लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला कट्टा कमी आहे का??? Wink
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

पल्ले यप्पड शब्दाचे हक्क राखिव आहेत Wink

पल्ले यप्पड हा शब्दसुद्धा फक्त दक्षीसाठी राखीव आहे. Wink

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

लहानपणी उस्मानाबादला असताना एकदा माझी मामेबहीण आमच्या स्वयंपाकखोलीत अडकुन बसली होती. रागाच्या भरात तिने आतुन कडी लावुन घेतली आणि नंतर तिला तिला ती उघडताच येइना. मग लागली रडायला. खोलीला दुसरे दारही नाही. शेवटी कुणीतरी वरुन पत्रे काढुन आत उतरले आणि कडी उघडुन तिला बाहेर काढण्यात आले. मी मात्र तीला मनसोक्त चिडवुन घेतले. साधी कडी उघडता येत नाही तुला! हे बघ.. म्हणुन मी आत शिरलो आणि खोलीची कडी आतुन लावुन घेतली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या......
अशा काही शिव्या खाल्ल्यात म्हणुन सांगतो ..................

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

एकदा आमच्या घरी पाहूणे आले होते. लहानपणी कोणी मोठे आले की त्याना नमस्कार करावे लागायचे. त्यावेळी मला खेळायला जायची घाई होती. तरी वडील म्हणाले, 'बयो, नमस्कार कर आजीना'. मग मी त्याना वाकून नमस्कार केला आणि जरा रागाने म्हणाले, "नमस्कार, खाली दिसला चमत्कार!" आणि धूम ठोकली बाहेर. :ड :-ड

शर्मिला... Lol

मी लहान असताना माझ्या आत्तेभावाचं लग्न झालं, आत्याने आंतरजातीय विवाह केल्याने भाऊ मराठा झाला... ते पण ९६ कुळी. त्यांच्याकडे पद्धत म्हणजे, येईल त्याच्या पाया पडायचं. भाऊ पाया पडून पडून वैतागला होता... माझी पाठ दुखतेय, आता मी कोणाच्याही पाया पडणार नाही असं काहीसं तो आत्याला सांगताना मी ऐकलं होतं.
थोड्या वेळाने एक वयस्कर (खौट) आज्जी आल्या, त्यांच्या पाया पडायला वाकले हे दोघं बिचारे...
मी घाईत म्हणाले, अरे मघाशीच म्हणत होतास ना आता कुणाच्या पाया पडणार नाहीस म्हणून? मग कशाला या आज्जीच्या पाया पडतोयंस? Proud

नंतर आत्याची जाम ओरडणी खाल्ली होती...

लहानपणीन आईने ट्रेनिंग दिले होते की कोणीही काही दिले तर खायचे नाही. कोणाच्याही घरी गेलो तरी खायचे नाही. ह्याचे कारण आई नोकरीत असल्याने तिच्या मागे आम्ही काही बाही कोणी दिलेले खावू नये असे होते. जर कोणाच्या घरी गेलोच आईबरोबर आणि त्या घरच्या लोकांनी आग्रह केला तर आधी चोरून आम्ही आईकडे पहायचो. जर आई हलगद हसली नी ती ही उजवी भुवयी वर करून तरच घ्यायचे असा काहीसा आईने न सांगता, न ठरवता संकेत केला होता आमचा आम्ही भावंडानी. हे काही आईने ठरवलेले न्हवते पण एक पडून गेलेली खूण. तर एकदा असेच आईच्या जवळच्या मैत्रीणीकडे गेलो, त्या मावशीने आईला विचारून अगदी मला आवडते म्हणून काजू कतली आणलेली. खूप आग्रह करून मी खात न्हवते कारण आई बाथरूमध्ये फ्रेश होत होती मावशीच्या घरी. मोठ्याने ओरडून मावशीने आईला म्हटले ,अग तू म्हणालीस हिला काजूकतली आवडते म्हणून, ही खात का नाहीये? आईने तिथून ओरडून सांगितले, हो खाते ना ती.
मी त्यावर लगेच ,पण तू कुठे उजवी भुवई उडवून सांगितलेस खा म्हणून? दोन मिनीटे त्या मावशीला हा प्रकार कळलाच नाही. मग आईने आपल्या मैत्रीणीला सांगितले तेव्हा खूप हसत होती. भारीच ग बाई आहेस तू. आईन डावी उडवली भुवई तर तू काय समजणार? त्यावर ही माझे उत्तर, बिलकून खावू नकोस. Happy
मग आई बराच वेळ मैत्रीणीला सांगत होती, अग असे काहीही शिकवले नाही गं वगैरे. Happy

