लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक फूल. हंड्याचा किस्सा जबरदस्त!!! माझ्या मामाने लहान्पणी हाच उद्योग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला होता. त्याने डोकं हंड्यामधे अडकवून घेतले होते Proud

माझा एक मावस मामा होता. तो माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा असेल. त्याची आई शिक्षिका (माझ्या आईची मावशी) वडिल जेलमधे नोकरीला आणि काका -काकू धारवाड मेंटल हॉस्पिटलमधे डॉक्टर!!!!

गल्लीत कुणाशी मारामारी वगैरे काही झाली की याचा नेहमीचा डायलॉग. "थांब माझे बाबा जेलमधे गेलेत. परत आले ना की घेऊन येतो तुझ्या घरी" Proud

स्व:तच्या मुंजीमधे त्याने भटजीची शेंडीची गाठ पाठीमागे खांबाला बांधून ठेवली होती. फोटोग्राफरच्या कृपेने असा गाठ बांधतानाचा फोटो पण आहे. अल्बम बघताना "हा कुठला नविन विधी?" असा प्रश्न कित्येकाना पडायचा.

Rofl

मी आय.ई.एस., पवई या शाळेत होतो तेव्हाची गोष्ट. शाळेची नवीन ईमारत तेव्हा जंगलात बांधली होती (आताचा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पण तेव्हा तिथे जंगल होतं, आणि जराशी आदिवासी वस्ती). मुलं-मुली शाळेत जायला अक्षरशः घाबरायचे. पण आमचा ग्रुप मात्र सकाळी उजेडायच्या आधीच शाळेत हजर, कारण एवढ्या लवकर शिपाईकाका आलेले नसायचे, बिनधास्त हुंदडायला मिळायचं. गेटला एक भगदाड होतं, त्यातुन आम्ही आत शिरायचो. काही दिवसांनी ते भगदाड बंद केलं आणि आम्ही दुसर्‍या दिवशी पाहतो तर आत शिरायचा मार्ग बंद झालेला. देवेंद्र गेटच्या खालुन लोळत आत गेला, पण त्याचं शर्ट मळलं. मग समीर गेटवरुन चढुन आत गेला. आता माझी पाळी, मीसुद्धा गेटवर चढलो, पण ऊतरताना पंचाईत! काही केल्या मला ऊतरणं जमेना. शेवटी माझी पँट गेटच्या टोकाला अडकली आणि मी चक्क त्या गेटला लटकलो. पुर्ण दिवस ती फाटकी पँट कशी सांभाळली ते माझं मलाच माहीत. कारण मी वर्गाचा मॉनिटर, त्यामुळे शिक्षक तास संपवुन बाहेर गेले की आम्हाला वर्गासमोर ऊभं रहायला लागायचं. Uhoh वरुन घरी आल्यावर आईचे धपाटे मिळाले ते निराळेच. Sad

शाळेची फी परवडत नसल्यामुळे माझं नाव आय.ई.एस., पवई इथुन कमी करुन प्रार्थना समाज हायस्कुल, विलेपार्ले या शाळेत टाकलं (इयत्ता ६वी).
ईथे ज्या वर्गात मी होतो तो वर्ग मस्तीखोर म्हणुन प्रसिद्ध होता शाळेत. नंतर नंतर तर मस्ती एवढी वाढली की आम्हाला ८वी ते १०वी एकच वर्गशिक्षिका, सहस्त्रबुद्धे बाई (या शाळेतील सर्वात कडक शिस्तीच्या म्हणुन प्रसिद्ध होत्या), आणि एकच वर्ग, मुख्याध्यापिकांच्या ऑफिससमोरील. Sad बाकी सर्व इयत्तांचे वर्ग वर्षाअखेर बदलायचे, आम्ही मात्र त्याच खोलीत. अजुनही माझ्या घरी ही गोष्ट माहीत नाहीये. Wink

या शाळेत मधल्या सुट्टीत बाहेर फिरायला परवानगी होती, अट एकच, मधली सुट्टी संपायच्या आधी शाळेत हजर राहायचे. एकदा का कैर्‍या दिसु लागल्या झाडावर, की आम्ही पार्ल्यात धुडगुस घालायचो. एकदा असंच कैर्‍या पाडत असताना चुकुन एका रिक्षाची काच फुटली. झालं, रिक्षावाल्याने आमची पाठ काढली आणि एका मुलाला पकडलंसुद्धा. त्याला मळेकर बाईंच्यासमोर (मुख्याध्यापिका) हजर करण्यात आलं. आमचा वर्ग मस्तीखोर म्हणुन शाळेत प्रसिद्ध होताच, हे प्रकरण पाहुन बाईंनी मधल्या सुट्टीत मुलांना बाहेर पडायला मज्जाव केला. Uhoh शाळेतल्या सर्व मुलांनी आम्हाला शिव्यांची लाखोली वाहली. अजुनही शाळेत मधल्या सुट्टीत बाहेर पडायला मज्जाव आहे. Uhoh Lol Biggrin

आमच्या शाळेच्या आवारात एक चिंचेचं झाड होतं. मुलं दगड मारत असत. रस्त्यावर जाणार्‍यांच्या दोन तीन तक्रारी आल्या होत्या दगड लागल्याच्या. लगेच एक मोठा फळा लिहिला गेला.
'चिंचेच्या झाडावर दगड मारू नयेत. मारल्यास मुख्याध्यापकांकडे नेऊन शिक्षा केली जाईल.'
चार दिवसांनी कुणा 'हुशार' मुलाने मजकूर थोडासा बदलला होता.
'चिंचेच्या झाडावर दगड मारू नयेत. मारल्यास चिंचा खाली पडतील.'

