लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका सुट्टीमध्ये मी मामाच्या गावी गेलो होतो. बरोबर तीन मावस भावंडं पण होती, (सगळयांचं वय ९ ते १२ वर्षांच्या मधला) सगळा वेळ दंगामस्तीत जायचा......
एका संध्याकाळी मामाला जमिन करण्यासाठी लाल माती हवी होती त्यासाठी तो चार चाकी हाथगाडी शोधत होता.....भंगारवाल्याची गाडी मिळाली आम्ही पण येणार असा हट्ट आम्ही धरला तो म्हणाला "चला गाडी घेऊन पुढे."
समोर डोंगर होता नागमोडी कच्चा रस्ता आम्ही गाडी ढ्कलत ढ्कलत चढ चढु लागलो, थोडे वर गेल्यावर मि सगळ्यांना म्हणालो तुम्ही बसा मी गाडी ढ्कलतो. तीघेजण बसले आणि मी गाडी वर ढकलण्या ऐवजी गाडी खाली ढकलली गाडीला धरुन मी खालच्या दिशेने धावु लागलो ,पण उताराला गाडी जोरदार पळायला लागली आणि माझ्या हातुन सुट्ली मी मागुन धावतोय गाडी माझ्या पुढे चार फुट लांब एव्हाना माझ्या भावंडांना कळलेलं काय झालेलं आहे. ते सगळे घाबरुन वाचवा वाचवा असे ओरड्त होते. समोरचं दृष्य पाहुन मि म्हट्ले आता गेले सगळे कालव्यात (कारण खाली आठ्लेला कालवा होता) पण इतक्यात त्या सगळ्यांच्या सुदैवाने मामा वरच येत होता त्यानं आमची वरात पाहीली लगेच स्मोर येऊन त्याने गाडी चा रोख बदलला आणि गाडी पलटी झाली (जर त्याने तसे केले नसते तर गाडी वळण न घेता सरळ कालव्यात) तो पर्यंत मी जी धूम ठोकली होती ती सरळ घरात, घरात जाऊन मी सरळ माळ्यावर भात ठेवण्यासाठी मोठ्या कणग्या असतात (काट्यांनी विणून मग शेणाने आतून बाहेरुन सारवलेले मोठे पात्र त्यांना कणगी म्हणायचे) असतात त्या मागे लपलो. नंतर सगळे आले. आणि मग संध्याकाळी मामाने माझी सांग्र-संगीत पुजा केली ती वेगळीच....

अजूनही ते भेट्ले की मला काळ म्हाणतात (आमचा काळ ). तो विषय निघाला की अजूनही आम्ही खुप हसतो

मी माझ्या बाहुलीचा एकदा स्टेप कट करायला गेले होते, माझ्या फॅशन डिझाईनचे मॉडेल्स बिचार्‍या माझ्या बाहुल्या असायच्या. आईने शेवटी चिंध्या लावलेल्या, केस कुरतडलेल्या त्या बाहुल्यांना माळ्यावर जागा दिली. आता मी काय कप्पाळ ओरडणार माझ्या लेकीला (माझेच गुण घेऊन आलेय ती)

लाहानणी मि आणि माझ्या बहिणी मिळुन खुप वेळा भातुकली खेळत असायचो. त्यात बीस्कीट्चा चुरा म्हणजे आमच जेवण. तर एकदा नविन प्रयोग म्हणुन शोभेच्या अळुचि भाजि कट करुन कच्ची खाल्ली. आणि आमच्या घशाचि जी काहि वाट लागली. घडाबडा लोळत होतो सगळ्या.

केतकी माझ्या भाचीने अक्खे क्रेयॉन्स किसुन किसुन संपवलेत कधी गाजरका हलवा कधी कोशिंबिर नी आणखीन काय काय म्हणुन Proud नशीब नुसतेच किसले खाल्ले नाहीत कधी

आनी शेंगदाण्याचे लाडू? मधे गूळ घालुन?

