पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
भाजक्या पोह्यात सातूच पीठ
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार. उन्हाळ्याच्या दुपारचा हिट्ट प्रकार. तसा कधीही करता येतो. नाश्त्याला बेस्ट.
कोकणात दिवाळीचा पहिला दिवस हा
कोकणात दिवाळीचा पहिला दिवस हा चावदिस असतो. नुकत्याच हाती आलेल्या भातापासून केलेल्या पोह्यांचे वेगवेगळे प्रकार केले जातात.
त्यातले आम्ही फक्त गोडाचे पोहे करतो.
जाद पोहे धुऊन त्यात बारीक चिरलेला गूळ आनि ओले खोबरे हाताने नीट मिसळून त्याचे मूद पाडून स्वाहा करणे.
माळव्यात ठेल्यावर मिळणार्या पोह्यांची कृती अकुंनी दिली होती.
इंदूरातल्या घरगुती पोह्यांची कृती
एका छोट्या बाउलमध्ये ताजे मायक्रोवेव्ह केलेले पातळ पोहे, चिमूटभर साखर आणि १ टीस्पून ताजे भाजलेले शेंगदाणे हे माझे कम्फर्ट फूड आहे. कच्चे पोहे +कच्चे शेंगदाणे हेही चालतात.
फर्साण मिक्स करून खायचे असतील तर कुरमुरे लागतात.
कोणे एकेकाळी दूध्+साखर्+पातळ पोहे किंवा चहा+पातळ पोहे आवडायचे.
झटपट होणारा अजून एक प्रकार
झटपट होणारा अजून एक प्रकार -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
एका ठिकाणी जास्त तेलाची
एका ठिकाणी जास्त तेलाची फोडणी- हिरव्या मिरच्या वापरून केलेली पातळ पोह्यांवर ओतून त्याला कच्चा चिवडा म्हणून पेश केलेले पाहिले आहे. पोहेच आहेत त्यामुळे वाईट नाही लागत,
योगेश, एक आमरस पोहे सोडले तर
योगेश, एक आमरस पोहे सोडले तर बाकीच्या कृती मस्त आहेत, लिहून ठेवणार.
आमरसात पोहे वा पोह्यांत आमरस ही कल्पना ऑड वाटते आहे..
मयेकर, मस्त कृती. पटकन होतात हे पोहे आणि गावाकडचे हातसडीचे, लाल पोहे असतील तर मग क्या कहने!
आमच्या मेडिकल कालिजच्या
आमच्या मेडिकल कालिजच्या हॉस्टिलात आम्लेट पोहे मिळायचे... म्हणजे आम्लेट अर्धवट करायचं .. मग त्यात एक डिश पोहे घालून हलवायचं.. आम्लेटाचे तुकडे आणि पोहे छान लागतात.
लक्ष्मी, जरा मला ऑड वाटतोय
लक्ष्मी, जरा मला ऑड वाटतोय प्रकार पण करून पाहीन. पोहे कुठले वापरायचे?
शैलजा करून पहा मस्त लागतं ते प्रकरण. त्या आमरसातच पोहे भिजतात त्यामुळे छानच लागतं. बिहारकडचा हा नाश्ताच असतो म्हणे आंब्याच्या सिझनला खखोदेजा.
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
सॉरी .. डिटेल लिवायचं
सॉरी .. डिटेल लिवायचं राहिलं.
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
जाड पोहे - १ वाटी भाजून
जाड पोहे - १ वाटी भाजून मिक्सर मधे बारीक करायचे.
ह्या पिठात तिखट, मीठ चवीप्रमाणे, थोडा पापाड खार घालायचा.
१ ते १.५ वाटी गरम पाणी - अंदाजाने घालत चांगले मळायचे.
गरम पाण्यामुळे पीठ फुगते. तेलाच्या हातने गोळा तायार करायचा.
छोट्या छोट्या लाट्या करून जाता येता खायला सुरवात करायाची !
