बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पास्ताकॄती टाकलेली आहे. केलात आणि चांगला झाला तर मला क्रेडीट. नाही चांगला झाला तर स्वतःच्या पाककौशल्यावर संशय घ्यावा..

http://www.maayboli.com/node/45955

कुणाचा तरी सर्विंग स्पून राहिला आहे.
विकु, आहात का ? छान काम केलेत!! (म्हणजे पान आणि बर्फी आणली ते! कुणाला इतर काही वाटलं तर तु. बु. दो. स. Proud )

विकु, आहात का ? छान काम केलेत!! (म्हणजे पान आणि बर्फी आणली ते!>>>>>> त्यांच्या उपस्थितीने बाकी पदार्थांची कमी भरुन काढली म्हणता येइल.

होस्ट पांडेजी बोलायला एकदम दब्बंग आहेत ह्याचा साक्षातकार झाला. अर्थात पाहुणे नसताना बुलबुल पांडे त्यांची दब्बंगिरी कितपत चालू देत असतील तो वेगळा मुद्दा आहे. Proud

बुलबुल पांडे Lol
भेळेतल्या मिर्चीच्या तुकड्यांनी सह्ही चव आणली. सगळा मेनूच खतरनाक जमला होता.

चुलबुल पांडे आणि बुलबुल पांडे अशी जोडी का? बरं..
जेवण सगळंच भारी होतं. मसूराच्या डाळीचे दहीवडे पहिल्यांदाच खाल्ले. दह्यात पाणी जास्त आणि दही कमी असं असूनही अजिबातच खटकलं नाही Proud

आम्हाला घरी पोहोचून निजानिज व्हायला पार २ वाजले. झोपेत परत गटग पुढे कंटिन्यू झालं.
१२ नंतर परत बेल वाजली, सगळ्यांना वाटलं भाई आले पण दाजी गौरी आणि अदित्यला घेऊन आले असं मला स्वप्न पडलं. Happy

देसाई, अनुल्लेख काय आणि? मी विचारलं होतं उ.उ.वि.बद्दल. हवंतर ब.ब. करा असंही म्हटलं होतं.

माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, पण मी आत्ता काही अ‍ॅक्शन घ्याय्ची नाही असं ठरवलंय हे तुमचं नशीब समजा. Proud

Lol बुवा, असं नाइटमेअर तर बाईंना यायला हवं ना!
सिंडी ला तर घरी जायला ३ वाजून गेले म्हणे! त्याबद्दल तिला "शूरा मी वंदिले" पुरस्कार देण्यात यावा!
स्वाती Lol

भेळ उत्तम (तीनवेळा खाल्ली).
वडे उत्तम (तीन खाल्ले).
पेशावरी/काश्मिरी/अमृतसरी छोले - भरपूर खाल्ले.
दोन्ही पुलाव - दोन दोनदा घेऊन..
दहीवडा - मस्त
नंतर काय खातोय, काय नाही हेच लक्षात येईना.
पण काजूकतली, पान, केक, नान, दुध इत्यादी बरेच प्रकार रिचवल्याचं आठवतंय.
सगळं Diet गेलं हे खरं..

हौ, तिला पुरस्कार अन नवर्‍याच्या गाडीकरता " प्राऊड हस्बंड ऑफ शुर गंगी" असं स्टिकर देणेत यावं.

> दाजी गौरी आणि अदित्यला घेऊन आले असं मला स्वप्न पडलं. >> Lol खरंच, असं स्वप्न बाईंना पडायला हवं.
भेळेत कैरीही होती पण विशेष आंबट नसल्याने आणि कमी प्रमाणात असल्याने चव जाणवली नसावी बहुतेक.

>>हौ, तिला पुरस्कार अन नवर्‍याच्या गाडीकरता " प्राऊड हस्बंड ऑफ शुर गंगी" असं स्टिकर देणेत यावं.>> Rofl

>> तिला पुरस्कार अन नवर्‍याच्या गाडीकरता " प्राऊड हस्बंड ऑफ शुर गंगी" असं स्टिकर
Lol

शिंडी नांव असल्याने रात्री घरी जाणे आलेच, पण तीन वाजता का गेली? बारानंतर जायचे नाही हे तिला तरी माहीत हवे.. Wink

Lol

भेळेतल्या मिर्चीच्या तुकड्यांनी सह्ही चव आणली <<<
भेळेत उल्लेखनीय मिरच्या(च) होत्या का ? Proud

Pages