पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
_प्राची_ > फोटो भारी एक्दम !
_प्राची_ > फोटो भारी एक्दम ! मस्तच !
मस्त केलयं डेकोरेशन प्राची..
मस्त केलयं डेकोरेशन प्राची..
बेळगावला ,आजोळी, उसाचा रस
बेळगावला ,आजोळी, उसाचा रस ,आलेपाक (एस्टी स्टॅन्ड्वर मिळतात त्या वड्या नाही ) नावाचे दडपे पोहे अन फुटाणे (पंढरपूरी डाळं) घालून तिखट चटणी हा एक भारी कार्यक्रम असायचा. मोठ्या पातेल्यात रस, भरपूर दडपे पोहे, त्याच्या भोवती गोल करून नातवंड , बाहेर्च्या गोलात उच्चासनावर मोठी मंडळी. त्यातल्यात्यात मोठ्या मुलांना वर्तमान पत्राचे चौकोनी तुकडे करून वाढायच काम. दुपार ते संध्याकाळ गप्पा मारत मारत फस्त करायचे.
निट रेसिपी आईला विचारून टाकते. इथे बेळगावकर आहेत का कोणी ?
इन्ना...क्या याद दिला दी.
इन्ना...क्या याद दिला दी.
माझेपण आजोळ बेळगावचे. आई करायची आलेपाक पोहे.
आलेपाकाची जी चटणी असते त्याची कृती आईला विचारून टाकते इकडे.
यम्मी आलेपाक पोहे आणि उसाचा रस. तोंपासु.
माझ्याकडे आहे आलेपाकाची
माझ्याकडे आहे आलेपाकाची रेसिपी. एकदम टेस्टी प्रकार. डाळीचे छोटे लाडू करुन पोह्यात घालतात.
उद्या रेसिपी देते. बेळगावची स्पेशालीटी आलेपाक तोंपासू.
नक्की दे आरती.
नक्की दे आरती.
पोहे खाणे ही एक अनुभूती असते.
पोहे खाणे ही एक अनुभूती असते.
पोह्याचे प्रकार बदलतात त्याप्रमाणे अनुभूतीही. आलेपाक पोहे आजोळी घेउन जातात. कच्चे पोहे वाटित घालून खात बसले की डोक्यातले गुन्ते अलवार उलगडतात. दुध साखर्पोहे =रात्रीची सब्मिशन्स, टपरीचा कटींग चहा अन स्टिल्च्या मेचकट खोल्गट ताटालीतून वरून शेव हिरवी चटणी घालून फोडणीचे पोहे ( ह्याला कांदापोहे म्हणावत नाही) म्हणजे कॉलेजचा कट्टा अन बंक मारलेली लेक्चर्स, तेल मिठ पोहे म्हणजे शुक्रवारी उशिरा रात्री दुरदर्शन्वर लागणारे विदेशी पिक्चर. तळून पोहे , गुळओखोपोहे म्हणजे दिवाळी. आणि निगुतीनी मटार भरपूर कांदा घालून एक मुठ जास्तच पोहे भिजवून अजिबात तेलाची काटकसर न करता केलेले कांदापोहे+ टमरेल भरून कॉफी म्हणजे सुट्टीची निवांत सकाळ.
:हे लिहून अहाहा फिलिंग आलेली मुलगी:
इन्ना
इन्ना
त्या आलेपाक पोह्यांची पाकृ
त्या आलेपाक पोह्यांची पाकृ मिनोतीने लिहिली होती... माहेर मासिकात लिहिली होती बहुतेक.
इन्ना, मला पण परवा ते ऊसाच्या
इन्ना, मला पण परवा ते ऊसाच्या रसासोबत खायचे पोहे आठवले, पण नाव आठवेना!! काय लागतात ते पोहे.... अशक्य सुंदर.
मोठ्या पातेल्यात रस, भरपूर दडपे पोहे, त्याच्या भोवती गोल करून नातवंड , बाहेर्च्या गोलात उच्चासनावर मोठी मंडळी. त्यातल्यात्यात मोठ्या मुलांना वर्तमान पत्राचे चौकोनी तुकडे करून वाढायच काम. दुपार ते संध्याकाळ गप्पा मारत मारत फस्त करायचे.<<< यासोबत कानडी-मराठी भाषेमधला तो अत्यंत हसवणारा संवाद.
नंदिनी मला संवाद नाही आठवत पण
नंदिनी मला संवाद नाही आठवत पण त्या गप्पा मारण्यातला निवांतपणाच फिलिंग मात्र लख्ख आठवतय.
आमच्या कडे कानडी बोलणारे नव्हते कोणी पण तो बेळागावी हेल मात्र हमखास. काय करायलास, त्याला पण दे की थोडा रस, पाप लहान बघून छळायलात काय झोंडांनो !! हे बेळागावी हेलात वाचावे. टिपिकल मावशी मामी डाय्लॉग 
इन्ना, मला एकदम लंप्या वाचून
इन्ना, मला एकदम लंप्या वाचून रहायलेय असं फीलिंग आलं
इन्ना, बरोबर. बेळ्गाव
इन्ना, बरोबर.
बेळ्गाव कित्तूरला आम्ही जाणर ते लग्न मुंजीलाच. म्हणजे सगळा गोतावला जमलेला असणार. त्यात आम्ही पोरंटोरं इतके उपद्व्याप करायचो.... की मोठी माण्सं चांगलीच वैतागायची.
