Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ करुन सावरुन प्रिया मॅडम
सगळ करुन सावरुन प्रिया मॅडम पळाल्या ऑस्ट्रेलिया ला.
हे बरय आपलं.कंपनि जॉइन कररतो न करतो,लगेच ओनसाइट!!!!!!!
काहिहि दाखवायचे....म्हणे मार्केट मध्ये चर्चा!!!!कसल अणी कुठल मर्केट ह्यांचं???????
कोल्हापुर मध्ये अस पॉश रेस्ट्रॉ मी तरि नाहि पाहिलेला....खरच अस एखाध सुरु झाल अहे का
rmd....True that...अगदी खरं
rmd....True that...अगदी खरं आहे....घरात अगदी घट वगैरे बसवून पूजा करून घरच्या बायकांना मात्र भयानकरीत्या वागवताना दाखवतात.... आतापर्यंत मी ही मालिका हसण्यावारी नेत असे. हा धागा वाचून मस्त करमणूक होतेही.
पण दादा होळकराला नाचताना पाहून रक्त उसळलं. दादा काय, प्रिया काय, कोणीही खलनायक/ खलनायिका काहीही वाट्टेल ती कारस्थानं करून लोकांचे खून बीन करून नामानिराळे असतात. त्याना शिक्षा/ शासन होत असेल तर अतिशय उशीरा आणि अत्यंत सुमार. ( काहीअंशी लल्लू यादवांच्या बाबतीत झाले आहे म्हणा असे थोडेसे)
पण असल्या मालिका बंद पाडायला हव्यात आपण.
काल मंजिरीबाईनी ड्वायलॉग
काल मंजिरीबाईनी ड्वायलॉग मारला की वठलेल्या झाडाला पालवी फुटायला पण वर्ष जावं लागतं पण ज्या झाडावर वीज पडते त्यावर कधीच पालवी येत नाही. म्हटलं बाई ग तुझ्या डोक्यावर पडायच्या आधी वीज पण दहा वेळा विचार करेल की इतक्या रिकाम्या डब्यावर पडून काही उपयोग आहे का.... >>>
या बया! सत्या काल आईला
या बया! सत्या काल आईला म्हणाला की त्याच्यामुळे मंजी घर सोडुन गेली नव्हं, मंग त्योच तिला घरला आणंल. अन ती प्रियातायची आत्ये काल निरोप घेऊनशान आली की प्रिया अन सुहास परवा/ त्येरवा कदीतरी हिकडं येणार हायेत कायमचे. लै मज्जा रे भो. लय भांडाभांडी सुरु होईल अन मालिका संपल २२ व्या शतकात. ( सत्याचा त्योच डाव दिसतोय मला.:अओ:)
त्यो सुहास कुटल्या तोंडाने ह्येंच्याकडे येणार हाये? अन त्यो अनघा राजेचा एक्स नवरा काल सारखाच एक डोळा बारीक करत होता, मला वाटलं चकणा हाय बहुतेक हा.:फिदी:
बाय द वे, ई टिव्ही वरची विवाहबंधन आणी अ.सुं. बंगला पाहिली तर तुतिमी ही खूपच बरी म्हणायची वेळ आली इतक्या खालच्या पातळीवरच्या त्या मालिका आहेत.:राग:
रश्मी, असावा सुंदर.. ची
रश्मी, असावा सुंदर.. ची स्टोरी तर कलर्सवरच्या ' उतरन' मालिकेचीच आहे.
चैत्राली मी एकही हिंदी सिरीयल
चैत्राली मी एकही हिंदी सिरीयल बघत नाही ना.:अरेरे: रादर बघायलाच मिळत नाही. एका टिव्हीसाठी साबा साबु दबा धरतात, तर दुसर्यासाठी माझी मुले.
