मागे....तो नाहि काहि
कसय ना
इथे सगलेच जण एकमेकांच्या मागे लागले आहेत, तु तिथे मि, तु तिथे मि खेळतायेत....
अहो, ती मंजिरी सतत दोन्ही
अहो, ती मंजिरी सतत दोन्ही बाजूंनी बडबड करत असते.....नको एव्हड बोलते ती....अशी व्यक्ती समोर असेल तर माणसाला काहीच सुचत नाही दुसर!!!! मी असा विचार जरी केला कि अशी माझी एखादी मैत्रीण आहे, तरी घाम फुटतो मला!!!
तोपसु,थोपु,प्रचि >>>>> आता हे
तोपसु,थोपु,प्रचि >>>>> आता हे काय नविन???
थो पु = थोबाड पुस्तक = फेबु =
थो पु = थोबाड पुस्तक = फेबु = फेसबुक
आता हा चिमा त्या नेत्रा ला
आता हा चिमा त्या नेत्रा ला मारायचा फालतुपणा करतोय की काय?.
का ग? काय दाखवले तसे? कारण
का ग? काय दाखवले तसे? कारण काल नेत्राच्या डोहाळेजेवणाची तयारी करण्याचे घाटत होते. आजच्या भागात तो प्रियाला म्हणताना दाखवलाय की तू माझ्या बाजूने साक्ष दे, मी तुझ्या मनासारखे करीन. प्रियाबेब जाम खूश दाखवलीय मग.
तू माझ्या बाजूने म्म >इथे म्म
तू माझ्या बाजूने म्म >इथे म्म म्हणजे काय?? मधेच मुका घेतलान की काय??
अगं सस्मित..
अगं सस्मित..
अरे देवा! हे माझ्या
अरे देवा!:हहगलो: हे माझ्या पोस्टमध्ये चुकुन टाईपले गेले काय?:हाहा: मी सस्मितचा प्रतीसाद वाचुन बाकी पोस्टमध्येच शोधत बसले. हाताला कळसा अन गावाला वळसा असे झाले माझे.:फिदी:
नाही सत्याने काय नाय केले. करुन सवरुन नामानिराळा झालाय तो.:फिदी:
अगं प्रिया ने दादा होळकर ला
अगं प्रिया ने दादा होळकर ला नाही सांगितलं का की ती कोर्टात साक्ष देईल पण त्याबदल्यात तिला नेत्राचा जीव घेतलेला हवाय... आणि आता सगळे जण नेत्रा नेत्रा करु लागलेत अचानक... बहुतेक नेत्रा बाईंचा गेम होणार..!
अग माझा तो एपिसोड राहिला
अग माझा तो एपिसोड राहिला पहायचा. त्यामुळे मला कळलेच नाही की सत्या एकदम नेत्राच्या जीवावर कशाला उठला ते. आता कळले तुझ्या पोस्टमुळे.:स्मित:
नेत्रा चा गेम नाही...काही तरी
नेत्रा चा गेम नाही...काही तरी भलतेच झालेय...:ऑ
चिमा ला वेड लागलेय..
काय झाल नक्की माउ.. माझा तो
काय झाल नक्की माउ.. माझा तो भाग बघायचा रहिला..
भलतेच झाले. मला कालचा भाग
भलतेच झाले. मला कालचा भाग पाहुन स्वतच्याच झिन्झ्या उपटुन नाचावेसे वाटले. पण साबा आणी इतर मन्डळी ( नवरा वगैरे) घरात असल्याने तो कार्यक्रम करता आला नाही.:अरेरे:
लेखनाची परिसीमा हद्द पार करुन गेली. काल सन्खेचा सत्याला फोन आला की नेत्राचा जीव धोक्यात आहे. सत्या आहे तसा ( अॅप्रन काढुन ) पळाला. जाताना मन्जुषा आणी अनुराधा दोघीना सुचना दिल्या की कोणी आले तरी दार बन्द करा, उघडु नका. मी पुढचे बघीतले नाही. मग नेत्रा व गौरान्ग मन्दिर आणी दवाखान्यात जात असताना अन्घा राजेच्या नवर्याने गाडी आडवी घातली.
दादाची मानसे गौरान्गवर हल्ला करणार तेवढ्यात तो ओरडला की नेत्राला पकडा, गौरान्गने नेत्राला पळुन जायला सान्गीतले. नन्तर सत्या आल्यावर ती वाचली. पण अनघा राजेचा नवरा आणी सत्या मध्ये लै हाणामारी झाली. त्यात आधी चाकू का काय ते अनघाच्या नवर्याने सत्याला मारुन बघीतले पण तेच सत्याने हिसकावुन त्याच्या पोटात खुपसले. आता तो ढगात गेला की दवाखान्यात ते कळ्ळे नाही, पूढचे मी पाहिले नाही. पण सन्ख्येने येऊन दादाला सान्गीतले की सत्याने अनघाच्या नवर्याचा खून केला वगैरे.
मला प्रश्न पडलाय की ह्या
मला प्रश्न पडलाय की ह्या खोट्या इस्टोर्या असतात, तर मग लेखक/ पटकथालेखक मन्डळी विकृतीकडे का झुकतात? वास्तवीक जेव्हा सर्वात आधी घरात कुणी नसताना, मन्जिरी माहेरी गेलेली असताना प्रिया सत्यजीतला भरीस पाडायचा प्रयत्न करते तेव्हा तो तिचा अपमान करुन तिचा चेहेरा मेक अप किटने विद्रुप करतो. तेव्हाच ती मनात ठरवते की याचा सूड घ्यायचा. मग या मुर्खाने तिला तेव्हाच कायमचे का नाही हाकलले? आई व आत्यापासुन हे सर्व उगाच मोठेपणा दाखवुन का लपवुन ठेवले? ( अर्थात मग सिरीयल कशी बनली असती नाही का?)
इतिहास आपण बदलु शकत नाही पण अशा सिरीयल पाहुन असेच वाटते की हे लोक मनोरन्जनाच्या नावाखाली कुठल्याही थराला जाउ शकतात. काय होणार आता? मन्जिरीचा सन्सार मोडला, सत्याच्या आईला टेन्शन, प्रियाबाय बहुतेक कायमच्या दादाकडे रहाणार.
मग पुढची सिरीयल येईल आपण सारे विसरुया.. सालाबाद प्रमाणे प्रेक्षक विसरतील आणी नव्या जोमाने खोट्या गोष्टी बघतील.
Pages