पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
लहान्पणी माझ स्वप्न होतं
लहान्पणी माझ स्वप्न होतं पोह्याच्या शेतकर्याशी लग्न करायच. पोहे शेतात उगवतात असा समज होता तेव्हा.>>>
लहान्पणी माझ स्वप्न होतं
लहान्पणी माझ स्वप्न होतं पोह्याच्या शेतकर्याशी लग्न करायच. >>>>
इन्नाला 'पोहे फॅन नं. १' चा किताब द्या!
इन्ना, पोह्यांचा शेतकरी>>
इन्ना, पोह्यांचा शेतकरी>>
मामी ,
मामी ,:इश्श:
पोह्यांचा शेतकरी सुप्रसिद्ध
पोह्यांचा शेतकरी
सुप्रसिद्ध इंदोरी पोहे, नागपुरी तर्रीवाले पोहे वगैरे खाऊनही मला पुण्याचेच टपरीवर मिळणारे साधे पोहे जास्त आवडतात. (गरवारे कॉलेजसमोर्च्या टपरीवरचे).
चिमुरी, इंदोरी पोहे म्हणजे वाफेवर मऊ करायचे, त्यात मीठ-साखर-हळद-बडीशोप-हि.मिरची घालून वरुन अगदी कमी तेला ची हिंगाची फोडणी द्यायची. वरुन जीरावन पावडर, बारीक कांदा, कोथिंबीर, रतलामी किंवा इंदोरी शेव अन डाळिंबाचे दाणे घालायचे. ही बेसिक रेसिपी.
पोह्याच्या शेतकर्याशी लग्न
पोह्याच्या शेतकर्याशी लग्न करायच >>>>
भारी फॅन क्लब. मी पण मी पण.
नागपूरचे माझे दीर चना पोहे
नागपूरचे माझे दीर चना पोहे करायचे. काळ्या हरभर्याची मसालेदार उसळ करून ती कान्दे बटाटे घालून केलेल्या पोह्यावर घालून द्यायची. वर भरपूर कोथिम्बीर नि लिम्बाचा रस घालायचा. सही लागतात.
मामी वांगी घालुन करुन बघणारच
मामी वांगी घालुन करुन बघणारच आता.
बरं, दडपे पोह्यात कांदा,टोमॅटो, काकडी कोचुन, ओले खोबरे, भाजके दाणे, कोथिंबीर, लिंबाचा रस व उडीदाची फोडणी ह्या combination शिवाय अजुन काही वेगळे combination कोणी वापरत असेल तर प्लिज लिहावे.
सुनिधी कैरीच्या दिवसात दडपे
सुनिधी कैरीच्या दिवसात दडपे पोहे करतांना, लिंबाऐवजी कैरीचा कीस घालून बघ, मला आवडतात. आम्हीतर कैरी, कांदा, ओले खोबरे आणि तेल, तिखट-मीठ, हवा असल्यास तळलेल्या पोह्याचा पापड घालून मस्त तिखट पोहे करतो, फोडणीपण घालत नाही, मस्त लागतात.
मटण घालुन कोणी पोहे केलेत का
मटण घालुन कोणी पोहे केलेत का ?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=TB7pR5kIy18
यम्मी मलाही आवडतात पोहे....
यम्मी
मलाही आवडतात पोहे.... पण अगदी खेतान फॅन नाही.... जपानी पंखा म्हणा हवा तर
http://www.maayboli.com/node/38278 इथे गोड पोहे बेक....
मस्तच हा बाफ आज वाचल्यावर
मस्तच
हा बाफ आज वाचल्यावर आधी पोहे केले. वांगी पोहे पण मस्तच लागतात, खूप छान आठवण दिलीत मामी वांगी पोह्यांची. (कृष्णा काठची वांगी घातलेले पोहे)
श्री, मटण घालुन पोहे नाही
श्री, मटण घालुन पोहे नाही केले कधी ,पण पातळ पोह्यांवर शिजवलेले मटण/ चिकन घालुन नेहमी खाते. मस्त लागतात असे पोहे.