(पापडाचे कच्चे पीठ आवडणार्यांसाठी खासकरुन) !
ह्याच पिठाच्या वाळ्वणाच्या चकल्या करता येतात. छान हलक्या होतात तळल्यावर.
मी पण पोफॅक्ल मधे! आत्ता
मी पण पोफॅक्ल मधे!
आत्ता सकाळीच मस्तपैकी गाजर, बटाटा, मटार घालून पोहे हाणलेत.
पोहे हे अल्टिमेट फास्टफूड आहे. कच्चा माल असला तर साधारण १० मि.त अनेक चवींचे पदार्थ झटपट होऊ शकतात..
पोहा भेळ भाजलेल्या जाड्या
पोहा भेळ
भाजलेल्या जाड्या पोह्यात तिखट फरसाण, रतलामी शेव,कैरी, कांदा, उकडलेला बटाटा,चिरलेला टमाटर, तळलेले वाटाणे, आमचूर, कोथींबीर्,उरलेल्या चकलीचे तुकडे, चिचंची चटणी टाकून खा.
(मी खात नाही पण इतर मेंब्राना आवडतात)
वरदा +१ फ्लॉवर घालूनही पोहे
वरदा +१
फ्लॉवर घालूनही पोहे मस्त होतात. फ्लॉवर परतायचा छान मात्र नाहितर जरा उग्रवास ...!
मी पण पोहे फॅनक्लबात. हसू नका
मी पण पोहे फॅनक्लबात. हसू नका पण मला तर फ्लॉवर, गाजर, मटार , बटाटे, वांगी शिवाय कांदा , टोमॅटो, मिरची वगैरे असं सगळं एकावेळी घातलेले पोहे खूप आवडतात.
पोह्यात घातलेले तळलेले शेंगदाणे देखिल लै ब्येश लागतात.
आई च्या हातचे, सोडे घातलेले पोहे तर यम्म!!!!
पोह्यात घातलेले तळलेले
पोह्यात घातलेले तळलेले शेंगदाणे देखिल लै ब्येश >> आजच हे कॉम्बि खाल्ले आहे ऑफिसजवळच्या टपरीत. एकदम सह्ही होते!
माझ्या साबा पोहे+बटाटा मॅश
माझ्या साबा पोहे+बटाटा मॅश करून मटारचे सारण घालून अल्टीमेट पॅटिस करायच्या.. काश मै सीखती!!
सुलेखा यांच्या रेसिपीने
सुलेखा यांच्या रेसिपीने मटर-चिवडा/मटर-पोहे मस्त होतात.
माझी एक मावशी भरपूर कांदा, टोमॅटो घालून पोहे केल्यावर सर्व करतांना परत त्यावर कच्चा कांदा बारिक चिरून देते. तसं पण छान लागतं.
पोहे म्हणजे वरवर पहाता सोप्पा आणि झटपट होणारा ऑप्शन असला तरी माझे पोहे दर वेळेला परफेक्ट नाहीत होत. कधी जास्त भिजले जातात आणि गिजगा होतात तर कधी कोरडे. पोहे साधारण किती वेळ भिजायला हवेत?
दडप्या पोह्यांच्यात,
दडप्या पोह्यांच्यात, कांदेपोह्यांवर किंवा चिवड्यावर डाळिंबाचे दाणे भुरभुरायचे...
आहाहा.. ओहोहो...
मी आहे या फॅन क्लब्मधे.
मी आहे या फॅन क्लब्मधे.
कोळाचे पोहे, दडपे पोहे आणि हच्चीद आवलक्की (प्राचीने लिहिलेले मेतकूट पोहे) माझ्या अतिअवडीचे.
पोह्याचे पॅटिस ही पण एक झटपट आणि यम्मी होणारी पा़ककृती आहे.
मी पण पोहे फॅन क्लबात. इथे
मी पण पोहे फॅन क्लबात.