एकदा मी शाळेतुन येईपर्यंत घराला कुलुप घालुन घरातले मी शाळेतुन येई पर्यंत ते परततील या अंदाजाने कुठे तरी बाहेर गेलेले. पण उशीर झाल्याने मी घरी येई पर्यंत घराला कुलुप. मग नेहमी प्रमाणे वाट पहावे म्हणुन बाहेरच कट्ट्यावर बसलो. अस्मादिकांना एक युक्ती सुचली. घरातले परते पर्यंत त्यांना आश्चर्यचकीत करन्यासाठी एक काम केलं. झाडाखाली वाट पहायचं सोडुन घारामागुन खिडकीचा आधार घेत पत्र्यावर चढलो. घराच्या पत्र्याला एका ठिकाणी भगदाड होतं (जे अजुनही आहे Proud - तसं आम्ही ते घर केव्हाच विकले. असो...) मग मी तथुन लोंबकळत आत उतरलो. पत्रा जमिनि पासुन १२ फुट उंचिवर. Uhoh मग एक वाशाला लटकत दुसरा वाशा पकडुन कसा बसा दरवाज्यावर पाय ठेवुन कडमडत जमिनिवर येउन आपटलो... ढोपर फुटलं, पण चावी नसताना घरात येवु शकल्याच्या आनंदात काहीच वाटलं नाही.. आता घरातले मस्त आश्चर्य चकीत होतील. Proud मग थोडया वेळात कोणी तरी परतेल म्हणुन वाट पाहत बसलो. पण कोणीच लवकर परतेना... Sad घरात जाम बोर मारायला लागले.. परत बाहेर हि जाता येईना. बाहेरुन कुलुप ! मग काय गप वाट पाहत बसलो. इतक्यात आजोबा आले. त्यांच्या कडं चावी नव्हती म्हणुन कट्यावर बसुन कोणाशी तरी गप्प मारतान मी ऐकले. मी आतुन आवाज देउन त्यांना बोलावलं. मी आत आहे कळ्ळ्यावर ते रागानेच बोलायला लाग्ले. मला ते कळ्ळंच नाही असं काय झालं ते. Sad मग त्यांनी आत मध्ये ड्रोवर मध्ये स्पेअर चावी आहे ती आणुन द्यायला लावली, कुलुप उघडुन आत आले नि झोडपायलाच लागले.. Sad अचानक झालेल्या हल्ल्याने प्रतिकार करायचं सुचलंच नाही. रडत रडत मार खाल्ला... नि वर तोंड करुन विचारलं मी काय केलं म्हनुन.. त्यावर काहीच उत्तर नाही मिळालं. नंतर आजोबांनी सांगितलं की असं यायचं नसतं घरात. Angry स्वतःच्याच घराच्या चोर वाटा सगळ्यांना काय सांगत फिरायचं अस्तं का.....

मल्ली Lol

हंड्याचा किस्सा जबरदस्त आहे.
वरती खडूचा उल्लेख आहे ते वाचून आमचे कॉलेजचे उद्योग आठवले (आम्ही लहानच होतो. मी १४ वर्षांचा ) आम्ही खडूच्या नखाने गोल चकत्या करत असू. मग त्यावर एक रेघ नखाने मारली, कि ती औषधाची गोळी दिसे, अश्या शेकडो गोळ्या करून आम्ही खिडकीत ठेवून देत असू.
त्यावेळी नवरंग सिनेमा परत लागला होता. आधा है चंद्रमा गाण्यातली मडक्याची उतरंड पण खडूत कोरुन काढत असू.
सगळ्यात अवघड प्रकार असायचा तो साखळी कोरून काढायचा. फार चिकाटी लागते त्याला.
पण आमच्या प्राध्यापिकेने ते बघून आमचे कौतूकच केले होते. काही नमूने, घरी दाखवायला नेले होते.

अकु Proud

मल्ली Lol

आम्ही बँगलोरला असताना (जॉब करत असताना) घराच्या मेन गेटची एकच किल्ली होती आणि आम्ही ४ मुली.. तर डुप्लिकेट किल्ली करून घ्यायची सोडून - आळशीपणे गेट शेजारच्या भिंतीवरून उड्या मारायचो (रात्री यायला उशीर व्हायचा तेव्हा)...

