पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा पोहे माझे पण फेवरेट !!

नेहमीचे कांदे पोहे , बटाटे पोहे आवडतातच. त्या वर ओलं खोबरं , कोथिंबीर , लिंबू मस्ट ! मस्त तळलेले भरपूर दाणे हवेतच.

माझी आई हे पोहे मस्त करते.
पातळ पोहे एका कुंड्यात घ्यायचे. त्या मध्ये तेल , बारीक चिरलेला कांदा , कांदा-लसूण मसाला , भरपूर शेंगदाणे ,थोडं मीठ टाकायचे आणि मस्त एकजीव कालवायचे.एकही पोहा पांढरा नाही दिसला पहिजे. मस्त चमचमीत लागतात हे पोहे. पाहिजे तर वरून दही घ्यायचं.
कांदा-लसूण मसाला नसेल तर नेहमीचा गोडा मसाला आणि थोडं तिखट टाकायचं.

नारळाच्या पाण्यात भिजवलेले दडपे पोहे एक नंबर लागतात .

बस्कू करून बघ तोंडली पोहे. तोंडली न आवडणारांनाही हे पोहे आवडतील.
अन्जू ........कोकणातल्या पोह्यांची काय चव असते........अप्रतीम! किंचित गोडसर.

अपून भी इस क्लब मे!

दडपे पोहे, कांदे पोहे, बटाटा-मटार पोहे! वर लिंबू+कोथिंबीर्+खोब्रे.....

घरात पोहे, रवा, तूप संपत आलं की मला अस्वस्थ व्हायला होतं!

प्राची, प्रतिसादात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारांची कृती एकत्र करून वरच्या हेडरमध्ये देणार का, प्लीज?

अहाहा, काय पण भूक चाळवली गेलीये! पोहे म्हणजे माझा जीव की प्राण! साधे कांदेपोहेही आवडतात. इथे इंग्लंडमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा मिळातो. त्याचे दोन तुकडे (दोन टीस्पून) मसाल्यात टाकतो. मग पोहे खातांना तोंडात जो भडका उडतो त्याला तोड नाही! हे पोहे तीनदा तिखट लागतात. चावतांना, गिळतांना आणि...! तेव्हा तब्ब्येत सांभाळून खावे लागतात.
-गा.पै.

मी पण मी पण... पोहेफॅनपण व कुलकर्णीपण. Happy

दडपेपोहे उरले तर त्यात अजुन काहीही न घालता आहे तसेच मऊ मळुन केलेले पॅटीस भन्नाट होतात.

पहिल्या पानावर प्राचीने दिलेले मेतकूट पोहे केले आज. मस्स्त चमचमीत झाले.

भारी भारी रेसिपी आल्यात इथे Happy

दही पोहे नाही लिहिले कोणी? दही मस्त अधमुरं लागलं असेल तर एक नंबर होतात दही पोहे.

कालच ब्रेफा ला वांगी, बटाटे, कांदे, टोमॅटो पोहे केले होते. दिल खुश हो गया. फोडणी करून त्यात वांग्याच्या आणि बटाट्याच्या चकत्या परतून एक वाफ काढून शिजवल्य. नंतर बाकी जिन्नस घालून शिजवले आणि मग पोहे घालून एक छोटीशी वाफ आणली.

वा!! काय मस्त बाफ... बाफची प्रस्तावनाही लई भारी आहे.

माझ्या आजोळी पुर्वीच्या काळी दिवाळीच्यावेळी पहिली आंघोळ झाल्यावर फराळाबरोबर पोह्यांचं नवं करायचे म्हणे. म्हणजे घरचे नवे पोहे आणि त्याचे निरनिराळे प्रकार. त्यात दहीपोहे हे सर्वात शेवटी खातात. आधी कोळपोहे, मग दोडक्याचे पोहे, मधे अजून कसल्या नवलाईचे पोहे आणि सर्वात शेवटी दहीपोहे. यात अधेमधे फराळही असायचा.

