Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28
'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसरी
दुसरी किंवा तिसरीत असेन फारतर, त्यावेळी पुण्यात पाषाणला राहायला होतो. उन्हाळ्याच्या सुटीसाठी म्हणुन धाकटी आत्या सहकुटूंब आमच्याकडे आली होती. तिची मुले आणि आम्ही भावंडे पळापळी खेळत होतो. (आम्ही त्याला शिवणापाणी का असेच काहीतरी म्हणायचो) आमच्या घराशेजारीच त्यावेळी गवळीवाडा होता. बहुतेक विठ्ठलराव निम्हण यांचा बंगला तिथेच होता तेव्हा. त्या बायका घराच्या अंगणात मोठे मोठे तीन तीन फुटाचे खड्डे करुन त्यात शेण साठवायच्या आणि त्याच्या गवर्या करुन विकायच्या. पळता पळता आत्याचा मुलगा चैतन्य त्या शेणाच्या खड्ड्यात पडला. मी पळत पळत घरी आलो. घरी आई-आण्णा, आत्या-मामा गप्पा मारत बसले होते. मी एकदा सगळ्यांकडे बघितले आणि आईला म्हणालो...
"आई, वन्संचा मुलगा शेणात पडला! "
क्षणभर कुणाला काही कळलेच नाही, कळल्यावर जो हास्याचा स्फोट झाला........
***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)
विशाल, तू
विशाल, तू कार्टूनच होतास लहानपणी
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
>> एवढे
>> एवढे चांगले काम करुन मी मात्र बोलणी खाल्ली >> मो
>विशाल, तू कार्टूनच होतास लहानपण< अश्वे लहानपणी ??? आत्ता तरी कुठं बदललाय तो?
लहानपणी
लहानपणी आम्ही सारे आमच्या मुळगावी (कर्नाटक मध्ये) गेलेलो. तिकडं घरात गाई, म्हशी,शेळ्या नि बैलं आहेत. भावाचा का कुणास ठाउक म्हशी कडे जास्त लक्ष असायचा. त्याचे एक दोन किस्से इतके हसण्यासारखे आहेत कि बस्स ! त्यातला एक हा.
दुपारी एकदा भाउ म्हशीला चारा खाउ घालत बसला होता. त्याला सवय होती कि हातातला चारा म्हैस पुर्ण तोंडात घेई पर्यंत तो धरुन बसायचा. त्या दिवशी मात्र त्याने म्हशीच्या रेडकुला ज्वारीचा चिपाटी (कड्बा) खाउ घालत होता. ती चिपाटी चांगलं चार हात लांब होती. ते रेडकु ति चिपाटी खात खात पुर्ण त्याच्या हाता जवळ आलं. भाउ मग ति चिपाटी पुर्ण त्याच्या तोंडात गेल्यावर त्या रेडकुच्या मागं जाउन शेपुट उचलुन उभा राहीला. इतक्यात वडील आले. त्याना हा नक्कि काय करतोय ते समजलं नाही म्हणुन त्याला विचारलं. तो म्हणाला "मी पुडुन म्हशीच्या पिल्लुला मोट्टं चिपाटी खाउ घातलंय. ते या पिल्लु म्हशी पेक्षा लांब होतं म्हण्न इकडं मागुन बाहेर आलय का बघतोय.." (अर्थात तो कन्नड मध्ये बोल्ला !)
दुसरा एक किस्सा म्हणजे दुपारी कोणी घरि नसताना, त्याने नि माझ्या दुसर्या एका छोट्या भावाने मिळुन पाँड्स पावडरचा अख्खा मोट्ठा डबा म्हशीच्या तोंडाला लावुन रिकामा केलेला. थोडं थोडं लावत डबा कधी रिकामा झाला त्यालाही कळ्ळे नाही. कारे म्हंटल्यावर म्हणतो "एवढं पावडर लावुन सुधा बघा अजुन म्हैस किती काळीच आहे ती.."
---------
आठवणींतले क्षण !
मल्ल्या
मल्ल्या पावडरचा किस्सा भन्नाट

मल्ल्या
मल्ल्या पावडर..
एकटीच हसतेय..
-------------------------
विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला.
अगं तिला
अगं तिला तिचं बालपण आठवलं असेल. दक्षे तुलापण एक डबा लागत असेल ना एका वेळेला?
