लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखीन एक प्रसंग..
मी पहिलीत/बालवाडीत असेन..
एके दिवशी घरी आले तर दप्तरात असंख्य पेन्सिलींचे (पाटीवरच्या) तुकडे होते..
आईनं घरी आल्यावर दप्तर बघितलं तर ते दिसले.. तिनं विचारलं की इतके तुकडे कुठून आले.. मी काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं..
दोन तीन दिवस गेले.. मामाच्या एका कलिगला त्याच्या मुलीच्या दप्तरात माझ्या मामाच्या लग्नाची पत्रिका सापडली.. त्यानं तिला विचारलं की ही तुझ्याकडे कशी आली - तर तिनं सांगितलं की मी ती शिरीष कडून विकत घेतली.. तिचा बाबा "विकत????" (त्या काळी इतक्या लहान मुलांकडे, छोट्या गावात तरी पैसे नसायचे)
मग उलगडा झाला तो असा की मी छोट्या पेन्सिलीला छोटी पत्रिका(जेवणाचं निमंत्रण) आणि मोठ्या पेन्सिलीला मोठी पत्रिका (अ‍ॅक्च्युअल लग्नपत्रिका) वर्गातल्या मुला-मुलींना विकलेली Proud

नानबा Proud

नानबा Happy
थोडाफार असाच उध्योग मी केलेला.
आमचे घरी गांवातला पहीला रेडिओ . कुणाला रेडिओ ऐकायला यायचे तर मी दारात बसुन पेन्सिली घ्यायचो. Happy

शाळेत कर्कटकने कोरुन कोरुन बेंचला छिद्र/ खळगा तयार करणे त्यात खडुची पावडर भरुन वरुन शाईच्या पेनातली शाई थेंब थेंब टाकणे हा आमचा आवडता उद्योग!

एक फुल, ह ह पु वा! नाने, तरीच ईथे तू ग्रुप ने घर घेण्याचा प्रस्ताव मांडला हेसः)) दिवे घेशीलच!

एकदा आमच्याकडे आत्या तीन मुलांना घेऊन आली होती. तेव्हा मी आणि माझा भाऊ दोघेही नव्हतो.
आई आणि आत्या तिघांना घरी ठेवून बाजारात गेल्या. माझा आतेभाऊ मस्तीखोर म्हणून पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होता. त्या दोघींची पाठ वळताच त्याने उद्योग सुरू केले. पहिल्यांदा त्याने स्वतःच्या भुवया कात्रीने कापल्या. नंतर समोरचे केस कापून टाकले. नंतर त्याने त्याच्या दोन बहिणींकडे मोर्चा वळवला. तो त्यांचे केस कापायला आला. त्या घाबरून बाथरूममध्ये लपल्या. तर त्याने त्यांना बाथरूममध्ये कडि घालून बंद केले. तेवढ्यात आई आणि आत्या परत आल्या. झालेला प्रकार कळल्यावर आत्याने त्याला लाटणे तुटेपर्यत मारले.

अमि << पहिल्यांदा त्याने स्वतःच्या भुवया कात्रीने कापल्या. नंतर समोरचे केस कापून टाकले. नंतर त्याने त्याच्या दोन बहिणींकडे मोर्चा वळवला. तो त्यांचे केस कापायला आला.>> काय अवतार झाला असेल कल्पनेनेच Lol

माझा एक आत्येभाऊ भयंकर वांड आणि चिडका बिब्बा होता. माझ्या भावाच्या मौंजीत त्याचे काहीतरी बिनसले आणि तो माझ्या भावाच्या मागे एक बर्फाची लादी घेऊन लागला. त्याला ती त्याच्या टकलावरच फोडायची होती. पुढे माझा भाऊ मागे आत्ये भाऊ त्याच्या मागे आम्ही सगळे असे बिल्डिंभर फिरत होतो शेवटी शेजारच्या काकुंनी बटुला त्यांच्या घरात लपवुन ठेवले!

