तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग अबोली मंजिरिपेक्षा मिरा परवडली असती एकवेळ मसाह मधली निदान घर तुटु नये म्हणुन काहितरी डोक चालवताना तरी दिसते.....

@मुग्धा....ओह....असेल असेल..मसाह मी पाहिली नाही कधी..टायटल साँग इरिटेट झाल त्यामुळे पाहायची हिम्मत नाही केली.

>>मंजिरिला सर्वोत्कृष्ठ सुनेचा झी मराठीचा पुरस्कार मिळाला आहे

ह्या स्पर्धेला आणि निकालालाही काही अर्थ नाही. एकाच नंबरवरून अनेकदा एसएमएस केले तर डिटेक्ट होतं का? मी कधी ह्यासाठी मेसेज पाठवले नाहीत आणि पाठवणारही नाही. त्यामुळे मला माहित नाही. तसं डिटेक्ट होत असेल तरीही नातेवाईक, मित्र, शेजारी वगैरेना सांगून एखादी व्यक्ती आपल्यासाठी मतांची तजवीज करू शकते. सिस्टीम हॅक करता येऊ शकते. तसंच ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शी नसल्याने कोणाला किती मतं मिळाली वगैरे आकडेवारी जाहिर होत नसेलच ना? मग एखाद्या सिरियलच्या लोकांनी लॉबिंग करून बक्षीस आपल्या पदरात पाडून घेणं सहज शक्य आहे. माझ्या मते हा पुरस्कार कॅशला मिळायला हवा होता. कारण सासूला सतत कसं पेचात पकडायचं हाच विचार प्रत्येक सून करत असते. ते तिने अगदी बरोबर दाखवलंय. Proud

पण खरं सांगायचं तर, मला असं वाटतं की अभिलाषाचा रोल करणार्‍या अभिनेत्रीने अत्यंत सुमार व्यक्तिरेखा सुध्दा छान साकार केली आहे. 'अवघाची हा संसार' मध्ये तिचा गंभीर रोल होता. त्या मानाने ही भूमिका निश्चित वेगळी आहे.

स्वप्ना तिला मिळाला ना. तिच नामांकन मला वाटत सहाय्यक भुमिका(स्त्री) साठी झाल होत त्यात मिळाला तिला.

चिमांला तूतिमी साठी नवा प्लॉट - तांबडेबाबा होळकरला स्वप्नात येऊन एके ठिकाणी १००० टन मोती आहेत असं सांगतात. मोतीवाल्या बाईला खूश करण्यासाठी तो ती जागा खणायला घेतो. Happy

हो स्वप्ना गंभीर भुमिका साकारण तितकस कठीण नसत पण मसाह मधली अभिलाशा काय किंवा होसुमियाघमधली शरयु काय अशा प्रकारच्या भोळसट व्यक्तिरेखा उभ्या करण जरा जडच असत अस मला वाटत...

स्वप्नाच्या पोस्टला अनुमोदन. मंजिरिला सर्वोत्कृष्ठ सुन पुरस्कार केवळ प्रेक्षकांमुळे मिळाला असं नाही वाटत. पण त्यांनाही सगळ्याच मालिका चालवायच्या आहेत. ज्या लोकांना हि मालिका बघावी लागते ते मालिकेला आणि मंजिरीला (बिनडोकपणामुळे) नावच ठेवताना पाहिलेत. फेबुवर हि ह्या मालिकेच्या पेजवर बरेच लोक हि मालिका बंद करा असे लिहित असतात.
अजून एक म्हणजे, मंजिचे वडील सरनाईक, ते आता बापाच्या कर्तव्याचा (सो कॉल्ड) भाग म्हणून मंजिरी-सत्याचा काडीमोड करण्यासाठी कंबर कसताना दाखवले आहेत. पण ह्यांचीच दुसरी मुलगी जिचा गरोदरपणात खून झाला आहे त्याबद्दल ह्या बापाला काहीच वाटत नाही का कि कर्तव्य म्हणून तरी खुन्याचा शोध घ्यावा, निदान पोलिसांचा तरी फॉलोअप घ्यावा कधी त्यासाठी. ती बिचारी खूप पटीने चांगली होती ह्या यडपट मुलीपेक्षा.

या सगळ्यांच्या(स्टार्टिंग फ्रॉम सत्यजितची आई टू मोतीवाल्या बाई) लग्नाचा उडालेला धुव्वा बघता हे दोघे पुन्हा विचार करतील....

माझि ३ वर्षा चि मुली चे मत - 'ति मंजिई सारख रडति बघ'.तिला मंजिरि नाहि म्हणता येत
हे ऐकल्या पासुन, तिचा समोर मी हि मालिका कधिच नाहि बघत

एक दिवस मी वेणि घातलि तर माझि मुलगि म्हणते - आइ तु मंजिई सारख दिसते. कपाळाला मारुन घेतले मि Sad

तिचा अजुन एक पेटंट डायलॉग - १.'ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि हि आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्शण हि त्यानिच दिली आहेत' अस निर्लज्ज पणे सांगते.जस कि बाप हिला उपाशिच ठेवत होता.

