तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोक्याला भुंगा लावायला.....मालिका पाहून पकले तरी पाहतीये.....

ए नको गं, नको गं असा अत्याचार करु.:अरेरे:

चिमा आणी मंजिरीच्या सतत रडण्याने माझे काळीज पूर्ण हेलावले आहे.:अरेरे: दगडाला पाझर फुटावा तसे मनाला पण पाझर फुटलाय. मन सैरावैरा धावतेय दादा होळकरच्या बायकोप्रमाणे.:अरेरे:

आज कहर झाला. आधीचे बरेचसे चुकल्याने सत्या का हुंदकत होता ते कळले नाही, प्रथेप्रमाणे मंजिरी व प्रिया त्याला शोधत होत्या. मंजिरी बेडरुममध्ये आली तर बरेचसे संवाद झडले, सत्या तिला म्हणाला, मंजिरी तू जिंकलीस. आता मला विष आणुन दे. मंजिरी नेहेमीप्रमाणे हुंदके गिळुन गप्प बसली. ( सारखे ग्लिसरीन घातल्याने डोळे लाल झालेत तिचे)

आता उद्याच्या भागात अनघा राजे उर्फ अनुराधा खोपकर उर्फ नेहा जोशी सत्याला उर्फ चिमाला म्हणते की आपली दुखः समान जुळली आहेत्.:खोखो:

सत्यजित किती परावलंबी आहे....विषपण बायकोला मागतो....स्वतः जाऊन घ्यायला काय हात-पाय दुखतात काय त्याचे???? Proud

just watching to see the end... >>> प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत कधीतरी होतोच म्हणतात. वाईट गोष्टींचा बहुधा होत नसावा Proud तेव्हा या मालिकेचा अंत होईलच असं सांगता येत नाही.

वाईट गोष्टींचा बहुधा होत नसावा तेव्हा या मालिकेचा अंत होईलच असं सांगता येत नाही. >> :फिदीफिदी:

काय ती मंजीरी, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, टाईप वागतेय. तिच्यामधे थोडा सीमावहिनीचा एलेमेंट टाकायला हवा. बहिणीचा खून होऊनही किती स्थितप्रज्ञ! बाकी लोकही सत्यजितचा गैरसमज दूर करायचा जराही प्रयत्न करत नाहीत. फक्त 'सगळे ठिक होईल. देवावर विश्वास ठेव' असे म्हणतात!

मंजिरी आणि सत्यजित हे हिरो हिरोईन आहेत कि तामडेबाबांचा परमभक्त तो टकल्या ??? मालिका विचित्र वळण घेतीये.

तामडे/तांबडे बाबांचा फोटो म्हणून ज्या माणसाचा फोटो लावलाय त्याने त्याच्यासाठी किती पैसे घेतले असतील हा प्रश्न मला तो फोटो पाहिला रे पाहिला की पडतो Proud

मालिका बघत नाही पण स्वप्ना, एकदम एलोएल प्रतिक्रिया आहे वरची. मराठी सिरियल, त्यात तू तिथे मी, त्यात तामडेबाबा (:हाहा:) नावाचं पात्र असेल तर ते कसं असेल Lol मी कल्पना करु शकते..
भरत Lol

हॅ! तो तर कुठल्यातरी कुंभमेळ्यात वगैरे एखाद्या साधूचा वगैरे काढलेला वाटतो फोटो. मला तो फोटो कुठल्यातरी साईट्/मॅगझिन मध्ये वगैरे पाहील्यासारखा वाटतो कायम.

संत पाषाणभेदांचा या कलीयुगातील अवतार म्हणजे तांबडेबाबा आहे हे त्यांच्या समस्त भक्तांनी लक्षात घ्यावे.

संत पाषाणभेद महाराज की जय!

आता मालिकेत सुद्धा खून, बलात्कार करणारे व्हिलन दाखवणार वाटते. आणि हिरो सुद्धा बिनडोक दाखवतात हल्ली. मला वाटत, पात्र मालिकेतून काढायचं असेल तर मालिकेत ते मेलेलं दाखवण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे त्या पात्राचा खून दाखवणे.

पात्र मालिकेतून काढायचं असेल तर मालिकेत ते मेलेलं दाखवण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे त्या पात्राचा खून दाखवणे. >> नाहीतर काय!
स्वप्ना आणि टुनटुनच्या , होळकर आपल्या बायकोचा खून करतो, अशा पोस्ट पाहून आता अजिबात बघायला नको असे झाले. आणि ती प्रिया किती कारस्थानी, आणि तिचे नशिब एवढे थोर कसे की कोणालाही तिचा संशय येत नाही.

