पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा...मस्त मस्त ...मी पण पो फॅ क्ल मधे हाजीर.......

प पो मधे कान्दा बारिक चिरुन कोथिबिर आणी कैरी लोणचे खार + फोडी पण ..मस्त कालवायचे आणी त्याच हाताने हादडायला सुरुवात करायची .....लोणच्याची बोटे चाटताना आहाहाहाहा..काय मज्जा येते......माझ्या सा बाची रेसीपी .....:)

दूध-गूळ-पोहे माझं आवडतं फ़ास्ट फ़ूड. बाकी कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोहे आहेतच. कोकणात आमच्याकडे गोकुळाष्टमीला साखर घालून दूध-पोहे करतात.
आमरसात मात्र (गरज असल्यास) साखर/मीठ/मिरपुडीव्यतिरिक्त काहीही घातलेले मला आवडत नाही.

अलीकडेच एका कुकरी शोमध्ये बिसी बेळे हुळी अवलक्की असा पदार्थ पहिला. बि.बे.अन्नपेक्षा झटपट झटपट होत असावा.
आमच्या ऑफिसात पोहे भरून केलेले पट्टी समोसे मिळत. पण ते प्रचंड तेल प्यालेले असायचे.
पुरणाचे पोहे अशीही कृतीही वाचलेली आठवते.

दिनेशदा करेक्ट! माला आठवत होत लोकसत्तात वाचलेल पण नक्की संदर्भ नव्हता...
अरे गोपाळकाला कसा काय मिसला?
भिजवलेले पापो + दही + शेंगदाणे + भि. ह. डाळ + बा चि ही मी + को + लिंबाचं गोड लोणचं + थोडं आंब्याच जुनं लोणचं लागली तर साखर अन मीठ वर डाळिंबाचे दाणे + अजून कुठल फळ बारीकचिरलेलें... सगळा काला करायचा अप्रतीम चव... आता आठवून सुद्धा नळ सुटलेत तोंडाला... Happy

पोहे भाजून मग मिक्सरमधून त्यांची पावडर करून ठेवायची. जेव्हा गरज असेल तेव्हा एक चमचा ती पावडर आणि गरम्/कोमट दूध आणि साखर एकत्र करून खावं. जबरदस्त लागतं. मात्र पोह्याची पावडर नंतर फुगत जाते त्यामुळे नंतर अजून थोडं थोडं दूध घालत जावं लागतं.

मामी, सोडे घातलेल्या पोह्याची आठवण कशाला काढली? आईसारखे मला अजूनही जमत नाहीत.
तेल तिखट वाले पौर्णिमाने सांगितलेले पोहे माझेही लाडके. आमच्या घरात सगळेच पोहे फॅन.

भिजवलेले पापो + दही + शेंगदाणे + भि. ह. डाळ + बा चि ही मी + को + लिंबाचं गोड लोणचं + थोडं आंब्याच जुनं लोणचं लागली तर साखर अन मीठ वर डाळिंबाचे दाणे + अजून कुठल फळ बारीकचिरलेलें... <<< आता बास कराल का? Proud

गिरगांवात [ प्रार्थना समाज जवळ ] फार पूर्वीं कुळकर्ण्यांचं हॉटेल होतं. शाळा-कॉलेजच्या दिवसांतली तिथल्या वांगीपोह्यांची चव जीभेवर रेंगाळत होती म्हणून प्रयोग करून ती चव आणायला जमते का पाहिलं व बरचसं जमलंही -
जीरा-हिंग फोडणी करून त्यांत दोन बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व तीन वांग्यांच्या फोडी टाकून वर गोडा [काळा] मसाला, किंचित गूळ, मीठ व थोडं पाणी घालून चांगलं शिजवायचं [किंचित पातळसर लगदा होईपर्यंत ]. मग त्यांत भिजवून निथळलेले पोहे [जाड]-तीन मोठ्या वाट्या भरून-, कोथिंबीर घालून हलकेच व्यवस्थित ढवळून एकत्र करायचं. मंद आचेवर तीन-चार मिनीटं ठेवून मग, त्यांत हवं असेल तर लिंबू पिळून, गॅसवरून उतरावयचं. सर्व्ह करताना नारळाचं किसलेलं खोबरंही चालतं पण मला स्वतःला नाही आवडत.
पोह्यांचा माझा अतिशय आवडता प्रकार, कदाचित लहानपणींच्या आठवणी निगडीत असल्यामुळेही असेल !!