***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)
अगं तिला
अगं तिला तिचं बालपण आठवलं असेल. दक्षे तुलापण एक डबा लागत असेल ना एका वेळेला?

---------
आठवणींतले क्षण !
मल्ल्या....
मल्ल्या.... पावडर म्हंजे ! खल्लास अगदी !
आम्ही राहुरीला असतांना क्वार्टरजवळच २-४ किराणा दुकाने होती. त्यातले एक 'बेल्हेकर' यांचे दुकान ,,, एक दिवस त्यांच्याकडे मालाचा टेंपो आला! आमच्या कॉलनीतील एक कार्ट गेलं होतं त्या दुकानात.. ! टेंपोचा मागचा दोन लोखंडी फळ्यांचा मोठ्ठा दरवाजा...अन कुलूप्..टेंपोवाला दुकानदाराबरोबर मालाचा हिशोब करत बसलेला! दरवाजा जरी कुलूप लावलेला तरी थोडासा ओढला की तिरपा उघडतो ना तसा .... ह्या कार्ट्याने खालुन त्याची बारीक बोटं बरोबर आतमधे ठेवलेल्या मालाला लागली.. नेमकं मागे लिमलेटच्या गोळ्यांचे पॅकेट्स भरलेले! मग काय याने दिले ब्लेड मारुन! हा SSS पाऊस लिमलेटच्या गोळ्यांचा...! बरं स्वतःपुरते ठेवावे ना याने... ही बोंब ठोकली कॉलनीमधे येउन..! मग काय आम्ही सगळ्या कार्ट्या त्याच्यामागे..फुकटात मिळतय तर सोडत कोण...! मी तर माझ्या लहान भावाला ३ चाकी सायकल घेउन ( एकास दुसरे सोबत चांगले ना म्हणुन) टेंपोकडे पळालो..! सगळ्या पोरांमधे लोटालोटी... लिमलेटच्या गोळ्या झेलायला..! बरं पोरच ती..एक पॅकेट संपलं की दरवाजाच्या खालुन हात घालुन दुस-या पॅकेटला ब्लेड मारायची!
शेवटी त्या वाण्याच्या लक्षात आलं नि मग काय! तो अन त्याचे असिस्टंटस आमच्या मागे....!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
नयने, काय
नयने, काय वात्रट होतीस गं लहानपणी..
बाप रे ..
बाप रे .. जाम म्हणजे जाम च हसायला आलं बाबा ..

काय व्रात्य कार्टी येतात इथं हुंदडायला आपलं उंडगायला .. आणि हो दिवे बिवे काही देणार नाही म्हणलं .. मी अग्दी सीरिअस्ली लिवलंय ..
लहानपणी आमच्याकडे एकदा कोणीतरी पाहुणे आले होते तेव्हा त्यांचे चहापान चालू असताना माझा भाऊ(वय ४/५) तिथे त्यांच्यापुढे जाऊन म्हणाला "ओ मी तुमच्या चहात जरा बिस्कीट बुडवलं तर चालेल का तुम्हाला?"
बिच्चारे पाहुणे नाही म्हणावं तरी पंचाईत आणि हो म्हणलं तरी पंचाईत .. शेवटी 'हो'च म्हणले बिच्चारे .. आणि करावाच लागला कप पुढे भावाच्या .. वर असंही म्हणले "काय धीट आहे हा मुलगा .. " (मनात म्हणले असतील कसलं इदरकल्याणी कार्टंय..)
) खरी मजा तर पुढे च आहे .. हे करून सवरून भाऊ निवांत गुपचूप ती बाटली होती तशी टेबलवर ठेवून आला.आणि नंतर घरी कुणीतरी आले होते त्याना आईने त्याच बाटलीतून पाणी दिले.. ते म्हणत होते कसलातरी वास येतोय पाण्याला.. 
याच भावानी एकदा एका दिड लीटरच्या पेप्सीच्या रिकाम्या बाट्ली त २-४ उदब्त्त्यांचा धूर भरलेला (चेष्टा नाही हं येतो भरता आणि मग हळूच बाटलीचं पोट जरा दाबाय्चं मग सिग्रेट्ची वलयं अस्तात तशी वलयं निघतात
<<<<< ओ मी
<<<<< ओ मी तुमच्या चहात जरा बिस्कीट बुडवलं तर चालेल का तुम्हाला! प्रिया
असले प्रकार मी पण केलेत..! एखादी काकु घरी येउन गेल्या की पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा कधीतरी योग यायचा! मग स्वतः आत किचनमधे जाउन सांगायचे... " काकु पोहे करा!" बाहेर आल्यावर आईने कितीही डोळ्यांनी दाबले तरी मी विचारायचे," मग, त्या आपल्याकडे आल्या तेव्हा आपण नव्हते का केले?"