आणि हो, एक सांगायचे राहीलेच, माझ्या आईची आपोआप उजवी भुवई हसताना वर जायची. आणि रागावली असेल तर आठ्या पडूलेल्या असल्याने डावी भुवई ही वर गेलीय असे दिसते. हे गोष्ट मोठी झाल्यावर लक्षात आली तेव्हा आम्ही आईची नक्कल करायचो. Happy

हं, मजेशीर आठवणी तर बर्‍याच आहेत. पण त्यातल्यात्यात ही जरा लक्षात राहिलेली.
आम्ही बहिणी तशा लहानच होतो. आई ही नोकरी करायची त्यामुळे एक लांबच्या नात्यातली बहिण आमच्याकडेच राहून आम्हांला संभाळायची. एकदा एक मावसभाऊ घरी आला. त्याने नातं बितं सांगितलं पण आम्ही काही त्याला ओळखलं नाही. आणि आई, बाबांनी अनोळखी लोकांना घरात वगैरे घ्यायचं नाही सांगितलेलं. ते व्यवस्थित लक्षात ठेवून आम्ही त्याला पूर्णवेळ घराबाहेरच उभं केलं आणि वर खिडकीवर उभं राहून 'चल उडजा रे पंछी' टाईपची गाणी त्याला कटवायला म्हटली. Proud

मी आणि माझ्या जुळ्या बहिणीने तर आई वडिलांना मॅक्सीमम हैराण केलं असावं. परिक्षेच्या वेळी शाळेत लवकर पेपर देऊन उरलेला वेळ देवळात जाऊन बसणं आणि मग तिथेच कुणाला तरी घडयाळ विचारून ठरलेल्या वेळी घरी जाणं.

सकाळी शाळेची बस असायची पण दुपारी मैत्रिणींबरोबर चालत घरी यायचो. आम्ही दोघीच बरोबर असू तर आंधळेपणाचं नाटक करायच्या टर्नस घेत असू. आणि मग जिने डोळे मिटले असतील तिचा हात धरुन घरापर्यंत चालत न्यायचं आणि जाताना इथे खड्डा आहे तेव्हा उडी मार, किंवा इथे पाण्याचं डबकं आहे तेव्हा बाजूने जा अशी कॉमेंटरी चालायची.

मैत्रिणी बरोबर असल्या तर मग मज्जाच मज्जा. शाळा ते घर हा पूर्ण रस्ता सगळ्या सोसायट्यांमधून लपाछपी खेळत घरी यायचं.

वा! काय छान आठवणी आहेत... मी एकांतात एकटी च वाचत होते पण वाचतांना वाटत होत जणु आपण सारे जमा झलो आहोत आणी गप्पा टप्पा करत आहोत Happy

८ वि त असतांना एकदा आई बाहेर गेली असतांना मी शाळेचा ड्रेस धुतला.. त्यात पांढरा शर्ट आणी सलवार ला निळ द्यायची म्हणुन पाण्यात निळ टकायला गेले तर दोन चार थेंबा एवजी दोन चार चमचे निळ पाण्यात पडली आणी पाणी दाट निळ झाल... आई ची खुप भीती वाटायची ....मी जाम घाबरले.. आई आली तर काही खर नाही म्हणुन पाण्याची बादली उचलली आणी गॅलरीतुन पाणी ओतुन दिल ते थेट खाली रहाणार्‍यांनी वाळत घातलेल्या कपड्यांवर...(बाथरुम मध्येच बादली रीकामी करुन बाथरुम धुवायच हे सुचल नाही)... खालच्या काकु बाहेर येवुन मोठ्याने "आमचे वाळलेले कपडे ओले झाले... निळे झाल कोणी वरुन पाणी टाकल...." ओरडत होत्या... आई घरात नव्ह्ती म्हणुन बर झाल Happy

