Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28
'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधुकर
मधुकर
मला दिवसभर घराबाहेर हुंदडायला
मला दिवसभर घराबाहेर हुंदडायला आवडायचे! (सगळ्यांनाच आवडते म्हणा! ;-)) पण आई दुपारी मला बळे बळे थोडा वेळ तरी झोपायला लावायची. अनेकदा मी टक्क जागी असायचे आणि तीच झोपून जायची. मग दबक्या पावलांनी हळूच गॅलरीत जायचे, माझा एक आवडता रबरी बाहुला होता ''अनिरुध्द'' नावाचा.... त्याला तिसर्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली रस्त्यावर टाकायचे! रबरी बाहुला असल्याने तो तुटा-फुटायचा धोका नव्हता. मग बाहुला पडला.... अनिरुध्द पडला करत आजीला सांगायचे, ''आजी गं, अनिरुध्द ना खाली रस्त्यावर पडलाय, मी आत्ता घेऊन येते हं त्याला...'' आणि खाली धूम ठोकायची......
एकदा अनिरुध्दला ताब्यात घेतले की खालच्या अंगणात प्राजक्ताच्या झाडाखाली खेळत बसायचे. दुपारच्या वेळेमुळे सामसूम असायची. वाड्यातील इतर मैत्रिणीही आपापल्या घरी असायच्या. मी एकटीच अंगणाची मालकीण.... मेरे आँगनकी रानी..... भरपूर हुदडायचे..... मग आईला जाग आली की तिला माझे आचरट उद्योग कळायचे.... स्वयंपाकघराच्या खिडकीतून खालचे अंगण दिसायचे........ तिची करड्या स्वरातील हाक ऐकू आली की मात्र मला घरी जाण्यावाचून गत्यंतर उरायचे नाही. घरी गेल्यावर तिला लाडीगोडी लावली की मग संध्याकाळी पुन्हा खाली अंगणात हुंदडायला परवानगी मिळायची. तेव्हा वाड्यातल्या इतर मुलीही असायच्या. दगड की माती, विषामृत, लंगडी, शिरापुरी वगैरे खेळ रंगायचे. मग अगदी दिवेलागणी झाली, अंधार पडून दिसेनासे झाले, बाकी सर्व पोरट्या आपापल्या घरी पांगल्या की मी पाय ओढत ओढत, मळक्या कपड्यांनी, उस्तरलेल्या अवतारात घरी परतायचे.
मी लहान असताना एकदा आमच्या
मी लहान असताना एकदा आमच्या घरी बाबांचे एक दारुडे मित्र आले होते.
ते दारु पिऊन आल्याचा आई बाबांना राग होताच. पण कशाला बोला म्हणुन गप्प होते.
निघताना बाबांच्या मित्राने मला १०० रुपये दिले....
मी चक्क त्यान्चा तोन्डावर ती शम्भरची नोट फाडली.
आणि वर डायलॉग ..... " मी दारुद्या माणसान्कडुन पैसे घेत नसतो !! "
ह्या सत्कार्यासाठी मला नंतर चॉकलेट मिळाले !!
बापरे मधुकर!!! हा फारच नसता
बापरे मधुकर!!! हा फारच नसता उद्योग होता तुमचा.
अरुंधती, विषामृत, दगड का
अरुंधती, विषामृत, दगड का माती, हे माझ्याही लहानपणीचे खेळ होते.
मधुकर, ग्रेटच.
मला वाटतं, तूम्ही सगळ्यांनी मोठं व्हायलाच नको होतं !!!
दिनेशदा, अजून तरी कुठे मोठं
दिनेशदा, अजून तरी कुठे मोठं झाल्यासारखं वाटतंय?