आमचा भाग म्हणजे सगळा शेती, संशोधनाचा असल्याने...काय काय नविन नविन किडे, द्विपाद, चतुष्पाद, सहस्त्रपाद, प्राणी बघायला मिळायचे.
पावसाळ्याच्या सुरवातीला, कुंकवासारख्या लाल रंगाचे रेशमी किडे सापडायचे ( त्यांना आम्ही वेल्वेटचे किडे म्हणायचो) १-२ च दिवस... नंतर कुठे गायब व्हायचे कुणास ठाऊक! रस्त्यावर मउ मातीमधे कधी कधी भोकं पडल्यासारखी बिळं दिसतात...त्यांच्यातला किडा काढायचो..तळहातावर ठेउन , मुठ बंद केली की त्याच्या गुदगुल्या अनुभवायचो.
हिरव्या, मोरपिशी रंगाचा एक झुरळाएवढा पण कडक असा षष्ठपाद असतो...त्याच्या मानेच्या सांध्यामधुन दोरा बांधायचा आणि त्याला कॉलनीतील शहाबादी फरशीवर भर उन्हात ठेवायचे...तो बिचारा चटके लागुन उडायचा...कि त्याला बांधलेल्या दो-यासोबत आपणही गरगर फिरायचे! नंतर त्या किड्याला रिकाम्या हिंगाच्या डबीत ठेवायचे ( थोडक्यात 'पाळायचे') खाण्यासाठी त्याला कोणीतरी सांगितले म्हणुन बेसन/ गव्हाचे पीठ, बाजरीचे दाणे द्यायचे ..! पण बिचारे ३-४ दिवसात मरुन जात...! काही जगले वाचले तर छोटी छोटी अंडी देत!
साप, विंचु, इंगळ्या तर नेहमीच निघायच्या....! एकदा माझ्या मैत्रीणीच्या वडिलांनी रात्री केव्हातरी उठल्यावर, एका विंचवाला मारुन आगपेटीमधे भरुन ठेवला.... तिच्या आईने, सकाळी गॅस पेटवायला आगपेटी उघडल्याबरोबर... टुणकन उडी मारली आणी नंतर जे घर डोक्यावर घेतले ..कि विचारु नका!

परवाच्या रविवारी रात्री... आईने व्याही / विहीण, नात आणि नातजावयाला जेवायला बोलावले होते. जेवण आटोपल्यावर, भावाची ३ वर्षाची मुलगी पाहुण्यांना काय म्हणाली असेल? ," पाहुणे आले की पैसे देत असतात", ! ते ऐकुन पाहुण्यांची काय गोची झाली असेल याची कल्पना करा! आम्ही तिला डोळ्यांनी दाबतोय तर तेही ऐकत नाही! बिचा-या पाहुण्यांनी ५० ची नोट काढुन बाळाला ( तिला लहान भाऊ झालाय ) दिली! नंतर ही हुश्शार म्हणते," पाहुणे जेवण झाले की त्यांच्या त्यांच्या घरी झोपायला जातात". त्यांनी लाइटली घेतलं म्हणुन ठीक आहे नाहीतर, व्याहीबुवांसमोर.......

हा प्रकार माझ्या मुलानेही केलेला आहे. कितीतरी वर्षातुन माझी मैत्रीण कोपरगावाहुन आली होती. (जंगलीदास महाराजांच्या आश्रमातर्फे असलेल्या उपक्रमात असते ती) . तीला मी जेवायला बोलावले होते, हा शहाणा, तीने बिचारीने १० रु. दिले जातांना तर तिला म्हणतो ," हॅ १० रु. मधे काय येतयं...एक कॅडबरी? " यावर आपण कसानुसा चेहरा करुन बाजु सांभाळावी...! ती गेल्यानंतर त्याच्याकडे 'बघितलं" चांगल! Happy

मी ६-७ वर्षाचा असताना एकदा मांजराला घेवुन झोपलो होतो (म्ह णजे ब र्याच वे ळ तसे झोपायचो), कुशीत पांघरुन घेउन. रात्री मांजराने कान चावला आणि मी ओरड्त उठलो. मग सकाळी ( मळ्यात रहयचो आम्ही) दवाखान्यात नेउन ड्रेसिंग केले , इंजेक्शन वगैरे दिले. त्याच दरम्यान टेबल फैन मध्ये बोट घातले होते. (सुरु असताना).

