लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात माझ्यापासुन.
माझ्या घरी गणपती असतो १० दिवसांचा. मी लहान असताना सगळे मखर बनवत होते घरी थर्मोकोलचं. तो थर्मोकोल आणून मी आमच्या कुत्र्याच्या पुढ्यात टाकला. त्याच्या ओल्या नाकाला तो चिकटला. म्हणुन मी तो माझ्या नाकाला लावुन पाहीला. लागेचना अज्जिबात. म्हणुन हळुच एक लहान तुकडा नाकात सरकवला. तो लगेच खाली पडला. घट्ट रहावा म्हणुन तो पेन्सिलने नाकात अगदी वरपर्यंत सरकवला.थोड्या वेळाने तो नाकात जाऊन फुगला आणि श्वास घेता येईना. आईने विचारल तेव्हा सांगितल जॉनीच्या नाकाला चिकटत होता म्हणून मी माझ्यापण नाकाला चिकटतो का ते बघितल. मग सगळ्यांची वरात डॉक्टरकडे. त्यांनी हळुच चिमटा वगैरे वापरुन काढला. पण अजुनही कधी विषय निघाला की घरी ह्याच्यावरुन चिडवतात.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235

हट्टिपणा .... आइ बरोबर बाहेर गेल्यावर रस्त्यात काहि आवडले आणि तिने दिले नाहि तर रडुन रडुन रस्त्यावर चालता चालता बसुन घ्यायचे ..
आणि नको तिथे नको ते प्रश्न विचारणे..
घरी आल्यवर आइचा हातचा प्रसाद ही मिळायचा ते वेगळ .आता ह्या गोश्टी आठवल्यावर हसु येते ..

यो Rofl
नाकाला फेविक्विक लावायचा....

लहानपणी मी एकदा भर पंक्तीमधे म्हणजे समोरासमोर जेवायला बसलेल्या माणसांच्या रांगामधे आईच्या समोर मुले उभी रहातात ना तसे उभे राहुन ... declare केले की "आज माझ्या आईने स्वयंपाक केला नाही म्हणुन आम्ही उंदीर मारुन खाल्ला." .अन मग माझ्या शाकाहारी आईच्या हातचा धपाटा खाल्ला होता. Sad

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

आमचे एक कुटुंब स्नेही होते, वाघ आडनावाचे, ते नेहमी सहकुटुंब यायचे आमच्याकडे. त्यावेळी मी फार तर ५ वर्षांची असेन. एकदा ते असेच आले आणि देवीच्या दर्शनाला गेले, तेव्हा मी आई-बाबाबांबा बोलताना ऐकलं असंच काहीतरी की किती दिवस राहणार आहेत वगैरे....

वाघ आणि कंपनी देवीच्या दर्शनावरून परतली आणि मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि त्यांना विचारलं की तुम्ही आज आला आहात पण जाणार कधी? नाही; आई तसं बाबांना विचारत होती म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं. Proud
तेव्हा आईबाबांनी काही केलं नाही मला... Lol

चतुश्रुंगीच्या जत्रेत मी आईचा हात समजुन दुसर्‍याच बाईचा हात धरुन निघाले. त्या बाईंची मुलगी माझ्याच एवढी होती पण तिने तिच्या बाबांचा हात धरला होता, हे जेव्हा त्या बाईच्या लक्षात आले तेव्हा तिने मला तिथल्या तंबुतल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. आमच्या मातोश्री आम्हाला शोधत आल्या. त्याक्षणी आई जेव्हा दिसली तो हर्ष आजही आठवतो. आई दिसेपर्यंत रडुन रडुन सगळे ऊंट लोंबकळायला लागले होते. Wink

मी केजी ला असतांना मला दुपारची झोप आवरायची नाही....मग बाई मला मागच्या रुममधे सतरंजी टाकुन द्यायच्या अन मी मस्त झोप काढायचे...५वाजले , बस आली की बाई मला उठवायच्या.