आमच्या वाड्यात खाली गॅरेजच्या छोट्याशा जागेत पत्र्याच्या छताच्या अरुंद खोलीत एक कुटुंब रहायचे. एवढी छोटीशी जागा असूनही घर एकदम लख्ख, टापटीप. ते काका घरात फार जागा नसल्यामुळे अनेकदा अंगणात बसलेले असत. त्यांना तपकिरीचा नाद होता. तासातासाने ते तपकीर ओढत आणि सटासट १५-२० शिंका देत. मोठ्याल्ल्या नाकपुड्यांत ते आपल्या चट्टेरी पट्टेरी पायजम्याच्या खिशातली डबी उघडून, त्यातली तपकीर काढून कोंबत. त्यांच्या शिंका पाहून आम्हा बच्चे कंपनीला फार हसू येई. मग आम्हीही त्यांच्या शिंकांची त्यांच्यासमोरच नक्कल करत असू. ते फार स्पोर्टिव्हली घ्यायचे. त्या तपकिरीविषयीही जाम कुतुहल वाटायचे.
एक दिवस आमच्या हट्टाला बळी पडून त्यांनी आम्हाला प्रत्येकाला चिमटी- चिमटीभर तपकीर ओढायला दिली. झाले!! कल्पना करा, वय वर्षे आठ ते बारा वयोगटातील ६-७ पोरटी नंतर अर्धा तास अशक्य शिंका देत बसली होती. डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. नाकात अतिशय हुळहुळत होते. आणि एकमेकांना शिंकताना पाहून जाम हसू येत होते. पण एवढा अनुभव आम्हाला पुरेसा होता. मग आम्ही कधीही त्या काकांकडे तपकिरीचा हट्ट केला नाही. उलट त्यांना फार छळले की तेच धमकी द्यायचे, ''थांब, तुला तपकीरच ओढायला लावतो!'' की आम्ही तिथून ''नक्को, नक्को'' करत पळ काढायचो!! घरी अर्थातच कोणीही ह्या सर्व घडामोडींचा थांगपत्ता लागू दिला नाही!!!
ओळखीच्यांचा एक मुलगा.. प्रचंड
ओळखीच्यांचा एक मुलगा..
प्रचंड उचापती..
तो एकदा नरसोबाच्या वाडीला गेला आणि चक्क दत्तांच्या पादुका घालून बाहेर पडला...
हे ठीक असं म्हणावं असे त्याचे पुढचे उपद्याव होते..
एका लग्नात त्यानं बरंच खाल्लेलं.. हा अजून लाडू मागत होता म्हणून आई म्हणाली आता बास..
हा स्टेजवर चढला.. डोळे मिटले, कानावर हात ठेवले आणि जोरजोरात 'आयSSS लाडू' 'आयSSS लाडू' 'आयSSS लाडू' असं ओरडायला लागला.. imagine त्याच्या आईला कसलं कानकोंडलं झालं असेल..
त्यानही मधुकरसारखच - 'गम्मत' म्हणून सोफ्याखाली फटाके लावलेले दिवाळीत!
हा शेवटचा किस्सा ऐकल्यावर तो मुलगा घरी येणार म्हटलं की मला धडधडायचं
नानबा
नानबा
नानबा, तुमसे ये उम्मीद नही
नानबा, तुमसे ये उम्मीद नही थी
>> मुझेभी
आणखीन एक असाचः
आम्ही सगळी चुलत भावंड, काका वगैरे सगळे उन्हाळ्याच्या सुटीत एकत्र होतो..
मला तेव्हा सुलटं-उलट कळायचं नाही.. किंबहुना मी उलटीच चप्पल घालायचे हमखास!
एकदा मी अशीच उलटी चप्पल घातलेली तर माझ्यापेक्षा ७ एक वर्षानं मोठ्या असलेल्या चुलतभावानं ते पाहिलं.. त्यानं मला विचारलं की तू चप्पल उलटी का घालतेस.
मी: "कारण माझं डोकं उलट आहे ना म्हणून"
त्याला फारच मजा वाटली .. की येवढी छोटी मुलगी असं उत्तर देते..