खरे तर सुरुवात चुकल्याने गोंधळ झालाच. पण सत्या अनघा राजेकडे दादाच्या बायकोला आणतो, तेव्हा ती बर्‍यापैकी धोक्याबाहेर आहे असे अनघा सांगते( ती डॉक्टर असल्याचे प्रथमच कळते).

सत्याच्या बाहेर रहाण्याने घरात बराच गोंधळ होतो, तिकडे दादोबा त्याच्या असिस्टंट संख्येला पण गोळी मारतो, बहुतेक तो ( संख्ये) सिरीयस असावा, पण दादोबा गोळी कुठे मारतो तेच कळले नाही.( म्हणजे डोक्यात की छातीत की पोटात?:अओ:)

उद्याच्या भागात अनघा राजे सत्याला फोन करुन रात्रीच बोलावुन घेतांना दाखवलीय. सत्याचे सत्य ( दादाच्या बायकोला वाचवणे वगैरे) फक्त आजीलाच माहीत असल्याने, मंजिरी वैनी संशय स्थितीत दाकवल्यात.

तांबडे बाबाचे गाणे लय भारी.

आजीने आज सत्याच्या आई आणि बायकोला सत्य सांगितलं. मग सत्या आणि अनुराधाने कॉफी घेतली. होळकरने प्रियाला सफरचंद खायला दिलं. आमच्या मातोश्रींच्या मते सत्याचा मित्र उर्फ गरीबांचा आदित्य पांचोली आणि अनुराधा ह्यांचं शेवटी शुभमंगल होईल. म्हणून मंजिरीच्या बहिणीला उडवलंय सिरियलीतून.

सॉरी अनघा म्हणाय्चं होतं मला.

>>अजुनही हि मालिका चिन्मय मांडलेकर लिहितोय पटत नाही...

प्रिया, मंजिरी, अनघा आदि बायका त्याच्यावर एव्हढा जीव टाकतात ह्यावरून तोच ही मालिका लिहित असावा हे नक्की. Happy ती होळकरची बायको त्याला 'दादा' म्हणतेय हे तिचं (आणि आपलं!) नशीब. मांडलेकर मालिकेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत चेहेर्‍यावर एकच एक्स्प्रेशन घेऊन वावरलाय. हेच एक्स्प्रेशन अग्निहोत्र मध्येही होतं.

हेच एक्स्प्रेशन अग्निहोत्र मध्येही होतं.

तुला असंभव म्हणायचय स्वप्ना

त्या पुर्वी तेच एक्स्प्रेशन वादळवात मधे ही होत.

हे पात्र आता प्रसाद ओक च्या सिरीयल मधल्या सारख चाललाय\
"मला तू पाहीजेस ... मला ती पाहीजे... मला सगळ्या बायका पाहीजेत"

सत्यजित हिरो...... अजून काय पाहिजे मालिका खड्ड्यात जायला?

बाकी ते अनुराधा खोपकरचं काय प्रकरण आहे? आधी वाटलं होत, दादा होळकरची चमची असेल...सत्या आणि मंजिरीत संशयास्पद वातावरण निर्माण व्हावं म्हणून पाठवलेली.....पण नाही काहीतरी वेगळचं दिसतंय.

अनुराधा खोपकरचं काय प्रकरण आहे? आधी वाटलं होत, दादा होळकरची चमची असेल..>>>हि शक्यता नाकारता येत नाही...अनुराधा खोपकर अज्ञात वासात आहे...अनघा राजे म्हणून लपून राहते आहे. ती कधीही दादाची चमची निघू शकते...अशी आपण मनाची तयारी ठेवायची.

सत्याच्या आईच्या मनात संशय निर्माण झालाय पण मंजिरीच्या मनात सत्याबद्दल संशय? कब्भी नही!!! 'माझा विश्वास आहे यांच्यावर - हे असे कध्धी करणार नाही' असे बोलतच ती म्हातारी होणार आहे यात काही शंका नाही कारण एका घरात राहून, देखण्या ताईंनी सुचवूनही प्रियाचा आपल्या नव-यावर डोळा आहे हे तिला कळत नाही ..तिच्या कडून आपल्याला दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही.

हे मात्र खरे कि मंजिरीशी वाईट वागत, सत्या कित्तीही बायकांसोबत राहिला तरी तो मनातून फक्त मंजिरीवरच प्रेम करणार आणि मंजिरीला धोकेबाज बोलणार.

हि मालिका अगदीच अवघाची हा संसार च्या वाटेवर चालली आहे..
त्या मालिकेचा लेखकही बहुदा चिमाच होता.

Pages