लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची आता बरोब्बर इमेज बनतेय बर का तुझ्याबद्दल
>> Lol
व्हावी म्हणून तर इथे लिहितीये हे सगळे किस्से .. Wink

नानबा, पटत नाही... तिथे सगळ्याना आत सोडतच नाहीत..
>> माहीत नाही, हे काही आखोंदेखं नाहीये.. मी ही ऐकलेलाच आहे हा किस्सा ...
(पण अशा जागी पुजार्‍यांशी ओळख असेल तर सोडतात आत (निदान माझ्या गावात तरी मला हा अनुभव आहे))

बाकी सर्वांना -^-

घरी आई रोज स्वयंपाक केला की देवाला नैवेद्य दाखवायची, कधी कधी लहान भावाला सांगायची नैवेद्य दाखवायला....एकदा रविवारी नॉन्-व्हेज केले असताना, सवयीप्रमाणे भावाने देवाला त्याचाही नैवेद्य दाखवला Uhoh

आमच्या शाळेत खास सामान्य ज्ञान नावाचा पेपर असायचा मी १लीत असताना "देवतांची वाहने" या प्रश्नाला "विष्णूचे वाहन स्कूटर,सरस्वतीचे वाहन सायकल, गणपतीचे वाहन रिक्षा इ.इ." लिहिले होते.
बाईंनी विचारले की"घरात देव नाहीत का तुमच्या? "त्यावर मी तत्परतेने "आहेत पण त्यांची वाहने नाहीत , त्यांचे त्यांच्या आवडत्या (मला पाळीव म्हणायचे होते) प्राण्या/पक्षाबरोबर फोटोही आहेत."
असे उत्तर देऊन बाईंनाच निरुत्तर केले.

Lol
ल्हानपणी बोटं दारात चेपवुन घेणे, सायकलची चेन उलटी फिरवत बसलेल असताना त्यात बोट अडकवुन घेणे,
जमत झेपत नसताना पण सापडलेली मोठी वीट किंवा दगड उचलुन दुसरीकडे नेताना पायाच्या बोटांवर पाडुन घेणे,
काळ्या माळ्या अस काहितरी बडबडत गोल गोल फिरुन चक्कर येवुन पडुन डोक्याला खोक पाडुन घेणे,
घराजवळच्या वाळु डेपोतगोंधळ करणे, तिथेच स्क्रॅप म्हणून टाकलेल्या एका टायरच्या स्टेपनीवरुन पडुन गुढघ्याच्या खाली मोठी जखम करुन घेणे असे बरेच उद्योग केलेत.
काहिंच्या खूणा अजुन आहेत. आणि काहिच्या आठवणीने अजुनही हातापायाची बोट दुखतात. Happy

लहानपणी भावा सोबत बेट लावलेली. घरात एक मोठ्ठा तांब्या आहे. तो तांब्या भरुन पाणी पियुन दाखवायचे. आई ओरडली त्यावर. मग दुपारी आई झोपल्यावर आम्ही दोघे घराबाहेर बसुन बेट पुर्ण करायचे ठरवले. मग दुपारी भावाने तांब्या भरुन आनला.. मी कसे बसे आर्धा संपवला. भाउ चिडवायला लाग्ला. मग काय...मी कसेतरी करुन पुर्ण तांब्या पाणी पियुन संपवले...:फिदी: मग अस्मादिक खुश होउन त्याला चिडवु लाग्लो Happy त्याला चिडवता चिडवता एक्दमच भडा भडा माझ्या नाका तोंडातुन सगळे पानी बाहेर.. Proud अस्मादिकांनी तिथेच उलटी केली Sad

अशीच दुसरी बेट म्हंजे आमच्या घराच्या शेजारी दुमजली घराचं बांधकाम चालु होतं. दोन तीन ट्रक वाळु येउन पडली होती. मी, माझा भाउ नि माझा चुलत काका (काका माझ्याच वयाचा आहे) तिघे खेळत होतो. काकाने पहिल्या मजल्यावरुन वाळुत उड्या मारायचं सुचवलं.. Proud मग आम्ही मारली. परत मग चला दुसर्‍या मजल्यावरुन ट्राय करायचे ठरले.. Happy काकने मारली उडी, मी हि मारली... वाळुतुन बाहेर येई पर्यंत आई झाडू घेउन समोर.... Proud अंगाला वाळु चिटकलेली सगळी कडे. आईला नको म्हणत अस्ताना आईने झाडुने झाड झाड झाडुन मला साफ केले Sad