या बया! सत्या काल आईला
या बया! सत्या काल आईला म्हणाला की त्याच्यामुळे मंजी घर सोडुन गेली नव्हं, मंग त्योच तिला घरला आणंल. >>> मला एक कळत नाही या दोन सिनिअर सिटिझन्स एवढ्या काय अडुन बसल्या आहेत मंजिने परत याव म्हणुन? अरे ज्या आजीने आपला मुलगा चुकीच वागला म्हणुन त्याला हाकलुन देउन सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली ती आज नातसुनेने सगळ विसरुन परत याव अशी अपेक्षा करते आणि तशीच अपेक्षा सत्याची आईपण करते हे म्हणजे अगदी कठीण आहे.
kharach kaahi pan
kharach kaahi pan dakhavtaat... ashya serials baghun na lokanche aadarsha pan asech tayar hotat... mhanje aapli suun pan ashich "soshik" asavi... mulinni kasa "samajootdaar (domblacha) asava.. ee. ee, avastav apeksha suru hotaat aani astat tyaana khatpaanich ghatala jaate..
aani, var kunitari media la khatakat nahi ka asa lihilay... kharay.. paN aapla media itaka jababdar asta tar ajun kai hava hota.. sadhi batmya dakhavtana sensitivity nahi yana, serials madhye sensitivity dakhavteel yachi kai apeksha karayachi..???
(sorry for writing in english... maaybli var marathi typech hota nahiye.. ka mahit nahi... chorme, IE FFox sagla try karun pahila... vishayantarabaddal khamasva... paN rahavalM nahi mhanun english madhyech type kelay!)
गोगो भाषा महत्त्वाची नाही हो,
गोगो भाषा महत्त्वाची नाही हो, भावना महत्त्वाच्या आहेत. तुम्ही अगदी खर तेच लिहिल आहे. मिडीया अजिबात जबाबदारीने वागत नाही.... आणि वर हे सगळ "प्रेक्षकांना असच आवडत त्याला आम्ही काय करणार?" या वाक्याखाली दामटुन नेतात. हे कधी गेले आहेत प्रेक्षकांना विचारायला की तुम्हाला काय आवडत नी काय नाही...
. मिडीया अजिबात जबाबदारीने
. मिडीया अजिबात जबाबदारीने वागत नाही.... आणि वर हे सगळ "प्रेक्षकांना असच आवडत त्याला आम्ही काय करणार?" या वाक्याखाली दामटुन नेतात. हे कधी गेले आहेत प्रेक्षकांना विचारायला की तुम्हाला काय आवडत नी काय नाही...<<<, हे विधान कशाच्या जोरावर आहे? तू तिथे मी चा टीआरपी माहित आहे का? या मालिकेसाठी जाहिरातदार किती पैसे देतत ते माहित आहे का? मीडीयाने जाबादारीने वागायला हवे म्हणजे काय करायला हवे? प्रेक्षक असल्या मालिकाबघतात म्हणून तर चालू राहतात ना? झी टीव्हीने समाज सुधारणेचा वसा घेतलेला नाही. मनोरंजन हा धंदा आहे त्यांचा. प्रेक्षकांना जे आवडतं ते मनोरंजन अशी साधी सोपी व्याख्या आहे.
माय्बोलीवर सध्या झी टीव्हीवरील प्रत्येक मालिकेसाठी बीबी चालू आहे. विनोद म्हणून का होइना तिथे कमेंट्स पडतच असतात. तरीपण "अशा मालिका कोण बघतं" असा प्रश्न असेल तर बेसिकमधे लोचा आहे.
nandini, I agree... media ne
nandini, I agree... media ne samaj sudharnech avasach ghetla pahije asa nahi mhanaycha mala... paN jababdarine vaagaychi apeksha aahech... mhanje striyanvareel atyaachar daakhavoon, var yacha aamhi nishedh karto evdha lihila mhanje zaala ka? kaai karu naye he itka karun dakhavtaat ki tyaachaach prabhav jast padato asa vatate.
aani, aata manjiricha udaaharan ghyaa... ashya murkha aani sasari/navaryacha kitihi jaach sahan karnaryaa muli kaa dakhavaychya...? changli sushikshit susamkrut ghara/lok aani sadhya stories dakhavlya tari harkat nahi... arthat "lokana hech baghaychay" haa prativaad asanarch aahe mhana.. pan aajubajuchya sagalya ghatana baghata "samaaj sudharaychi garaj" olakhoon tyapramane vaagave evadhach... prabodhan karu nakaa hava tar, pan adhogatichya rastyanwar dive ujaloo naye evadhach maaza media la mhananna aahe...
maayboli war pratisaad denyachi evadhi savay nahiye.. so maaza mhanna kitpat mandata aalay te mahit nahi...