७ वीत असताना पेट्रोल कसे पेटते ते बघन्यासाठी म्हणुन काकांच्या लक्ष्मी गाडीतील थोडे पेट्रोल काढुन घेतलें, रीकाम्या शाइच्या दोउत मध्ये. मित्राला घेउन मागच्या गल्लीत गेलो. कोणि नाही ते बघुन बाटलीचे टोपण काढुन काडेपेटीने बाटलीला आग लावली. जशी बाट्लीच्या तोंदाला आग लागली तसे बाट्ली हवेत फिरवु (नाचवु) लागलो. मित्र पण नाचु लागला. पण थोडे पेट्रोल चे शिंतोडे हातावर पडले. भाजल्यावर ती बाट्ली मी खाली टाकली, मग खुप म्हणजे खुप मोठा भडका उडाला.... आणि माझा शाना (!) मित्र आमच्या घरी पळाला .... काय झाले ते सांगायला. पण ती आग लगेच विझ्ली आणि मी पण जसे काही झालेच नाही अशा अविर्भावात "निवांतपणे" घरी आलो. मग..... घरच्यांचा Angry आणि मी... Sad

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

Lol वेड्यासारखी हसले सगळे किस्से वाचून...

सातवीत आसताना आम्ही शिकवणीला जायचो, एकदा १ एप्रिलला सर्वाना एप्रिल करायचे म्हणुन, कागदात थोडे शेंगदाणे घेतले आणि खडी साखरेच्या ऐवजी तुरटीच्या खडयाचे तुकडे घेतले आणि गेलो शिकवणीला आणि प्रसाद म्हणुन वाट्ले,
पहिला खडा खाल्ला तो आमच्या शेजरच्या विजयानेच आणि जोरात ओरडली " शी...... आंबट आहे हे "
काय विचार करताय जास्त काही नाही झाले फक्त दिड तास ओणवा उभा होतो

मांजराला घेवुन झोपलो होतो >>>> मी देखिल लहानपणी नेहमी मांजराला बरोबर घेऊन झोपायचो. घरातले खुप चिडायचे. एकदा त्यांनी मांजराला घराबाहेर ठेवले. आणि त्या रात्री त्याला कुत्र्याने मारले. Sad दुसर्‍या दिवशी मी अख्खे घर डोक्यावर घेतले होते.

===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

मि पण मांजराला कुशित घेउन झोपायचे. कधि कधि चिरडायचे पण ते. पण तिथेच झोपुन रहायचे.

आमच्या घरी ४-५ मांजरं आहेत. अजुनही मी घरी गेलो की मांजरांसोबत दंगा घालतो. त्यांना कुशित घेउन झोपायला मजा येते ना Happy

------------------------------------------------------
आठवणींच्या मागे धावलॉ कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.

मल्ल्या मोठा हो आता Lol
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......

मल्ल्या लगिन कशाला केलंस भावा मग? Light 1

दक्स Lol

------------------------------------------------------
आठवणींच्या मागे धावलॉ कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.

मल्ल्या लगिन कशाला केलंस भावा मग? :दिवा घ्या: >>>>>>

Rofl

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

हसून हसून पुरेवाट झाली.
माझे बालपण मालाडच्या दत्त मंदीर रोडवर गेले. तिथे कोपर्‍यावर एक मोठी पोस्टाची पेटी होती. का कुणास ठाऊक पण त्या पेटीबद्दल आम्हाला विचित्र काहितरी वाटायचे.

चण्याशेगदाण्याच्या पुडीचे कागद आम्ही त्यात टाकायचो. कागदाची न उडलेली विमाने त्यात टाकायचो.
दसर्‍याला आपट्याची पाने टाकायचो. दिवाळीला अर्धवट जळालेली फुलबाजी टाकायचो.

बर्फाचा गोळा खाणे हि त्यावेळी चैन असायची. त्याचा रस चोखायचा आमचा स्पीड खुप असायचा. त्यामूळे त्या गोळेवाल्याला परत परत त्यावर ते सरबत घालावे लागायचे. दोनतीनदा झाले कि तो नकार द्यायचा. मग आम्ही तो उरलेला गोळा त्या पेटीत टाकून द्यायचो. त्यावेळी फारशी पत्रे वगैरे नसायची. पण तो पोस्टमन नक्किच वैतागला असणार.

मला पण पोस्टाच्या पेटी बद्ल उत्सुकता असायचि. तेव्हा मि परुळे म्हणुन गाव आहे वेंगुर्ले तालुक्यात (श्वास च चित्रीकरण झाल तिथे) तिथे रहायचे आणि माझ आजोळ मालवणला. मि साध्या कागदावर चिठ्ठी लिहुन त्यात फुले, टाकुन मामे बहिणिला पाठवायचे. एकदा तर गोगल गाय पाठवलि होति. भेटले तेव्हा विचारल मिळालि का म्हणुन उत्तर तर तुम्हाला माहितिच आहे.