काय सुन्दर बाफ आहे....मी पण
काय सुन्दर बाफ आहे....मी पण पोहे क्लब ची खूप मोठी फॅन आहे ..:)
माझे खास घरगुती पोहे- दूध पोहे
जाड पोहे भिजवून त्यात दूध, मीठ घालायचे आणी वर जीरे, मोहरी, तळलेल्या मिरच्याची फोडणी..अप्रतीम सुन्दर लागतात..!!
अरेच्च्या दगडी पोहे नाही खात
अरेच्च्या दगडी पोहे नाही खात का कुणी? (एक प्रकार राहिला होता म्हणुन अॅड केला)
मला पण पोह्याचे सर्व प्रकार
मला पण पोह्याचे सर्व प्रकार आवडतात. दडपे पोहे सगळ्यात जास्त.
हे आमचे दहि-पोहे. लेकाच्या शाळेत नो फायर कुकिंग ची स्पर्धा होती त्या साठी केले होते.
मस्त दिसतोय पूर्ण सजवलेला
मस्त दिसतोय पूर्ण सजवलेला ट्रे! सफरचंदाचा पक्षी पण मस्त! ते सिमलामिरचीचं काये?
बेडुक बहुतेक
बेडुक बहुतेक
सिकेपी घरात सोडे किंवा सुकट
सिकेपी घरात सोडे किंवा सुकट घातलेले पोहे हमखास होतात. त्याची मजा औरच.
मॅक्सा मला माहीतिये पण एकदम
मॅक्सा मला माहीतिये पण एकदम बेडूक / खेकडा म्हटलं असतं तर बरं नसतं दिसल म्हणून फोटो पोस्ट्णारीलाच विचारलं...
प्राची.. मस्त दिसतोय सजवलेला
प्राची.. मस्त दिसतोय सजवलेला ट्रे!
पोह्यांमध्ये उकडलेलं अंडं आणि
पोह्यांमध्ये उकडलेलं अंडं आणि / किंवा ग्रिल्ड चिकन मस्त लागतं.
मॅक्सा मला माहीतिये पण एकदम
मॅक्सा मला माहीतिये पण एकदम बेडूक / खेकडा म्हटलं असतं तर बरं नसतं दिसल म्हणून फोटो पोस्ट्णारीलाच विचारलं... >>> मग म्हणायचं की तो मोर कित्ती सुंदर दिसतोय!
मस्त दिसताहेत दडपे पोहे.
पोह्यांचा शेतकरी, इन्ना रावण
पोह्यांचा शेतकरी, इन्ना

रावण पोहे राहिले की यात. मी पोहे फॅन नाही
नताशा धन्यवाद.. म्हणजे इंदोरी
नताशा धन्यवाद.. म्हणजे इंदोरी पोहे करताना ते आधी नेहमीसारखे परतुन नाही घ्यायचे का? की परतुन झाल्यावर वाफेवर करायचे परत? डिटेल रेसिपी लिहा की कोणीतरी प्लीज
इंदूरी पोह्यांच्या कृतीची ही
इंदूरी पोह्यांच्या कृतीची ही लिंक
http://jayawagle.blogspot.in/2010/01/indori-kande-poha-and-battle-of-sex...
आधीच्या पानावरही दिली होती.
अरुंधती कुलकर्णी यांनी दिलेली पद्धत :
http://www.maayboli.com/node/38475?page=23
पण इंदूरी पोह्यांवर खोबर्याऐवजी शेव जाडी, बारीक, झणझणीत तिखट, कशीही पण शेव मस्ट. रतलामी शेव असेल तर मज्जा.
आमच्याकडे वेगळ्या प्रकारे
आमच्याकडे वेगळ्या प्रकारे करतात दडपे पोहे.
पातळ पोहे नारळाच्या पाण्याने भिजवून घ्यायचे. मग वरून मीठ, पादेलोण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडे आले किसून, ओले खोबरे घालून मिक्स करायचे आणि दडपून ठेवायचे थोडा वेळ. नारळाचे पाणी आणि खोबरे यामुळे मस्त मऊ होतात पोहे. पण हे लगेच खायचे केल्यावर. सकाळी केलेले दुपारपर्यंत कडक होतात.
खेकड्यासारखे पाय असलेला
खेकड्यासारखे पाय असलेला बेडूकच आहे तो
धन्यवाद मयेकर
धन्यवाद मयेकर
Pages