आधी डीफाईन करा,. मीडीया
आधी डीफाईन करा,. मीडीया म्ह्णजे कोण? न्युज मीडीयावाले? झीटीव्ही वाले? मालिकांचे निर्माते? यापैकी "मीडीया" म्हणून तुम्हाला नक्की कोण अपेक्षित आहे ते सांगा जरा मला. मग मी उत्तर देऊ शकेन.
media mhanje he saglech nahi
media mhanje he saglech nahi ka?? print media, news channels, entertainment channels he sagle media madhyech yetat na.. mag ek bhaag jababdar hava ani dusara nahi ase hote ka?
mhanje news channels aahet mhanun jabadar asnyachi apeksha yogya aani channel wale jababdari vagle nahit tari chalel asa kasa asel?
वरच्या कमेंटमधे तुम्हाल कोण
वरच्या कमेंटमधे तुम्हाल कोण अपेक्षित आहेत?
paN aapla media itaka jababdar asta tar ajun kai hava hota.. sadhi batmya dakhavtana sensitivity nahi yana, serials madhye sensitivity dakhavteel yachi kai apeksha karayachi..???
मिडीया अजिबात जबाबदारीने वागत नाही.... आणि वर हे सगळ "प्रेक्षकांना असच आवडत त्याला आम्ही काय करणार?" या वाक्याखाली दामटुन नेतात. हे कधी गेले आहेत प्रेक्षकांना विचारायला की तुम्हाला काय आवडत नी काय नाही...<<<,
या वाक्याबददल बोलत आहे मी. बातम्या दाखवणारा मीडीया आणि सीरीयल्स दाखवणारा मीडीया एकच मानायचा का? टेक्निकली, दोघेही मीडीयाच आहेत, पण त्यांच्या जॉबमधे फार फरक आहे. म्हणून मी परत विचारतेय. जबाबदारेने वागणारा म्हणजे नक्की कुठला मीडीया अपेक्षित आहे?
Nandidni, mag ek bhaag
Nandidni,
mag ek bhaag jababdar hava ani dusara nahi ase hote ka?>>>
yaa mazyaa vakyat tumchya prashnache uttar nahiye ka??
malaa mahit aahe ki tumhi yach kshetrat karyarat aahat (romat aste mi kaayam, kadhi discussions madhye vaigare bhag ghetala nahi aani tumche likhanahi vachat aste).. media hech tumche kshetra aahe, tyamule tumche inputs mahatvache aahetch...
अरे भांडु नका रे इथे....
अरे भांडु नका रे इथे....
अगं, भांडत नाहिये गं... वाटलं
अगं, भांडत नाहिये गं... वाटलं ते बोलले फक्त... भांडणाकडे जातोय विषय असं वाटत असेल तर चला, परत मंजिरीकडे वळू.. :;) :domaa:
गोगो, माझा पॉइण्ट कदाचित
गोगो, माझा पॉइण्ट कदाचित तुम्हाला समजलेला दिसत नाहीये. इथे प्रश्न माझा मीडीयाची संबंध आहे की नाही वगैरे अजिबा नाही. मुग्धा रानडे यांनी केलेलें हे विधान आहे की "मीडीयाला जबाबदारीचे भान हवे" मग मी विचारते की नक्की कुणाला जबाबदारीचे भान हवंय?
(पुढील प्रतिसाद कूणालाही वैयक्तिक रीत्या उद्देशून नाही)
जेव्हा तुम्ही एक जनरल स्वीपींग स्टेटमेंट करता के "मीडीयाला जबाबदारीचे भान हवे" त्यावेळेला तुम्ही हे चक्क विसरता की तुम्ही पण या मीडीयाचाच एक भाग आहात. मीडीया म्हणजे काही कुणी वेगळ्या ग्रहावरून आलेले प्प्राणी नसतात, तुमच्याआमच्यासारखेच समाजाचा एक भाग असतो, आपण जसे नोकरी करतो तसे तेही काम करतात पैशासाठी. कलाकार-दिग्दर्शक-निर्माते झाले म्हणून रोजीरोटी असतेच त्यांना. जाहिरातदार अशाच मालिकेला प्रायोजकत्व देतात, ज्यांना प्रेक्षक लाभतात म्हणून मालिका अशा बनतात ज्या प्रेक्षकांना बघायला आवडतात. आणि प्रेक्षकांना काय आवडतंय ते तर समोर दिसतच आहे ना? मग नक्की काय प्रॉब्लेम अहे?