२.'ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि ते या जगातले उत्तम वडिल आहेत'. रभा चा चेहरा बघण्या सारखा होतो.बिचारा

तिचा अजुन एक पेटंट डायलॉग - १.'ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि हि आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्शण हि त्यानिच दिली आहेत' अस निर्लज्ज पणे सांगते.जस कि बाप हिला उपाशिच ठेवत होता.

२.'ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि ते या जगातले उत्तम वडिल आहेत'. रभा चा चेहरा बघण्या सारखा होतो.बिचारा

अगदी अगदी

रभा = रमेश भाटकर

जेम तेम १.५ वर्षांचा संसार त्यातून वर्षभर छळ.......आणि म्हणे सुखाचे क्षण.
'ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि हि आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्शण हि त्यानिच दिली आहेत' >>>त्यावर तिचे वडिल बोलतात कि "अग पण तेच सुखाचे क्षण इतर बायकांवर पण उधळत होता" त्यावर ती गप्प.

ते माझाशि कसे हि वागले असतिल ना तरि ते या जगातले उत्तम वडिल आहेत'. >>>म्हणून काय परत त्याच्याकडे जाणार का? आणि जाऊन तरी काय करणार? मुलीसमोर भांडणार, रडत बसणार, कायम फुगून बसणार का?

नवर्‍याने एव्हढा छ्ळ केलान....तेही हिची काही चूक नसताना, बाळापासून दूर केले..."माझ्या बाळाच्या भूकेसाठी तुझ्यासारख्या बाईवर अवलंबून रहावं लागतं" असे काहीही बोलणारा नवरा खरेतर तेव्हाच मनातून उतरायला हवा होता ...बरं ते सोडा...एव्हढं सगळं करताना तो बाहेर शेण खात होता हे कळलं तरीही हि अजून हि हाच विचार करते कि मी आता काय करू?

रमा Lol

ठार येड्पट आहे ती मंजिरी .. अजुन पण त्या सत्यजितचा विचार करते.. रमेश भाट्कर अशी भुमिक कसं करु शकतात?
अ‍ॅड मधे बघितल -
रभा - (अजुन एका माणसाला) माझ्या मुलीने खुप सहन केलं पण मी काय करणार तेव्हा ती सासरी होती ना ..
जसं काही ती लॉकअप मधे होती नि भयंकर कॉम्प्लेक्स पासवर्ड दिला होता ... :रागः

सत्याचं एक बरं आहे. त्याची मैत्रिण बायकोने म्हणे खपवून घ्यायची, ते पण ह्याची अफेअर्सची हिस्टरी असताना. का तर म्हणे ह्यांची शुध्द मैत्री आहे. आणि हाच माणूस तिचा मित्र तिला त्रास देत होता तेव्हा तिच्यावर संशय घेत होता. तेसुध्दा आपण बाहेर शेण खाताना. का म्हणून? वर त्या मित्राला म्हणत होता की मंजिरी असं पाऊल उचलेल असं मला वाटलं नव्हतं. बायको म्हणजे काय ह्याला पायातली वहाण वाटते का? मनात आलं घातली पायात, नाहीतर काढून ठेवली. म्हणे माझा श्वास कोणीतरी काढून नेतंय असं वाटतंय. काय पण आहे पती परमेश्वर. ह्याला त्या बायकोने खेटराने हाणला नाही हे त्याचं नशीब.

आता मंजिरी म्हणतेय की सत्याच्या चारित्र्यावर कोर्टात शिंतोडे उडालेले मला खपणार नाही. चारित्र्य आहेच कुठे त्या माणसाला? तिच्या वडिलांनी तिला सरळ सांगायचं की तळ्यात मळ्यात करणार असशील तर सरळ जा नवर्‍याकडे परत आणि परत रडत येऊ नकोस.

रच्याकने, मागे मंजिरी त्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमधून निघून गेली होती तेव्हा तिच्या आईचा आत्मा ढगातून आला होता. आता नाही आला ते???

वेड्यांचा बाजार आहे. आता ही बया त्याचं (नसलेलं) चारित्र्य जपत बसेल आणि त्याचा वकील तिच्यावर आशिषमुळे जी जुनी केस झाली होती त्या केसचा रेफ. देऊन केस जिंकेल. म्हणजे एवढं सगळं होऊन तीच व्याभिचारी ठरेल.
या मालिकेचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता हे व्हायला काहीच हरकत नाही Happy

जसं काही ती लॉकअप मधे होती नि भयंकर कॉम्प्लेक्स पासवर्ड दिला होता ... >>>तो म्हणतो मंजीला कि हे घर सोडून परत ये...तेव्हा ती नाही येणार सांगते.....आता हेच माझं घर...हिच माझी माणसं असे काहितरी बोलते.

का ग पियु? अग हे केलान, दिलान, घेत्लान वगैरे चिपळुणातच जास्त बोलल जात म्हणुन विचारल मी.....

Pages