त्यानं सगळ्या भावंडाना, मोठ्या माणसाना बोलवलं की ही काय म्हणते बघा..
त्यानं मला पुन्हा (सगळ्यांसमोर) विचारलं की तू चप्पल उलटी का घालतेस.
मी त्याच टोन मधे "कारण तुझं डोकं उलट आहे ना म्हणून" असं उत्तर दिलं..
सगळ्यांना उत्साहात बोलवून आणलेल्या त्याचा बिचार्याचा चेहराच पडला..
लहानपणी इतकाच आगाऊपणा/उपद्व्याप केलेले की नंतर बराच काळ जावा लागला माझी ती इमेज बदलायला
आमच्या बाबांना आमचे वाढदिवस
आमच्या बाबांना आमचे वाढदिवस लोकांना बोलावून साजरे करायला आवडायचं नाही. तुमचे वाढदिवस आणि उगाचच लोकांना कशाला भुर्दंड असं त्यांच लॉजिक होतं. पण मला प्रेझेंटचं खूप आकर्षण होतं ( कोणाला नसतं म्हणा
). कोणाकडून २ तेलीखडू मिळाले तरी त्याचं अप्रूप वाटायचं.
तयारीला फक्त एक तास असताना आईनी सगळं कसं मस्तं पार पाडलं आणि मी केलेल्या उद्योगाचंही कौतुकच केलं 
एके दिवशी माझ्या भावाच्या वाढदिवसाला गल्लीतल्या सगळ्या मुलांना मी आमंत्रण देऊन आले की आमच्याकडे संध्याकाळी ५:३० ला या. आई-बाबांना कळलं तर प्लॅन कँसल होईल म्हणून त्यांना पत्ताच लागू दिला नाही. ४:३० ला हळूच आईला सांगीतलं की मी भावाच्या वाढदिवसाला सगळ्यांना बोलावलं आहे आणि ते ५:३० ला येतील. आई चाट. तिनी लगेच मला अंडी आणि वेफर्स, भावाला भेळेचं सामान आणायला पाठवलं. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून रसनाचं सरबत केलेलं होतंच. रवा-बेसनाच्या वड्या पण केलेल्या होत्याच.
केक, भेळ, रवा-बेसन वड्या, वेफर्स, रसना सरबत असं मुलं येइपर्यंत तयार होतं
रजनीगंधा, सेम पिंच! फक्त मी
रजनीगंधा, सेम पिंच! फक्त मी असं समस्त बच्चाकंपनीला दिवाळीच्या फराळाला बोलावलं होतं.... आणि सर्व मित्रमैत्रिणी आपल्याकडे संध्याकाळी फराळाला येणार आहेत म्हणून आईला दुपारी १ - १:३० ला सांगितलं!!!
बिचार्या आईने मग आजीच्या मदतीने ताजा चिवडा, शंकरपाळे व चकल्या केल्या. शिरा भाजला. लाडू बहुतेक होतेच घरी! पण तिने हे जेमतेम ३-४ तासात, घरातली बाकी सर्व कामे सांभाळून केले आणि माझ्या मित्रमैत्रिणींना घरचा ताजा फराळ खाऊ घातला. वर ह्याबद्दल मला ती कधी रागावलीही नाही!!!!
मी साधारण साडे तीन वर्षाची
मी साधारण साडे तीन वर्षाची असतानाची गोष्ट. मला ते कुत्र्याला खायला घालतात ना बिस्कीट ते खाण्याची फार इच्छा होती पण आई बाबा साहजिकच नको म्हणायचे. एकदा आईने मला नाक्यावरच्या वाण्याकडून (तो लोणीही विकायचा)
लोणी आणायला सांगितले तो ओळखीचा होता. मी लोणी तर विकत घेतलेच पण मला "त्या" बिस्किटाचा मोह आवरेना म्हणून २ ती बिस्किटे घेऊन (५ पै.ला एक) घरी निघाले वाटेत कसेबसे एक खाल्ले दुसरे अर्धवट खाऊन घरी गॅलरीत ठेवले. आईने विचारले १० पै कमी कसे? मी म्हटले त्या वाण्याने इतकेच दिले .तिचे लक्ष्य बिस्किटाकडे गेले ...मी लगेच तत्परतेने उत्तर दिले "अगं कावळ्याच्या तोंडातून पडले जाता जाता" पुढे आईने आपल्या लेकीला नीट ओळखत असल्याने माझ्याकडून वदवून घेतले तो भाग वेगळा....