मस्तं धागा. आपुनभी पोफॅ. पोह्याचा कुठलाही (तिखट) पदार्थ भारी लागतो.

केळं-गूळ्-पोहे एकत्र करून त्याच्या थापलेल्या वड्या बघितल्यापासून गोड पोह्यांची धास्ती बसली.

पातळ/जाड पोहे भिजवून घ्यायचे. MTRचा पुळिओगरेमसाला लावून खायचे. भन्नाट लागतात.

पातळ/जाड पोहे भिजवून घ्यायचे....... <<< मलाही हे आवडतं.

आणि दुसरे एक - पोहे फार नाही भिजवायचे, नुसता वरून पाण्याचा शिंतोडा द्यायचा. फक्त हाताला ओलसर लागले पाहिजेत. त्यात मोठ्या दाण्यांची थोडीशी साखर मिसळायची. हा प्रकारही अगदी दोन मिनिटात पोटभरी पाकृ प्रकारात. शिवाय जास्त भांड्यांची मांडामांड आणि धुवाधुवी नाही. Proud

मी पण, मी पण.
फोडणीचे पोहे, दही पोहे, दडपे पोहे, तेल तिखट पोहे ह्या व्यतिरिक्त काही प्रकार खाल्लेले नाहीत.
फोडणीच्या पोह्यांत मात्र कांदा, बटाटा ह्याबरोबरीने कोबी हवाच हवा. मस्त मऊ होतात पोहे.

पोह्याचा अजुन एक झटपट प्रकार -पातळ पोहे भाजुन त्यात तेल, मीठ, लाल तिखट्,साखर घालुन खाणे.
पातळ पोहे भाजुन त्यात फरसाण किंवा भेळेसाठी वापरतो ती शेव, एखादी बारीक चिरलेली हि.मिरची.
बिरडे+पोहे,
मटण / चिकन चा पात़ळ रस्सा + पोहे ( आमच्याकडे मटण, चिकन करताना नारळ वापरत नाहीत. फक्त भरपुर कांदा,आले,लसुण वापरतात, त्यामुळे रस्सा पातळच असतो.
नारळ पोहे- खवणलेला ओला नारळ,पातळ पोहे,साखर ,मीठ,बारीक चिरलेली हि.मिरची
दडप्या पोह्यासाठी पोहे ताकात भिजवलेले मला खुप आवडतात.
माझ्या सासुबाई पोह्याचा चिवडा करताना त्यात वाटलेला हिरवा मसाला( हि. मिरच्या,कोथींबिर्,आले,लसुण) वापरायच्या मस्त झणझणीत व्हायचा,.रंगही हिरवा यायचा.

नाहीच रहावलं मला. आता डिनरला पोहेच केलेत!!!
कांदा गाजर दाणे, फ्लावर जे होतं नवत त ढकलंय. वर एक ऑम्लेट पण भिरकवलं. जबरीच लागतंय प्रकरणं... Happy

मटार पोहे,ब कां.पोहे. मयेकरांनी सांगितल्याप्रमाणे गूळ- पोहे त्यात साजूक तूप.
नारळाच्या दूध्+गूळ्+वे. पा.मधील पोहे हा कोकणातील अजून एक प्रकार.

आम्ही पण पोहे फ्यॅन !
फोडणीचे पोहे आठवड्यातून दोनदातरी होतात घरी, दडपे पोहे, दही पोहे हे पण आवडतात,,
कोळाचे पोहे कोणी खाल्लेत का? नारळाचं दुध आणि चिंच घालून.. अप्रतिम लागतात!
नानबाच्या रेसिपीने पोह्यांची उकडपण भारी होते !

मेघना भुस्कुटेच्या ब्लॉगवरची ही लिंकपण पहा.. http://khaintartupashi.blogspot.in/2009/04/blog-post_30.html

मी पण पोहे फॅनक्लब मध्ये .
शेलाट्या बांध्याचे पोहे >>> हायला पोहे पन सेक्सी असतात माहित नव्हतं , हे भगवान उठाले ! Proud

आम्ही पण पोहे फॅन !!!
पण लाल पोहे जास्त आवडतात. नविन भाताचे लाल पोहे सर्वात टेस्टी असतात. खास नविन लाल पोहे आणायला पुढच्या महिन्यात गावी जाणार आहे.
लाल पोहे पाण्याने एकदा धूवून घ्यायचे + किसलेल गूळ + ओल खोबर हव तर सा. तूप. सर्व मिक्स करा. कधीही न बिघडणारा सोपा पदार्थ.. Happy
फोडणीचे पोहे माझे बिघडतात त्यामूळे ते क्वचितच केले जातात.