हे सगळे आत्तेभाउ इतके वल्ली का अस्तात? ४ थीच्या मे महिन्यातल्या सुट्टीत आम्ही दिल्लीला आत्याकडे गेलो होतो. माझा आतेभाउ माझ्यापेक्षा एकच वर्षाने मोठा....आणी अतिशय वात्रट! पत्ते / चंगस ( माहितीये का कोणाला?) खेळायला बसलं की हमखास रडीचा डाव खेळयचा आणि मग कटाप केलं की आम्हाला मांडीला कर्कटक टोचायचा.....! Sad

माझ्या मामेबहीनीने पएज लावली मी आजीचे केस कापुन दाखवते म्हणुन आणी तिने आजीचे केस कापले होते. ती बट वाढेवर्यंत आजीला खुप वेळ लागायचा आंबाडा बांधायला Proud

मी_आर्या Happy

लहानपणी मला व माझ्या बहिणीला आमचा काका उगाचच खोड्या काढुन त्रास देत असे तेव्हा आम्ही पण कर्कटक घेउन त्याच्या मागे लागायचो Happy

लहानपणी माझ्या बहिणीने एकदा खेळताना इंजेक्शन देते म्हणुन एक खिळा टोचला होता आमच्या भाडेकरुंच्या मुलीच्या दंडात .. नंतर तिची आई आली बोंबलत आणि आमच्या आईने ताईची चांगलीच धुलाई केली Happy

Rofl आई ग .. इथल्या सगळ्या मुलांचे प्रकार वाचून हसू तर येतंय पण समोर काय वाढून ठेवला आहे ते हि दिसत आहे
ल्हानपणी बोटं दारात चेपवुन घेणे, सायकलची चेन उलटी फिरवत बसलेल असताना त्यात बोट अडकवुन घेणे>> बोट चेपवून थेट इमर्जन्सी सुद्धा गाठावी लागली ..
जमत झेपत नसताना पण सापडलेली मोठी वीट किंवा दगड उचलुन दुसरीकडे नेताना पायाच्या बोटांवर पाडुन घेणे,>>>>>ह्यातले इतके प्रकार झालेत घरी आत्ताच .. वय वर्षे ५ च्या खाली आहेत मुलं ..
शॉक काय आणि कारी ट्रक खेळताना काही दिसताच नाही .. पायरी वागिरे सोडून गडगडत खाली.. प्लेन घेवून उडतोय म्हणे आणि गादीवरून सरळ खाली..

लहानपणी मला एकदा एक LED सापडला तो मी सरळ प्लगमध्ये घातला आणि त्यावेळेस बटण ऑनच होते Uhoh LED मस्त पैकी फुटला, दोन बोटे थोडी भाजली आणि शॉक लागला तो वेगळाच ...पण घाबरुन कोणालाच काहिही सांगितले नव्हते आतापर्यंत Proud

मी कॅमेरयातला रोल काढुन घरीच धुतला होता...भावाच्या महाबळेश्वर ट्रिप चे फोटो होते त्यात. त्याने तर त्याने, त्याच्या मित्रांनी पण मग मला चंागलाच धुतला...

अाजोबंाच घड्याळ, चष्मा फोडणे, काठी लपवणे ई. किरकोळ वाटम-या नेहमीच्याच होत्या. ...सिगारेटीची पाकीटं, काड-पेट्या गोळा करण्याचा खेळ होता...१० पिवळी सि.पा. १०पै., १ पांढरी सि.पा. १०पै. तर १० चावी चा छाप वाली का.पे. १०पै, कोणताही वेगळी एक छापवाली का.पे. १०पै.... अर्थात ज्याच्याकडे जास्त तो गल्लीचा शेठ... सगळे त्याला मान देणार, कट्ट्यावर अाला की बसायला जागा मिळणार..वै. दोन गल्यांमधे मिळुन राजा..३-४ मध्ये म.राजा..करार वै.... *१९७६/७७ चे हे खेळ होते...असच एका सुट्टित मी अाणी माझा भाउु गटारी-कोंडाळे शोधत होतो, अाणी कुणीतरी जाउन घरी सांगितलं अाजोबांना. अामचे अाजोबा प्रसिध्ध शिक्षक होते, गावात चांगलाच दबदबा होता. सगळा गाव टरकून असायचा त्यांना...अामचे हे उद्योग कानावर गेल्यावर घरी गेल्यावर सगळ्य़ांसमोर..पहिले खेळ समजावून घेतला, मग विचारले अापण कोण..."राजे, या..." अजुनी त्यांचा मार अाठवतो. रात्री झोपताना मात्र परत अाहेच ...रडत-रडत...अाजोबा गोष्ट...त्यात खंड नाहि पडला ... अाजोबा-अाजींचे ज्यानी लाड बघीतलेत त्यांना कल्पना असेलच जगात त्यावेळी जी चांगली माणसे या सदरात मोडतात त्यात ते पहिले असतात अाणी खास करून अाइ-बाबा शेवटी रागावतात म्हणून... तु कोणाचा/ची? - अाजोबांचा/ची किंवा अाजीचा/ची... हे तर अालंच... Happy