मला मोठ होण्याची (वयाने) खुप घाई होती...मी घरात लहान असल्याने "तु लहान आहेस गप्प बस", "मोठ्यां मध्ये बोलायच नाही" , ... वै नियमांचा मला जाम विट यायचा...

"नमस्कार, खाली दिसला चमत्कार!" >> :d

दक्षिणा, विशाल, नयन, स्वर, योगिता, सायो धमाल उद्योग :d

दिवाळीतील आतिषबाजीचे बरेच किस्से आहेत... हा त्यापैकी एक... त्यावेळी फटाके पुरवून पुरवून फोडावे लागत... एक माळ एकाच वेळी पेटवण्यापेक्षा ती सुटी करून एक एक बार उडवण्यात मज्जा येत असे... त्यातही काही फुसके बार असतं... सगळी मुले उरलेल्या फुसक्या बारातील दारू एका कागदावर एकत्र करून, ती एकाच वेळी पेटवून दिल्याने केसांवर आफत ओढवून घेतली होती...

चाळीत उंदीर मामांचा जाम त्रास... "या उंदरांचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे"... मोठ्यांचे ही वाक्यं अनेकदा कानावर येई... चाळीत उंदिरांची बिळं बरीच होती... एका दिवाळीत ती एकत्र केलेली दारू एका कपड्याच्या तुकड्यात भरून तो बोळा उंदिराच्या बिळात कोंबला आणि दिला पेटवून... आत्ता उंदिरांचा कायमचा नायनाट होईल या खुषित आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो ...

अर्धा तासाने समोरच्या चाळी समोर उभे असलेले अग्निशमन दलाचे बंब बघुन आमची काय अवस्था झाली असेल हे न सांगणेच बरे...

नमस्कार, खाली दिसला चमत्कार!" >>
Lol

हे भगवान अगदी हहपुवा झाली सगळ्यांचे किस्से वाचून.. Lol
माझा मावसभाऊ लहान असतानाचे काही किस्से..
एकदा आम्ही एका ओळखीच्यांच्या कडे गेलो होतो. हा, मी अन माझी आई. त्यांनी आम्हाला चहा केला, हा चहा घेत नाही असं मी सांगितलं तर म्हणाला, मी सरबत घेईन म्हणाला. Lol
एकदा असच का कोण जाणे, याला लहान ग्लासात अन बाकी सगळ्यांना एके ठिकाणी मोठ्या ग्लासात सरबत दिल गेलं. लगेच मोठ्याने म्हणाला, मला नको लहान ग्लासात, मोठ्ठा हवा. Happy

अरे मस्त सही किस्से आहेत एकेकाचे... Lol
मि लहान असताना औदुंबरच्या मावशी कडे कायम पडुन असायचो... तिथे एकदा दत्तजयंती निमित्य महाप्रसाद होता.. विटांची चुल रचुन खुप मोठ्या कडई मध्ये ( याला काईल का कायसे म्हणतात असे वाटते..) घवाची खीर केलेली असायची, आम्ही सगळे छोटे स्वयंसेवक वाढप्याचे काम करायचो, तेंव्हा त्या कडईतुन खिर बाहेर काढताना मि त्या कडईमध्येच पडलो होतो.. नशिब खिर जास्त गरम न्हवती.. बाहेर काढल्यावर असा काही मार खाल्ला की बस परत आयुश्यात कधिही स्वयंसेवक झालो नाही... Proud

राम्या लै खास! Lol तुला वेणाबाईच्या मठातली दत्तजयंतीची खीर आठवते का? देशिंगकरांच्या बोळात काइलमध्ये करायचे आणि पत्रावळींवर वाढायचे.. अहाहा.. लै खास आठवण करुन दिलीस..