मला कळ्ळेच नव्हते की आमची बेट आईला कशी कळली... भाऊ माझ्या मागुन उडी मारनार होता. तो उडी न मारता आईला घेउन अलेल... ते नंतर क्ळ्ळं. Proud

नाही तुला इतकं स्पेसिफिक आठवतंय >>
नाय गो पोरी!!
काही खुणा आहेतच की...
इशानचे वेगळे उद्योग असतात. तो मोठा झाला की लिहिल ह्याच बीबी वर. Happy

मल्ल्या Lol

एकदा मे महिन्याच्या सुट्टीत घरातील सर्व मोठी मंडळी (आई, २ काकवा, २ काका इ.) आम्हा मुलांना माझ्या वडीलांच्या देखरेखीखाली सोपवून गुपचूप 'बसेरा' पिक्चर बघायला गेली होती. आम्हाला त्यांचा फार फार राग आला होता. मी व माझे दोन चुलतभाऊ, आम्ही त्या रागाचे उट्टे आमच्यावर ''ताईगिरी'' गाजविणार्‍या दोन चुलतबहिणींवर काढायचे ठरविले. वडील दुपारचे डाराडूर झोपल्याची खात्री झाल्यावर आमच्या त्रासपर्वाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात दोघीही बहिणी चिडल्या. त्यांनी आमच्या कटकटीपासून वाचण्यासाठी आमच्या स्वयंपाकघरात स्वतःला बंद करून घेतले. मग झालेच! आम्हीही त्या दरवाजाला बाहेरून कडी घातली. शिवाय स्वयंपाकघराला बाहेरच्या पॅसेजमध्ये उघडणारी एक उंचावरची खिडकी होती झडप असलेली. एका उंच स्टुलावर उभे राहून आमच्यापैकी कोणी एक जण स्वयंपाकघरात डोकावून त्या दोघी आत काय करत आहेत त्याचे समग्र वर्णन इतरांना करत असे. मग त्यांना त्या झडपेतून आत हात घालून चिडवणे, वेडावून दाखवणे, चित्रविचित्र आवाज काढणे इ. सुरु झाले. थोड्याच वेळात त्या दोघींना आपण कोंडले गेलो आहोत ह्याची जाणीव झाली. त्यांनी दारावर आतून खूप धडका मारल्या, आम्हाला धमकावले, पण आम्ही शेवटपर्यंत दार उघडलेच नाही!
मग त्या शेवटी रडायला लागल्याची खात्री झाल्यावर हळूच दार उघडले व लपून राह्यलो. दोघी रागाने लालेलाल झाल्या होत्या. रडून रडून नाकाचे शेंडे सुजले होते. डोळे लाल झाले होते. अर्थात मोठी मंडळी परत येईपर्यंत आम्ही त्यांना आमच्या मर्कटचेष्टांनी पुन्हा हसवू लागलो होतो. आणि त्यामुळे त्याही आमची तक्रार करण्याचे विसरून गेल्या.

शाळेत असतांना एका मुलाशी भांडण , अस्मादीकांनी त्या मुलाला चांगलाच बुकलला अन उचलुन खाली आदळला , खरचटले , थोडेफार रक्त बाहेर , त्या मुलाचे आईवडील आमच्या घरी ओरडत भांडायला आले.
वडीलांनी पहीलाच प्रश्न विचारला ' मुलाचे नांव काय हो तुमच्या ? '
म्हणाले ' मारुती '
वडील म्हणाले , 'मग कस शक्य आहे माझ्या मुलाने 'मारुती' ला उचलणे '
भांडण राहील बाजुला , जमलेली मंडळी जोरजोरात हसत परत गेली Happy

१) धरमवीर पिक्चर टिव्हीवर पाहिल्यानंतर कॉटवरून लोखंडी स्टुलावर उडी मारण्याच्या प्रयत्नात डोक्याला खोक पडून चांगले ५ टाके पडले होते.
२) फटाके तापवले की चांगले वाजतात म्हणून डायरेक्ट गॅसवर तवा ठेवून त्यावर फटाके तापवण्याचा उद्योग केला होता. आईने वेळेवर पाहिले म्हणून फटाके पाठीवरच फुटले..