एकदा तर कहर झाला....बाईंनी वर्गात विचारले," वाघ कुठे रहातो?". मी ठसक्यात उत्तर दिले," वाघ ५५० ला रहातो"...अन मग काय , सगळे मुलं हसतायेत माझ्याकडे बघुन्..अन मी काय कळलेच नाय म्हणुन बावळटासारखी एकदा बाईंकडे, एकदा मुलांकडे बघतेय..! झाले असे की राहुरी कृषी विद्यापिठात कॉलनीची नावे ५५०, ७५०, ९५० अशी घराच्या कार्पेट एरीयानुसार आहेत. आम्ही ५५० ला रहायचो तिथेच ' वाघ' काका नावाचे वडिलांचे मित्र रहात, ते आमच्या घरी येत असत मधुन मधुन वडिलांबरोबर! .. अन मग काय मला वाटते 'सुज्ञास सांगणे न लगे'

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

बालवाडीत असताना मला आज्जीकडे रहायला खुप आवडायचे. काका, आत्या सगळे लाड करायचे ना.शनिवार, रविवार तिथेच असायचे मी. आणि मग रविवारी रात्री अक्षरशः धिंगाणा असायचा घरी येताना. बाबा यायचे न्यायला स्कुटर घेऊन. जाम रडारड चालायची. मग काहीतरी गोडी गुलाबी लावुन मला घरी आणले जायचे. नंतर नंतर आज्जी लवकर जेवायला घालुन झोपवायची मला. आणी झोपेतच माझी रवानगी घरी व्हायची. सकाळी उठल्यावर लक्षात यायचे.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235

दुसरित असतांना एकदा हत्तिवाला ह्त्ती घेवुन आला होता ,मला व माझ्या मैत्रिणिला कळ्लच नाहि आम्हि शाळेच्या पटांगणातुन त्य हत्तिच्या मागे जंगलात कधि गेलो ते! नेमक शेजार च्या मुलाने(तो मोठा होता) आम्हाला पाहिल व घरि सांगितल, मग काय शोधा शोध , आणि नंतर चांगलाच प्रसाद मिळाला, माझ्या बाबानि अंगणातच बदडलि मला!

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

लहानपणी चित्रहार पहायला जाऊ का असं विचारून बाबांची परवानगी मिळाली तरंच आम्ही (मी आणि माझी बहीण) जाऊ शकायचो. एकदा असंच चित्रहार पहायला गेलो, ज्या घरी टिव्ही पहायला गेलो होतो ते घर आमच्या घरापासून बर्‍यापैकी लांब होतं, त्यावेळी सर्वांकडे टिव्ही नसायचे. चित्रहार (रात्रौ ८ वा.)संपल्यावर आम्ही दोघी घरी परतायच्या ऐवजी तिथेच बसून राहीलो आणि ९ ची ये जो है जिंदगी सिरियल पाहून रात्री ९.३० ला घरी आलो. जेवलो नव्हतो काही नव्हतो. आमच्या घराला दरवाजा होता तो आडवा होता, माळ्याला वगैरे असतो तसा... तो चक्क बाबांनी लावून घेतला होता, आम्ही जिन्यातच घराच्या, आतच घ्यायला तयार नाहीत. आम्हाला म्हणाले की जिथे चित्रहार पाहीला तिथेच जेवायला जा, आज तुम्हाला घरातच घेणार नाही. आम्ही बाबांना खूप घाबरायचो, आईने अक्षरश: विनंत्या करून आमच्या वतीने माफी मागून आम्हाला आत घेतलं. तेव्हा मी ५ वर्षांची होते. पुढे वर्षभराने आई गेली, त्यानंतर बाबा कधीच कडक वागले नाहीत आमच्याशी... Sad

मी लहान असताना मला तयारी-मेकअप करायला फार आवडायचे. नेहमीच्या निरीक्षणाप्रमाणे जसे आई मावशी बेडरुमचे दार बंद करुन तयार होतात. असेच एकदा काही फॅमिली फंक्शन होते आमच्या घरी. तेव्हा मी पण ठरवले की दार बंद करुन आपण तयार होवुन सगळ्यांना सरप्राईज द्यावे. मग काय स्वारीने दार बंद करुन टॉवेलची साडी नेसली आणि मेकअप चालु होता.

तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले कि पिल्लु गायब. सगळे शोधत शोधत बेडरुम पर्यंत आले, अरे हिने तर दाराला आतून कडी लावली आहे. मग मला मसका पॉलिश चालु बाळा दार उघड ना. दार उघडेल तर ते बाळ कसले?? मी दार उघडतच नव्हते.

मग काका मामा यांनी स्टुल व खुर्चीवर चढुन मला खिडकीच्या वेन्टिलेटर मधुन आमिष दाखवायला लागले.. बाळा दार उघड ना तुला बाहेर आल्यावर चॉकलेट, कॅडबरी, द्राक्षे देतो पण तु दार उघड. अक्षरशः मामा चॉकलेट, कॅडबरी, द्राक्षे घेवुन आला आणि वेन्टिलेटर मधुन मला दाखवले. तरीही मी दार उघडतच नव्हते.

शेवटी दार तोडायचे ठरवले. सगळे जण दाराला जोराने धक्के देवू लागले आणि मी दाराजवळ जावुन उभे राहीले. माझा मामाने हे खिडकीच्या वेन्टिलेटरमधुन पाहीले व सगळ्यांना थांबायला सांगितले. पिल्लु दाराजवळच उभे आहे. मग सगळ्यांनी मामाला सांगितले कि तु तिला वेन्टिलेटर मधुन खावू देवून बोलण्यात गुंतवून ठेव, आम्ही इकडे दार तोडतो. मग मामाने मला चॉकलेट व एक एक द्राक्ष द्यायला सुरु केले. सगळे जण दाराला जोराने धक्के देवून दार तोडु लागले. तरीही दार तुटतच नव्हते, शेवटी माझ्या आजोबांनी कोणालातरी जवळच्या बांधकामावरुन पहार आणण्यास सांगितले आणि पहारीने दार तोडून माझी सुटका झाली...

पण मज्जा माहीतीये या कालावधीत मी कितीतरी चॉकलेट व द्राक्षे खाल्ले.. Happy

०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

पिल्लु छोटा, काय किस्सा आहे :d

एकदा बाबांच्या ऑफिसमधले बरेच लोक जेवायला आले होते घरी. लहान भाऊ आईला किचन मधे त्रास देत होता. मग आई त्याला म्हणाली... इथे त्रास देण्यापेक्षा, बाहेर काय हवं नकोय ते बघ जरा.
भाऊ तरातरा चालत बाहेर गेला आणि सगळ्यांच्या ताटांकडे बघून म्हणाला, आई ने विचारलयं, "ताटातलं तुम्हाला काय काय नकोय?"

मी लहान असताना एक मराठी मालिका बघितली - चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे. त्यात सुन सासुच्या त्रासाला कंटाळून म्हणते,' जगातल्या सगळ्या सासवाना वेशिबाहेर चिंचेच्या झाडाला उलटं टांगून खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे'.
आणि मी आजीसमोर हेच वाक्य सारखे बडबडत होते आणि माझी आई खूप घाबरली होती.

दिवाळीचे दिवस होते. घरी चिवड्यासाठी पाच किलो चुरमुरे आणले होते. आईने ते घरातल्या भल्या मोठ्या पातेल्यात काढुन ठेवले आणि आत्याला सांगितले की थोडे साफ करुन घ्या, खडे-कचरा असण्याची शक्यता आहे. आत्या काहीतरी दुसरे काम करत होती, त्यामुळे तिने थोड्याअ वेळाने बघू म्हणुन पातेले एका बाजुला ठेवुन दिले. मी साफ करुन घ्या एवढे ऐकले होते. त्यामुळे चुरमुर्‍याच्या पातेलात थोडा निरमा टाकला आणि पातेले नळाखाली धरले.......
पुढे काय झाले असेल ते सुज्ञांस सांगणे नलगे. Proud

