पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नाही वाटत तो मसाला म्हणाजे चटणीपुडी. घरच्या पुडीचा रंग वेगळा आहे. तितका लाल नाही.
इथल्या कोणालातरी नक्की माहिती असेल चटणीपुडी म्हणजे काय ते. गनपावडर आणी चटणीपुडी सेम की वेगळे हा ही प्रश्न मला आत्त्ता पडला आहे.

चटणीपुडी !!!!
वाह ऐकूनच तोंपासु !!!

पोहे कालवावेत तर चटणीपुडीत मी अनेकदा खाल्ले आहेत

माझ्या माहीतीप्रमाणे ही उडदाच्या डाळी आणि अजून एक दोन प्रकारच्या डाळीपासून बनवतात काहीजण फुटाण्याची दाळ (दाळे ) देखील घालतात बहुधा प्रमाण माहीत नाही तिखटपणासाठी लाल तिखट हळद घालतात बहुधा पण ह्याची खास चव त्यात वापरलेल्या चिंचेमुळे असते हे नक्की ही पूड माझी फेव्हरिट आहे चटणीपुडीत कालवलेल्या पोह्यासारखे मस्त पोहे दुसरे कसलेही लागत नाहीत
पण हे पोहे कालवण्यापूर्वी जरा कुरकुरीत भाजून घ्यायचे असतात मग फारच मस्त लागतात आवडत असेल तर चटणीपुडी आणि मेतकुट मिक्स केले तर स्वर्ग केवळ दोनच बोटे !!

कुणाला डीटेल माहीत असल्यास प्लीज सांगावेत

अहो वै व कु, तुम्हीच सांगितलेत की एवढे डिटेल्स Happy
अगदी असेच्च कालवलेले पोहे आहेत माझ्याकडे चिक्कार.

म्हणजे युनाइटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस.
शूम्पीकडचे (तिला विशेष न आवडणारे आणि चिक्कार) पोहे तिने मला पोस्टाने पाठवावेत अशी सूचना केली आहे. Proud

ओक्के
मग पाठवा के मला तुमच्याकडचे पोहे माझा सध्याचा पत्ता ....
सर्व्हे नं .१२७/४/२२ .
रीलाय्बल सर्व्हिस सेंटर
पाषाण सूस रोड ,पाषाण पुणे ४११००२१
महाराष्ट्र .
भारत
Happy

अहो इबा तुम्हाला पोहे पाठवले तर मला साबा काय म्हणतील (एवढे त्यांनी लाडक्या लेकासाठी केलेले)? मी हवं तर तुम्हाला चटणीपोडी पाठवू शकते (लपवून)

शूम्पी, मै भी हूँ लाईनमें .. Wink

आता आली होतीस तेव्हाच घेऊन येता आले असते ना .. Lol

(साबा फक्त लेका नेच खावे अशी सक्तीची पुणेरी पाटी लावून देतात का पोह्यांच्या पिशव्या? :हाहा:)

सशल शूम्पीकडुन तिच्या साबांचा संपर्क घे आणि सांग की चांगले झालेत पोहे शूम्पीने आम्ही नको म्हणत असताना पण अर्धे अधिक आम्हाला दिले Wink Lol

Hi ashi aste ka, shoompi? Mala ikade Indian store madhye milali aahe ek.

Ingredients are: urad dal, chana dal, tamarind, red chilli,garlic, cumin, coriander, curry leaf.

IMG_20131205_123408.jpg

अंजु, गव्हाच्या पोह्यांचे दडपे पोहे पण छान लागतात, पण त्याला थोडा पाण्याचा हबका द्यायचा, कारण ते कडक असतात जरा!! केल्यावर सांग कसे झाले ते!!!!!

चटणीपुडीवरून आठवलं, आई बर्‍याचदा मेतकुट, तिखट आणि पुडचटणी घालून पोहे करायची. या सामानाबरोबरच पोह्यात मीठ, कच्चं तेल, साखर, लिंबुरस, भाजलेले शेंगदाणे आणि कच्चा कांदा. अजून खमंग करायचे असतिल तर एखादा उडदाचा पापड भाजून यात चुरायचा.

अशात आईनी, मेतकुट, पुडचटणी बनवणं बंद केलंय. तिची रेसेपी घेवून यायला हवी.

हो. पातळ पोहे. ज्यांना पातळ पोहे चावताना चिवट वाटतात, अश्यांनी थोडे भाजून घेतले तरी चालतिल. मला कच्चेच आवडतात.

मी काल संध्याकाळी, तांदुळाचे पफ पोहे (रोचीन यांनी सांगितलेले), त्यात कांदा, टोमाटो, तेल, तिखट, मीठ, मिरची, कोथींबीर घालून खाल्ले, आवडले मला.

नाश्ता पोहे - तयार कांद्याबटाट्याची भाजी + फ्लॉवर + शेंगदाणे तळून + एक्सेस कोथिंबीर... वर चहा २ दा. विकांताची मस्त सुरुवात... Happy

आज लंचला पोहे आहेत. त्यात कांदा, बटाटा, फ्लॉवर, गाजर, मटार, मक्याचे दाणे, टोमॅटो आणि वांगी आहेत. वरून तळलेले शेंगदाणे. बरोबर हिरवी चटणी - फक्त कोथिंबीर, थोडा लसूण, मिरची आणि लिंबू घालून केलेली.

Pages