वांगी घालुन कधीच केले नाहियेत. आता नक्की करुन पाहणार. बाकी पदार्थात काही वेग़ळे घालायचे का गं मामी?

माझ्या घरातही पोहे १२ महिने असतात. अगदी चहापावडर-साखर सारखे.
चहा पोहे, कांदा पोहे, पोह्याचा चिवडा, पापड चुरुन, पोहे भाजुन पोह्याची भेळ हे आमच्या घरातले आवडीचे पोह्याचे प्रकार.
मी एकदा मुग-पोह्याचे लाडूही केले होते.

तळून घेतलेले पोहे, सुके खोबरे, डाळे, दाणे गुळाच्या पाकात मिक्स करून लाडू वळायचे आणि मग खसखशीत घोळवायचे.
एकदम यम्मी लागतात.

भुजिंग विसरू नका. पोहे + चिकन = भुजिंग>>>> मामी .... भुजिंग गटग आठवलं ..... एअक्दम सहीच लागतात आनि पोहे पण बटाटे पोहे आणि बटाटा ही चिकन सारखाच रोस्ट केलेला असतो त्यात....

पोहे हा कोणत्याही सुगृहिणीच्या घरातला अविभाज्य घटक! 'कुमठ्याचे पोहे/कालयिले पोव्हू 'हा पोह्याचा प्रकार शिल्पाच्या www.Aayi'srecipes.com वर मिळाला!करून बघितला. खूप छान आहे.

बाकी पदार्थात काही वेग़ळे घालायचे का गं मामी?

>>> नाही. वांगी जरा खरपूस तळून घे. जे काही फोडणीचं तेल आहे त्यातच. आणि मग एक छोटीशी वाफ घे. पुन्हा कांद्याबरोबर आणि मग पोह्याबरोबर शिजणार आहेतच. पाणी घालू नकोस.

नमस्कार. मला पण पोहे खूप आवडतात. आमच्या आईने शिकवलेला एक प्रकार. पोहे नेहमीच्या तुपात तळून चाळणीत काढायचे. थोडे कोंबट असतानाच त्यात खवलेले ओले खोबरे आणि पिठीसाखर mix करायची चांगली आणि चवीला चिमुटभर मीठ पण घालायचे. गरम गरम असताना खाल्ले कि खूप छान लागते.

तळलेल्या पोह्यांना पादेलोण, मीठ, पिठीसाखर लावून एअरटाइट डब्यात भरून ठेवायचे.
खाताना वरून ओले खोबरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून खायचे.

तळून घेतलेले पोहे, सुके खोबरे, डाळे, दाणे गुळाच्या पाकात मिक्स करून लाडू वळायचे>>> त्यात आले टाकले की
मस्त लागतात. आईच्या हातचे खाऊन बरीच वर्षे झाली.

मी पण पोहे फॅन....
ए जागु मी या दिवाळीला केलेले तुझ्या रेसिपिने मुग पोहे लाडू. मस्त झालेले!

दडपे पोहे/ चिवडा/ ते ति मी पोही टाइपचे कुठलेही पोहे आणि वरून गार्निशसाठी संत्र्याच्या फोडींचे तुकडे असं खाऊन पाह्यलंय का?
भन्नाट लागतं तेही.

फोडणीच्या पोह्यांवर / दही पोह्यांवर तळलेली मिरगुंडं / तळलेले बटाटा पापड चुरडून घालायचे - मस्त लागतात.
शेव, तिखट बुंदी, बिकानेरी शेव इत्यादी प्रकारही पोह्यांवर भुरभुरून मस्त लागतात.

निशामधुलिकाच्या ब्लॉगवर पोह्यांची एक वेगळी रेसिपी आहे. त्यात भिजवलेल्या जाड्या पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ-साखर मिसळून ठेवायची. फोडणीत मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची व हळद घालायची. मटारचे दाणे घालून वाफ आणायची. त्यात भिजलेले पोहे आणि किशमिश (बेदाणे) घालायचे. जरा परतून एक वाफ आणायची. वरून तळलेले दाणे, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून सर्व्ह करायचे.
ज्यांना कांदा हवा असेल ते पोह्यांवर बारीक चिरलेला कांदा घालून खाऊ शकतात.

