पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
आजच पोहे खाल्ले, बटाटे, भरपूर
आजच पोहे खाल्ले, बटाटे, भरपूर शेंगदाणे, भरपूर कांदे, कडीपत्ता, कोथिंबीर, भरपूर मिरच्या घालून केलेले.
हे असे कधीतरीच मूड आला की करतो, नाही तर थोड्याश्या तेलाची फोडणी केलेले अन पाणी घालून वाफवलेले असते. अश्या पोह्यांसोबत मस्त तर्री असलेला कट , त्यावर फरसाण मस्त लागतात
आता पोहे धागा वर आल्यावर
पोह्यांना कांदा कोथिंबीर
पोह्यांना कांदा कोथिंबीर मिरची आणि लिंबू हवेतच , बाकी गोष्टी ऐच्छिक आहेत . पण मला टमाटे घालून पण आवडतात, एक छान मऊपणा आणि थोडी आंबट चव येते . कधी कधी करते मी असे. सोबत बारीक पिवळी शेव असेल तर अजून छान. झाली आठवण, आता उद्या पोहे होणारच :)
चिरमुरे भिजवून हेच सगळे
चिरमुरे भिजवून हेच सगळे पाकसंस्कार करून सुशीला उर्फ सुस्ला नावाचा पदार्थ बनतो
पण तो गरम गरमच मस्त लागतो
https://hebbarskitchen.com/hi/susla-recipe-puffed-rice-upma-mandakki/
सुशीला मस्त लागतो .. मी करते
सुशीला मस्त लागतो .. मी करते कधीतरी..
(No subject)
पुण्यात पोह्यमध्ये सांबार
पुण्यात पोह्यमध्ये सांबार घालुन देतात ते कोणते असते इडली चे च का ?
सांबार वा उसळीवरून आठवले,
सांबार वा उसळीवरून आठवले,
रैवारी संध्याकाळी शिल्लक पोह्यावर दुपारच्या चिकनमटणचा रस्सा घालून खायला मला फार आवडायचे, संध्याकाळी पोहे सुके झाले तरी त्यामुळे ओले व्हायचे. हल्ली बराच काळ हे असे करून खाल्ले नाहीये
बहुधा पोह्यासोबत आपल्या आवडीचे काहीही कॉम्बिनेशन ट्राय केले तरी ते सूट होऊन जाते या खासियितीमुळे पोहे घराघरात पोहोचले असावेत.
मीपण हा धागा वर आल्यामुळे
मीपण हा धागा वर आल्यामुळे दडपे पोहे करून खाल्ले आत्ता!
मला पोह्यांमध्ये:
मला पोह्यांमध्ये:
शेंगदाणे... हवेतच
बटाटे... हरकत नाही
कोथिंबीर... असल्यास उत्तम
वरुन किसून शिवरलेले ओलं खोबरं... हवेच हवे
मिडीयम साइज पिवळी शेव... असल्यास उत्तम
लिंबाची फोड... असल्यास उत्तम
टोमॅटो... नसल्यास उत्तम
सांबार... नको रे देवा नको
(पोह्यांत शेंगदाणे नसणे म्हणजे मला पिलर शिवाय कन्स्ट्रक्शन असल्यासारखे वाट्ते
)
अरे व्वा, पोह्यांच्या गप्पा.
अरे व्वा, पोह्यांच्या गप्पा.
इंदौरी पोहे वेगळे लागतात चवीला हे खरे. आपण फोडणीत पोहे घालून एक-दोन वाफा काढतो तसे न करता इंदौरी पोहे हे गरम पाण्याच्या पातेल्यावर पोह्यांची परात ठेवून वाफवले जातात. त्यामुळे, वेगळी चव येते. शिवाय वरून कच्चे दाणे, कांदा, शेव, डाळिंब दाणे असतात. त्याची चव वेगळीच येते. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी. इकडचे कच्चे जाडे पोहे पण जरा जास्तच जाड असतात. आणि चिवड्याचे पातळ पोह्यांना नागपुरी पोहे असे म्हणतात.
इंदुरी पोह्यांच्या फोडणीत
इंदुरी पोह्यांच्या फोडणीत बडीशेप आहे.(यावर आणखी ५० प्रतिसाद येऊ शकतील
)
ते वाफेवर शिजवायचे आहेत.
बारीक शेवेऐवजी झणझणीत रतलामी शेव भारी लागते.