बाप्रे.............. हसून हसून पुरेवाट झाली माझी. latest कुणाला काही लहानपणच्या मस्त्या आठवत नाहियेत का? घ्या! माझ्याकडून थोडी addition.

लहानपणी मी आणि माझी लहान बहिण पाळणाघरात रहायचो. सांभाळणार्‍या मावशी जरा कुचकट होत्या. त्यांची मुले (एक मुलगा व एक मुलगी) पण तशीच.

दुपारी झोपायचे असल्यास अंथरायला चटई न देणे, थंडीच्या दिवसांत पांघरायला दोघींना मिळून एकच पातळ शाल देणे, घरात फळे वगैरे आणलेली असल्यास आम्हांला न देता चोरून खाणे, जमेल तेव्हा डोळे मोठ्ठे करून अंगावर ओरडणे, दुपारी आम्हा बहिणींना झोपायचे असल्यास त्यांच्या मुलांनी मुद्दाम फूल्-रॅकेट खेळणे इ.इ. उद्योग ते करत असत. आई-बाबा नोकरी करत असल्याने आणि ओळखी मध्ये दुसरे कुठले पाळणाघर नसल्याने आम्ही मुकाट्याने सर्व सहन करायचो. शेवटी मात्र माझी सहनशक्ती संपुष्टात आली व मी सूड घेण्यासाठी म्हणून एक गंमत केली. त्यांच्या घरात गॅलरी मध्ये कट्ट्यावर पायपुसणी वाळत घातलेली असत. त्यावर मी कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांच्याच घरातल्या एका पेनाने आचरट असे काही खरडून ठेवले. त्यांचा मुलगा त्याच्या बहिणीस उद्देशून जे शब्द बोलत असे तेच लिहून ठेवले. माझा असा कयास होता की त्यांच्या मुलाला मावशी मस्त दणके देतील पाठीत असा चाळा केला म्हणून. सुरुवातीला असेच झाले. मावशींनी त्यांच्या मुलाचेच बकोट धरले. पण नंतर मात्र माझ्यावरच आरोपपत्र सिद्ध झाले. संध्याकाळी आई-बाबा office मधून घरी आल्यानंतर मावशींनी तिखट्-मीठ लावून आईला सांगितले आणि आईने त्यांच्यासमोरच माझी पाठ तिंबली. Sad मला खूप वाईट वाटले. असे वाटले की आमच्यासारख्या निरुपद्रवी लहान जीवांना हे लोक छळतात तर त्यांना काहीच शिक्षा नाही. आणि मी अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून मला मात्र शिक्षा. Sad देवाजवळ न्यायच नाही असे वाटायचे.

पण आज आमचे सर्व काही छान चालले आहे. त्या कुचकट family मध्ये मात्र अतोनात problems आहेत. त्यांच्या नवर्‍याची नोकरी सुटली, सांडगे+पापड इ. करून गुजराण करण्याची वेळ आली. मुलगी (चारित्र्याबद्दल) बद्दल जनमानसात काही-बाही ऐकू येऊ लागले. कालांतराने तिचे लग्नही झाले परंतु थोड्याच दिवसांत सासरकडचांनी तिला माहेरी परत धाडून दिले. त्यामुळे आपली करणी वाईट असेल तर वाईटच फळ मिळते याची खात्री पटली. हे जरा अवांतर झाले पण एकातून दुसरे सांगत गेले.

काय काय उद्योग केलेत सगळ्यांनी!
माझी मुलं लहान असताना (जरा सॉरी बरं का आता माझी मुलंच मोठी आहेत.....त्यामुळे मला आता त्यांचेच उद्योग आठवताहेत. माझे लहानपणीचे उद्योग नाही आठवत आता.)
आमच्या कडे आमच्या कॅनडातल्या काकू आल्या होत्या. मे महिना असल्याने माझी दोन मुलं(मुलगा, मुलगी) व नणंदेची दोन(दोन मुली) आणि जावेची दोन्(मुलगा मुलगी) अशी वानरसेना जमली होती. काकू निघाल्या. माझा मुलगा समोरच होता. त्याला म्हटलं , आजीच्या पाया पड. तो पडला. काकूंनी शंभरची नोट काढून दिली. त्याचे डोळे विस्फारले. तो अचानक पळत सुटला व उरलेल्या सेनेला घेऊन आला. त्यांना कानात सांगू लागला, "अगं लवकर पाया पडा आजी पैसे वाटताहेत."

