पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमकी
हो. पुर्‍या झक्कास होतात. Bedmi Puri / Urad Dal Kachori या पाककृती गुगल करुन पहा. अशा कचौडी बरोबर बटाट्याची रस्सा भाजी अमेझिंग लागते.

लाडुही करता येतील बाय द वे.

@ रैना धन्यवाद ! पण अग माझ्याकडे उडीद डाळीचं तयार पीठ आहे ...या दोन्ही रेसिपीत उडीद डाळ भिजवून वाटायची आहे.

गवारीच्या शेंगांची आमटी, शेंगदण्याचा कूट+हिरव्या मिरच्या घालून कशी करतात कुणाला माहीत आहे का?
खान्देशात हा प्रकार बरेच जण करतात.

वरदा >>पण आलूपराठे करण्याइतकं (म्हणजे सारण भरलेले उंडे धडधाकट लाटण्याएवढं) कौशल्य अंगात आहे>> असे उंडे भरायला नको असतील तर माझ्या पाखुंमध्ये सोप्पा उपाय सापडेल बघ. नोड ४१५२

सद्ध्या आंब्याचा सिझन असल्यामुळे भरपुर आंबे घरात आहेत. आंब्याचा जॅम कसा करतात ते कोणी सांगु शकेल का??

चमकी, उकडीसारखा दिसणारा `घुटं`' नावाचा एक प्रकार माझी जुनी शेजारीण करायची तो बहुतेक उड्दाच्या डाळीचं पीठ वापरून.

रोचीन, आंब्याच्या जॅमची उद्या फोटोसकट पाकृ लिहिन मी.

साक्षी, मायबोली गणेशोत्सव २०१२ ग्रूप पहा. त्यात 'मिसळम् पाकम्' स्पर्धेत सफरचंदाच्या पाकृ आहेत.

धन्स मंजूडी...
मी ही टाकली होती तिथे पाकृ, पण त्यात गोड सफरचंदे वापरली होती. बाकीच्या पाकृ वाचते परत एकदा आणि सफरचंदं मार्गी लावते Happy

बन्डुदा
भाज्लेले दाणे+मिर्चि+लसुन हे पेस्त सार्खे वाटून घेने. जिरे+थोडि मोहरी फोडनी करुन हळ्द टाक्णे. आता त्यात गवार टाकायची. २ मिनीट पर्तुन जित्की पात्ळ हवी तित्के गर्म पानी टाकुन एक उक्ळी आल्यावर वरील पेस्त टाकणे. मीथ टाकुन शिजु द्यावी. झाली भाजी त्यार.
वरील पेस्त कर्ताना कोथ्बीर ही टाकु शक्तात.

घरी थोडी आंबट सफरचंदे आहेत ३-४. काय करता येईल? आंबट असल्यामुळे नुसतीच खाणं शक्य नाही.
>> लोणचं घाला. सीरीयसली सांगतेय. Happy

कैरीचं धावतं लोणचं घालतो तसं.

saakshi ह्या लिनक्स तुझ्या साठी

सफरचंद खोबरे कचोरी
साक्षी हे तुझेच मोमोज
सफ़र रिंग
हे जागुचे सफरचंद कटलेट

नाहीतर अगो च्या रेसिपिने थालिपिठे करता येतील. Happy

१)बटाटा भाजी(उकडून)
२)चवळी--हिग्,राईच्या फोडणीवर चवळी शिजवावी.जिरे-खोबरे वाटून घालणे. गूळ घालणे
३)मूगागाठी--साले काढलेले मूग हिग्,राई ,कढिलिंबाच्या फोडणीवर शिजवावे.मीठ तिखट घालणे.थोडे धणे-खोबरे
चिंच वाटून घालणे.
४)फ्लॉवर+बटाटा
५)चणा डाळ+कोबी

Pages