त्यात आमच्याकडे कानडी सासवा कानडीतूनच बोलणार आणि त्यांच्या मराठी सुना मराठीतूनच उत्तर देणार असला एक जबरदस्त भाषिक प्रयोग असायचा. त्यातली एखादी कानडीचा गंधदेखील नसलेली नवीन सून असेल तर तिची गंमतच. "सासूबाई काय म्हणायल्यात?" करून कुणाला विचारलं तर सासूने पाणी आणायला सांगितलं असेल तर आम्ही पोरं "चहा मागायलेत." नाहीतर "तुला भूक लागली असं विचारायलेत" करून ठोकून द्यायचो. थोड्या दिवसांनी ती सून जरूरीपुरतं कानडी शिकेपर्यंत तिची असलीच गंमत करायचो. मज्जा यायची.
वरदा ,नंदिनी
वरदा ,नंदिनी
हळदीचे पान घालूनपण पोहे छान
हळदीचे पान घालूनपण पोहे छान लागतात, ज्यांना हळदीच्या पानांचा वास आणि चव आवड्त असेल त्यांना आवडतील. माझ्या माहेरी आमची हळदीच्या पानांची बाग आहे त्यामुळे कोवळे, ताजे पान आणून ते चुरडून किंवा कुटून बारीक करायचे आणि पोह्यात घालायचे, त्याबरोबर ति़खट-मीठ, तेल, हवं असल्यास ओले खोबरे, किंचित साखर घालायची आणि स्वाहा करायचे. हळदीचे पान मात्र पाव किलो पोह्यांना साधारण एक घ्यायचे, खुप जास्त घातली पाने तर चांगले नाही लागणार.
इन्ना आमच्या शेजारी रहायचे
इन्ना आमच्या शेजारी रहायचे त्यांचे माहेर बेळगांवचे, अशीच भाषा बोलायच्या त्यात तो पाप शब्द इतक्या वेळा यायचा, मग हळूहळू आम्हाला लक्षात यायला लागलं की तो कुठल्या अर्थाने वापरतात.
आम्ही फक्त पाप-पुण्य ह्या अर्थाने वापरतो.
प्राची.. मस्त दिसतोय सजवलेला
प्राची.. मस्त दिसतोय सजवलेला ट्रे!>>> अगदी अगदी!
आरती.... मलाही हवीय आलेपाकाची रेसिपी.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46506 - आले पाक
लवकर बनवा आणि फोटो डकवा.
पोह्यांच्या कुठल्याही
पोह्यांच्या कुठल्याही प्रकारावर पोह्याचाच पापड चुरून खायचा. किंवा मिरगुंडं. म्हणजे स्वर्गात जागा पक्की!
पैल्याच पोस्टमधे पोहे फॅन क्लबात ऑनररी मेंबरशिप दिल्याबद्दल प्राचीचे आभार.
स्वाती, मिरगुन्ड म्हणजे
स्वाती, मिरगुन्ड म्हणजे काय?
बाय द वे, कॅन्सास ला एकही धड इन्डियन स्टोर्स अजून सापडलेल नाहीय. त्यामुळे मेतकूट खाताना रोज तुला धन्यवाद देतेय
अजून पुरलंय ते?! आणखी आलंय
अजून पुरलंय ते?! आणखी आलंय माझ्याकडे, पाठवू का?
मिरगुंडं म्हणजे पोह्याच्या पापडांच्याच कापट्या असतात मोठ्या शंकरपाळ्यांच्या आकाराच्या. तळली की एकेक कापटी हीऽ एवढी फुलते! (पाठवू का?)
प्राची, यासगळ्या प्रतीसादांत
प्राची, यासगळ्या प्रतीसादांत आलेल्या कृतींच संकलन वर मूळ लेखात दे जमलं तर. रेडी रेफरन्स होईल तो सगळ्यांकरता...
त्यापेक्षा मीच येऊ का?? :)
त्यापेक्षा मीच येऊ का?? :):)
ये की.
ये की.
Madhurima aga Ambica Indian
Madhurima aga Ambica Indian store Madhe try mar
सिकेपी घरात सोडे किंवा सुकट
सिकेपी घरात सोडे किंवा सुकट घातलेले पोहे हमखास होतात. त्याची मजा औरच. >. सुकटवाल्या पोह्यांची सविस्तर रेसिपी टाका कोणीतरी प्लीज
मी पण या क्लबात. दडपे पोहे
मी पण या क्लबात. दडपे पोहे खूप प्रिय. मग दही-पोहे, दूध-पोहे, पोह्याचा चिवडा, फोडणीचे पोहे आणि मग सगळेच पोह्याचे प्रकार पार अगदी पापडापर्यंत.
पण पोह्याच्या पापडाच्या लाट्या तेल लावून = स्वर्गसुख आणि कच्चे पोहे + तेल + तिखट + मसाला + मीठ = समाधी.
इन्नाला अनुभूती वगैरे होते म्हणजे पोहे फॅन नं १ किताब दिलाच पाहिजे.
पोह्याच्या पापडाच्या लाट्या
पोह्याच्या पापडाच्या लाट्या आणि पोह्याच्या पीठाचे डांगर, आहाहा.
पोह्यांवर किती लिहु शकतात
पोह्यांवर किती लिहु शकतात तुम्ही सगळे? वाचायला मजा येतेय.

सुट्टीच्या दिवशी, अचानक कोणी आले असताना पोहे करते मस्त असंच म्हटलं जातं. दुसर्या पदार्थाची पट्कन आठवणच होत नाही मला.
लोक्स पोह्यांवर इतके
लोक्स पोह्यांवर इतके लिहीलेजात्यं यो कु एखादा पोहे गटग करायला हव.
Pages