माझी बहीण ४थीत असताना गीता
माझी बहीण ४थीत असताना गीता शिकायला जायची . नुकतीच सुरुवात असल्याने तिला खूप उत्साह होता.
एकदा तिला घेऊन आई बाबा एकांकडे त्यांच्या आई वारल्या म्हणून भेटायला गेले. त्या बिचा-या खूप रडत होत्या. माझ्या बहिणीला काही ते सहन झाले नाही तिने लगेच म्हटले ,"कशाला रडता काकू अहो जन्माला आलेलं माणूस कधीतरीजाणारच" माझ्या आई बाबांना थोबाडीत मारल्या सारखं झालं.
> लहानपणी इतकाच
> लहानपणी इतकाच आगाऊपणा/उपद्व्याप केलेले की नंतर बराच काळ जावा लागला माझी ती इमेज बदलायला

आमची आता बरोब्बर इमेज बनतेय बर का तुझ्याबद्दल
>दिनेशदा, अजून तरी कुठे मोठं झाल्यासारखं वाटतंय?
अगदी बलोबल.
माझ्या एका वाढदिवसाला (बहुतेक
माझ्या एका वाढदिवसाला (बहुतेक ७-८ वर्षाच्या) असेच आजुबाजूच्या लोकांना बोलावले होते. बर्याच जणांनी गिफ्टं(!) आणली होती. पण एकाने काहीच आणले नव्हते (व हातही रिकामेच दिसत होते - हे बघण्याची नि कळण्याची अक्कल कशी होती काय माहित!). मी आईला बहुतेक तेथेच बावळटासारखे म्हटले "आई, ह्यांनी काहीच आणले नाहीये". आईची जामच पंचाइत झाली असणार पण ती मला सांगू लागली की "अरे सगळेचजण काही गिफ्ट आणतात असे नाही" पण त्या बिचार्यानी तातडीने खिशातून गिफ्ट म्हणून आणलेली पेन्सिल मला देऊ केली तेव्हा कुठे अस्मादिकांचे समाधान झाले.
मी ४ थ्या वर्गात असताना
मी ४ थ्या वर्गात असताना गडचिरोली वनविभागातर्फे घेतल्या जाणारी कुठली तरी वन्य प्राणी निबंध स्पर्धेची परिक्षा दिली, जिल्ह्यात पहिला आलो. मग एटापल्लीच्या वनविभाग हापिसातुन सर्टीफिकेट व २०० रुपये रोख अशी रक्कम घ्यायला वसतीगृहात बोलवने आले. भलं मोठं सर्टीफिकेट हातात घेऊन येताना बघुन शेजारच्या शिक्षक कॉलनीतील चेतना ताईनी ( १२वित शिकत होती) विचारलं. मधुकर कुठे गेला होतास, हातात काय आहे ते ? ये ईकडे. मी तीच्या जवळ जाउन ते दाखवत होतो तेवढ्यात मागुन तीच्या आईनी विचारलं. मधु मग या सर्टीफिकेटच आता काय करणार.
मी लगेच उत्तर दिलं. बाजारात जाणार आणी प्रेम करणार!!!!!!!!!!!
आणि घरातील सगळे जोरात हसत सुटले.