भ॑न्नाट किस्से आहेत सगळ्यांचेच! अशक्य हसले.

आमच्या शेजारी एक कावळे आडनावाचे काका यायचे. त्यांच्या बायकोचा उल्लेख आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्या काकवा 'कावळ्याची चिमणी' असं करायच्या. एकदा ते कावळे काका आले आमच्या शेजारच्या काकांकडे तर मी त्यांना विचारले 'तुमची चिमणी कुठेय?' ते शेजारचे काका काकु एकदम गोरेमोरे झाले.

आम्ही एका मोठ्या कॉलनीत रहायचो. तिथे रहाणार्‍या बर्‍याच कुटूंबात शिकायला/नोकरीला आलेले भाऊ बहिण असत. पैकी एका काकांच्या भावाचे आणी दुसर्‍या एका नर्सकाकुंच्या बहिणीचे सुत जमले. ते दोघे एकदा संध्याकाळी आमच्या शाळेजवळ भेटले. शाळा संपली होती पण आमचा कसला तरी क्लास संपवुन येतान मी त्या दोघाना पाहिले. दुसर्‍या दिवशी त्यातल्या मुलाला मी बर्‍याच जणांसमोर विचारलं, ' काल तुम्ही बोलत होता ती ताई कोण होती?' त्यांची त्रेधा उडाली पण सावरुन ते म्हणाले, ' तुझ्यासारखीच ती पण आहे' त्यावर मी त्यांना म्हणाले , 'पण ती माझ्याएवढी कुठे आहे?'
नंतर काही वर्षांनी सगळे संदर्भ लागले:))

इथे सर्वांनी अगदी धमाल किस्से सांगितलेत! हसून हसून मुरकुंडी वळली!!

मी पूर्वप्राथमिकसाठी नूतन बालविकास मंदिर ह्या पिले सरांनी चालवलेल्या शाळेत जायचे. पुण्यात टिळक रोडला असलेल्या आमच्या घरापासून ही शाळा अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होती, मात्र शाळेत जाण्यासाठी टिळक रोड आणि त्यावरच्या वर्दळीच्या वाहतुकीचा सामना करायला लागायचा.

एक दिवस आई मला शाळा सुटल्यावर आणायला वेळेत आली नाही. माझे वय असेल तेव्हा साधारण चार-साडेचार वर्षांचे. शाळेच्या दारात साधारण १० मिनिटे उभे राहून कंटाळल्यावर मी सरळ दप्तर उचलले व आपली आपण टिळक रोड ओलांडून घरी आले. मोठ्या विजयी मुद्रेने व अपेक्षेने आईकडे बघितले, वाटले की आपले आता मस्त कौतुक होणार! कसले काय!! घरी अचानक पाहुणे आल्यामुळे आईला निघायला उशीर झाला होता. तिने त्या पाहुण्यांसमोरच अस्मादिकांच्या पाठीत रट्टा दिला व माझा हात धरून तरातरा उलट पावली मला शाळेत घेऊन गेली. तिला माझ्या मुख्याध्यापकांना, म्हणजे पिले सरांना जाब विचारायचा होता. पिले सर शाळेच्या इमारतीतच खालच्या मजल्यावर राहात. आम्ही तिथे पोचल्यावर पाहिले की शाळेचे मुख्य गेट आतून बंद होते. मी कंबरेवर हात ठेवून जोरात, खणखणीत स्वरात हाक मारली, ''ओ पिले, माझ्या आईला तुमच्याशी बोलायचंय.... बाहेर या.''
आता गोरीमोरी व्हायची आईची पाळी होती! बिचारे पिले सर, काहीही बोलले नाहीत, आम्हाला आत घेतले, आईचे म्हणणे ऐकून घेतले आणि माझ्या ''ओ पिले, मला घसरगुंडीवर खेळायचंय,''ला मुंडी हालवून संमतीदेखील दिली!!

