लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा , लेखन गुगल देवाला शरण जाऊन करत आहे. थोड्या चुका मानून घ्याव्या य़पुधे चुका कमी करण्याचा प्रयत्न करेन

काचेच्या बाटलीत फटाके किती जणांनी फोडलेत.
मी एकदा (५-६ वीत असेल तेंव्हा) लक्ष्मी फटाके एका बाटलीत फोडत होतो, बाटली बरीच जाड काचेची असल्यांमुळे लवकर फुटली नाही, शेवटी तिने दम सोडला, भरपुर तुकडे होउन अंगावर उडाले होते, पण नशीब की लांब जाउन उभे राहण्याची बुद्धी झाली होती, काही लागलं नाही.
पेट्रोलच्या रिकाम्या डब्यात गॅसचा लायटर पण एकदा पेटतो का ते बघितलं होतं, डब्याच्या तळाशी शिल्लक राहिलेल्या पेट्रोलने पेट घेउन तिन बोटांचं फ्रेंच फ्राय झालं होतं.
एक मित्र डिंग्या मारत होता की सायकल कशीही चालवली तरी तो घाबरत नाही वगैरे. त्याच्या बरोबर पैंज लावली माझ्या मागे डबल्सिट बसुन दाखव, तोही तयार झाला, मग सायकल जोरात पळवली आणि त्याला घाबरवण्यासाठी वाकडी तिकडी केली, थोड्याच वेळाने तो त्याचा पार्श्व भाग चोळत पडला होता (बिचारा आठवडाभर लंगडत चालत होता) आणि मी माझा पुर्ण सोलपटलेल्या गुडघ्यावर दगडी पाला चोळत होतो.
टेस्टर पिन मध्ये खोचुन दिवा लागलेला पाहिला, मग शोध लागला की मागे हात लवला तराच दिवा पेटतो पण करंट बसत नाही, मग टेस्टरच्या पुढच्या टोकाला हात लावला तर करंट बसेल का? आणि दिवा लागेल का? >> दिवा लागला नाही पण झणझणीत करंट बसला होता Wink

अनन्या वर्तक, तुम्ही माणसांचे केस कापलेत. माझ्या मित्राने लहानपणी एकदा मांजरीच्या मिशा कापल्यात. आता बोला!
आ.न.,
-गा.पै.

मी लहान असताना एडिसन चाळे करीत असे तेव्हाचा एक किस्सा

एकदा बाबांनी रात्री मला थॉमस अल्वा एडिसन अन लाइट बल्ब फिलामेंट ची गोष्ट सांगितली तेव्हा मी खुप इंस्पायर झालो व त्यांना विचारले की "बाबा लाइट पेटतो कसा हो?" आता माझे वय ५ की ६ बाबांनी मला मोघम सांगितले की बाबारे "फिलामेंट ला उष्णता मिळाली की ती तापते लाल होते अन प्रकाश पडतो" मग मी विचार करत क
झोपलो सकाळी उठलो ते घरी दिवाळीच्या माळा लावायची गड़बड़ सुरु होती त्या सीरीज मधे काही इटुकले लाइट दिसले अन आमच्या डोक्यात बल्ब पेटला की बुआ जर आपण आपल्या तोंडात बल्ब धरला तर फिलामेंट गरम होऊन प्रकाश पडेल अन तोंडात पेटता दिवा बघायला मौज वाटेल तेव्हा मी सीरीज मधला एक बल्ब दातात धरला पण बेटा काही जळेना मग त्याला अजुन हीट द्यायची म्हणुन आम्ही तो अजुन कचकन दाबला ते तो फट करून दातांतच फुटला अन तोंड भर काचा आई आवाज ऐकून धावत बाहेर मग पाण्याचे शिपकारे मारून काचा काढणे डॉक्टर बोलावणे त्यांनी कापसाचा बोळा मुखातुन फिरवणे झाले तरी काच पोटात गेली आहे का ही शंका होतीच् म्हणून दिवसभरात दीड डझन केळी खायला घालणे वगैरे सगळे सोपस्कार होऊन आज आम्ही जित्ते राहिलो आहोत!

माझ्या मित्राने लहानपणी एकदा मांजरीच्या मिशा कापल्यात >>>> हायला, हे उद्योग आमच्या अर्धांगाने पण केलेत

सोन्याबापु डेंजर हो..