रोज मालिका बघायची, अनि मग नंतर इथे येऊन "हे चुकीचं दाखवतात, त्यांना जबाबदारीचे भान हवे" हे लिहिण्ञापेक्षा बंद करा ती मालिका बघणं. चॅनलला ईमेल करा की तुम्ही अशा गोष्टी दाकह्वलेल्या मला आवडल्या नाहीत, मी यापुढे ही मालिका बघणार नाही. बघू मग मीडीयाला कसलं भान आहे की नाही ते.
"मी मालिका बघत नाही. घरचे बघतात म्हणून मला बघायला लागते" हा जर तुमचा प्रतिवाद असेल तर घरातल्या सदस्यांना कन्विन्स करा की या मालिकेमधे अमुक एक गोष्ट चुकीची दाखवतात तुम्ही पाहू नका. त्याइवजी दुसरे कार्यक्रम बघा, आणि जर घरातल्या दोन सदस्यांना हे तुम्ही पटवून देऊ शकत नसाल तर मीडीयाकडून अपेक्षा ठेवता की त्यांनी असं हजारो लोकांना पटवून द्यावं हे जरा जास्त्च डीमांडींग होत नाही का?
अगं, भांडत नाहिये गं... वाटलं
अगं, भांडत नाहिये गं... वाटलं ते बोलले फक्त... भांडणाकडे जातोय विषय असं वाटत असेल तर चला, परत मंजिरीकडे वळू.. :डोळा मारा:>>> हेच चांगल आहे.
नंदिनी तुझा प्रश्न लक्षात
नंदिनी तुझा प्रश्न लक्षात आलाय. पण दुर्दैवाने मिडीया म्हणले की लोक सरसकट ( इथे लोक म्हणजे मायबोलीकर स्त्री/ पुरुष नव्हे) सरमिसळच करतात. पेपर हे वेगळे तर चॅनेल हे वेगळे माध्यम आहे ही तफावत बर्याच जणांना कळत नाही.
मी स्वतच एक सर्व्हे ( नोकरीनिमीत्त) केला होता, ज्यात मला कळले की किमान ४५ % लोक घरी पेपर घेऊन वाचतच नाही. अगदी खरे आहे हे. त्यामुळे हे लोक काय त्या चॅनल ना कळवणार आणी काय भांडणार?
घरी अशा सिरीयल बघायचे नाहीच असे ठरवले नाही तरी घरचे लोकच ऐकत नाहीत, मग ते सासरचे असो वा माहेरचे. ते वहिनीसाहेब, भाग्यलक्ष्मी, चार दिवस सासुचे असल्या सिरीयल पहायच्या नाही असे ठरवुनही माहेरी गेले तरी तेच. माझे आई वडील एकदम सिरीयसली त्यात गुंतुन त्या पहायचे आणी ती डोकेउठाड मला पण पहायला लागायची. घरच्यांना कन्व्हिन्स करणे खरच कठिण असते, तुझा हा मुद्दा पण बरोबर आहेच.
दुसरे असे की भारतीय मानसीकता ही अशी विचीत्रच तयार झालीय, ज्यातुन नट नट्यांना देव मानले जाते, त्यांच्या खाजगीत नको तेवढे गुंतले जाते. डोके बाजूला ठेवुन असे पाहिले जाते. यातुनच या निर्मात्यांचे फावते आणी अश्रु ढाळणार्या बाया बापड्यांकरता सिनेमे आणी डेली सोप बनवली जाते.
आणी या विरुद्ध आवाज कोण उठवणार? घरात तर सासु सुनांचे भांडणे त्यातुनच जन्माला येतायत. खरी वस्तुस्थिती आहे की माझ्या घरी तर माझ्यात आणी या नायिकांमध्ये पण तुलना होते, ती पण कधी लेकी बोले सुने लागे या पद्धतीने. काय करणार? मराठीत आता असंभव सारख्या सिरीयल येणे कठिण आहे.