***
आमच्या बॉसच्या घरी कामाला असलेला मुलगा १२-१३ वर्षाचा असेल्..बॉसच्या फोनची रिंगटोन नेहमी बदलवुन ठेवतो.. मजा तेव्हा येते , जेव्हा बॉस त्यांच्या बॉसबरोबर महत्त्वाच्या मिटिंग मधे असतील त्यावेळेस रिसेप्शनिस्टला सांगुन तो त्यांना मोबाईल करायला लावतो. बॉसची आधीची छान सॉफ्ट गाण्याची रिंगटोन सोडुन अशी काहीतरी "चोरी चोरी चोरी दिल ले गई, हायो रब्बा .." किंवा कुठल्यातरी साऊथकडच्या भाषेतील दणदणीत रिंगटोन ऐकली की बॉसच्या तोंडावरचा रंग उडतो..आणि तो मोबाईल कुठे ठेउ ( लपऊ ) असे त्याला होते .! आणी आम्ही मग मजा बगतो!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
माझा भाउ
माझा भाउ खुपच मस्ति करायचा लहानपणी. वड्लांच्या नोकरी मुळे आम्ही तेव्हा मालवण ला रहात होतो. आणि तिथे माझ आजोळ सुध्धा होत. मामाकडच्या बागेत नारळ - पोफळी इ. वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यावेळीच तिथे टारझन चित्रपट आला होता.
त्यावेळि तो तर मि टरझन बनणार म्हणायचा. निर्-फणसाची मोठी मोठी पाने पाठीवर लावायचा, हातात नारळाच्या पानांचे तिर घ्यायचा (ति त्याचि तलवार असायची) आणि आमच्या कुत्र्याच्या पाठीवर बसुन सगळीकडे फिरायचा. त्या तिरांनि आम्हा सगळ्या बहिणींना मार मार मारायचा. मोठयांकडे तक्रार केली तर झाडांवर चढुन बसायचा. आणि टारझन चित्रपटातिल कोणत तरी गाण गायचा जोर जोराने.
आता आम्ही सगळे भेटलो कि आठवणि काढुन खुप हसतो.
मला वाटतं
मला वाटतं मी हे लिहिलंय जुन्या मायबोलीवर कुठेतरी...
सापडत नाहीय म्हणून परत टाकतेय.
आम्ही माझ्या लहानपणी भाड्याने रहात होतो त्या घरमालकांचा कुत्रा होता मोती म्हणून. अगदी गरीब होता बिचारा.
एकदा तो नि मी अंगणात उन्हात खेळत होतो नि मला एकदम काय झाले कोणास ठाऊक. मी त्या कुत्र्याचाच कडकडून चावा घेतला. कुत्रा जोराने भुंकून विव्हळला तशी स्वैपाकघरातून आई धावत आली. तोवर मी भोकाड पसरलेले. तिला बिचारीला वाटले मलाच कुत्रा चावला. ती मला थोपटू लागली नि माझे कान फुंकू लागली. (नागपूरकडे लहान मुले घाबरली की भीती घालवायला असे करतात.)
इतका वेळ अंगणात बसून सगळा प्रकार बघणार्या म्हातार्या मालकीणबाई शांतपणे म्हणाल्या,
'अहो, तुमच्या लेकीचे नाही...माझ्या कुत्र्याचे कान फुंका..:))
या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून माझ्या बहिणी नि नवरा माझी यावरून चेष्टा करतात
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सुमॉ,
सुमॉ, कुत्र्याला इंजक्शनं वगैरे घ्यावी लागली का?
अजून
अजून माझ्या बहिणी नि नवरा माझी यावरून चेष्टा करतात >>>
सायो, तो
सायो, तो कुत्रा नंतर मेला असं म्हणून बहीण छळते अजूनही
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
तरीच
तरीच तूम्ही सुपरमॉम! पण कुत्रा उलट चावू शकला असता ना
'कलीयुग'
'कलीयुग' 'कलीयुग' ,हणून भुंकला असावा कुत्रा.