आणखी काही -

१) जळती काडी समोरच्या मित्राच्या केसांना लाऊन केस कसे जळतात ते पहाणे.
२) होल्डर मध्ये करकटकची दोन्ही टोके घुसवणे आणि बटण चालू करणे. (फ्युज घालवून घरात अंधार करणे)
३) एलेक्ट्रीक लायटर मध्ये सेफ्टी पिन घालणे. (आणि शॉक लागून मागच्या मागे धडपडणे)
४) शाळेत बाईंनी मुलींच्या मागे बसायची शिक्षा दिल्यावर पुढच्या मुलीच्या केसांची टोकं बाकावरच्या खिळ्याला बांधणे. (आणि दुसरी शिक्षा मिळवणे)

दिवाळीला कुत्राच्या शेपटीला फटाके अन फुलझडी बांधुन पळवणे ...एकदा तर ते कुत्रे कापसाच्या गंजीत घुसले अन आग पेटली होती . मग काय आमची दिवाळी ..पाठीवर जोरजोरात फटाके ....फटके Happy

दिवाळीला कुत्राच्या शेपटीला फटाके अन फुलझडी बांधुन पळवणे ...
>>सॉरी.. पण मला खूप वाईट वाटतं असं कुणी केल्यावर (आत जळतं म्हणतात ना तसं काहीतरी).. मग कुत्री आक्रमक झाली तरी आपण त्यांना मारणार..
बाहेर फटाके वाजले तरी कुत्री घाबरून बसतात घरात.. त्यांच्या ऐकू येण्याच्या क्षमतेमुळे त्यांना जास्त त्रास होत असावा... Sad

किरु... Lol

एकद दरवाज्याचा बेल खराब झालेला म्हनुन बाबांनी काढुन ठेवलेला. मी तो कसा वाजतो पाहण्यासाठी हातात धरुन त्याचे दोन्ही वायर्स प्लग केले नि बटन चालु.. Proud एक्दम कोनि तरी काना खाली जाळ काढल्या सार्खा झाला, डोक्याला मुंग्या आलेल्या.. मला वाटले बाबांनी मला मारले म्हणुन हातातली बेल सोडुन मागे पाहीले. तर मागे कोनिच नाही Sad मग मला शॉक बसला याची जाणीव झाली. म्हंटल अजुन एकदा टेस्ट करावी म्हनुन परत तोच प्रकार केला.. Proud अंगातुन झाटके आल्या सार्खे, फिट आल्या सार्खा एकटाच वाकडा तिकडा नाचाय्ला लाग्लो.... त्यात ति बेल हातातु सोडतोय तरी सुटेना.. Sad कसे बसे दुर पडलो नाचत. मग इकदे तिकदे पाहीले. कोनीच नव्हते.. हुं कि चु न करता सगळ्या वस्तु आपाप्ल्य जागी ठेवल्या Proud

(नंतर प्रत्येक वेळा इलेक्ट्रिकल काम करताना शॉक बसलाय Proud कधी चुकुन, कधी मुद्दम Wink )

१) धरमवीर पिक्चर टिव्हीवर पाहिल्यानंतर कॉटवरून लोखंडी स्टुलावर उडी मारण्याच्या प्रयत्नात डोक्याला खोक पडून चांगले ५ टाके पडले होते.
मला ते डान्स करताना हिरो लोक गुढग्यावर घसरत जातातन ना, त्याचं लै क्रेझ होतं.. Proud अस्मादिकांनी खुप वेळा पलंगावरुन उडी मारुन घसरण्याचा प्रयत्न केला... परिणाम सांगायची गरज नसेलच Proud

माझ्या काकुच्या एका शेजारांच्या कडे एक बराच मोठा पितळी हंडा होता (पाणी भरायचा)..
एकदा त्यांचा मुलगा( ३-४ वर्षांचा) त्यात उभा राहिला. हळूहळू त्यात बसायचा प्रयत्न करु लागला आणी शेवटी बसलाच कसातरी. मग बाहेर काही निघता येईना, आतच मांडी घालून बसून राहिला. तोंड बाहेर!
थोड्या वेळानी त्याच्या आईचे लक्ष गेले. तिनेही बरेच प्रयत्न करुनही निघाला नाही. मग माझे काका हिरोहोंडावर, मागे त्या काकू अन त्यांच्या हातात मुलगा बसलेला हंडा, अशी वरात निघाली लोहाराकडे Lol
लोहाराने हळूहळू तळ कापला अन कार्ट्याला हळूहळू सोडवले Proud Lol
मला तर अजुनही हा सीन आठवून हसू येते Happy

Pages