वरून इतर गोष्टींसोबत जिरावन (मसाला).
नुसते पोहे नको.. जलेबी हवी...
नुसते पोहे नको.. जलेबी हवी...
पोहा जलेबी...
Ok
Ok
रातराणी शेव म्हणजे कुठली शेव
रातराणी शेव म्हणजे कुठली शेव ?
रतलामी Stupid autocorrect
रतलामी
Stupid autocorrect
अगं राणी रातराणी नाही
अगं राणी रातराणी नाही
(No subject)
ओके भरत. सिंडरेला
ओके भरत. रातराणी शेव वाचून उत्सुकता वाटलेली नक्की कश्या प्रकारची असते म्हणून
सिंडरेला
पोह्यात मोहरी अजिब्बात म्हणजे
पोह्यात मोहरी अजिब्बात म्हणजे अजिब्बात आवडत नाही.
शेंगदाणे घालत नाही, पण कोणी घातले तर चार पाच घासात एक असा आला तर आवडतात. दर घासाला नको. ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू मस्ट. पहिलं सर्विंग संपलं की दुसर्या सर्विंगला शेव वगैरे काय घालायचं ते घाला.
पुण्याला ज्ञानेश्वर पादुका चौकातल्या निरंजन मधल्या पोह्यांबरोबर नारळाची चटणी देतात ती आवडते. घरी केलेल्या पोह्यात मात्र नाही.
साखर हवीच. त्याने एक गोडवा येतो तो फार आवडतो. आणि पोहे केल्याबरोबर लग्गेचच खायला आवडतात. एकदम वाफाळते हवेत.
आज दुपारी जेवायला पोहेच हवेत आता.
पोह्यात मोहरी अजिब्बात म्हणजे
पोह्यात मोहरी अजिब्बात म्हणजे अजिब्बात आवडत नाही >>>>
मग फोडणी कशाची द्यायची?
जिऱ्याची असेल.
जिऱ्याची असेल.
मला शेंगदाणे न घातलेले पोहे
मला शेंगदाणे न घातलेले पोहे खाणे हा गुन्हा वाटतो, म्हणुन मी तो गुन्हा करत नाही. वरून मूठभर कच्चे शेंगदाणे तरी घालून खातो.
मला साखर जराशी, शेंगदाणे
मला साखर जराशी, शेंगदाणे जराशे, लिंबू मस्ट, शेव नकोच बाकी काही असले नसले तरी ओके.
मला कैरीचा किस घातलेले पोहे
मला कैरीचा किस घातलेले पोहे पण आवडतात .. खोबरे घालतो तसेच थोडासा कैरीचा किस घालायचा मज्जा येते..
नाही नाही जिरं पण नको. नुसता
नाही नाही जिरं पण नको. नुसता हिंग, हळद, मिरची कढिपत्ता बास झाला की.
जिरावन आणी चाट मसाला यात जमीन
जिरावन आणी चाट मसाला यात जमीन अस्मानचं अंतर असतं ते तिखटपणात. जिरावण नुसतं चाटून खाता येत नाही. फारच जास्त तिखट लागतं.
बाकी भरत, तुम्हीपण ट्विटरवर सबनिसांचे फॉलोअर का? :फिदिफिदि:
ही रेसिपी हुसेन हैदरींनी
ही रेसिपी हुसेन हैदरींनी ट्वीट केली.
आमच्याकडे पोहे फक्त आणि फक्त
आमच्याकडे पोहे फक्त आणि फक्त नवराच बनवतो..ते ही इतके तिखट की तीन वेळा तिखट लागतात.. खाताना, गिळताना आणि .. ..आणि इतक्या तिखट पोह्यांसोबत चहा मस्ट.. पोह्यात शेंगदाणे म्हणाल तर सेपरेट तेलात तळूनच पोह्यांमधे घातले जातात..आधी शेंगदाणे तळून त्याच तेलात पोहे बनवा असा प्रकार आमच्याकडे होत नाही.. पोह्यांची चव बदलते
पोह्यांवर लिंबू आणि आलू भुजिया पण हव्यातच (साध्या भुजियात ती मजा नाही)
मला साखर जराशी, शेंगदाणे
मला साखर जराशी, शेंगदाणे जराशे, लिंबू मस्ट, शेव नकोच बाकी काही असले नसले तरी ओके. >> म्हणजे त्यात "पोहे" नसले तरी?
Pages