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विशाल Biggrin Biggrin

****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निविघ्नंकुरूमोदेव सर्वकार्येषुसर्वदा||||

विशाल, चुरमुरे....चांगले ब्रश ने घासुन साफ करायचेस ना! Proud

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

विशाल, लहानपणापासूनच तू असा आहेस? Lol
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

हे काहीच नाही. आई नेहेमी म्हणायची मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. त्यामुळे एकदा घरी आण्णांचे मित्र येणार होते सपत्निक जेवायला. त्यांच्यासाठी श्रीखंडपूरीचा बेत केला होता....
आम्ही काय दिवे लावले असतील ते सांगणे नलगे Wink

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

वविला तुला जेवणाच्या जवळसुद्धा फिरकू दिलं नाही पाहिजे Proud
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

मला एकदा आज्जी नातेवाईकांकडे घेऊन गेली होती. मला मारीची बिस्किटं अज्जिबात आवडायची नाहीत. त्यानी मारीची बिस्किटं दिली खायला मला. आज्जीने सांगितल ती नाही खाणार ती बिस्किटं. तुम्ही ठेवुन द्या परत. मी पटकन उठुन म्हटल नाही हो मी खाईन ती. मला हवीयत. आज्जी काही सांगते तुम्हाला. द्या मला ती बिस्किटं. आणि बशीतली खाऊन आणखी मागितली त्यांच्याकडे. आज्जी चाट. घरी येऊन जो काही ओरडा मिळाला ना. त्या दिवसापासुन आई किंवा कोणीच अस सांगितल नाही की ही हे खात नाही म्हणुन.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

माझा एक किस्सा आई बाबा सांगतात माझ्या आजीच सोवळ- ओवळ फार असायच आणि मी तिने केलेल्या आमटीत बॉल टाकण्याचा पराक्रम केला होता (वय असेल २-३)

माझ्या भावाने २ रीत परिक्षेत लिहील होत दुध कोण देत - भय्या Proud

आमच्या दारात १ कुत्रा रोज यायचा त्याला आम्ही पोळी देत असु खायला. एक दिवस भावाने तो कुत्रा लक्ष देत नाही म्हणुन त्याची शेपटी खेचुन "ही पोळी बघ" "ही पोळी बघ" अस केल. झाल पोटावर इंजेक्शन घ्यायला लागली (तेव्हा पासुन मी प्राण्यांना घाबरायला लागले, तो बिंधास्त त्या नंतरही १ दा असाच इंजेक्शन घेऊन आलाय)

आम्ही सगळी भावंडं गणपतीत चेंबुरला आजोळी जमत असु. तेव्हा आम्ही भल्या पहाटे दुर्वा आणि फुले आणायला जात असु कारण आरतीच्या आधी आमचे ८ ही जणांचे हार आम्हाला घालायचे असायचे. तेव्हा अगदी झाडावर चढुन (दुसर्‍याच्या कंपाउंड मधल्या) फुल गोळा करायचो. १ ही फुल त्यांच्या झाडावर शिल्लक रहायचे नाही ५ वाजे पर्यंत. पण तेव्हा कोणी तक्रार केल्याच पण आठवत नाही, सगळ्यांना सगळ चालायच बहुतेक.

माझ्या भावाने आईची भोचक मैत्रिण एकदा घरी आल्यावर (आई नसताना) मी तिच्या साठी केलेल्या चहात महासुदर्शन चुर्ण टाकल होत. त्याच बाईंच एकदा (हे मुद्दाम नाही इनोसंटली झाल) स्टूल त्या बसत नव्हत्या म्हणुन काढुन घेतल. त्या बाईंना पत्ताच नाही त्या बोलण्याच्या नादात तशाच बसल्या स्टुल आहे समजुन

यो, तुझ्या सारखीच मीही गोची केली होती एकदा.... एस्टी ने मामाच्या गावाला जातानाची गोष्ट. कंडक्टरने माझे फुल टिकीट काढायला सांगितल्यावर आई म्हणाली कि आत्तातर पहीलिला आहे हा... कसला फुल टिकीट ? मी दोघांच्या गप्पा ऐकत होतो. मध्येच उठुन सिट वर उभारुन म्हणालो 'ओ नाही ओ, मी दुसरीला आहे, पहीलिला नाही.' त्यावेळेस आईचा चेहर बघण्यासारखा झालेला... अजुनही आई उचकते कधी कधी.... Happy

-----------------------------------------------------
कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होतेच !