मी स्वतच एक सर्व्हे (
मी स्वतच एक सर्व्हे ( नोकरीनिमीत्त) केला होता, ज्यात मला कळले की किमान ४५ % लोक घरी पेपर घेऊन वाचतच नाही. अगदी खरे आहे हे. त्यामुळे हे लोक काय त्या चॅनल ना कळवणार आणी काय भांडणार?<<<
रश्मी, तू त्या ४५% मधे नाहीस ना? तू कळवू शकतेस का? झीचे फेसबूक पेज आहे. ईमेल आयडी आहे. तिथे जाऊन लिहून या सर्वांनी- जर तुम्हाला जर मालिका इतक्या खटकत असतील तर!!! पण तसं तर काही चित्र दिसत नाही. दर्जेदार मालिकांची चर्चा होताना दिसत नाही जितकी फालतू मालिकांची टिंगलटवाळी होते. क्वचित "संथ चालती" वगैरे वाहत्या बाफवर ही चर्चा होत असेल तर मान्य करू, पण जवळ जवळ प्रत्येक मालिकेसाठी एक एक बीबी ओपन केलेला आहे, आणि दिवसभर चालू आहेच. मग कबूल करा की आम्हांला हे असलंच मनोरंजन आवडतं, आम्हाला या मालिका बघायला आवडतात- त्यांची टिंगल करायला आवडते... माझे काही म्हणणे नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे स्वातंत्र्य आहे. पण मग दुसरीकडे त्या मालिकेमधे चुकीचे दाखवल्यावर ती चूक मीडीयाने(च) निस्तरावी अशी अपेक्षा ठेवू नका.
तुम्ही जेव्हा मायबोलीसारख्या कुठल्याही सोशल नेटवर्किंग संस्थळावर मालिकेबद्दल लिहिता तेव्हा ते कुठेतरी मालिकेतर्फे रजिस्टर करून घेतलेले आहे की तुम्ही "प्रेक्षक" आहात. मग तुम्ही नावे ठेवा, शिव्या घाला अथवा आरती ओवाळा, त्यांना फरक पडत नाही. त्यांना आय-बॉल्स ऑलरेडी मिळालेले आहेत. परिणामी, जाहिराती मिळाल्या आहेत. त्यांच्या ब्रेड बटर आणि जॅमची सोय झालेली आहे.
घरी अशा सिरीयल बघायचे नाहीच असे ठरवले नाही तरी घरचे लोकच ऐकत नाहीत, मग ते सासरचे असो वा माहेरचे. <<< तोच प्रश्न मी विचारलाय. तुमच्या घरांतल्या लोकांना या मालिका पहायला आवडतात, अशा मालिकांना प्रेक्षक मिळत आहेत हे तुमच्यासमोर आहे, तरी खापर त्या मीडीयावर का फोडताय?? मीडीयाने कन्विन्स करायला हवे लोकांना हे बघू नका म्हणून, तुम्ही करा की तुमच्या घरातल्यांना. ते जर इतके कठिण आहे तर मीडीया काय जादूची छडी घेऊन येणार आहे का?
एकीकडे मालिका पहायच्याच, त्याच मालिकेवर चर्चा करायचीच, आणी मग नंतर "मीडीयाने जबाबदारीचे भान ठेवायला हवे" का बरे??? मीडीया तद्दन मूर्ख आहे हे मान्य केलं तरी प्रेक्षक म्हणून आपल्या जबाबदारीचे काय? त्याचे भान कोण ठेवणार?? मीडीयाच???
इथे कसलाही वाद घालायचा नाही. महाभारत सीरीयलमधे कृष्ण म्हणतो तसं "स्वयं विचार करे!!!"