मिरजेत एका ठिकाणी खीर करण्याची काहील इतकी मोठी असायची कि ती धुवायला एक दोन बारकी पोरे उतरत असत.

सायो, अय्या आम्ही पण जुळ्या बहीणीनी खूप खूप त्रास दिला आई-पप्पाना बरोबर मोठ्या बहीणीला.
ह्याच्यावरून आठवले,
आम्ही दोन्ही जुळ्या बहीणी खूप दांडगाई करायचो मोठ्या बहीणीवर(४ वर्षाने मोठी आहे). Happy अगदी सेम असेच आईच्या चुलतभावाला एकदा बाहेर ठेवले. खरे तर मोठ्या बहीणीचे टॉन्सीलचे ऑपरेशन ह्या मामाने केले होते तेव्हा मोठी बहीण ओळखत होती. एकदा ते दुपारी बहीण कशी आहे आता विचारायाला घरी आले तर आळीपाळीने आयहोल मधून बघून घेतले १५-२० मिनीटे. मोठी बहीण म्हणाली मी ओळखते ह्या मामांना. हेच तर डॉकटर मामा आहेत. पण मेजॉरीटी विन्स,मेजॉरीटी विन्स असा आम्ही दोघींनी गोंधळ घातला नी बहीणीला म्हटले तू गप्प बस, आम्ही दोघी ओळखत नाही तर त्याना घरात घ्यायचे नाही. मोठ्या बहीणीला ठेवली बेडरूममध्ये कडी लावून ,आम्ही दोघी बाहेर गेलो,साखळी वगैरे लावून सगळी माहीती विचारली नाव काय, काम काय वगैरे. ते मामा सारखे आपले, तुमची ताई आहे का? ती ओळखते मला. १ तास उन्हात होते आपल्या गाडीत बसून वाट बघत आई येइपर्यन्त नी बहीण बेडरूमध्ये अडकून. Proud

मोठ्या बहीणीला 'बेबी' म्हटलले आवडायचे नाही. तरीही सगळ्यांसमोर मोट्या बहीणीला ए बेबी ए बेबी असे हाक मारायचो अगदी शाळेत सुद्धा. ती बिचारी फक्त आईला सांगेन म्हणायची पण आई आल्यावर आमची काही तक्रार करायची नाही. तिच्या एका काकू टाईप मैत्रीण जी अगदी फुग्याचे हात असलेला टीपीकल प्रिंट असलेला शिवलेला फ्रॉक (ते ही 10th,१२th मध्ये घालून नी पार्लर काय प्रकार माहीत नसलेली,मस्त मिसरूड असलेली,तेल लावून चपचपून वेणी ,खाली मान घालून चालायची(मुंबईत राहूनसुद्धा एकदम टीपीकल जोशी काकू टाईप नमुना होता ही मैत्रीण). ती घरी आली की मोठ्याने बहीणीला, तुझी काकू आली बघ असे मोठ्यने जोरात म्हणून पळायचो. Happy ह्याच मैत्रीणीची आजी एक विवाहमंडळ चालवायची, आम्ही मोठी बहीण नेमकी त्या मैत्रीणीच्या घरी अभ्यासाला गेली की, कधी कधी ब्लँक कॉल्स द्यायचो , त्या आजीच फोन उचलत मग कधी उचललाच तर, ए कैसी है तू? आजी आपल्या मराठी हिंदीत, तू कोण? कधी नाहीतर आवज अगदी मोठ्याचां काढून, रूमाल टाकून आमची एक मुलगी आहे लग्नाची असे करून खोटी माहीती द्यायचो. मोठ्या बहीणीला आमच्यावर अगदी संशय. घरी येवून ती रडायची की त्या आजींना कळले तर किती वाईट दिसेल ,तसे दिसेल्,असेल दिसेल वगैरे. आम्ही उलट चिडवायचो की त्याना कसे काय कळणार वगैरे? आज आठवले त हसायला ही येते नी वाईट वाटते की काय मोठ्या बहीणीला त्रास द्यायचो. तरी तिने आईला कधीच कंम्प्लेट केली नाही. खरे तर ती आमचा नीट सांभाळ करायची आई पप्पा घरी नसताना. Happy मस्त दिवस होते ते घरी इतका दुपारी गोधंळ घालायचो आम्ही जुळ्या बहीणी. Happy