इथे मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पोह्यांच्या रेसिपीज वाचल्या होत्या. त्यातल्या काही :
मटर चुडा
पौष्टिक पोहे
भिजवलेले जाडे पोहे + खोवलेला नारळ + साखर हे कॉम्बो पण मस्त लागते.
कोमट दूध + साखर + भिजवलेले जाडे / पातळ पोहे हे तर साक्षात कम्फर्ट फूड आहे.
माझी काकू कणीचे पोहे करते. म्हणजे तांदळाची कणी भिजवून, ती फुलवून तिचे नेहमीसारखे फोडणीचे पोहे करायचे. रुचकर लागतात अतिशय!
विदर्भात उन्हाळ्यातला घरोघरी
विदर्भात उन्हाळ्यातला घरोघरी होणारा पदार्थ कच्चा चिवडा. पोह्यात तेल मीठ, तिखट दाणे, फुटाणे, हिरवी मिरची कोथिंबीर, कैरीचे बारेक तुकडे तातलीत ख्यायला घेतले की वरुन बारीक चिरलेला कांदा. आमच्याकडे आवडणारा प्रकार टोमॅटो पोहे. पातळ पोह्यात कांदा, टमाटा, कोथिंबीर, मीठ साखर घालून मिक्स करायचे त्यात हिरवी मिरची व दाणे (दाणे खमंग तळल्या गेले पाहिजे) घालून केलेली खमंग फोडणी
ताक-पोहे पण मस्त लागतात. ताक
ताक-पोहे पण मस्त लागतात. ताक + दाणेकूट + भिजवलेले पातळ पोहे + बारीक चिरलेली मिरची + मीठ + साखर.
असेच जाड्या पोह्यांचेही ताक पोहे करता येतात, पण त्याची चव इतकी खास नाही लागत!
दही पोहे + वरून तळलेली सांडगी मिरची किंवा मिरची-लिंबू लोणचे किंवा रसातली मिरची!
दही पोह्यांना वरून तुपातली जिरे, कढीपत्ता, हि मि ची फोडणी!
दक्षिणेकडचा पोह्यांचा अवलकी हा प्रकार मला आजवर अनेकदा खाल्ला तरी फारसा आवडला नाही. ते पोहे टोचरे वाटतात. आणि कोरडेठाक! आपल्याकडच्या लुसलुशीत पोह्यांची सर त्यांना येत नाही.
मी कॉलेजात असताना मला अचानक
मी कॉलेजात असताना मला अचानक एके वर्षी टोमॅटो हे अतिप्रिय झाले होते! तेव्हा मी टोमॅटोचा रस व फोडी घालून केलेले टोमॅटो पोहे करायचे. नेहमीपेक्षा जास्त संख्येने टोमॅटो बारीक चिरायचे, त्यांतून जो रस गळेल तो गोळा करून वेगळा ठेवायचा. भिजवलेल्या जाड्या पोह्यांना फोडणीत घालून परतताना हा टोमॅटो रस व टोमॅटोच्या फोडी घालून परतायचे. ह्या पोह्यांची चव नेहमीच्या पोह्यांपेक्षा जरा आंबटसर लागायची व त्यांचा रंगही फिकट केशरी - लालसर असायचा.
मीपण ह्या क्लबची सदस्य. मी
मीपण ह्या क्लबची सदस्य.
मी पोहे कसेही, कुठल्याही तिखट शाकाहारी पदार्थाबरोबर खाते. नेहेमीचे दडपे पोहे, माझ्या बाबांच्या हाताचे पोहे ( बाबा जाडे पोहे तेल- तिखट-मीठ-कांदा घालून खूप सुंदर करतात, कधी त्यात ओले खोबरे, कैरीच्या दिवसात कैरी घालतात आणि बाबांच्या हाताची चव.)
सलाड पोहे- वेगवेगळी सलाड घालून पोहे करते, कच्चेच करते त्यात मिरची, तिखट-मीठ घालून खाते.