नंदिनी, मी माझ्या आईला
नंदिनी, मी माझ्या आईला विचारलं की तुला जर ह्या सिरियल्स पाहून एव्हढी चिडचिड होते तर का बघतेस? तर ती म्हणते की मला दिवसभर काम असतं, काही मनोरंजन नको का? बाकी मराठी-हिन्दी चॅनेल्सवर थोड्याफार फरकाने सिरियल्समध्ये हाच मालमसाला असतो. राहता राहिल्या 'तारक मेहता का उलटा चष्मा' सारख्या मालिका ज्या फार कमी प्रमाणात असतात. आई म्हणाली की मला विनोदी मालिका पहायला आवडत नाहीत, कारण कॅन्ड लाफ्टर तिच्या डोक्यात जाते. बरं, मग इंग्लिश मालिका आहेत त्या बघ असं मी सुचवलं. ह्या चॅनेल्सवर बरेच सिटकॉम असतात त्यातले विनोद मागच्या पिढीला आचरट वाटु शकतात. पण कॅसल, प्रॅक्टीस, ग्रेज अॅनटमी ह्या मालिका ती खरंच आवडीने पहाते. तिला हळूहळू ह्या मालिकांकडे वळवायचा माझा प्रयत्न चालू आहे. उदा. आता मला सासू हवी संपली की ८ ते ९ एखादी इंग्लीश मालिका, उदा एक्स फाईल्स असेल तर बघ असं मी तिला सुचवलंय (ह्यात माझा स्वार्थ आहेच!). कारण नवी मराठी मालिका एकदा बघायला सुरुवात केली की ती बघावीशी वाटते केवळ 'काय होईल' ह्या उत्सुकतेपोटी.
मला असं वाटतं की कोंबडी आधी का अंडं असा हा प्रकार आहे. चांगल्या सिरियल्स दाखवत नाहीत म्हणून आहे त्या सिरियल्स लोकांना पहाव्या लागतात. आणि त्या पाहिल्या जातात म्हणून तश्याच सिरियल्स बनवल्या जातात. असं तर नाही?
बाकी, मला एक विचारायचं होतं - टीआरपी कसा कॅलक्युलेट करतात?
बाकी तू प्रत्येक
बाकी तू प्रत्येक मालिकेसाठीच्या वेगळ्या बीबीबद्दल लिहिलं आहेस ते एकदम मान्य. माझ्या ह्यापुढल्या पोस्टस फक्त वाहत्या बीबीवरच असतील.
नंदिनी, झी टीव्ही मराठीला मेल
नंदिनी, झी टीव्ही मराठीला मेल करून झालेले आहे, त्यांच्या फेसबुकच्या पेज वरही मेसेज टाकला आहे. विशिष्ट मालिका व त्यातील आक्षेपार्ह गोष्टी सूचित करून झाल्या आहेत. तसेच मालिका चालू असताना खाली एक मेसेज येतो, ह्या मालिकेबद्दल तक्रार करायची असल्यास....इथे कळवा अशा अर्थाचा काहीतरी. तिथेही संपर्क साधून निरनिराळ्या मालिकांमध्ये काय खटकते याची नोंद केली आहे २-३ महिन्यांपूर्वी.
हो, मी पण 'दिल्या घरी तू सुखी
हो, मी पण 'दिल्या घरी तू सुखी रहा' मध्ये ती कांता चोरगे सुनेला मारताना दाखवली होती तेव्हा झीला निषेधाची मेल केली होती आणि सीसीमध्ये टीव्हीवर दाखवतात तो आयडी टाकला होता. पण मला वाटतं हे एकदाच न करता जेव्हा जेव्हा आपल्याला खटकेल तेव्हा तेव्हा न कंटाळता करायला हवं.
अरे वा....स्वप्ना यू टू..
अरे वा....स्वप्ना यू टू.. मलावाटतं आणखीन जास्त लोकांनी (उदाहरणार्थ मायबोलीकर) झीटीव्ही मराठीला मेल केल्यास त्यांना दखल घ्यावी लागेल.
नंदिनी कूल डाऊन. ह्या
नंदिनी कूल डाऊन. ह्या सिरीयलचा बाफ सुरु झाल्यापासुनच्या माझ्या पोस्ट बघ, मी कुठेही यात मिडीयाला जबाबदार धरलेले नाहीये. किंबहुना मिडीयाने काही हालचाल करावी अशीही माझी अपेक्षा नाहीये. आणी का असावी? बघतो आम्ही, चर्चा करतो आम्हीच मग त्यात मिडीयाचा संबंध येतोच कुठे?
वर गोगो वगैरेंनी चर्चा केली म्हणून मी माझे मत लिहीले, ते पण मिडीयाला दोष न देता. माझी पोस्ट नीट वाच म्हणजे लक्षात येईल. मी तुझ्याशी भांडत पण नाहीये आणी वाद पण घालत नाहीये. तुझ्याबद्दल आदर असल्याने असल्या गोष्टी माझ्या मनात पण येणार नाही.