माझी आणि माझ्या धाकट्या मावसभावाची मुंज एकाच दिवशी , एकाच मांडवात झाली. डोक्याचा चकोट केल्यानंतर भिक्षावळीचा विधी संपन्न झाला. त्यावेळी झोळीत वेगवेगळ्या प्रकारचे लाडु आणि सगळ्यांनी दक्षीणा म्हणुन दिलेले रुपये.... दोघांकडे मिळुन काहीतरी अठरा रुपये जमले होते....
थोड्या वेळाने पुढच्या विधीसाठी म्हणुन गुरुजींनी बटुंना बोलवण्यास सांगितले. दोघेही बटु गायब. अर्ध्यातासानंतर आण्णांनी आम्हा दोघांनाही शेजारच्या व्हिडिओ सेंटरमधुन धरुन आणले. रजनीकांतचा "गंगवा" बघत बसलो होतो. तेही कमरेला पितांबर आणि डोक्याचा गोटा अशा अवस्थेत. भिक्षावळीच्या पैशाचा एवढा छान उपयोग कधी कुणी केलाय ? Proud

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)

विशाल Rofl
०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

विशाल, सायो हाहापुवा झाली माझी.
सायो, आजीला 'ए कैसी है तू?' म्हंजे टू मच!!!! Happy

मो, आजीला 'कैसी है तू' मी नाही, मनस्विनी म्हणायची.

लहानपणी आम्ही जिथे भाडयाच्या (no pun intended) घरात रहायचो तिथे मागच्या अंगणात जमिनीपासून साधारण ३ फूट खाली हौद होता आणि वर झाकण नव्हते. आम्ही तिथून खूप पळापळ करायचो. संध्याकाळी पाणी आले की आईला तिथल्या नळातून भरावे लागायचे. एकदा मी ७-८ वर्षांची असताना आई बाहेर गेली होती, मी आणि माझ्या ताईने आईला इंप्रेस करण्याकरता पाणी भरायचे ठरवले. नेमके त्या दिवशी माझा पाय घसरला आणि मी डायरेक्ट हौदात लँड झाले. हौदात शेवाळे झाल्यामुळे आत घसरले. पण पडता पडता 'ताई ....' अशी जोरात हाक मारली आणि हात वर केला. ताई शेजारीच उभी होती. तिला माझी फक्त बोटं दिसली, त्याला धरून तिने ओढून काढले. शेजारच्या काकू आल्या, आणि मग त्याने पोट दाबून पाणी काढले (पण नव्हते). आई रागावली नाही, पण आमचा हौदाजवळचा मुक्त संचार मात्र कमी झाला.
बाबांचे एक मित्र नेहेमी आमच्या घरी आले की खुर्ची मागे करुन भिंतीला डोके टेकवून बसायचे. त्यांच्या डोक्याला भरपूर तेल असायचे जे भिंतीला लागायचे. आमच्या घरी बर्‍याच ठिकाणी असे डाग झाले होते. मी आईला हे बोलताना ऐकले. दुसर्‍या दिवशी हे काका आले आणि नेहेमीप्रमाणे बसायला लागले. त्याआधीच मी त्यांना म्हटले - "तुम्ही रोज तेल लावून आमच्या भिंतींना टेकून बसता, बघा कसे सगळे डाग पडलेत. आमची भिंत सगळी खराब झाली आहे." त्यानंतर ते कधीही टेकून बसले नाही आणि भिंत खराब केली नाही. एवढे चांगले काम करुन मी मात्र बोलणी खाल्ली. Happy

अरे सॉरी, गडबड झाली.....
पण हाहापुवा तुम्हा तिघांनाही होते. Happy

Pages