आपून भी पोफॅक्ल मे!

वर लई पदार्थ आलेच आहेत
त्यात भर -
पोह्याची खीर ( हे दूध साखर पोह्यांपेक्षा भारी लागत. इतर खिरींपे क्ष. करायला सोपं पडतं म्ह्णे. पोहे विरघळले की दाटपणा येतो . पोह्यांच्या अंगच्या चवीमुळे छान लागतं)

पोह्याची थालपीठं - किसलेला बटाटा, भिजवलेले पोहे, हिरवी मिरची, जीरं, मीठ, दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून.. थापून... आहाहा.. तेल पि तात मात्र ही थालपीठही..

नानबा, तुझ्या पोह्यांच्या उकडीची लिंक दे की इथे. मला ब्रेकफास्टला खायला खूप आवडते ती पोह्यांची उकड.

मी पण या पोहे फ्यान क्लबची सदस्य होउ इच्छीते. वरील सर्वच प्रकारचे--''फोडणीचे पोहे, दडपे पोहे, वेगवेगळ्या भाज्या घालुन केलेले पोहे मला आवडतातच.याशिवाय आमच्या येथे हनुमान-जयंतीला प्रसाद म्हणुन कुरकुरीत पोहे + साखर + ड्राय फ्रूट वाटतात.तेही खुप छान लागत. पोह्याचा गोपाल-काला तर अप्रतिम. याशिवाय मला पोह्याचे लाडुहि खूप आवडतात.
क्रुती--
पोहे मा. वे. त भाजुन मिक्सरवर बारीक करुन घ्यायचे. त्याच्या निम्मे कणिक तुपात भाजुन घ्यावी. त्यात पोह्याच पीठ मिसळायच. थोड थंड झाल कि त्यात पिठी साखर, ड्राय-फ्रूट ,भाजलेली खसखस ,जायफळ-वेलदोड्याची पावडर घालून लाडू वळायचे. डिंकाच्या लाडुसारखेच लागतात.
मला तर फार आवडतात.

लहानपणी आई अवीट चवीचे तोंडली पोहे करायची त्याची रेसिपी:
बागेत जाऊन तोंडल्याच्या वेलीवरून अगदी कोवळी तोंडली तोडून आणा. येता येता बागेतलाच कढिलिंबही आणा २ काड्या तोडून.
मग तोंडली अगदी पातळ चकत्या करून फोडणीत घाला. यात कांदा नको. फोडणीत नेहेमीप्रमाणे मोहोरी, जिरे, हळद आणि भरपूर हिंग घाला. तोंडली शिजल्यावर भिजवलेले पोहे, मीठ, लिंबू, वरून खोबरं कोथिंबीर इ.इ.
व्वा अजून चव तोंडात आहे!

आपण पोहे चर्चा करतोय, नवरा माझा कोकणात गेला होता, माझ्यासाठी खाऊ म्हणून पोहे घेऊन आला, लाल तांदुळाचे नाहीयेत पण पोहे एकदम चविष्ट. मी नुसतेच खातेय येता-जाता.

वा, मानुषीताई कोवळ्या तोंडल्याचे पोहे. अरेरे नवऱ्याने गावाहून तोंडली आणली असतीतर बहार आली असती.

पोह्याचे वडेपण मस्त होतात बेसन आणि कांदा घालून, तेलकट होतात जास्त त्यामुळे मी क्वचित करते. नवऱ्याला जास्त करून गुळ, ओले खोबरे घालून पोहे जास्त आवडतात. मी गोड नाही खाऊ शकत नाही जास्त.

पोहे मला कधीही चालतात. सकाळ, दुपार, सन्ध्याकाळ. दिवसातलं कोणतं ही मिल मी पोह्याने करु शकते. पण मी फक्त कांदे/बटाटे/मटार पोहे बनवते किंवा पोह्याचा चिवडा. वरचे इतके प्रकार बघुन ट्राय करावेसे वाटतेय

आदिती, सेम हियर. पोहे कधीही चालतात आता इथे मध्यरात्र आहे आणि मी पोहे खाणार आहे फक्त मी तिखट पोहे खाऊ शकते, गोड घालून नाही. हा नुसते पोहे खायला चवीने किंचिंत गोडसर चालतात.

Pages