कुठलीही उसळ, पिठले (कुळीथ आणि डाळीचे), आमटी, कढी ह्या सर्वात मी जाडे पोहे घालून खाते. पोहे शक्यतो मी जाडेच घेते, चावायला आवडतात. शिळ्या कुळथाच्या पिठल्यात पोहे छान लागतात.
आई पातळ पोहे थोडेसे भाजून त्यात कांदा, ओले खोबरे, तिखट, मीठ, तेल, कोथिंबीर घालून पोहे करते तेपण आवडतात.
पोहे कुठलेही थोडे भाजून (मी मावेत भाजते १ मिनिट) त्यात मावेतच थोडे मटार, फ्लॉवर, कांदा, आपल्याला आवडेल ती भाजी घालून मग तिखट-मीठ, तेल, कधी ठेचा घालून करते.
मी जाडे पोहे जवळ-जवळ रोजच खाते, काही नाही तर साधे तेल, तिखट,मीठ किंवा ताक आणि फोडणीची मिरची किंवा ताक आणि ठेचा.
बापरे माझे पोहे पुराण खूप लांबले. आहे की नाही मी पोहे fan.
मी पण आहे या फॅन क्लब
मी पण आहे या फॅन क्लब मधे...सगळ्यात फेवरेट कांदे पोहे..त्या खालोखाल दही पोहे..दडपे पोहे आधी विशेष खाल्ले जात नव्हते पण आता नवर्यामुळे आवडायला लागलेत..
मलापण खूप दिवस वाटत होते,
मलापण खूप दिवस वाटत होते, पोह्यांवर धागा काढावा. मी वाट बघत होते कोणी काढतंय का?
thank u प्राची.
आपले नेहेमीचे कांदा-बटाटे पोहे ह्याप्रमाणेच वांगी, फ्लॉवर, पडवळ घालूनपण पोहे छान होतात.
Radhika_P > तेच डांगर ना?
Radhika_P > तेच डांगर ना? भारी लागतं . ओले पापड किंवा लाट्या अतिशय आवडतात. पोहे फॅन क्लब मधे मला पण मेंबरशिप हवी!
पोह्यांचा आणखी एक प्रकार कधी
पोह्यांचा आणखी एक प्रकार कधी काळी खाल्ला होता. मला विशेष आवडला नव्हता, पण इतर कोणाला आवडू शकतो.
भिजवलेल्या जाड्या पोह्यांमध्ये किसलेले आले, खोवलेला नारळ, ४-५ तास भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (ऑप्शनल), मीठ, साखर (किंवा साखर नको असल्यास भिजवलेले बेदाणे) घालून एकत्र कालवायचे आणि खायचे - वरून फोडणी - लिंबाचा रस ऑप्शनल आहे.
रात्रीचा १ वाजलेला असतो.
रात्रीचा १ वाजलेला असतो. कोणतातरी चित्रपट तुम्ही मन लावून पहात असता. आणि भूक लागते. तेव्हा उपलब्ध असेल त्या मेथडने पोहे पॅनमधे नुसते भाजून घ्यायचे ब्राऊन होईपर्यंत. आणि गरमागरम खायचे...काय चव असते अहाहाहा...
लाल पोहे नुसते चहात टाकून खायलाही छान लागतात. इन फॅक्ट नुसतेच चावून खायलाही मस्त लागतात...
योगेश तो बिहारकडचाच
योगेश तो बिहारकडचाच नाश्त्याचा प्रकार आहे. तिथले आंबे आपल्यासारखे घट्ट गराचे नसतात त्यामूळे पोहे छान भिजतात त्यात. अविनाश बिनीवाले यांच्या न्याहारी सदरात त्यांनी पोह्याचे अनेक प्रकार दिलेले आहेत.
ते लोकसत्तामधले सदर होते, त्याचे पुस्तक आले का त्याची कल्पना नाही. यायला हवे.
Pages