(५वीत इंग्रजीची तोंडओळख व्हायची व मी आजुन ४थीतच होतो म्हणून फ्रेम (ऐकीव) चं प्रेम झालं)
५ वीत असतानाची घटना. ABCD शिकवुन झाल्यावर शब्दार्थ व त्याचे उच्छार शिकवायाला सुरुवात झाली.
प्रत्येकानी उभं राहुन ५ शब्द व त्यांचा अर्थ सांगायचं होतं. माझा नंबर आला. Doctor या शब्दाला मी डोसीटोर असं वाचलं. पुढचे कित्येक महिने इंग्रजीच्या तासाला खाली मान घालुन बसायचो.
माझी मावस बहीण ७-८ वर्षाची
माझी मावस बहीण ७-८ वर्षाची असावी, खुप उपदव्यापी होती. एक दिवस चुकुन तीच्या हातात कात्री लागली. तीची आई कोणाशीतरी ग्प्पामधे रंगली असताना या पट्टीने आईच्या आंगावर खेळता खेळाता आईच्या डोक्यावरचे केसंच कापले. नंतर चांगलच मार खावं लागलं तीला.
वा मधुकर! तुमची लेखनाची चुणुक
वा मधुकर! तुमची लेखनाची चुणुक तुम्ही लहानपणीच दाखवली तर!
"सार्खे तर गळ्याला पडत आहेत,
"सार्खे तर गळ्याला पडत आहेत, मला नाही पहायचे"

पने
लहानपणी शाळेत विज्ञानाच्या तासाला वस्तुंचे प्रसरण आकुंचण वगैरे शिकवलेले. त्यात विविध पदार्थांचे वेगवेगळे तापमान वगैरे असे काहीसे शिकवलेले. घरी जाई पर्यंत एकच गोष्ट डोक्यात राहीलेली कि काच गरम झाल्यावर वितळते..
घरी जाउन मी हे असे कसे होते ते पहायचे ठरवले
मग काय.. घरी गेल्यावर काचेचं काहीतरी शोधा. तेवढ्यात लक्श शेल्फ मधल्या बाटली कडे गेले... ति बाटली होती कि बरणी आठवत नाही. पन त्या वेळेस काचेच्या बरण्या म्हणजे आईला खुप आवडायच्या... त्यातलीच एक घेतली नि (नशीब) रिकामी करुन ठेवली गॅस वर. मग काय त्याच्या कडे बघत बसलो. मग लक्शात आले की अरेच्चा काच वितळल्यावर सगळं गॅस वर सांडनार..
मग आई ओरडेल की म्हणुन त्याल पातेल्यात ठेवुन तापवायचं ठरवलं, पण ती बरणी बसेल असं काही सापडेच ना... तो पर्यंत इकडे गॅस चालुच नि गॅसवर ति बरणी. मग जाउदे आधी वितळू तर दे नंतर बघु म्हनुन विचार सोडला नि त्याच्या समोर अगदी जवळ तोंड करुन बघत बसलो. थोड्यावेळाने कशा साठी तरी जागेवरुन उठलो तेवढ्यात मोट्याने आवाज आला नि स्वयंपाकघरभर सगळ्या काचा...
मागे वळुन पाहीलं तर गॅस मंदपणे जळत होत, पण त्यावर बरणी नव्हती.. 

मग काय आई कडुन मला नवा 'धडा' मिळाला त्या दिवशी..
मी एटापल्लीला वसतीगृहात होतो
मी एटापल्लीला वसतीगृहात होतो तेंव्हाची गोष्ट. पैसे असणारी मुलं गावातील धोब्याकडनं कपडे ईस्त्री करुन आणत. मला त्या ईस्त्री केल्या कपड्यांचं फारच कौतुक वाटे. वरुन काय तर खीशावर किंवा मागे फुलाच्या डिझाईनच स्टी़कर कि काय ते ठेवून ईस्त्री केल्यास ती डीझाईने त्या शर्टवर उमटत असे. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे पैसे देऊन ईस्त्री करणे तर शक्यच नव्हते. मग एक युक्ती सुचली. ताटात निखारे टाकायचे व शर्ट ईस्त्री करायचं. मग काय, निखा-यानी भरलेलं ताट शर्टवर ठेवल्यावर मोठं भोकच पडलं. पुढल्या आठवड्यात चींदी बाजारातनं ५ रुपयात शर्ट विकत घ्यावं लागलं.
