बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोले शिजले का?
वडे दह्यात मुरले का?
नाशत्याला बटाटे वडे खाऊन, संध्याकाळकरता काही उरले का?

Proud

वडे झाल्यातच जमा आहेत. सकाळी आयते पोहे मिळाल्याच्या आनंदात चुकून मसूर डाळ भिजवली तर आज मसूरडाळ वडे चालवून घ्या. दही थोडसंच कमी पडलं तर फार नाही उगी अर्धा लिटर पाणी घातलं. मीठ भरपूर घातलं आहे. त्यामुळे पाण्याने चव बिघडणार नाही. बिंधास्त असा.

Lol वड्यांपेक्षा त्यामागची भावना महत्वाची तेव्हा चालवून घेऊ.
मी ही चुकून चुरमुर्‍यांना हिंग, मोहरी, हळद अशी फोडणी घातली तेव्हा चिवडा समजून कांदा, खोबरं घालून चालवून घ्या. दिवाळीचा फराळ म्हणालात तरी हरकत नाही.

विकु, तुम्हाला ईमेल केलाय ना पत्ता. मिळाला नसेल तर लिहा इथे पुन्हा.
छोले शिजलेत. दूध उकळत आहे.
आपापली लाइट जॅकेट्स, शाली घेऊन या.
फायर पिट आहेच.लाकडं आणलीयत. मस्त शेकोटी करू. तरी नाहीच जमले तर घेइन हो घरात. घाबरूनये! Happy

घाबरूनये! >>>> Lol हे आत्ता बघितलं.

डीजे बुवा तुझ्या असल्या कमेन्ट्स फार मिस करत होते बघ >>>>> झाडली! डिज्जेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बुवाला गोळी झाडली! Proud

मला शेकोटी म्हंटलं कि लहानपणी चित्रहार_छायागीत ला लागणारी 'रुप तेरा मस्ताना' टाइप गाणीच आठवतात Proud
हिरो शेकोटी पेटवत कपडे वाळत टाकतो आणि हिरॉइन बेडशिट टाइप काहीतरी गुंडाळून हिरोला चोरटे चावट लुक्स देते !
अत्ताची गाणी म्हंटलं तर 'इतनी सर्दी है किसिका गिलाफ लैले , जा पडोसी के चुल्हेसे आग लैले' .
बुवा,
मी मजेत, तुम्हाला का म्हणे गोळी घाल्तेय मैत्रेयी Proud ?

अरे आवरा हिला! Lol अगं काय बोलतेस, हे कुटुंबवत्सल लोकांचे जिटिजि आहे. काहींनी कुंटूंबांना घरीच ठेवायचा निर्णय घेतलाय तरी!

कस्काय चाल्लंय जिटिजि? Happy

हिरॉइन बेडशिट टाइप काहीतरी गुंडाळून हिरोला चोरटे चावट लुक्स >>>> त्या तसल्या भलत्यासलत्या ठिकाणी ( म्हणजे ते कोणाचं बॅकयार्ड नसतानाही ) हिरॉइनला ते बेडशिट टाइप काहीतरी कुठे आणि कसं काय मिळत असेल? Proud

गटग धम्माल पार पडले! डीज्जे, शेकोटी प्रकरण तर फारच पर्फेक्ट Happy कारण आधी थोडा पाऊस पण आला, अन मग शेकोटी केली , शिवाय मसाला दूध होतंच !! Lol
मनोरंजनासाठी नेहमीचे यशस्वी कलाकार वगळता इतर काही त्याच तोलामोलाचे कलाकार होते अन ते सुपरहिट झाले एवढेच म्हणेन !! Happy

Pages