राहता राहिले या मालिकांबद्दल, तर माझ्या काकुने पत्र पाठवले होते. पण बाकी बर्याच लोकांचे हेच म्हणणे होते की या सिरीयल चालूच रहातील, कारण संध्याकाळी घरी दमुन आल्यावर बाहेर जाण्याची ताकद नसतेच मग पर्याय काय?
दुसरी गोष्ट मी मेल पाठवणार आहे. माझे फेसबुक अकाऊंट नाही, आणी ते बनवणार पण नाही. पण दुसरे पर्याय नक्कीच शोधणार.
मी पण 'दिल्या घरी तू सुखी
मी पण 'दिल्या घरी तू सुखी रहा' मध्ये ती कांता चोरगे सुनेला मारताना दाखवली होती तेव्हा झीला निषेधाची मेल केली होती आणि सीसीमध्ये टीव्हीवर दाखवतात तो आयडी टाकला होता. <<< मला वाटतं तेव्हा वाहत्य अबीबीवर याची चर्चा झाली होती, आणि मी मालिका पाहत नसताना देखील निषेध ईमेल टाकला होता.
ती मालिका अद्याप चालू आहे का??
पण मला वाटतं हे एकदाच न करता जेव्हा जेव्हा आपल्याला खटकेल तेव्हा तेव्हा न कंटाळता करायला हवं.>> बरोब्बर!!! मुळात सोशल मीडीयासारखे टूल आपल्या हातात असताना ते कसं वापरायचं ते आपण ठरवायला हवं, आपण मीडीयासुजाण आहोत, प्रेक्षक म्हणून आपलीदेखील काही जबाबदारी आहे हे सर्वात आधी लक्षात घ्यायला हवंय.....
मी मला खटकणार्या जाहिरातीसाठी हे काम सतत करत असते. मराठी मालिका पाहतच नसल्याने फारसा प्रश्न येत नाही. मुळात जिथे "स्त्रियांवरील अत्याचाराचे आम्ही समर्थन करत नाही" वगैरे डिस्क्लेमर टाकावे लागतात. तेव्हाच त्या मालिकांची व्हॅल्यु माझ्या दृष्टीने शून्य होते.
नंदिनी कूल डाऊन. ह्या
नंदिनी कूल डाऊन. ह्या सिरीयलचा बाफ सुरु झाल्यापासुनच्या माझ्या पोस्ट बघ, मी कुठेही यात मिडीयाला जबाबदार धरलेले नाहीये. किंबहुना मिडीयाने काही हालचाल करावी अशीही माझी अपेक्षा नाहीये. आणी का असावी? बघतो आम्ही, चर्चा करतो आम्हीच मग त्यात मिडीयाचा संबंध येतोच कुठे?>>>>>
रश्मी, मी तुला बोलत आहे असं तुला का वाटलं? मागच्या पानावर मुग्धा रानडे यांनी एक विधान केले आहे "मीडीयाला जबाबदारीचे भान हवे" त्या वाक्याच्या संदर्भावरून मी इथे लिहत आहे. तुला अथवा इतर कुणालाही (मुग्धा रानडेला देखील) वैयक्तिकरीत्या उद्देशून काहीही बोलत नाही.
बाकी, मला एक विचारायचं होतं - टीआरपी कसा कॅलक्युलेट करतात?>>> फार मोठा विषय आहे. पूर्वी टीआरपी कॅल्क्युलेट करायचे फंडे वेगळे होते. आता सोशल मीडीया कन्टेक्स्टमधे ते पार बदलले आहेत. वेळ मिळाला तर लिहेन... पण एक छोटीशी इंटरेस्टिंग बात: टीआरपी असो वा इतर काही, प्रत्येक प्रेक्षकाची किंमत येऊन्जाऊन पैशामधे होते. अमुक एक लोक सुमारे सत्तावीस मिनिटांची आमची मालिका पाहतात, तेवढ्यावेळाच्या जाहिरातीचे पैसे इतके. म्हणजे त्या कार्यक्रमची किंमत लोक गुणीले जाहिरातीचे पैसे- हे आमच्या कार्यक्रमाचे मूल्य!!!!
ओके नंदिनी. माझा गैरसमज झाला
ओके नंदिनी. माझा गैरसमज झाला त्याबद्दल सॉरी. पण धन्यवाद पोस्टबद्दल.
Pages