चींदी बाजाराबद्दल अधिक माहीतीसाठी ईथे वाचा.
http://mdramteke.blogspot.com/2010/01/blog-post_27.html
१) माझा मुलगा २ १/४ वर्षाचा
१) माझा मुलगा २ १/४ वर्षाचा आहे. त्याला 'पिताजी' हा नवीन शब्द २ दिवसांपूर्वी कळला. पण अर्थ माहित नव्हता. तो पिताजी पिताजी असं ओरडत होता म्हणून मी त्याला सांगितलं, 'पिताजी' म्हणजे 'बाबा'. पण त्याचा विश्वास बसला असं वाटलं नाही म्हणून मी त्याला म्हणाले, 'बाबांना विचार, 'पिताजी' म्हणजे बाबा का?' त्याने जाउन नवर्याला (त्याचा बाबांना) विचारले, 'बाबा, 'पिताजी' म्हणजे तुम्ही आईचे बाबा आहात का?'
२) माझी ३ १/४ वर्षाची भाची शुभंकरोती म्हणत होती
शुभंकरोती कल्याणम |
आरोग्यम धन संपू दे ||
~साक्षी.
आरोग्यम धन संपू दे ||>>
आरोग्यम धन संपू दे ||>>
आमच्या शेजारी राहणारा एक
आमच्या शेजारी राहणारा एक मुलगा एकदा म्हणत होता "सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा."....
मी बरेच दिवस शुभंकरोती
मी बरेच दिवस शुभंकरोती म्हणताना 'घरातली पीडा बाहेर जाउ दे, बाहेरची पीडा घरात येऊ दे' म्हणत होते
पने
पने
सगळे किस्से भन्नाट..
सगळे किस्से भन्नाट..
>>तो एकदा नरसोबाच्या वाडीला
>>तो एकदा नरसोबाच्या वाडीला गेला आणि चक्क
नानबा, पटत नाही... तिथे सगळ्याना आत सोडतच नाहीत..
साक्षी, निंबुडा

लहान असताना (वय अंदाजे
लहान असताना (वय अंदाजे साडेतीन) मला बाबांचे ऐकून ऐकून गणपती अथर्वशीर्ष चांगलेच पाठ झाले होते. आणि ते मी कधीही, कोठेही म्हणत सुटायचे. एकदा बाबांचे काही मित्र पुण्यात आले होते त्यांच्याबरोबर आम्ही कोणत्या तरी हाटेलात गेलो होतो. मित्रमंडळींची ओली व सामिष पार्टी चालू होती. बाबांच्या एका मित्राने ''बाळा तुला काय काय म्हणता येते'' असे मला मोठ्या प्रेमाने विचारायची घोडचूक केली आणि झाले! माझी अथर्वशीर्षाची गाडी जी सुरु झाली ती थांबेचना!
सगळ्यांना जाम हसू येत होते आणि मी मात्र पुढ्यातील सामिष पदार्थांना खाता खाता जोरजोरात अथर्वशीर्ष म्हणत होते!
मी बरेच दिवस शुभंकरोती
मी बरेच दिवस शुभंकरोती म्हणताना 'घरातली पीडा बाहेर जाउ दे, बाहेरची पीडा घरात येऊ दे' म्हणत होते >>> काय पीडा आहे

मी साधारण साडे तीन वर्षाची
मी साधारण साडे तीन वर्षाची असतानाची गोष्ट. >>
साडे तीन वर्षाची असताना नाक्यावरून लोणी आणायला पाठवलं?
Pages