पारंपारिक पोह्यांची चव तर सगळ्यांनीच अनुभवली आहे. पण काहीतरी नविन चव आवडणार्यांसाठी हे वेगळ्या पध्दतीने केलेले पोहे आहेत. माझी एक मैत्रिण जी मूळची इंदौरची असून बनारसची सून झाली आहे, तिच्याकडे खाऊन बघितलेला हा एक प्रकार . खास थंडीमध्ये हा प्रकार केला जातो तेव्हा मटार स्वस्त झालेले असतात. लवंग, दालचिनीचे सेवन करू शकतो.

साहित्य - जाडे पोहे २ वाट्या, लांबट कापाची वांगे १ १/२ वाटी, मटार, दालचिनी, लवंग ,आले, हिरवी मिरची, जीरे, हिंग, तेल,तूप ,कोथिंबीर , मीठ, लिंबू.

कृती - वांगी साल काढून बारिक चिरून घ्यावीत. एका पातेल्यात २ चमचे तेल व २ चमचे तूप एकत्र गरम करावे. प्रथम जिरे,हिंग (व्यवस्थित) घालावे. तडतडल्यावर २ मिरच्या व पाव इंच आले वाटून घालावे. दीड वाटी वांगे असल्यास एक वाटी मटार घ्यावेत. फोडणीत आधी वांगे टाकावे त्यावर मीठ टाकावे. थोडे बोटचेपे झाल्यावर डावानेच मॅश करून घ्यावे. नंतर मटार घालावेत. परत एक वाफ काढावी. लवंग-दालचिनीची पावडर घालावी.

वांगं व मटार एकत्र मिळून आल्यावर भिजवलेले पोहे घालावेत. चव घेऊन मीठ घालावे. एक वाफ काढावी. उतरताना कोथिंबीर व लिंबू घालून वाढावे.

(याचा रंग आपल्या पोह्यांसारखा पिवळाधम्मक येत नाही, त्यामुळे रंगावर जाऊ नका)

अरुंधतीने आआपातल्या कुठल्यातरी बाफवर इंदोरी पहुआची पाकृ दिली आहे.
काही पोह्यांना तेल खूप घालावे लागते, नाहीतर दणदणीत वाफ काढूनही त्या पोह्यांचा तोठरा बसतो. अश्या पोह्यांना इंदोरी पहुआची कृती लागू पडते. नेहमीसारखे कांदेपोहे-बटाटेपोहे-मटारपोहे इत्यादी प्रकारचे फोडणीचे पोहे करायचे. आणि ती पोह्यांची कढई उकळत्या पाण्यावर ठेवून द्यायची. कढईवर झाकण ठेवायचे. पोह्याचा दाणा न् दाणा मसत उमलून येतो. आणि मस्त अलवार असे पोहे होतात.

अहाहा पोहे!
कच्चे जा पो वाटीत घालून खाणे हे माझे कम्फर्ट फूड. Happy लहान्पणी माझ स्वप्न होतं पोह्याच्या शेतकर्‍याशी लग्न करायच. पोहे शेतात उगवतात असा समज होता तेव्हा.
कोकणातल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाबरोबर विविध प्रकारचे पोहे करायची प्रथा आहे. पुण्यातही ती चालू ठेवली आहे (स्वार्थ दुसर काय Wink ) कोळाचे (शिवराक) पोहे, तळून पोहे पिठीसाखर पेरून, ओल खोबर गूळ बरोबर कालवलेले पोहे, दडपे पोहे . इतके मिनिमन प्रकार असतात त्या दिवशी.
इथल्या नविन रेस्प्या ट्राय करायला पाहिजेत आता. Happy

Pages