सुमॉ तू
सुमॉ

तू अगदी कहर आहेस
(No subject)
*************** युद्
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
मगाशी मी
मगाशी मी इथे एक दोन किस्से लिहायला आले होते, पण वरचे किस्से वाचुन नुसतीच गडबडा लोळुन गेले. माझे किस्सेच विसरले
मधल्या सुट्टीत शाळेच्या आसपास (नजर चुकवुन) सगळे पकडा पकडी खेळायचे. एकदा माझा भाऊ असाच खेळताना पडता पडता वाचला, पावसाळ्याचे दिवस होते म्हणुन हात मात्र चिखलाने बरबटले. शाळेची बेल पण झाली तेव्हढ्यात, हात धुवुन वर्गात जायला उशीर होईल म्हणून त्याने समयसुचकता
दाखवुन एका घराच्या समोर वाळत घातलेल्या पाढर्या पंचाला हात पुसले. नंतर बरेच दिवस आम्ही तिथुन जायचोच नाही. अजुनही मला ते घर आठवतय 
आमच्या आधीच्या घरा समोरच्या लेन मधे एक वाडा होता, तिथल्या आजी एकदम भांडकुदळ होत्या. आम्ही दुपारचे मैत्रिणीच्या घरी पासिंग द पार्सल खेळत होतो. सगळ्यांनी मला त्यांच्या घराला कडी लावुन ये अशी शिक्षा दिली. मी पण गेले, कोणी नाही बघून मस्त कडी घालुन आले. १/२ १ तासाने जे किर्तन सुरु झाल ना त्यांच ते आम्ही वरुन चोरुन बघत होतो. कुणी तरी बिचार्याने जाऊन कडी काढली असावी त्याला पण प्रसाद मिळाला आमच्या नावाचा. एकंदर सगळीच त्यांच्या मागे हात धुवुन लागायची. आमच्या गल्लीतली मुल पिकत पेरू घ्यायची नी त्यांच्या समोर उभ राहुन खायची. त्यांना वाटायच त्यांच्या झाडाचे पाडुन खातोय. त्या जे शिव्या द्यायच्या ना की बस रे बस (हे खाण्याचा प्रोग्रॅम करण्या आधी आम्ही त्यांच्या झाडावर दगड भिरकावलेले असायचे
)
माय गॉड!
माय गॉड! सुपरमॉम ग्रेटच आहात तुम्ही! कुत्र्याला आंघोळ घातली होती का? आणि नक्की कुठल्या ठिकाणी चावलात तुम्ही कुत्र्याला????
आणि हो, आमच्याकडे पण लहान मुलांचे कान फुंकतात.... घाबरला किंवा पडला तर!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
कुत्र्याल
कुत्र्याला आंघोळ घातली होती का? >> नयने , आता काय त्याचं ?
सुमॉ आहे इथेच , कुत्र्याचं पुढं काय झालं तिलाच माहीत !
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
दिप्या,
दिप्या, हायजिनिक पॉईंट ऑफ व्ह्यु ने विचार कर ना! तोंडामधे जंतु जात नाही का... कुत्र्याच्या अंगावरचे! म्हणजे सुमॉ किती हेल्दी आहेत हे कळतं ना!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
माझ्या
माझ्या पुतणीला शाळेत सरांनी प्रश्न विचारला की, आपले होम मिनिस्टर कोण आहेत?
हिने उत्तर दिले "आदेश बांदेकर".
वर्शा ..
वर्शा .. एकदम सही.
एक जुनी
एक जुनी आठवण... मित्राच्या मातोश्रींनी सांगितलेली. त्या शिक्षीका आहेत.
प्र.: कोळी लोकांचे प्रमुख व्यवसाय सांगा.
उ.: नाचणे व गाणी म्हणणे.
(त्यावेळी कोळीगीतं फुल फॉर्ममध्ये होती)
आणि नक्की
आणि नक्की कुठल्या ठिकाणी चावलात तुम्ही कुत्र्याला????


आदेश बांदेकर
मला "दुध कौन देता हौ ? - हमारा भैया !" आठवले....

@अमित...
----------------------------------------
नदी चालते वाट सासरची,
गिरी माहेरचा स्तब्ध पाहतो.
ती निघते; ठेउन फक्त ओलावा,
अन मेघ रडुन पाठवनी करतो.
Pages