माझे वडील भूतानला जाणार होते. मी अडीच-तीन वर्षांची असेन. आजोबांनी वडीलांना माझ्यासाठी भूतानहून खेळणी आणायला तब्बल ५१ रुपये दिले होते. (तेव्हा ती रक्कम बरीच मोठी होती!) वडीलांनीही मोठ्या कौतुकाने भूतानहून मला बरीच सुंदर सुंदर खेळणी आणली. त्यात ट्रेन सेट, बाहुल्या आणि अजून बरेच काय काय होते. एका छोट्या टबमध्ये ही सर्व खेळणी ठेवलेली असत. मलाही तो प्लास्टिकचा टब इकडून तिकडे नेता येत असे.

एक दिवस दुपारचे घरातले सर्वजण निजले असताना मी गूपचूप तो टब घेऊन बाल्कनीत गेले व तिसर्‍या मजल्यावरून ती सर्व खेळणी खाली टाकून दिली. खाली वर्दळीचा, वाहता रस्ता होता त्यामुळे थोड्याच वेळात जाणार्‍या-येणार्‍या लोकांनी खेळणी उचलून नेली. आई उठल्यावर मी तिला मोठ्या फुशारकीने सांगितले, ''मी सगळ्ळी खेळणी जुनी झाली म्हणून टाकून दिली! आता आपण नवीन खेळणी आणूयात!''

माझ्या ह्या अतिहुशारीमुळे घरातले सगळेजण फार हळहळले. कारण ती खेळणी खरंच खूप सुंदर होती आणि त्यांना आणून जेमतेम महिना लोटला होता. त्यानंतर मात्र सर्वांनी कानाला खडा लावला आणि मला तुळशीबागेतील रबरी, प्लास्टिकच्या खेळण्यांवर पुढे वर्षानुवर्षे समाधान मानावे लागले! Proud

हा हा हा, एक फूल, शिक्षा-बिक्षा कसली, आईवडीलांचे पैसे वाचले...कारण मी पुढच्या खेपेलाही तेच केले असते! मला नंतर ज्या ज्या बाहुल्या गिफ्ट म्हणून आल्या किंवा आईने आणल्या त्या सर्वांना मी त्यांचे केस कंगव्याने बळेच विंचरून टकले केले. मग त्यांचे टक्कल दिसू नये म्हणून ते काळ्या स्केच पेनने रंगवित असे. हेही पुरे पडले नाही म्हणून त्यांच्या नाका-काना-गळ्यावर बॉलपेनने अलंकार चितारत असे. शिवाय त्यांचे हात-पाय उसकटून पुन्हा लावताना कधी कधी ते पिरगळल्या अवस्थेत पुन्हा जोडले जात असत. माझी चुलत बहीण मी त्यांच्याकडे गेले की घाबरून तिची बाहुली कपाटात लपवून ठेवत असे.
घरीही मी आमच्याकडे फिनोलेक्स कंपनीच्या पीव्हीसी पाईप्सची बरीच सॅम्पल्स होती वडीलांच्या कामाची... ती लांबवून त्यांच्यात माझी भातुकली खेळत असे. आईच्या किचनमधली भांडी, चिमटा वगैरेही लांबवत असे. शेवटी आईला ते सामान माझ्या भातुकलीतून हुडकून घ्यावे लागे. तुळशीबागेतून आणलेल्या सर्व प्लास्टिक बाहुल्यांवर मी पेनाने रंगकाम केले होते...आणि त्या कधी नाकात नाहीतर पोटात किंवा गालात चेपल्या गेलेल्या असत! आता आठवले की आपण त्या बिचार्‍या बाहुल्यांवर किती अत्याचार केले असे वाटते..... बिचार्‍या! Proud

Pages