एकदा आमच्याकडे पाहुणे आले होते, आईने चहा केला होता मला अगदी अर्धा कप दिला बाकी सगळ्यांना कप भरून भरून दिला. मी भोकाड पसरलं. तोवर आईचा निम्मा कप चहा पिऊन झाला होता. ती मला म्हणाली अगं तुला कमी दिलाय आणि मी पण कमीच चहा घेतलाय, मी रडं थांबवून तिच्या कपात डोकावून पाहीलं कप निम्मा होता, रडं पुन्हा चालू झालं, ती म्हणाली आता का रडतेयंस? मी म्हणलं तु निम्मा पिऊन उरलेला निम्मा मला दाखवलास आणि मला सांगतेयंस की तेव्हढाच घेतलास मला पण पुर्ण कप भरून चहा हवाय... Lol
माझी हुशारी बघुन सगळे पाव्हणे चाट, आईला दुसरा कप चहा करून द्यायला लागलाच मला.. Proud

दक्षे Lol

लहानपणी चहाची कित्ती क्रेझ असते नाही?
आणी हे मोठे बळजबरीने दुध पाजतात...!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

अरे हसुन हसुन पोट दुखायला लागल माझ!

......................................................

मन होई मेघ वेड ओल्या राति, मेघ गाइ मेघ धुन कोणासाठि
दिस रुसुन गेला सामसुम ,रात धरि बोट ये म्हणुन
नभि मेघ पाणि डोळा देत जाती ..........

माझी आजी महिला जेल ची मेट्रन होती. ती जेल जवळच्या पोलीस क्वार्टर मधे रहायची. मी हे पाहीलं होतं की आजीच्या कडे गेल्यावर बस मधून उतरलं की बाबा रिक्शा वाल्याला "जिला जेल जाना है" असं सांगतात.त्या मुळे आजिच्या घराला जिला जेल म्हणतात असंच मला वाटायचं! आजी एकाध वेळेस मला पण ड्युटी वर घेऊन जायची. तिचं केबीन महिला जेल च्या प्रांगणात होतं.

एकदा सुट्ट्यां नंतर शाळेत बाईंनी विचारलं कोण कुठे जाऊन आलं सुट्ट्यां मधे आणि मी सांगीतलं मी माझ्या आजी कडे जिला जेल ला गेले होते. त्यांनी मला परत विचारलं " तुझी आजी कुठे रहाते?" मी परत ठसक्यात "जेल मधे" सांगीतलं. बिच्चार्या बाईंच्या चेहर्या वरचे भाव अजून मला आठवतात! त्यांनी पूढच्या पालक शिक्षक भेटीत आईला अगदी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं "तुमची आई कश्या साठी जेल मधे आहे?" आईला आधी काही कळलं नाही, मग बाईनी सांगीतलं "अक्षरी म्हणाली तुम्ही सुट्ट्यां मधे तिच्या आजीला भेटायला जेल मधे गेला होतात" आईने त्यांना समजावून सांगीतलं तेव्हा दोघींच्या डोळ्यात हसून हसून पाणी आलेलं अजून आठवतं.

आई आणि मावशी अजून त्यावरून पोट पकडून हसतात!

========================
बस एवढंच!!

ए आपण एक यप्पड ग्रुप सुरु करु या का? एकदम युनिक ग्रुप असेल तो.

पल्ले, २००% अनुमोदन. पल्ली ग्रुपलीडर ! Wink

***********************************
आज घर कसं निटनेटकं वाटतय,
माझा संगणक बिघडलाय ना ! Happy

Pages