हा किस्सा, लहानपणच्या किश्श्यात सांगावं का किश्श्यांच्या बाफवर माहीत नाही..
मी दुसरीत होते.. माझी मोठी बहिण पाचवीत
आम्ही दोघी इन्फॉर्मली एका सरांकडे क्लासला जायचो.. (माझं अक्षर सुधारावं म्हणून Wink )
एकदा क्लास चालू असताना दिवे गेले.. सरांनी ताईला सांगितलं की टेबलावरून घड्याळ आण.. ते आणताना ताईकडून पडलं.. आणि त्याला क्रॅक गेला.
घरी परत येताना ताई मला म्हणाली, 'शिरीष प्लीज आईबाबांना सांगू नकोस'
मी बरं म्हणाले..
दुसर्‍या दिवशी मी ताईला म्हणाले, माझं दप्तर भर .. ती म्हणाली 'का? तुझं तू भर'..
'ताई दप्तर भर, नाहीतर "सघफ"' ..
"सघफ" म्हणजे 'सरांचं घड्याळ फोडलं' हे ताईला कळायला अर्थातचं वेळ नाही लागला..
मग मी हळूहळू ताईकडून सगळी कामं करून घ्यायला लागले..
दप्तर फेकायचं रस्त्यात, आणि ताईला फक्त 'सघफ' म्हणायचं..तीची चिडचिड व्हायची पण ती आणायची ते..
मग ती हे आईला सांगायची.. आई म्हणायची "तू नको आणूस ना.. टाकूदेत तिला, मी बघेन तिच्याकडे मग"
पण ताई मात्र आणायची आणि आईला काही कळायचं नाही की ती असं का करतेय..
असं करता करता वर्ष गेलं..उन्हाळ्याची सुट्टी आली.. माझी मामी, मी आणि ताई पत्ते खेळत होतो.. ताईकडे असं एक पान होतं की ते तिनं टाकलं तर माझा हात होणार नव्हता.. मी पुन्हा म्हणाले 'सघफ'..
तोपर्यंत ताईच्या सहनशक्तीचा कडेलोट झालेला
ती म्हणाली 'सांग सांग' .. मामी म्हणाली काय झालं? मी सांगितलं की हिनं सरांच घड्याळ फोडलं..
मामी म्हणाली की ठीक आहे आपण भरून देऊ..
मग मामी नं आईला सांगितलं तर आईला कळेना की हे सर कुठले, कारण आम्ही क्लास सोडूनही ६ महिने झालेले Wink
मग अर्थातच आईही म्हणाली की घड्याळ भरून देऊ..मग आईला सगळा प्रकार सांगितल्यावर आईनं ताईला समजावून सांगितलं.. की तू इन्टेन्शनली फोडलं नाहीस ना, मग आम्ही कशाला रागवलो असतो.. रागवलो असतो तरी ते एकदा रागवून संपलं असतं.. त्याकरता तू असं वर्षभर सगळं सहन केलस?

अर्थातच मलाही छान लेक्चर मिळालं..

त्यानंतरच्या वर्षभरात मला ताईनं कुदल कुदल कुदललं..संधी मिळाली/नाही मिळाली की हाणायची.. Wink

असं वागू नये ह्याचा मला - आणि असं सहन करू नये ह्याचा तिला आपसूकच धडा मिळाला!

ह्यामुळे ब्लॅकमेल हा शब्द मला फार लहानपणीच कळला. लहान मुलं अगदी निरागस वगैरे काही नसतात हे घरातल्यांना कळलं..
लहानपणी केलेल्या काही उद्योगांमुळे जे कानफाट्या नाव पडलेलं ते पुसलं जायला आणि मी बर्‍यापैकी सरळमार्गी - सज्जन आहे हे लोकांना पटायला बराच वेळ लागला. (मला एक्स्ट्रा एफर्टस मात्र नाही घ्यायला लागले - कदाचित मी जो संधीचा आपसूक फायदा घेतला तो माझ्यासाठी आऊट ऑफ कॅरॅक्टरच असावा.. कारण असंलं काहीच करण्याचा मोहही नाही झाला मला पुन्हा)
असो, आता जवळच्या सगळ्यांना मी सज्जन आहे असं वाटतं तरी खरं Happy

छान कसला डेंजर आहे! Wink
माझ्या लेकीनं असं केलं असतं तर मला धसका बसला असता..

आईनं छान मॅनेज केलं.. हा प्रसंग कायम मजेचा म्हणूनच सांगितला गेला..
मला गिल्टी फीलिंग न येताही त्यातली चूक कळली...

मी हा इतरांना बिनधास्त सांगू शकते, ह्यातच सगळं काय ते आलं!

Pages