बापरे, वाट लागली हसून

माझाही एक किस्सा

मी ३ - ३.५ वर्षांची होते, सो मला काही आठवत नाही पण सगळ्यांनी इतक्यांदा ऐकवला आहे की चित्र उभे राहते डोळ्यासमोर

मम्मी मला घेऊन गावी गेली होती मामा कडे, तेव्हा मामीला बाळ होणार होते
एकदा मी अन मामी दोघीच घरी होतो, मामी मला काहीतरी खाऊ भरवीत होती
तेव्हा तिचे मोठे सुटलेले पोट पाहून मी तिला विचारले की त्यात काय भरलेय
तर तिने मला सांगितले त्यात बाळ आहे
मग आम्ही स्वभावाप्रमाणे हट्ट धरला की मला आत्ताच्या आता बाळ बघायचंय
मामीने खूप समजवयाचा प्रयत्न केला तरी माझे काही समाधान झाले नाही, मी अचानक उठले अन गोठ्यातून खुरपे घेऊन आले
म्हटले तू दाखवत नाहीयेस न तर मीच फाडून बघते
मामी ईतकी घाबरली कि ७ महिन्याची गरोदर असूनही ४ मोठया खोल्या धावत पळत पार करून अंगणात आली अन तिच्यामागे हातात खुरपे घेऊन मी सुद्धा

आम्हाला पाहून शेजारच्या आज्जीने कसेबसे समजूत काढून माझ्या हातातले खुरपे काढून घेतले

नशीब कोणाला काही इजा झाली नाही

अजूनही बरेच पराक्रम केलेत, ते पुन्हा कधीतरी

Bapre Proud
VB d Don Rofl
dangerous ahat ekdam Wink

solid ahe ha dhaga
hasun hasun purevat
sarw kisse ekso ek bhari ekdam

हानपणी इलेक्ट्रिक प्रयोग (चुंबक बनवणे वगैरे) म्हणजे जीव कि प्राण होता. पूर्वी बॅटरीमध्ये मोठे सेल असत. तसे संपलेले एकदोन सेल घरी पडून होते. सतत लाईट जात असे म्हणून हा सेल चार्ज करायचे ठरवले. घरी कोण नसताना मित्रांना बोलवून उद्योग सुरु केला. त्या सेलला दोन्ही बाजूला दोन वायर्स मेन प्लग मधून (थेट २४० वोल्ट) जोडल्या. वायर्स निघू नयेत म्हणून दोन्ही बाजूला दोन जाडजूड लाकडी ओंडके लावले. आणि एक दो तीन... म्हणून स्वीच सुरु केला.

इथला तिथला नव्हे. थेट बाहेर गल्लीतल्या खांबावरचा फ्युज उडाला होता. सेल चार्ज व्हायचा राहिला बाजूला पण सगळ्या गल्लीची वीज गायब Biggrin Lol

असले प्रयोग करतानाचे लहानपणीचे एकाहून एक अफलातून किस्से आहेत. सांगताना मजा येते. लिहायचा कंटाळा. पण यथावकाश लिहितो.

माझी मुलगी २ १/२ वर्षांची असतानाची गोष्टं. माझी आई रोज पूजा करायची आणि नैवेद्य म्हणून गूळ ठेवायची. माझ्या मुलीला गूळ खूप आवडायचा. अगदी पूजा होईपर्यंत तिथेच ठाण मांडून बसायची. आईनं तिला एकदा म्हटलं, नुसता गूळ नाही मिळणार. देवाला नमस्कार कर आणि म्हण "देवा, मला सुखी ठेव".
लेक लगेच म्हणाली , "देवा, सुखी रहा" Happy

मी असेन चौथी-पाचवी मध्ये. मला सायकल वर भटकायला खूप आवडायचं. माझी मैत्रीण आणि मी, दोघी रोज नवीन रस्त्यावर जायचो. एकदा आई-बाबां सोबत जवळच्या एका धरणावर गेलो होतो. सुंदर परिसर होता. घरी अल्यावर मैत्रिणीला सांगितलं खूप वर्णन करून. ती खट्टू झाली. मग मला वाईट वाटलं, तिला म्हटलं हाय काय अन नाय काय, तुझे आई-बाबा तुला नाही घेऊन जात ना, मीच घेऊन जाते. मला माहित आहे रस्ता. (चांगलं २०-२५ किमी होतं Happy )
निघालो दोघी सुद्धा सायकल वर. साधारण २-३ किमी गेल्यावर एक नदी लागली. तिला म्हटलं, अगं, हि नदी काल लागली होती. आपण बरोबर जातोय. पण पूल पार करायची हिम्मत तिला होईना. मी तिला धीर देत होते. तेवढ्यात एक ओळखीचे काका दिसले. इतक्या लांब तुम्ही दोघी काय करताय? अंधार पडेल आता, घरी पळा, नाहीतर आई-बाबांना सांगतो घरी येऊन, असा दम दिला. घरी कळलं तर चांगलीच पट्टी पडणार, म्हणून चुपचाप घरी परतलो. पण मैत्रिणीला काय पोटात राहवेना. तिने तिच्या आईला सांगितलं. झालं.... तिच्या आईने आमच्या कडे येऊन इतका आरडा-ओरडा केला!!

वाहत्या पानावर झाडावर चढण्याचे उद्योग लिहीले तेव्हांच असा एक बीबी असल्याची आठवण आली. आता वाचून काढला. मजा आली.

स्व:तच्या मुंजीमधे त्याने भटजीची शेंडीची गाठ पाठीमागे खांबाला बांधून ठेवली होती. फोटोग्राफरच्या कृपेने असा गाठ बांधतानाचा फोटो पण आहे. >>> मला ही थाप वाटतेय..

Pages