आत्ता वाटतय, की किल्ली करून घ्यायला जरा कमी कष्ट पडले असते नाही! Lol

नानबा... डिट्टो! माझी बहीण बंगलोरला जॉब करत असताना घराचे मेन गेट रात्री दहा-साडेदहाला घरमालक बंद करायचे. मी तिच्याकडे गेले की आमच्या भटकंतीत घरी परतायला व्हायचा उशीर. आणि आम्ही बाहेर जाताना हमखास किल्ली न्यायला विसरलेलो असायचो. मग त्या कंपाऊंड वॉल वरून आत जिन्यावर उडी मारायची. अनेकदा त्यात अंधारात पायरी नीट दिसली नाही की पुन्हा धडपडश्चमे व बोंब! दुसर्‍या दिवशी घरमालक विचारायचे, ''रात को ज्यादा देर हो गयी क्या? तुम लोग चाबी क्यूं नही लेके जाता? बहुत लगा तो नही?'' Wink Lol

मी लहानपणी एकदा कॉड लिव्हर ऑईलची गोळी सुईने फोडून पाहिली होती. ते सोनेरी तेल चवीला कसं लागतं त्याची जाम उत्सुकता होती. नंतर हाताचा वास जाता जात नव्हता आणि बरेच दिवस त्या ऑईलची चव आठवून उमासे यायचे. दिसतं तसं नसतं हेच खरं Proud

नानाबा.. Lol

आम्ही कॉलेज मध्ये असताना रात्रीच्या पिक्चरला जायचो तेव्हा पंचाईत व्हायची. आमची रुम तिसर्‍या मजल्यावर. मालक अपार्ट्मेंटच्या बेसमेंटला लॉक घालायाचे... चावी एकाकडेच. मग काय, वरात हॉस्टेल कडे मित्राच्या रुम वर. तिथेही गेटला चावी असली की कंपाउंड वरुन उडी मारुन मागच्या साईडला बाथरुमच्या खिडकितुन आत जायचो.. Proud

मित्र नेहमी ओरडायचा, च्यायला एक चावी करुन घ्यायला येत नाही. रात्रभर भटकुन असली चिंघीगीरी करन्या पेक्शा ते सोप्प आहे ना...:राग:. आम्ही करु बे राहुदे म्हणत परत बे चा पाढा पंचावन्न करायचो Proud

ती एक स्कूटर असते ना, एक पाय त्या स्कूटरवर आणि एका पायानी ती पळवायची, एकदा ती स्कूटर भाऊ (राहुल) चालवत होता. ती स्कूटर जरा जूनी झाली होती, म्हणून त्याचा पत्रा एका बाजूनी बाहेर आला होता. चालवता चालवता तो पत्रा ह्याच्या पायाच्या बोटाला लागला. लागला म्हणजे काय बोट कापलं जाऊन आतलं मांस दिसत होतं आणि भळाभळा खूप रक्त वाहात होतं. आई ओरडेल म्हणून ह्यानी त्यात रक्त थांबायला (का जखम लपवायला) बागेतली भरपूर माती भरली आणि मला म्हणाला की कुणाला सांगु नको मला लागलय म्हणून.
मी तत्परतेनी आईला जाऊन सांगीतलं की "राहुलला खूप लागलय आणि त्यानी त्यात खूप माती घातलीए" Proud आई त्याला पटकन डॉक्टरांकडे घेऊन गेली, जखम साफ करताना डॉक्टरांच्या नाकी नऊ आले, आणि आई नाही पण डॉक्टर त्याला जखमेत माती घातली म्हणून खूप ओरडले Happy

एकदा "मला मोठी सायकल चालवायची आहे" म्हणून बाबांची मोठी काळी सायकल घेऊन गेला. आमच्या इथल्या रस्त्यावर डांबरीकरणामुळे पूर्ण खडी टाकून ठेवली होती. ५ मिनीटात दोन्ही रक्तबंबाळ गुडघे घेऊन सायकल हातात धरून महाशय परत Happy

एकदा बाबा आणि राहुल License To Kill बघायला गेले होते. पिक्चर बघून येताना सेनादत्त पोलिस चौकी समोर, अगदी चौकीच्या दारात, गाडी स्लिप होऊन दोघे पडले (राहुल गाडी चालवत होता हे सांगायला नकोच). ह्या वेळी बाबांचे गुडघे फुटले. पोलिस सहाजिकच बाहेर आले, काय झालं बघायला. राहुलकडे license मागीतला, जो तो चुकुन (असेल, असेल) घरी विसरून आला होता. मग हे दंडाची पावती फाडून घरी आले. लायसेंन्स घरी विसरला, गुडघे आणि दंड ह्या कारणांनी बाबांनी त्याला without license kill करायचे बाकी होते Happy

>>बाकांकडे बघून वाटत नाही ह्यांनी इतकी पडझड

आता राहुल म्हणेल

राहोंकी जेहमतोंका तुम्हे क्या सुबूत दू?
राहोंकी जेहमतोंका तुम्हे क्या सुबूत दू?

मंजील मिली तो पाँव के झाले नही रहे.

Happy

ह्या बाफच नाव "लहानपणीचे (स्वतःचे) नसते उद्योग" असं बदलूया का?
नाहीतर हा किश्श्यांचा ओघ थांबायचाच नाही Sad

आणि ह्या किश्श्यांवरून परिक्षा करू नका. मी एक साधा, सरळमार्गी 'मुलगा' आहे. Proud

Pages